"गेम ऑफ थ्रोन्स"

Submitted by लोला on 21 August, 2013 - 21:33

"गेम ऑफ थ्रोन्स" ही George R. R. Martin यांच्या पुस्तकांवर आधारीत एचबीओची लोकप्रिय मालिका तुम्ही बघता का? बघत नसाल तर बघू लागा. तीन सीझन्स पूर्ण झाले आहेत. प्रत्येक सीजनचे १० एपिसोड http://www.hbogo.com वर उपलब्ध आहेत. तुम्ही केबलवर एचबीओ घेतले असेल तर या साईटवर तीनही सीझन्सचे सर्व एपिसोड संपूर्ण पहाता येतील.

ऑफिशियल वेबसाईट (spoiler)
http://www.hbo.com/game-of-thrones/index.html

हा अतिशय लोकप्रिय शो most pirated show आहे. तिसर्‍या सीझनच्या प्रिमियरनेपायरसीचे रेकॉर्ड केले आहे.पाहिल्यावर कारण कळेलच.

वरच्या लिंक्सवर शोबद्दल माहिती मिळेलच.

जे पहात आहेत त्यांनी न लाजता इथे चर्चा करा. हा माझा फार आवडता शो आहे. मी सर्व एपिसोड पाहिलेले आहेत. चौथा सीझन मार्च २०१४ मध्ये सुरु होईल. त्यापूर्वी आधीचे पाहून घ्या. कोणी कितपत पाहिले आहे ते लिहीलेत तर बरे होईल. पुढचे काही फोडले जाणार नाही याची दक्षता घेता येईल.

हा interactive map तुम्हाला उपयोगी पडेल. कोणते राज्य कुठे आहे तसेच एपिसोड प्रमाणे कोणते पात्र कसे ट्रॅव्हल करते ते दिसेल. तुम्ही पाहिलेत तिथपर्यंतच जा, फार पुढे जाऊ नका.

करा तर मग सुरुवात. बघाल तर हसाल, न बघाल तर फसाल!

"When you play the game of thrones, you win or you die. There is no middle ground." - Cersei

Group content visibility: 
Public - accessible to all site users

GOT नेटफ्लिक्सवर नाही. HBO वर दर सोमवारी पहाटे 6.30 वाजता दिसतं. पण त्यावर सेक्स, न्यूडीटी, व्हायोलन्स बेसिस वर बरीच काटछाट असते म्हणे.
मी हॉट स्टार प्रीमियमवर uncut वरजन्स पहाते. कारण TV वरच्या काटछाटीमध्ये काही महत्वाचा क्लयु हरवेल असं वाटतं मला.
बाकी ओळखीतले यंगस्टर्स, पॉपकॉर्न आणि अशाच प्रकारच्या साईट्स वरून डाउनलोड करतात असं पूर्वी कळलं होतं, पण त्या साईट्सवर पायरेटेड कॉपीज असतात.

किरणुद्दीन,
मी पायरेटेड कॉपी डाउनलोड केल्यात.

ऑल बेसेस कव्हर्ड.... सिजन ८ एपीसोड ४ ची वाट बघणे चालू...

माझा अंदाज टिरियन लॅनिस्टर ऐनवेळेस काहीतरी घोळ घालणार... फायनल मारामारी एगॉन टार्गारियन आणि सेर्सी लॅनिस्टर मधे होणार.. आर्या स्टार्क क्वीन ऑफ नॉर्थ होणार... ब्रॅन तिसरा डोळा उघडून काहीतरी अगम्य घडवणार ज्याच्यामुळे दोनचार जणांच्या डोक्यांची शकलं होणार..
डॅनी बिचारी होणार आणि एगॉनची क्वीन होणार. सर ब्रियेन आणि जेमी लॅनिस्टर युद्धात भाग न घेता नॉर्थला निघून जाणार.. सॅम सिटाडेल मधे मोठा माणूस होणार.. ग्रेजॉय एकमेकांतच लढून मरणार..

हाउंड माउंटनला मरणार
जेमी सर्सीला मारणार
डॅनी किंवा जॉन कशानेतरी मरणार.
कोणीतरी युरॉनला मारेल

डॅनी किंवा जॉन कशानेतरी मरणार>>> या दोघातील एकतरी जिवंत राहील असं वाटतंय. हाऊस टार्गॅरियन संपवून नाही टाकणार पूर्ण.

यारा जिवंत आहे - तिने मारायला हवं यूरॉनला.
सर्सी आर्याच्या लिस्टमध्ये आहे. धाकट्या भावंडाने मारायचं भाकित पुस्तकात होतं की टीव्ही शोमध्ये?

आर्याच्या हिरोइक कामगिरीनंतर तिला संपवतील अशी मला धास्ती लागून राहिली आहे.

सर्सीकडे गोल्डन कंपनीची वीस हजार फौज आहे. नॉर्दर्नर्स संख्येने आता कमी आहेत, पण याराचे लोक आणि तो डारिओ नहारिस यांना आता बोलावता येईल.

धाकट्या भावंडाने मारायचं भाकित पुस्तकात होतं की टीव्ही शोमध्ये?>> टिव्ही शो मधे पाहिल्यासारखं नाही आठवत, मेबी पुस्तकात असेल. पण तरीही जेमी किंवा टिरीयन यांपैकी कोणीतरी मारेल.

आणि व्हॉट अबाउट फेसलेस मेन? ते किती आहेत आणि ते आर्याने बोलावलं तर येतील का?>>> येतीलही, पण तिने बोलवायची शक्यताच कमी वाटतेय...त्यांचं अवतार कार्य आर्याला 'नो वन' बनवण्यापुरतंच असावं.
बाकी त्या ब्रॅनचा थ्री आय्ड रेवन असण्याचा बॅटल ऑफ विंटरफेल मधे तरी काहीच उपयोग नाही झाला (तो मस्त वॉर्ग होवून 'अ‍ॅव्हेंन्जर्स' पाहून आला Wink ) आता सर्सीविरुद्धच्या लढाईत तरी उपयोग व्हावा नाहीतर फुकटची हवा झाली त्याची असे वाटेल.

गॉट इज फेमस फॉर बिइंग अनप्रेडीक्टेबल , काहीही होऊ शकतं !
बर्फाळ युध्दात आइस वर्सेस फायर झालं आता सर्सीचा वाइल्ड्फायर वर्सेस ड्रॅगन्स , थोडक्यात आता फायर वर्सेस फायर मधे काय होतय पहायचं !
याराने युरॉनला मारावे , सर्सी आर्या कधी भेटच झाली नाहीये, आता बघु ती सर्सीला मारते कि टिरियन !
मला अजुनही शंका आहे टिरियनबद्दल .. त्याची आणि सर्सीची मीटींग आपल्याला अर्धवटच दाखवली, नक्की काय बोलले अजुन गुलदस्त्यातच आहे, टिरियन डॅनीला सान्सासाठी धोका देइल कि सर्सीसाठी ?
डारिओ नहारीस पण गायब आहे, तो सर्सीला सामील होइल का आयत्यावेळी प्रकट होऊन जोराह सारखा त्यागाने मरेल ?
डॅनीला सॅम मारेल असं वाटतय, वडिल आणि भावाचा बदला !
जॉन जीवंत राहील का? जर तो एकदा मरून पुन्हा आलाय तरी काहीतरी पर्पज सर्व्ह केल्यावर तोही मरायला हवा लॉजिक नुसार !
सान्सा लेडी ऑफ विंटरफेल , ब्रिएन सान्साची क्विनगार्ड, टिरियन कॅस्टर्ली रॉकचा लॉर्ड- जेमी त्याचा किंगज्गार्ड, सॅम सेव्हन किंग्जडमचा ग्रँडमिस्टर आणि आयर्न थ्रोन मात्रं आर्याने घ्यावा , हाउंड आर्या टिम मधे अशी माझी इच्छा , अर्थात ती सध्यातरी दावेदार नाही, जर गेंड्री राजा झाला आणि तिने त्याच्याशी लग्न केल्यावर तो मेला तरच Happy
उद्या युध्द दाखवतील कि नाही शंका आहे मला, एमिली क्लार्कच्या मुलाखतीत आलय कि पाचवा एपिसोड सर्वात मोठा आहे, तिसर्या एपिसोडपेक्षाही मोठा !

डॅनी किंवा जॉन कशानेतरी मरणार>>> या दोघातील एकतरी जिवंत राहील असं वाटतंय. हाऊस टार्गॅरियन संपवून नाही टाकणार पूर्ण.
>>>> अहो अजब, म्हणूनतर मी किंवा म्हणाले आणि नाही Happy

गॉट इज फेमस फॉर बिइंग अनप्रेडीक्टेबल , काहीही होऊ शकतं !>>> हे जरी असलं तरी ते लोक फोर शॅडोइंग करतात.

आर्या प्रिव्ह्यू मध्ये म्हणते ना की आय लुक फॉर्वर्ड टो सीइंग धिस फेस ऑफ डेथ.. आणी तिनेच मारलं डेथला.

एपिसोड ४ युध्दात धारातिर्थी पडलेल्यांची शोकसभा , होउ घातलेल्या युध्दाच्या नव्या स्ट्रॅटजीज , नव्याने होऊ घातलेल्या नात्यांच्या गुंतागुंती , सर्सीमातेची नवी कारस्थानं इ. मधे जाईल असा अंदाज, सर्सीपर्यंत सेना नुसतीच येऊन थडकेल असं वाटतय एपि ४ मधे , लेट्स सी !

मागच्या भागात प्रमुख पात्रे आणि मोजके लोक सोडले तर बहुतेक लोक मारले गेलेले दिसलेत. शेवटच्या काही मिनिटांत तर नुसता खच पडलेला दिसत होता माणसांचा. आता पुढच्या भागात हे नवीन सैन्य कुठून आणणार लढायला. जर त्यांनी पुन्हा मोठ्या प्रमाणात सैन्य दाखवलं तर ते बहुतेक लोकांना रुचणार नाही.

बिचारा किंग तोमेन चांगला होता, ट्रायल बाय कंबॅट कायमची रद्द केली तशीच लोकशाही आली असती , आता २ पोटेन्शिअल मॅड क्विन्स आहेत !
डॅनी आणि सर्सी पैकी कोण ‘बर्न देम ऑल‘ म्हणतय बघायचं !

>>> बिचारा किंग
हे कॉम्बिनेशन चुकीचं आहे - म्हणूनच मेला तो. Happy

मला पण आर्याचे अवतार कार्य संपले की काय अशी भिती वाटते आहे! इतक्या मोठ्या ग्लोरी नंतर आता सर्सीला मारायचा मान पण तिलाच हे जरा जास्त होईल. ती फेस्लेस होईल का पुन्हा? हाउंड चे पण तसे पाहिले तर अवतार कार्य संपलेच आहे पण समहाऊ त्याचा माउंटन शी सामना ९९% होईल असे वाटते. कदाचित दोघेही मरतील त्यात.

सर्सी आर्याच्या लिस्टमधे असली तरी तिच्याकडून मेली पाहिजे असं नाही, तसा तर जॉफरीही होता तिच्या लिस्टमधे !
आर्या ग्रीन आइज कोणाचे बन्द करणार तेही पहायचय, डॅनी , सर्सी कि सान्सा ??
कदाचित ऑलरेडी केलेही असतील बन्द, ती हाउस ऑफ ब्लॅक अँड व्हाइट मधली मुलगी जी तिला मारायला पाठवलेली असते , तीही बहुदा घारीच होती !
असो, कोणाचा अवतार संपवतात बघु !
कोणीतरी भलतच आयर्न थ्रोन घेइल असं वाटतय.
मुळात अजुन स्टार्क भगिनींची जॉनच्या टार्गेरियन असण्यावरची रिअ‍ॅक्शन दाखवली नाहीये !

माझा अंदाज टिरियन लॅनिस्टर ऐनवेळेस काहीतरी घोळ घालणार... फायनल मारामारी एगॉन टार्गारियन आणि सेर्सी लॅनिस्टर मधे होणार.. आर्या स्टार्क क्वीन ऑफ नॉर्थ होणार... ब्रॅन तिसरा डोळा उघडून काहीतरी अगम्य घडवणार ज्याच्यामुळे दोनचार जणांच्या डोक्यांची शकलं होणार..
डॅनी बिचारी होणार आणि एगॉनची क्वीन होणार. सर ब्रियेन आणि जेमी लॅनिस्टर युद्धात भाग न घेता नॉर्थला निघून जाणार.. सॅम सिटाडेल मधे मोठा माणूस होणार.. ग्रेजॉय एकमेकांतच लढून मरणार..
<<

आर्याचं त्या सो कॉल्ड 'बास्टर्ड' सोबत "जे काय" चाल्लंय ते का चाल्लंय?

सर्सीचा एक मुलगा/अपत्य तिला न सांगता स्टिल बर्थ म्हणून बाहेर टाकले होते तो हाच का? तसं असेल तर सध्याच्या राजघराण्याचा तो एकमेव ऑथेंटिक वारस होतो अन आर्या त्याची क्वीन बनते.

नॉर्थ साठी सान्सा पुरेय. ती मंद मुलगी आहे असेच मला अजूनही वाटते.

डॅनी अन ड्रॅगन्स दोन्ही नष्ट होतील, असे मला वाटते.

जॉन ऑलरेडी अनडेड आहे. त्याच्यापासून डॅनी प्रेग्नंट राहिली असं स्टोरी लायनीत आहे का नक्की>?

युरॉन ग्रेजॉय पुस्तकांत तरी फारच विकृत रंगवलाय. बघू पुढे काय होतंय ते.

गॉट इज फेमस फॉर बिइंग अनप्रेडीक्टेबल , काहीही होऊ शकतं !
<<
अन्प्रेडिक्टेबल पेक्शा त्या दोघा स्क्रीनरायटर्सना काय 'कूल' "दिसेल" असे वाटते त्या प्रमाणे चालतंय असं वाटतं.

>>बाकी त्या ब्रॅनचा थ्री आय्ड रेवन असण्याचा बॅटल ऑफ विंटरफेल मधे तरी काहीच उपयोग नाही झाला <<
असं कसं; ब्रॅन थी आय्ड रेवन असल्यामुळेच नाइटकिंग गाड्स्वुड्स मध्ये आला ना? आता तो टेक्निकल लिमिटेशन्स मुळे नाइट्किंगलाच वॉर्ग करु शकला नाहि, अन्यथा सगळं चित्रंच बदललं असतं... Proud

मला तर वाटतंय कि सर्सी+डॅनी ची फाइट अनइवन होणार आहे. डॅनी कडे भले मनुष्यबळ नसेल, पण दोन ड्रॅगन्स दोन राउंड ट्रिप्स मध्ये गोल्डन आर्मीचा पार कोळसा करुन टाकण्याच्या कुवतीचे आहेत...

डॅनीच थ्रोनवर बसेल, असंही टारगेरीयन घराणंच थ्रोनचे खरे वारस आहे
आर्या ह्या सगळ्या राजकारणात पडणार नाही तिला थ्रोनशी काही घेणं देणं नाही
वॉल पडल्यामुळे आता परत बांधतील कि नाही ?
बर्फाळ प्रदेशातून आता कोणाचा धोका पण नाही

असंही टारगेरीयन घराणंच थ्रोनचे खरे वारस आहे
<<
हे म्हणजे दिल्ली जिंकून पेशव्यांनी परत मोगल बादशहा तख्तावर बसवला त्या चालीवर आहे. Lol

Pages