माझे ड्रायव्हिंग व्हेकेशन - लेह लडाख - भाग ६

Submitted by केदार on 5 August, 2013 - 16:42

लेहचा एक चांगला भाग म्हणजे चंगंस्पा मार्केट. ह्या मार्केट मध्ये निदान एकदा तरी गेल्याशिवाय लेह पूर्ण होत नाही. विविध दुकानात विविध वस्तू मिळतात. पण इथे तुम्हाला अनेक बाईक आणि सायकल रेन्टल दुकानेही दिसतील. इथे एक तरी संध्याकाळ राखून ठेवायलाच हवी.

बाय बाय फॅमिली एन्टर ग्रूप !

संध्याकाळी आम्ही शांतीस्तूपाच्या भेटीला गेल्यावर डोक्यात पुढील प्लान घोळत होते. पुढे काय करावे? वर ऑलमोस्ट शिक्काम्रोर्तब झाले होते पण प्रज्ञाला आता माझी काळजी वाटयला लागली होती की मी एकटाच उरलेली सुटी हिमालयात कशी घालवेन. कोणाच्या सोबतीशिवाय गाडीला, मला काही झाले तर काय? हा एक मोठा प्रश्न होता. कारण ती आणि मुलं असली तर गाडी खराब झाली किंवा कुठलाही प्रसंग असला तरी आम्ही सर्व एकत्रच होतो पण आता तसे असणार नव्हते. ह्या विचारातच आम्ही शांती स्तूपावर गेलो. तिथे मी मेडिटेशन हॉल मध्ये बसलो असताना आदित्य त्याच्या स्वभानूसार इकडे तिकडे फिरत होता आणि मग इतरांना डिस्टर्ब नको म्हणून मी देखील त्याला बोलावून बाहेर आलो, तर तेथील दोन मुलं माझ्यासोबत बाहेर आली आणि त्यांनी विचारले की, मराठी का? मग ओळख झाली. ते दोघे औरंगाबादचेच ! त्यांच्या बोलतोय तो पर्यंत अजून चौघे बाहेर आले आणि ते सहा जण मित्र लेह ट्रीप साठी औरंगबादहून आले होते. ट्रेन व टॅक्सी असा त्यांच्या प्रवास चालू होता. बोलता बोलता मी त्यांना सांगीतले की मी XUV घेऊन आलो, तर त्यापैकी अद्वेत म्हणाला की काल आम्ही एक MH 14 पाहिली ती तुमचीच का? म्हणजे XUV वॉज नोन. मग पुढेचे प्लान्स काय? अशी विचारणा झाल्यावर मी म्हणालो ही लोकं उद्या जातील आणि मी एकटाच. मग मी त्यांना त्यांचे प्लान्स विचारले. तर ते उद्या टॅक्सी घेऊनच नुब्रा व्हॅली ( व्हाया खार्दूंगला - हायस्ट मोटरेबल रोड इन द वल्ड) जाणार होते, मी ही एकटा तिकडे जाणार होतो. तर मी ऑफर दिली की, तुम्ही माझ्यासोबत या पण एक दोन बाईक रेंट कराव्या लागतील कारण तुम्ही ६ , मी आणि सामान गाडीत मावणार नाही. ते सर्वच बजेट व्हेकेशन वर (कारण सर्वच तसे विद्यार्थी वयातील आहेत) असल्यामुळे लगेच त्यांनी होकारही दिला आणि प्रज्ञाच्या डोक्यावरचे टेंशन कमी झाले.

तर मग उद्या ९ च्या आजपास भेटू असा विचार करून आम्ही त्या ग्रूपचा निरोप घेतला. त्यांनी त्यांना विश्वास बसेना, म्हणून परत रात्री फोन केला की उद्या मी खरेच त्यांना बरोबर घेईन का? मी त्यांना निर्धास्त व्हा असे सांगीतले, पण मी प्रत्यक्ष जाई पर्यंत त्यांचा बहूदा विश्वास नसावा.

सकाळी ६ वाजता प्रज्ञा अन मुलं विमानतळावर गेली. मी मस्त आणखी झोप काढून नाश्ता वगैरे उरकून,चेकाऊट त्या ग्रूपला भेटायला निघालो. जाईपर्यंत मला वाटत होते की खरचं अनोळखी मुलांसोबत प्रवास करायचा का? त्यापैकी कोणाला सिगारेट वगैरेचे व्यसन असेल तर परत वास सहन करा, त्यांच्या धिंगान्यात सामिल व्हा. कोणी सांगीतले? त्या पेक्षा मै और मेरा चीता किती मस्त ! नाहीतरी य वेळा मी सोलो ट्रेक केला आहेच.
पण भेटल्यावर कळाले ती सर्व मुलं खरचं चांगली आहेत. एकालाही कुठलेही व्यसन नाही, शिवाय त्या सर्वांना रोज योगा वगैरे करायची सवय आणि त्यापैकी दोघे तर शिक्षकही ! आमची गट्टी जमायला १५ मिनिटेही लागली नाहीत. अद्वेत देशपांडे, ओमेश शुक्ला, भरत अग्रवाल, प्रतिक अग्रवाल, आलोक शिंदे आणि चेतन बासटवार अशी त्यांची नावं. त्यांचा वयोगट १९ ते ३०. पैकी भरत हा पक्का ट्रेकर. मग त्याचे नी माझे ट्रेक विषयी बोलने झाले, शिवाय ज्यांच्यासोबत मी जायचा प्लान करतोय त्या "व्हेअर इगल्स डेअर" टीम सोबत ट्रेक देखील केलेला आहे, माझ्याकडे गाडी असल्यामुळे मी मध्येच उतरून ट्रेक केले नाही, पण भरतने पुढे अनेक Z टर्नस वर उतरून ट्रेक करत तो खाली आला. त्यासोबत पुढच्या सिझन मध्ये स्टोक कांगरी करायचे ठरले आहे.

आजचा प्लान होता नुब्रा व्हॅलीचा. नुब्रा व्हॅली मध्ये डिसकित, हुण्डर, पनामिक अशी प्रसिद्ध गावं येतात. हुण्डर येथे डबल हम्प बॅक्टेरिअन उंट आहे, पूर्ण व्हॅली ही "कोल्ड डेझर्ट" मध्ये मोडली जाते. हुण्डर पासून पुढे ७५ किमी येथे तुरतूक नावाचे गाव आहे. तुरतूक गाव हे १९७१ युद्धापर्यंत पाक मध्ये होते नंतर ते आपल्याकडे आले. हुण्डर ते तुरतूक रस्त्यामध्ये हुण्डर पासून पुढे २५ किमी वर थॉईस ( Thoise - Transit Halt Of Indian Soldiers Enroute (to Siachen) ) देखील आहे. इथे देखील (चुसूल सारखीच) एअर स्ट्रीप आहे. बर्‍याच लोकांना Thoise कॅम्प माहिती नाही, त्यामुळे ते तिथपर्यंत जात नाहीत. शिवाय थॉईस पर्यंत जायच्या आधी एक ब्रिज आहे, तिथूनही गाड्यांना वापस पाठविले जाऊ शकते. थॉईस हा भाग अत्यंत सुरक्षित ठेवायचा असल्यामुळे तिथे देखील फोटोग्राफीला देखील मज्जाव आहे.

तर आजचा बेत होता रात्री पर्यंत हुण्डर गाठणे. साधारण १२० किमी. आणि ते पार करायला साधारण ५ तास लागतात.

nubra_map.JPG

आजचा प्रवास आणखी महत्वाचा का? तर आज सो कॉल्ड हायस्ट मोटारेबल रोडवर मी गाडी चालवणार होतो. तसा नॉर्थ पुल्लू नंतरचा रस्ता खूप चांगला आहे. पण लेह ते साऊथपुल्लू ते खार्दूंगला आणि नॉथ पुल्लू पर्यंत रस्ता जवळ जवळ नाहीच असे म्हणाले तरी गैर नाही. जो रस्ता आहे तो अनेक दगड धोंड्यांमधून.

लेह मध्ये एकच पेट्रोल / डिझेल पंप आहे. बाकी कुठेही (कारगील आणी टंडी सोडल्यास) पंप नसल्याकारणामुळे लेह मधून मी जवळ असलेल्या टाकीतही डिझेल भरून घेतले. लेह मनाली रस्त्यावर टंडीला आणि लेह श्रीनगर रस्त्यावर कारगिलला पेट्रोल मिळू शकते. पण तेवढेच. इतर ठिकाणी गाशेवतएक्स्ट्रा टाकी जर नसेल तर मात्र बोंबच. त्यामुळे दुचाकींना पण पेट्रोलच्या टाक्या लटकवेल्या दिसतील. तर आम्ही तीन गाड्यात डिझेल / पेट्रोल भरून तयार झालो आणि खार्दूंगलाच्या रस्त्यावर एक अनामिक अँक्साईटी मनात ठेवून निघालो.

खार्दूग ला पास हा लेह पासून केवळ ४५ किमी आहे. ह्या पासला जाण्यासाठी इनर लाईन परमिट लागते. ज्याची पडताळनी लेह पासून जवळच असलेल्या साऊथ पुल्लू ह्या गावात होते.

रस्ता :

तिथे पोचायच्या आधी आम्ही १७००० फुटांवर असताना इतक्यातच लॅन्ड स्लाईड झालेला रस्ता नीट करण्याचे काम चालू होते.

द ब्रो आणि जेसीबी

मग परत टाईम पास कसा करावा? कॅन यू इमॅजिन?

ऑफक्रोर्स वी आर द क्रिकेटिंग नेशन !

युर्वर्स ट्रूली : तो फलंदाज मीच आहे. आम्ही चारजणांनी सुरू केले पण मग ते पाहून आजूबाजूच्या टॅक्सी ड्रायव्हर पण खेळायला आले. रुल एकच. बॅटसमननी जर बॉल दरीकडे मारला आणि तो खाली गेला तर बॅटसमन जाऊन वापस आणेन !

वर्ड ऑफ कॉशन :१७००० फुटांवर असे काहीही उलटे सुलटे करू नये. मी ऑलरेडी अक्लमटाईज झालो होतो आणि उरलले लोकं बहुतेक टॅक्सी ड्रायव्हर म्हणजेच लोकल असल्यामुळे काही झाले नाही. पण थम्ब रुल इज, नो अ‍ॅक्टीव्हिटी. माझा सल्ला असा असेल की तुम्ही नुब्राला जात असाल तर खार्दूंगलाला जाताना न थांबता येताना थांबावे कारण तो पर्यंत तुम्ही अक्लमटाईज झाला असाल.

रस्ता परत वाहतुकीला सुरू केल्यावर आम्ही खार्दूंगलाला पोचलो.

तेथे लावलेल्या पताका !

सियाचीन ब्रिगेड वेलकम्स यू टू

खरे तर खार्दूंगला पेक्षाही दोन मोठे ला लेह मध्ये आहे.

मारिस्मिक ला - १८४०० फुट
आणि काकासांग ला - १७८८०
खार्दूंगलाची खरी उंची ही १७७७० फुट असून १८३८० फुट नाही असे नवीन पाहणीत आढळले आहे. पण वरील दोन्ही 'ला' क्रॉस करायला केवळ ४ X ४ च लागते आणि खार्दूंगलाला अगदी नॅनोही (नीट नेली तर) जाऊ शकते त्यामुळे कदाचित हा वर्ल्डस हायस्ट मोटारेबल रोड आहे.

आणि माझी गाडी !

आम्ही पुढे निघून नॉर्थ पुल्लूला जेवण उरकले. इथे काहीही मिळत नाही, त्यापेक्षा पुढे जाऊन खार्दूंग गावात तुम्ही जर गेलात तर बरेच ढाबे आहे. इथे मात्र लेह मधील आवडती मॅगी मिळते किंवा थुपका. एक सांगायचे राहिले लेह हे हाय पासेस लॅन्ड तर आहेच तसेच मॅगी लॅन्डही! कुठेही तुम्हाला मॅगी हमखास मिळेल! आयुष्यात पहिलेंदा मी आज नॉर्थ पुल्लूला मॅगी खाल्ली. आणि इतक्या वर्षात फार काही मिस केले नाही असेही कळाले.

एकाच वेळी वाळवंट,नदी, हिरवी वनराई आणि ग्रे माऊंटेन्स. केवळ नुब्रा व्हॅली मध्ये हे पाहायला मिळेल!

पुढे दिसकित यायच्या आधी एक वाळवंट लागते. तो रस्ता पाहा !

आणि त्या रस्त्यावर तपश्चर्या करत बसलेले महान योगी श्री केदारनाथ महाराज !

हुण्डर मॉनेस्टरी

आणि हुण्डर मधील मैत्रेय !

रेस्ट स्टॉप

बुलेट रायडर व्हू लेफ्ट हिज XUV

सियाचीन नदी जी पुढे जाऊन शायोक नदीला जाऊन मिळते. आणि शायोक परत सिंधूला.

तुरतूक ( भारत - पाक सीमा) कडे जाणारा रस्ता

अ‍ॅण्ड द गनर्स

रात्र झाली आणि रात्रीने नवीनच गोष्टी दाखविल्या ज्या आजपर्यंत मी कधीही अनुभवल्या नव्हत्या. मिल्की वे ! तो पण आपल्या डोळ्याने बघने हा केवळ अद्वितिय अनुभव असतो.

हे एस्क्पोजर २८२ सेकंद घेतल्यामुळे सर्व तार्‍यांनी आपली जागा बदललेली दिसेल. असे अनेक फोटो एकत्र केले ( स्टॅक) की पूर्ण गो असणारी इमेज दिसेल. मी काही दिवसात ती टाकेन. ती रात्र मिल्की वे अनूभवन्यात गेली. माझ्याकडे प्राईम लेन्स नसल्यामुळे आणि इन्फिनिटीवर फोकस सेट करू शकत नसल्यामूळे फोटो तेवढा चांगला नाही. पण तरीही इथे का दिला? तर त्यात लाखो तारे दिसत आहेत म्हणून. Happy ती मध्ये धुरासारखी रेष दिसतेय तोच मिल्की वे.

रात्री मला ७०० रू मध्ये एक गेस्ट हाऊस मिळाले. एकुण चांगले. बाकीच पब्लिक टेन्ट मध्ये राहायला गेलं. पण माझ्या आयफोनच चार्ज लाईफ खूप कमी असल्यामुळे मी जिथे वीज आहे अश्या ठिकाणी राहायचे पसंत केले.

सकाळी आम्ही थॉईसला जाऊन वापस परत लेह ला गेलो. माझ्या मित्रांचा त्सो मोरिरीचा प्लान नव्हता आणि मी त्यांना सांगीतले की त्सो मोरिरी शिवाय लेह ट्रीप संपूर्ण होणार नाही, पण त्यांना थॉईसही माहित नव्हते आणि मी त्यांना ऑलमोस्ट बळजबरीच नेले आणि ते पाहून ( कॅम्प, एअर स्ट्रीप वगैरे) आम्हा सर्वांना जे वाटले ते इथे मांडणे शक्य नाही त्यामुळे त्यांना मी म्हणजे कोणीतरी भारी "लेह अभ्यासू" वाटलो आणि त्सो मोरिरीला कदाचित आम्ही देखील येऊ असे ते म्हणाले.

वरच्या मॅप मध्ये एक सी दिसतेय ते म्हणजे 'पनामिक'. पनामिकला गरम पाण्याच्या झरे आहे. मी चुमथांगला जाणार असल्यामुळे (तिथेही आहेत) पनामिक स्किप करायचे ठरविले. येताना पण मस्त टंगळ मंगळ करत आम्ही ५ पर्यंत लेहला पोचलो आणि चंगंस्पा मध्ये टाईम पास केला.

फॅमिली नसल्यामुळे मी देखील बजेट हॉटेल मध्ये राहनेच पसंत केले. ७०० रू मध्ये मला चंगंस्पा मार्केट मधील राब यंग गेस्ट हाऊस मध्ये मला रूम मिळाली. ७०० रू मध्ये इतकी स्वच्छ, रनींग हॉट वॉटर, टॉवेल्स आणि डबल बेड देणारी रूम मी आजपर्यंत पाहिली नव्हती. सो इट वॉज लाँग टू डेज. मध्यंतरी प्रज्ञासोबत फोन झाला होता. तिच्या बाबांना थोडे बरं वाटत नव्हतं पण आता तसं काही सिरियस वगैरे नव्हतं.

भाग एक
भाग दोन
भाग तीन
भाग चार
भाग पाच
भाग सहा
भाग सात
भाग आठ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे हा भाग पण!
सियाचिन नदी किती छोटी आहे! तो पाण्यात डोंगरांचे प्रतिबिंब पडले आहे तो फोटो खास आहे!

झंपी - >>अक्लमटाईज < म्हणजे वातावरणाशी जुळवुन घेणे. तिथे इतक्या उंचीवर ऑक्सिजन कमी असतो, त्यामुळे आपल्यासारख्या लोकांना जुळवुन घ्यायला थोडा वेळ लागतो. नाहीतर जास्त श्रम केले तर चक्कर येणे वगैरे प्रकार होतील. so no exercise Happy

हा भाग पण मस्त. क्रिकेट सहीये.... Happy

तो डोंगराचे प्रतिबिंब पडलेला फोटो काय सुंदर आहे!!!

वा!

वर्णन आणि छायाचित्रण..दोन्हीही अफलातून..आपण तर एकदम फिदा..!

त्यामुळे त्यांना मी म्हणजे कोणीतरी भारी "लेह अभ्यासू" वाटलो >>>>>>>>>> अहो त्यांना काय मला पण असच वाटत आहे.प्रत्येक भाग अप्रतिम.......................

मिल्की वे अफाट! प्रत्यक्षात किती सुंदर दिसत असेल.>>+!

हा ही भाग मस्त. मला त्या मैत्रेय बुद्धाची मुर्ती खूप आवडलीये. किती देखणी मुर्ती आहे ती!! Happy

अप्रतिम!
वाळवंट, नदी, हिरवाई आणि करडे डोंगर - हा फोटो खूप आवडला.

मंडळी माहेरी गेल्यावर तू जास्त मजा केलीस असं वाटतंय >>> Lol पण तरी, +१ Wink

Pages