स्वर्णप्राश - आयुर्वेदिक औषध

Submitted by गजानन on 4 August, 2013 - 07:09

नमस्कार,

काल मुलीच्या शाळेत आयुर्वेदातल्या एका तज्ज्ञांचे व्याख्यान होते. त्यांनी स्वर्णप्राश या आयुर्वेदातल्या एका औषधाविषयी पालकांना पुढील माहिती दिली. शुद्ध सोने हे इतर आयुर्वेदिक औषधांबरोबर १००० ते १५०० °C पर्यंत उकळले जाते. ही क्रिया दहा ते पंधरा वेळा केली जाते. असे केल्याने ते सोने आपल्या शरीरात १००% शोषण्यायोग्य होते. मग हे सुवर्णभस्म मध आणि गायीचे तूप यांत घालून स्वर्ण प्राश तयार केले जाते. एक ते सहा या वयोगटातील मुलांना हे नियमितपणे (महिन्यातून तीन ते चार थेंब) दिल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढणे, योग्य शारिरीक वाढ, स्मरणशक्ती वाढणे इ. अनेक फायदे सांगण्यात आले. त्यांनी दिलेला फॉर्म भरून दिल्यावर शाळेत मुलांना हे दर महिन्याला देण्यात येईल. द्यायचे की नाही हे पालकांसाठी ऐच्छिक आहे. कोणाला याबाबत काही अनुभव आहे का? असल्यास कृपया इथे लिहा. धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इब्लिस,
तुमचा मुद्दा क्र. ५. मी दिलेल्या लिंका वाचा. अजून काही लिंका मिळवून वाचा, किंवा मी देतो. तुमची माहिती अपूर्ण आहे.

<तुम्ही शुद्ध अणूंच्या विशिष्ट गुणधर्मांबद्दल, त्याबद्दलच्या संशोधनाबद्दल जरी बोलत असलात, व ते मला समजत असले, तरीही, तुमच्या शब्दांतून लोकांपर्यंत पोहोचणारा संदेश व त्यातून होणारे संभाव्य परिणाम मला दिसत असतात. त्यामुळे मला तुमचे बोलणे खोडून काढावे लागते.>

हे असं खोडून काढताना चुकीची माहिती का द्यावी? किंवा माहितीचा विपर्यास का करावा? योग्य ती माहिती द्या आणि घ्या. योग्य तेच निष्कर्ष काढा. तुमच्या आधीच्या पोस्टांमधली विधानं कृपया एकदा वाचून बघा. तुमची कळकळ योग्य असली तरी रसायनशास्त्राबद्दल होणार्‍या गैरसमजांचं काय? माझ्या शास्त्राबद्दलही माझं काहीएक कर्तव्य आहे. तुम्ही माझ्या शास्त्राबद्दल पसरवत असलेली चुकीची माहिती खोडून काढणं, हा माझ्या कामाचा भाग आहे.

<तुम्ही नॅनॉ पार्टिकल्स सिद्ध केल्या नंतर तुमच्या तीक्ष्ण निरिक्षणशक्तीच्या जोरावर, "अरेच्चा! हे अशासारखे काहीतरी जुन्या ग्रंथांत ऑलरेडी आहे की!" असे म्हणता. त्या ग्रंथातल्या इतर कल्पनाविलासाला तुमचे अनुमोदन नसते, हे तुम्हाला मनोमन ठाऊक व अध्यहृत असले, तरी तुमच्या त्या वाक्यानंतर, इतर पुराणढोलबडवमतवादी तुमचे नांव घेऊन वेगळेच मर्कटिंग करतात, अरेरे हे मात्र मला सहन होत नाही स्मित>

हे वाचून खरोखर हसू आलं. हा निष्कर्ष तुम्ही कशाच्या जोरावर काढलात? अहो, खरंच जरा अधिक माहिती घ्याहो..यापेक्षा खूप वेगळं सुरू आहे जगात. आयुर्वेदिय ग्रंथांमधल्या माहितीची छाननी खरंच जगातल्या अनेक प्रयोगशाळांमध्ये सुरू आहे. सुवर्णभस्माशी संबंध नसलेल्या पण नॅनोगोल्डबद्दल असलेल्या किती शोधनिबंधांमध्ये तुम्हांला हे संदर्भ दाखवू?

असो. आता मला कंटाळा आला. मला जे काही लिहायचं होतं, ते लिहून झालं आहे.

हं.
जय आयुर्वेद!
>>
हो, खरंच जरा अधिक माहिती घ्याहो..यापेक्षा खूप वेगळं सुरू आहे जगात. आयुर्वेदिय ग्रंथांमधल्या माहितीची छाननी खरंच जगातल्या अनेक प्रयोगशाळांमध्ये सुरू आहे. सुवर्णभस्माशी संबंध नसलेल्या पण नॅनोगोल्डबद्दल असलेल्या किती शोधनिबंधांमध्ये तुम्हांला हे संदर्भ दाखवू?
<<

असोच्च!. माझा अन जगाचा काय संबंध? गामा पैलवान फकस्त जगातल्या शोधनिबंधातल्या नामस्मरणांनी वाचलेत बरे का!!
पण तेही असोच.
आता, धागाविषयाला धरून, लोकांना नीट शब्दांत सांगता का जरा?
हे असले औषध त्यांनी (लोकांनी) त्यांच्या मुलाबाळांना २०-३० रुपडक्यांत द्यावे का, जेणे करून त्यांच्या मुलांची 'योग्य वाढ होईल', त्यांची 'इम्युनिटी वाढेल' व 'स्मरणशक्ती सुधारेल' (असे इतरही 'अनेक' फायदे मर्कटींग तज्ज्ञांनी सांगितलेत म्हणे)
गजानन यांचे सामान्य ज्ञान अन तत्सम गुळमुळीत उत्तरे कृपया नकोत.३
लेट्स सी.
वाट पहातोय.

मला "कंटाळा" येउन चालत नाही.
डॉक्टरने २४ पैकी ४८ तास लोकांना 'सेवा' द्यावी अशी कन्सेप्ट रिसर्चमधून पब्लिश झालिये.

गजानन,

आपला प्रश्न वाचला. दोन मुद्दे मांडावेसे वाटतात.

(१)कुठलेही औषध असे घाऊक पद्धतीने देणे हे मुळातच आयुर्वेदाला अनुसरून आहे असे वाटत नाही. मुलाला कशाची गरज आहे हे त्या त्या मुलाच्या प्रकृतीवर अवलंबून असेल.
(२)हे औषध खरच आयुर्वेदिक आहे हे कसे ठरवणार? आजकाल अनेक बनावट औषधे सर्रास आयुर्वेदिक या नावाखाली खपवली जात आहेत. त्यांच्या प्रचाराला बळी पडू नये. (तसेच फार्मा कंपन्यांकडून मिळणार्‍या सर्व प्रकारच्या लाचेला चटावलेल्या काही डॉक्टरांकडून आयुर्वेदाबद्दल जो दुष्प्रचार केला जात असतो त्यालाही बळी पडू नये.)

त्यामुळे द्यायचेच असल्यास निष्णात आयुर्वेदिक वैद्याच्या सल्ल्याने उपयुक्त औषध देणे चांगले.

या निमित्ताने चिनूक्सकडून खूप चांगली माहिती मिळाली आहे. धन्यवाद, चिनूक्स.

<हं.
जय आयुर्वेद!
असो. माझा अन जगाचा काय संबंध?
पण तेही असोच.>

यात कितीही उपहास असला तरी पुन्हा वाचकांचा गैरसमज होऊ नये म्हणून लिहितो. सीएसआयआरचे प्रमुख असताना डॉ. माशेलकरांनी आयुर्वेदिय ग्रंथांमधल्या औषधांची छाननी व्हावी, यासाठी काम सुरू केलं. त्यानुसार भारतातल्या अनेक प्रयोगशाळांमध्ये हे काम सुरू आहे. यामागे आयुर्वेदप्रेम नाही. अतिशय गांभीर्यानं संशोधक काम करत आहेत. सुवर्णभस्मावर परदेशातल्या प्रयोगशाळांमध्येही काम सुरू आहे. सोन्याच्या नॅनोकणांबद्दल लिहिताना सुवर्णभस्माबद्दल अनेकदा लिहिलं जातं. अतिशय प्रतिष्ठेच्या जर्नलांमध्ये असे पेपर छापले गेले आहेत.

<आता, धागाविषयाला धरून, लोकांना नीट शब्दांत सांगता का जरा?
हे असले औषध त्यांनी (लोकांनी) त्यांच्या मुलाबाळांना २०-३० रुपडक्यांत द्यावे का, जेणे करून त्यांच्या मुलांची 'योग्य वाढ होईल', त्यांची 'इम्युनिटी वाढेल' व 'स्मरणशक्ती सुधारेल' (असे इतरही 'अनेक' फायदे मर्कटींग तज्ज्ञांनी सांगितलेत म्हणे)>

याबद्दल अगोदरच लिहिलं आहे. २०-३० रुपयांत शुद्ध सुवर्णभस्म मिळणं शक्य नाही. मात्र नॅनोगोल्डमुळे प्रतिकारशक्ती वाढते, हे सांगणारं संशोधन उपलब्ध आहे. लिंक दिली आहे. स्मरणशक्ती सुधारते, याला पुरावा नाही.

बाकी औषधाची शुद्धाशुद्धता, मुलाची प्रकृती, औषधांचा बाजार याच्याशी माझा संबंध नाही. हा प्रत्येकानं स्वतःपुरता घ्यायचा निर्णय आहे.

<गजानन यांचे सामान्य ज्ञान अन तत्सम गुळमुळीत उत्तरे कृपया नकोत>

गुळमुळीत उत्तर देण्याचं मला कारण नाही. माझा मुद्दा मांडताना मी उगाच दिशाभूल करणारी विधानं करत नाही. Happy

<मला "कंटाळा" येउन चालत नाही.>

मुद्दाम चुकीची माहिती दिलेली चालते का? किंवा माहिती नसताना बोललेलं चालतं का? आमच्या क्षेत्रात चालत नाही. मीही डॉक्टरच आहे हो. Proud

मी कोणती चुकीची माहिती दिली?
एल ओ एल.
उपहास, अन चुकीची माहिती यातला फरक तुम्हाला समजत नसेल, असे वाटले नव्हते Happy
लिहा मी दिलेल्या चुकीच्या माहितीची वाक्ये. तुमच्या स्पेशल लॉग इन वर तुम्हाला माझ्या सगळ्या एडिट हिस्टरीज मिळत असतीलच Happy कोणतीही चूक दाखवलीत तर सपशेल माफी मागीन Happy

>> हे सर्वसामान्य शहाणपण आहे
तसं असतं तर ही चर्चा सुरूही झाली नसती आणि इतकी भरकटलीही नसती.+११११११११११११११११११११११११११११

महोदय,

आपण डॉक्टर आहात हे ठाऊक आहे.

त्या पलिकडले अन अलिकडलेही ठाऊक आहे. मायबोलीच्या संपादकपदावर तुमची नेमणूक झाल्याच्या धाग्यावर अभिनंदनाची पोस्ट आहे माझी.
मला माहितेय की आय अ‍ॅम डीलींग विथ अ मॉड, अँड अ ह्यूमन बीइंग, व्हू हॅज पर्सनल चॉइसेस.
at the same time, i am confident that i am saying not a single wrong word.
beyond that,
moderators are always right. Happy

इब्लिस,
कृपया याचा मायबोलीच्या व्यवस्थापनाशी संबंध लावू नका. चर्चेला चर्चेच्या परिघातच राहू द्या. तुम्हांला सविस्तर उत्तर देणार होतो. पण याउप्पर तुमच्याशी चर्चा करण्यात मला रस नाही. धन्यवाद.

आणि स्वतःचा मुद्दा सिद्ध करताना इतरांबाबत कृपया गैरसमज पसरवू नका.

मायबोलीचा एक आयडी म्हणून माझी भूमिका आणि व्यवस्थापक म्हणून भूमिका या भिन्न गोष्टी आहेत. व्यवस्थापक म्हणून असलेली भूमिका योग्य त्या ठिकाणी, योग्य त्या आयडीने मांडली जाते. चिनूक्स या आयडीच्या चर्चांमधल्या मतांचा व्यवस्थापनाशी संबंध नाही.

ठीक. असो.
मी देखिल डॉक्टर आहे असे एक वाक्य नंतर संपादित होवून आले, म्हणुन पुढचे खडुस लिहिले..
जौ द्या.
काय फरक पडणारे मला?
लोकांनी त्यांच्या मुलांना काय खाउ घालावे हे सांगणारा मी कोण?

मला वाटले ते माझे शेवटचे पोष्ट असेल.

चिनूक्स ( इन्फॅक्ट तुमचे नाव दोनदा चुकले होते , नंतर दुरुस्त केले)

जे खाली लिहले आहे ते चुकिचे आहे असे मी म्हणत नाहीय. मला तेही माहित आहे. अगदी ड्रग कॅरीअर म्हणुन देखिल. पण त्याचा आणि वर विचारलेल्या (गजानन) प्रश्नांच्या संबंद्धाबद्दल मी बराच साशंक आहे.

क्लिनिकल ट्रायल्स झाल्या आहेत. मी स्वतः त्यात सहभागी झालेलो आहे. आधीच्या लिंकांमध्ये एकदोन लिंका अशा ट्रायल्सच्या आहेत. अजूनही असंख्य असतील. पाण्याच्या शुद्धीकरणात, हातमोजेपायमोजे स्वच्छ करण्यासाठी वापरतात की हे कण. ड्रग कॅरियर म्हणून तर कधीचा सुरू आहे हा वापर.>>>>

पुन्हा एकदा - गेली अनेक वर्षं यावर काम सुरू आहे. अनेक पेपर सापडतील. ज्यात सुवर्णभस्माचा खासकरून उल्लेख होता, त्या लिंका दिल्या आहेत.>>>>

काम सुरु असणे आणि सध्या ते वापरत असणे यात फरक आहे असं मला वाटतं. याच गोष्ट तुम्ही सोडुन दुसर्‍याने लिहल्या असत्या तर कदचित मी इथे काहीही प्रतिसाद दिला नसता. किंवा याच गोष्टी संशोधनाच्या बाफ वर असत्या तरी चालले असते, असे मला वाटते.

अजुन एकदा, मी जे लिहलं ते या बाफवर सुरु असलेल्या विषयाबद्दल, सर्वसामान्य लोकांत असलेले गैरसमज दुर व्हावेत म्हणुन. तुम्ही म्हणता आहत ते बरोबरच आहे. पण त्याच वेळी काही लोकांना चुकिचा संदेश जाउ शकतो , तुमच्या काही रेफर्न्स काढुन वाचलेल्या विधानांमुळे.

विषयः सुवर्ण प्राश द्यावे काय?
माझे मत (चुकिचेही असु शकते): अजुन तसे काही कुणी सिध्ह केलेले नाही. त्यामुळॅ देणॅ चुकिचे वाटते.

अजुन एक, चिनूक्स,
ते ९० % गोल्ड बद्दल जरा सविस्तर लिहाल का? एनसिएल मध्ये चेक केलेले. म्हणजे सोल्युशन मध्ये किती % सॉलिड्स होते वगैरे. आणि कोणत्या मेथडने चेक केले (जर शक्य असेल तर). आता या बाफचा प्रवास दुसर्‍या दिशेने सुरु झाला. सॉरी गजाननराव Happy

निवांत पाटील,
याबद्दल लिहिलं आहे. लिंकाही दिल्या आहेत. त्या कृपया बघा. ९०%+ हा आकडा सप्रमाण सिद्ध केलेला आहे. अनेक पेपरांमध्ये तुम्हांला हे संदर्भ दिसतील.
याउप्पर या बाफवर मला लिहायचं नाही. संपर्कातून इमेल केल्यास अधिक संदर्भ पाठवू शकतो

इथे औषध (सुवर्णप्राश) उपयुक्त होईल का ह्या बाबत चर्चा चालू आहे. त्याबाबतीत मला काही म्हणावयाचे नाही, तो वेगळा विषय. पण 'informed consent' ह्या दृष्टीने विचार केला तर जे काही शाळा-वैद्य करीत आहेत ते अत्यंत चुकीचे आहे.
१. शाळा व्यवस्थापन ह्यात सहभागी असेल तर हे करता येत नाही कारण ते 'coercion' मानले जाते. शाळेने आपला सहभाग नाही हे जाहीर केले पाहिजे. तसेच भाग घेणे ऐच्छिक आहे हे ठीक आहे पण भाग घेतला नाही तर शाळा व्यवस्थापन मुलांच्या निकालावर काहीही परिणाम करणार नाही हे घोषित केले पाहिजे. (क्षुल्लक मुद्दा वाटेल पण तसा नाहीये. गरजेचा आहे. शाळेचा वकील/कायदेशीर सल्लागार झोपला आहे बहुतेक)
२. 'मायनर' व्यक्तीची संमती घेताना इतका हलगर्जीपणा चालत नाही - "पालकांनी फॉर्म भरून दिला तर इ इ ". शक्य तर दोन्ही नाहीतर एक पालकास नर्स/डॉक्टर यांनी स्वतः अर्ज वाचून दाखवला पाहिजे. त्यांना सगळ समजले ह्याची खात्री केली पाहिजे. अर्जावर समक्ष सही केली पाहिजे.
३. केवळ औषधाचे फायदे सांगून चालत नाही. उपलब्ध सर्व चिकित्सा (treatment options) सांगावी लागते. उदा: इतर वनस्पतीज औषधे उपलब्ध आहेत. इ ई.
4. Standard care काय आहे हे सांगावे लागते. स्मरणशक्ती साठी काहीही न देणे हे Standard care आहे हे सांगावे लागते.
५. किती काल औषधी देणार हे स्पष्ट सांगावे लागते. ह्या काळात काही इतर लक्षणे झाल्यास कुठे जावे आणि कोण खर्च करणार हे सांगावे लागते.
६. चिकित्सेचा फायदा झाला हे कसे तपासणार हे सांगावे लागते. जर मुलांना घेऊन दवाखान्यात जावे लागणार असेल तर कुठल्या तपासण्या करणार त्याला किती वेळ लागणार हे व्यवस्थित समजावले पाहिजे.
अजून काही मुद्दे आहेत पण सध्या एवढे पुरे.

गजानन, आपल्याला फुकटचा एक सल्ला- आयुर्वेद चांगला वाईट हा विचार न करता, हे जे काही चालले आहे ते आंतरराष्ट्रीय नियमांना धरून नाही हे लक्षात घ्या. बाकी आपल्या पाल्याबाबत योग्य निर्णय आपण घ्यालच.

चिनुक्सजी,

तुम्ही लिहिलेले वाक्य न वाक्य खरे आहे पण तरीही ...

आपल्यासारख्या व्यासंगी आणी साक्षेपी व्यक्तीभोवती आपसुकच एक वलय (फिल्मस्टार गोविंदा किंवा डॉ भटकर प्रमाणे) तयार झालेले असते. त्यामुळे आपल्यावर नकळतच एक जबाबदारी येऊन पडते. आपल्या वाक्याचा कधी कधी विपर्यासही होऊ शकतो. आयुर्वेदिक सुवर्णभस्माच्या चर्चेत नॅनो गोल्ड वरही संशोधन सुरु आहे असे आपण म्हणता तेव्हा काही चतुर लोक त्याचा अर्थ आपण हे endorse करताहात असा काढू शकतात मग भले तुमचा तसा उद्देश असो वा नसो. हीच गोष्ट कुणी दुसर्‍याने लिहिलि असती तर मी दुर्लक्षच केले असते.

आपला नम्र,
विकु.

एक चांगला थेसिस मिळाला. यात खास करुन "सुवर्णबिंदूप्राशन" यावरील संशोधन आहे.

त्यातील रिझल्ट्सः-
Children in Suvana Bindu Prashan group showed significant reduction in the scores of
eating habits, behaviour, mood, temperament and scores of event of illness.
However there was no significant difference in the score of sleeping habit. There was
significant increase in IQ percentage.
Conclusion:
Looking at the overall observations and findings of the study, it can be concluded
that SBP definitely has effect on improving immunity and intelligence.

अधिक माहीती :- http://182.48.228.18:8080/jspui/bitstream/123456789/495/3/aniket.pdf

मुळातुन वाचण्यासारखा वाटला.

आता गजानन तुमचा प्रश्न. जर ते सुवर्ण प्राश तुमच्या पाल्याला द्यायची इच्छा असेल, तर ते कोण बनवणार आणि किती देणार हे सगळे डीटेल्स मागवणे गरजेचे वाटते. जर उगाच कोणीतरी बनावट औषध देत असेल तर न घेणे उत्तम, पण ते जर एखाद्या निष्णात व्यक्ती/संस्थेने बनवलेले असेल तर घ्यायला हरकत नसावी.

दुर्दैवाने म्हणा की सुदैवाने, सुवर्णप्राश (किंवा तस्तम) औषधाचे दुष्परीणाम यावर गुगलुन काहिच मिळाले नाही. म्हणजे दुष्परीणाम नाहीत, की अद्याप माहिती नाही ?

चला चर्चा संपायच्या मार्गावर आहे. गुड. विजयराव तो थेसिस , विषेशतः रीझल्ट सेक्शन त्यातला क्लिनिकल ट्रायल्स चे रीझल्ट वाचा मग इथे त्यातील सार लिहा. सिगनिफिकंट म्हणजे नक्कि काय असा नविन प्रश्न आता माझ्या डोक्यात तयार झालाय. एका ठिकाणी जि गोष्ट १०% वाढते ती खुप चांगली आणी दुसरी कडे १२ % वाढते ती सिगनेफिकंट नाही Uhoh
इथे कोणाला नावे ठेवणे किंवा कुणाची मापे काढणे हा विषय नाही. म्हतारी मेल्याचे दुखः नाही पण काळ सोकावतो . :विनाकारण आर्धा पाउन तास वाया घालवलेला निवांत :

आणि हो त्यांनी दिलेल्या औषधात ४ मि.ग्रा. सोने होते / पर डोस ( पेज ७९).

वरच्या पेपरातला डोस मला जास्त वाटतोय.
शिवाय पेपरपेक्षा ती जाहिरातच अधिक आहे.

हा एक महत्त्वाचा पेपर - http://www.ingentaconnect.com/content/asp/jnn/2013/00000013/00000003/art...

आणि हा एक - http://www.sciencedirect.com/science/article/pii/S1748013211001137

विकु,
फिल्मस्टार गोविंदाच्या ऑर्‍याशी तुलना केल्याबद्दल धन्यवाद. Happy
सुवर्णभस्माला विरोध हा अगोदर वैज्ञानिक निकषांवरच व्हायला हवा. बाकीचे सर्व मुद्दे नंतर येतात. लोक अण्वस्त्र बनवतात म्हणून शाळांमध्ये फिजनफ्युजन शिकवू नका, असं म्हणण्यासारखं आहे हे.

तो पेपर नाहेय. तो आखा थेसिस आहे. पण १००% त्याने पेपर कुठेतरी पब्लिश केला असेलच. पण त्याचा लिटरेचर सर्वे छानच आहे. त्यात बरीच चांगली माहिती मिळाली.

निवांत पाटील,
तो पेपर आहे ऑनलाइन. सुवर्णभस्मामुळे मुलांच्या बुध्यंकात वाढ झाली, असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. त्याच महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांचे याच विषयावरचे अजून तीनचार पेपरतरी आहेत. कर्नाटकातल्या अनेक कॉलेजांनी असे पेपर छापले आहेत. पण त्या जर्नलांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह आहे.

सिमन्तिनी यान्नी जे लिहिले आहे, त्याला अनुमोदन.

आणि सुवर्णभस्मामुळे जर माणसाची बुद्धी वाढते, तर मुळात जी पोरे बुद्धीमानच आहेत, त्यानाच ते द्यायचा अट्टाहास का?

मानसिक अपंग, अल्झेमरचे रुग्ण यांच्यावर काही प्रयोग झाले आहेत का?

बाकी गजानन यांच्या मुलीच्या शाळेत दिलं जाणारं सुवर्णभस्म हे एका अतिशय प्रसिद्ध आणि जुन्या कंपनीचं आहे. त्यासाठी वापरली जाणारी मानांकनंही त्यांनी जाहीर केली आहेत. वर उल्लेखलेली पद्धत ते नक्कीच सुवर्णभस्म तयार करायला वापरत नाहीत. त्यामुळे 'सुवर्णभस्माच्या नावाखाली काय दिलं?' हे सहज पडताळून पाहता येऊ शकतं.

चिनुक्समामा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्च केला.

त्यात हे एक पान मिळाले. http://www.mynanogold.com/

आता, माझा प्रश्न असा आहे की समजा, नॅनोगोल्डने न्ञुरॉन अ‍ॅक्टिवेशन वगैरे होते , तर ते आयुष्यभर घ्यायला नको का?

महिन्याचा एक २० रु चा डोस, याप्रमाणे १२ महिने औस्।अध घेतले, तर त्याचा इफेक्ट जन्मभर कसा काय राहू शकेल? शिवाय, हेही सगळे हायपोथेटिकल आहे ना?

चिनूक्स :- पण त्या जर्नलांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह आहे.>>>>>>> असं असेल तर कठीण आहे. निवांत पाटील म्हणतात, तसं १०%-१२% वाचुन बघावं लागेल. शेवटी संशोधन योग्य असणही गरजेचच, उगाच पेपर छापणे प्रकार असेल तर असही होतं.

वाचुन बघतो, काय म्हणतात हे लोकं.

मानसिक अपंग, अल्झेमरचे रुग्ण यांच्यावर काही प्रयोग झाले आहेत का?>>>> याची आधी लिंक दिली होती का? बहुदा चिनुक्सच्या पोस्ट मध्ये आहे. चेक कराव लागेल.

चिनुक्स एक प्रश्न :- म्हणजे खात्रीलायक असं संशोधन उपलब्ध नाही का, जे क्लिअरली म्हणेल की स्मरणशक्ती वाढण्यात सुवर्णप्राशचा मोलाचा वाटा आहे? आणि स्मरणशक्ती वाढली हे कसं ठरवणार? काही टेस्ट आहेत का तश्या?

Pages