स्वर्णप्राश - आयुर्वेदिक औषध

Submitted by गजानन on 4 August, 2013 - 07:09

नमस्कार,

काल मुलीच्या शाळेत आयुर्वेदातल्या एका तज्ज्ञांचे व्याख्यान होते. त्यांनी स्वर्णप्राश या आयुर्वेदातल्या एका औषधाविषयी पालकांना पुढील माहिती दिली. शुद्ध सोने हे इतर आयुर्वेदिक औषधांबरोबर १००० ते १५०० °C पर्यंत उकळले जाते. ही क्रिया दहा ते पंधरा वेळा केली जाते. असे केल्याने ते सोने आपल्या शरीरात १००% शोषण्यायोग्य होते. मग हे सुवर्णभस्म मध आणि गायीचे तूप यांत घालून स्वर्ण प्राश तयार केले जाते. एक ते सहा या वयोगटातील मुलांना हे नियमितपणे (महिन्यातून तीन ते चार थेंब) दिल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढणे, योग्य शारिरीक वाढ, स्मरणशक्ती वाढणे इ. अनेक फायदे सांगण्यात आले. त्यांनी दिलेला फॉर्म भरून दिल्यावर शाळेत मुलांना हे दर महिन्याला देण्यात येईल. द्यायचे की नाही हे पालकांसाठी ऐच्छिक आहे. कोणाला याबाबत काही अनुभव आहे का? असल्यास कृपया इथे लिहा. धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बॅड कर्मा म्हणजे जर एखाद्या प्राण्याला इजा पोहोचवून औषध टेस्ट केले गेले असेल तर त्या ला झालेल्या वेदना हे कर्म चांगले नाही ते कधीतरी कोणाला तरी तेवढाच त्रास पोहोचव्णार. ह्याच जन्मात. अर्थात वरील चर्चेचा ह्या च्याशी काही संबं ध नाही. व ते संपूर्ण पणे मानन्यावर आहे.

चिनूक्स पुन्हा एकदा,
>>केवळ लोकांनी आयुर्वेदिय औषधं घेऊ नयेत,<<
हे माझे अजिब्बात म्हणणे नाही.
माझे म्हणणे पुनः सांगतो, की,
१. ते अमुक गृहस्थ विकत आहेत, ते "आयुर्वेदिक" आहे का?
२. अन औषध तरी आहे का?
३. अन हे जे काय आहे ते तुमच्या मुलांना धोकादायक नाही हे कशावरून?
४. १०००-१५०० डिग्रीवर 'आयुर्वेदिक औषधांसोबत उकळणे' हा काय प्रकार आहे? कोणते औषध त्या टेंप्रेचरला टिकेल? भाजी थोडी जास्त शिजली तर व्हिटॅमिन्स मरतात त्यातली.
५. कुणी काही क्लेम करतो म्हणून मुलांना आपण काय खाऊ घालतोय याचा विचार देखिल करायचा नाही??

केवळ इब्लिस बोलतो आहे म्हणजे 'प्राचिन भारतीय आयुर्वेदाच्या बद्दल याच्या मनात आकस आहेच, अन याचा विरोध आयुर्वेदाला आहे', हे अध्यहृत धरून जे काय चाल्लंय त्याची खरेच कीव येतेय मला.

प्लीजच चालू द्या तुमचं.

. एखादा धातू काही विशिष्ट प्रक्रिया केल्याने त्याचे कसकसे गुणधर्म बदलतात हे नक्कीच तपशीलवार माहित होतं (अनुभवाने) पण त्यामागच्या केमिकल, फिजिकल कारणांविषयी त्यांना निश्चितच माहिती नव्हती. त्यांच्याकडे आधुनिक प्रयोगशाळा नव्हत्या>>>>>>>>>

हे कसं काय, ते नाही कळलं. अगदी महर्षी कणादांनी कणांचा सिधान्त लिहिलाच होता आणि रसायनशास्त्र आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातुन लिहिलेलं नसावं का? अगदी त्यावेळीही सुवर्णभस्म होतच ना. भलेही त्याला रासायनिक संज्ञा आणि रासायनिक नामकरण नसेल, पण म्हणुन त्यांना नॅनोकण हा शब्द माहीती नसला तरी त्याची तयार करण्याची पद्धततर माहिती होतीच की आणि उपयोगही. कदाचित तसं त्यांनी लिहुन ठेवल्म असेलही पण आपल्याला सापडलं नसेल किंवा कळलं नसेल. Sad

उगाच संस्कृत न शिकल्याचे वाईट वाटतय. Sad

अधिक माहीती http://www.tjdb.org/123456789/10656/1/JSIR%2069%2812%29%20901-905.pdf आहे.

उदा. धातुला एक प्रकारची चकाकी असते, जी त्याच्या भस्माला असू नये, याचा अर्थ धातूची property बदलली पाहिजे.

>>मंजूडी | 5 August, 2013 - 07:09
ट्रायल असेल आणि निशुल्क औषधे असतील तर साईडैफेक्टची जबाबदारी कन्सेन्ट देणार्यावर असते.
ट्रायल असेल तर सशुल्क औशधे नैतिकदृष्ट्या देता येत नाहीत.>> नाही, समहाऊ हे पटत नाहीये. पण ठीक आहे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

मंजू, न पटण्याचं कारण कळलं नाही. ड्रग ट्रायलमधे औषध घेणारा पेशंट हा प्रयोगाचा महत्त्वाचा भाग असतो. पेशंटला औषधापासून फायदा होण्याचा संभव आहे तसाच तोटा होण्याचादेखिल. तोटा झाला तर नेमका काय, फायदा झाला तर साइडइफेक्ट्स कुठले याबद्दल कंपनीला आवश्यक ती माहिती मिळणार आहे. थोडक्यात काय तर औषध घेणारी व्यक्ती 'गिनि पिग' होऊन कंपनीचा फायदा करून देते आहे. त्यामुळे त्याच व्यक्तीला ती ट्रायल- औषधं सशुल्क देणं एथिकली, मॉरली आणि व्यवहारदृष्ट्या कसं योग्य ठरेल?

यावरून आठवलं, विकसीत देशातल्या कंपन्या अविकसीत-विकसनशील देशांत औषधाच्या ट्रायल्स घेतात याबद्दल वाचलं होतं. कारणं काय असावीत माहिती नाही. राबवल्या जाणर्‍या कायद्यांची शिथिलता? काँपेन्सेशन कमी द्यावं लागतं? पोस्ट ट्रायल काळजी घेण्याची फारशी गरज उरत नाही? खालच्या दुव्यावर काही रिलेटेड माहिती दिसली.
http://bioethics.georgetown.edu/nbac/clinical/Chap4.html

गजानन, सॉरी. तुझ्या धाग्यावर हे टँजट झालंय. पण मंजूडी आणि सातीच्या पोस्टींच्या अनुषंगानं लिहिलं गेलं.

इब्लिस पुर्णपणे अनुमोदन. सध्या जे काही चालु आहे ते बकवास आहे.

चिनूक्स , तुम्ही म्हणताय ते चुकिचे नाहीय. पण त्याच्या ( मेटलच्या) प्रॉपर्टीज चेक करुन रेसर्च आर्टीकल पब्लिश करणे आणि सरळ सरळ ते खुपच उपय्प्गी आहे हे ठामपणे सांगुन ते विकणे किंवा फुकट देणे यात खुप फरक आहे. आता सो ने, चांदी याबरोबर तांबे नाही का अँटीबॅक्टेरीअल ? आहेच. पॅथोजन कौंट खरोखर कमी होतो पाणी तांब्याच्या भांड्यात ठेवल्यामुळे. म्हणुन तांब्याचे भस्म घेउन ते अँटीबायोटीक्स प्रमाणे काम करेल असे म्हणणे (तसे सिध्ह केल्याशिवाय) केवळ धोकादायक ठरेल.

दुसरी गोष्ट म्हणजे, घेउन तोटा तर काही होत नाही असे म्हणणे अ घेणे हे देखिल चुकेचे आहे. कारण तोटा झालेला कधी कळेल तेंव्हा वेळ निघुन गेलेली असेल आणि तोटा अ‍ॅफोर्डेबल असेल तर ठिक पण नसेल तर...

इब्लिस,
तुमचे हे मुद्दे तुम्ही आत्ता उपस्थित करताय Happy
मी लिहिली की सुवर्नभस्म तयार करण्याची विधी. त्यात मलातरी औषधं उच्च तापमानाला उकळलेली दिसत नाहीयेत.
औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि जबाबदारीबद्दल तुम्हांला काही म्हणायचं आहे, हे मलातरी आधी दिसलं नाही. तुम्ही सतत सुवर्णभस्माच्या, नॅनोगोल्डच्या प्रक्रियेबद्दल, गुणधर्मांबद्दलच बोललात.
जबाबदारी, परवानग्या यांबद्दल लिहिलंय की साती, केश्विनी, अश्विनीमामी यांनी. त्याबद्दल कोणाचंच दुमत असू नये. मात्र हे मुद्दे असताना तुम्ही धातूंचं महाग असणं, किंवा मी तुम्हांला गुगल करा असं सांगणं, किंवा सोन्याचे औषधी गुणधर्म यांबद्दलच का लिहिलं, हे कळलं नाही. Happy

निवांत पाटील,
मी 'शाळेत सुवर्णभस्म घ्या / द्या' असं कुठे लिहिलंय? सुवर्णभस्म = नॅनोगोल्ड आणि नॅनोगोल्डमध्ये अँटिमायक्रोबियल गुणधर्म आहेत, एवढंच मी लिहितोय.

शाळांची, औषध कंपन्यांची जबाबदारी किंवा नैतिकता सिद्ध करण्यासाठी किंवा कोणी विकत असलेलं औषध खोटं आहे हे सिद्ध करण्यासाठी रसायनशास्त्रातल्या सिद्धांतांना किंवा संशोधनाला कोणी खोटं का ठरवावं? ते दोन पूर्णपणे वेगळे असे मुद्दे आहेत.

पण पाटील, ज्या सुवर्णभस्म/ औषधाबद्दल हमदर्दने क्लिनिकल ट्रायल्स घेतल्या त्या खोट्या म्हणायच्या का?

>> शाळांची, औषध कंपन्यांची जबाबदारी किंवा नैतिकता सिद्ध करण्यासाठी किंवा कोणी विकत असलेलं औषध खोटं आहे हे सिद्ध करण्यासाठी रसायनशास्त्रातल्या सिद्धांतांना किंवा संशोधनाला कोणी खोटं का ठरवावं? ते दोन पूर्णपणे वेगळे असे मुद्दे आहेत.

पहिल्याच पानावरचा पहिलाच प्रतिसाद वाचला तर या धाग्यावर हे दोन मुद्दे एकत्र का झाले असतील हे लक्षात येतं आहे.

ते कसं? माझा प्रतिसाद पूर्णपणे संशोधनाबद्दल बोलतो. त्या विशिष्ट औषधाचा खरेखोटेपणा तपासण्याची जबाबदारी शाळेची आणि पालकांची आहे. ऑनलाइन फोरमवर कोणीही त्याबद्दल सांगू शकत नाही. एकदा सुवर्णभस्माचे औषध म्हणून फायदेतोटे कळले की ते पाल्याला द्यावं की नाही, ही जबाबदारीही पालकाची. हा निर्णय सुवर्णभस्माबद्दलच्या संशोधनातूनच घेता येईल.

गजाभाऊंचा बीजभाषणातला प्रश्न शाळेत (प्रचाराला) आलेल्या औषधाबाबतच होता. जनरल संशोधनाबद्दल नव्हताच की.

>>
त्या विशिष्ट औषधाचा खरेखोटेपणा तपासण्याची जबाबदारी शाळेची आणि पालकांची आहे. ऑनलाइन फोरमवर कोणीही त्याबद्दल सांगू शकत नाही.
<<

बरोबर. हे त्या प्रतिसादात यायला हवं होतं नाही का?

प्रचाराला आलेलं औषध हे सुवर्णभस्म होतं. ते कोणी बनवलं, कुठे बनवलं, या तपशिलांअभावी ते औषध द्यावं की नाही, हे कोणीच सांगू शकणार नाही. मात्र मुळात सुवर्णभस्म द्यावं की नाही, याबद्दल निर्णय घेता येतो. रॅनबॅक्सीसारख्या कंपन्यांच्या औषधांची खात्री देता येत नाही, तिथे एका शाळेत येणार्‍या औषधाची खात्री कोण कशी देईल?

<बरोबर. हे त्या प्रतिसादात यायला हवं होतं नाही का?>

Lol हे सर्वसामान्य शहाणपण आहे. गजाननलाही याची कल्पना असणारच. असो.

मी तरी तेच म्हणते आहे की. तुमच्या त्या पोस्टमुळे संपूर्ण चर्चेची दिशा सुवर्णभस्माबाबतचं संशोधन आणि आयुर्वेद आणि पूर्वजांना नॅनो टेक्नॉलॉजी माहीत होती की नाही अशी बदलली ना!
सामान्य वाचक त्यातून 'चांगलं असतं हो सुवर्णभस्म/प्राश की काय ते' एवढाच टेक होम मेसेज घेतो ना!

>> हे सर्वसामान्य शहाणपण आहे
तसं असतं तर ही चर्चा सुरूही झाली नसती आणि इतकी भरकटलीही नसती.

<तुमच्या त्या पोस्टमुळे संपूर्ण चर्चेची दिशा सुवर्णभस्माबाबतचं संशोधन आणि आयुर्वेद आणि पूर्वजांना नॅनो टेक्नॉलॉजी माहीत होती की नाही अशी बदलली ना!>

सुवर्णभस्म आणि त्याबद्दलचं संशोधन या मुद्द्याशिवाय 'औषध घ्यावं की नाही?' हे कसं ठरवणार? कारण मुळात संशोधन 'सुवर्णभस्म घ्यावं की नाही?' याबद्दलच सुरू आहे. ते कुठे आणि कसं तयार केलं, हा फार नंतरचा भाग झाला.

<तसं असतं तर ही चर्चा सुरूही झाली नसती आणि इतकी भरकटलीही नसती.>

आता त्याला माझा इलाज नाही. 'औषधं तपासून घ्या, जबाबदारीनं घ्या' हे सांगण्यासाठी रासायनिक सिद्धांत आणि संशोधन खोटे ठरवू नयेत, हे मात्र नक्की.

चिनूक्स : Happy
तुमचे सुरवातीचे प्रतिसाद वाचल्यावर मला वाटले तुम्ही त्याला सपोर्ट करताहात. म्हणुन बाफच्या अनुषंगाने लिहले आहे. तेंव्हा गडबडीत टाइप केले. आता निवांत लिहतो.

भस्म म्हणजे राख. केमिकल भाषेत ऑक्साईड. (करेक्ट मी इफ आय अ‍ॅम राँग). आता आपण गोल्ड नॅनोपार्टीकल आणि आणि सुवर्णभस्म कसे काय कंपेअर करु शकतो. भले त्याच्या तश्या प्रॉपर्टीज असोत किंवा नसोत. कोलायड्ल गोल्ड हे दुसरेच प्रकरण आहे.

:उत्तराच्या प्रतिक्षेतः

http://www.sigmaaldrich.com/catalog/search?interface=All&term=gold&lang=...

गोल्ड नॅनो पार्टीकल्स १ ग्राम ३१२७२ रु मिळतात. ९९.९% <१००नॅनो मी.

निवांत पाटील,
मी या आधीच्या पानावर काही लिंका दिल्या आहेत. त्या कृपया वाचा. 'भस्म' असं नाव असलं तरी ती राख / ऑक्साइड नाही. ते नॅनोगोल्ड आहे. लालतपकिरी रंगाचं.
त्याच पेपरांमध्ये सुवर्णभस्म तयार करण्याची विधी आहेत. सोन्यापासूनच ते तयार केलं जातं.

आता पुन्हा - मग इतक्या कमी किमतीत ते शाळांमध्ये कसं दिलं जातं, हा प्रश्न येऊ शकतो. त्याचा संशोधनाशी संबंध नाही.

<तुमचे सुरवातीचे प्रतिसाद वाचल्यावर मला वाटले तुम्ही त्याला सपोर्ट करताहात. >
मी केवळ संशोधनाबद्दल लिहिलं आहे. पुढच्या प्रतिसादांमध्ये चाचण्या व्हायला हव्यात, हेही लिहिलं आहे. नॅनोगोल्डबद्दल अतिशय चुकीची विधानं वाचल्यावर माझे पुढचे मुद्दे आले आहेत. त्याचा अर्थ मी सुवर्णभस्माचा पाठिराखा आहे, असा नाही. मात्र नॅनोगोल्डच्या गुणधर्मांबद्दल मी ठाम आहे.

अँटिमायक्रोबियल.
बाकी लिंका दिलेल्या पेपरांमध्ये आहेच.
हां, ते अँटिमायक्रोबियल आहे म्हणून बुधलाभर प्यायलं असं करायचं नाही. अतिप्रमाणात नॅनोकण शरीरात गेल्यास काय होतं, यावरही संशोधन सुरू आहे.

आपल्याला मोबाइल फोन घ्यायचा असेल, तर आपण त्या फोनचे स्पेसिफिकेशन बघतो. तसंच औषध घ्यावं की नाही, हे बघताना त्या औषधाचे गुणधर्म, त्यात वापरलेला मॉलेक्यूल, साइड इफेक्ट इत्यादी आधी तपासायला हवं.
औषधातली भेसळ आणि मुलांना मुळात औषध द्यावं की नाही, हे मुद्दे नंतर येतात किंवा ते आपले आपण सोडवायचे असतात.

मला स्वतःला वैयक्तिकरित्या चिन्मयच्या पोस्टमधून " तुमचे सुरवातीचे प्रतिसाद वाचल्यावर मला वाटले तुम्ही त्याला सपोर्ट करताहात." नि इब्लिस च्या पोस्ट्मधून 'ते सरसकट आयुर्वेदावर घसरले आहेत' असे वाटले नव्हते. इथे वाचणारा त्याला जे आधीच माहित आहे नि त्याचा कल ज्या बाजूला झुकलेला आहे त्या prejudice ने वाचून पोस्टचा आपल्या सोयीनुसार अर्थ लावतोय. पोस्ट करणारा किती fine prints लावत बसणार ?

ऑफकोर्स ... ते आहेच. पण त्या गुणधर्माचा आणि जे काही चालले आहे त्याचा आपण लोक संबंध लावणं चुकिचा आहे असे मला वाटते. ते अँटिमायक्रोबियल / अँटाकॅन्सर / अँटाअल्झायमर आहे हे प्रायोगिक लेवला सिद्ध केलेलं आहे. पण त्याचा कसा उपयोग करता येइल यावर अजुन चर्चाच चालु आहे. क्लिनिकल ट्रायल्स अजुनही झाल्याचे माझ्या वाचनात आलेले नाही.

इथे महत्वाचा मुद्दा म्हणजे, जे काही सुवर्णभस्म / प्राश विकताहेत ते नेमके काय आहे. त्यात निदान ट्रेस लेवलला तरी एखादा सोन्याचा अणु आहे का? आणि असेल तर त्याचा नेमका काय रोल प्ले होणार आहे तो आहे. तो शरीरात शोषला जाणार? कुठे ? कि एखाद्या सेलला स्टीम्युलेट करणार ? कि एखादे नविन एन्झाइम रीलेज होणार? कुठे? त्याचा मोड ऑफ अ‍ॅक्शन काय असणार? इ. इ . माहित नसताना जो बाजार भरला आहे त्याबद्दल वाईट वाटते.

तुम्ही चुकिचे लिहले आहे असे मी कुठेच म्ह्टले नाही तुमची सुरवातीची विधाने वाचुन मला तसे वाटले ( माझी चुक असु शकते कारण डिफरंट परस्पे़टीव्ह). मला तसे वाटले म्हणुन विचार केला कि अजुन कोणाला तरी वाटुन चुकिचा संदेश जाउ नये म्हणुन येथे लिहले. "कारण चिनूक्स म्हणाला म्हणुन " असे होउ नये Happy

बाकि चालु द्यात ...

निवांत पाटील,
क्लिनिकल ट्रायल्स झाल्या आहेत. मी स्वतः त्यात सहभागी झालेलो आहे. आधीच्या लिंकांमध्ये एकदोन लिंका अशा ट्रायल्सच्या आहेत. अजूनही असंख्य असतील. पाण्याच्या शुद्धीकरणात, हातमोजेपायमोजे स्वच्छ करण्यासाठी वापरतात की हे कण. ड्रग कॅरियर म्हणून तर कधीचा सुरू आहे हा वापर.

<जे काही सुवर्णभस्म / प्राश विकताहेत ते नेमके काय आहे. त्यात निदान ट्रेस लेवलला तरी एखादा सोन्याचा अणु आहे का?>

एनसीएलला बाजारात मिळणार्‍या काही सुवर्णभस्मांच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यात आधी सांगितल्यप्रमाणे ९० टक्क्यांहून अधिक नॅनोगोल्ड सापडलं आहे. मी दिलेले पेपर वाचले तर एएफएम, एसईएम, इडॅक्स इत्यादी वापरून चाचण्या केलेल्या आहेत. एनसीएलमध्ये झालेलं संशोधनही दोनेक दिवसांत इथे देईन. हे केवळ सुवर्णभस्मांबद्दलच नव्हे, तर अनेक भस्मांबद्दल झालेलं आहे.

<तो शरीरात शोषला जाणार? कुठे ? कि एखाद्या सेलला स्टीम्युलेट करणार ? कि एखादे नविन एन्झाइम रीलेज होणार? कुठे? त्याचा मोड ऑफ अ‍ॅक्शन काय असणार? इ. इ . माहित नसताना जो बाजार भरला आहे त्याबद्दल वाईट वाटते. > पुन्हा एकदा - गेली अनेक वर्षं यावर काम सुरू आहे. अनेक पेपर सापडतील. ज्यात सुवर्णभस्माचा खासकरून उल्लेख होता, त्या लिंका दिल्या आहेत.

केवळ चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून झालेल्या संशोधनाला नाकारायचं, हे पटत नाही. असो.

कुणीही येऊन कुठलंही माहित नसलेलं औषध घ्या सांगितलं तर शाळेतच काय, घरीही घेऊ नये. मग ते आयुर्वेदिक असो, अ‍ॅलोपॅथिक असो वा अजून कुठलं प्रत्येकाच्या शरिराची टेन्डन्सी वेगळी असते आणि कुणासाठी काय व किती प्रमाणात योग्य आहे हे त्या औषधाच्या पॅकिंगवर दिलेले प्रमाण किंवा औषधांची डिरेक्टरीमध्ये दिलेली माहिती आणि डॉक्टर्सची तपासणी/निदान/प्रिस्क्रीप्शन ह्यावरच ठरवावे.

सुवर्णभस्म झंडू फार्मास्युटिकल्स, श्री धूतपापेश्वर, बैद्यनाथ सारख्या नामांकित व खूप वर्षांचा अनुभव असलेल्या कंपन्यांनी बाजारात आणलेलं आहे. ह्या कंपन्या काहीही बेस नसलेलं औषध मार्केटमध्ये आणण्याजोग्या बेजबाबदार असतील असं वाटत नाही. कुठल्याही औषधांना FDA टाईप ऑथोरिटीचं अ‍ॅप्रूव्हल लागतच असेल ना? काही औषधं (फक्त आयुर्वेदिकच नव्हे... तर इतरही) एका देशात चालू शकतात तर दुसर्‍या देशात बॅनड असतात. माणसं तर सगळीकडे सारखीच असतात कुठल्याही देशात गेलं तरी. मग दुसर्‍या देशात त्या औषधावर हानीकारक म्हणून बंदी असेल तेव्हा पहिल्या देशातल्या लोकांनी तेच औषध बंदी नाही म्हणून घ्यावे का?

कुठल्याही फार्मास्युटिकल कंपनीने बाजारात आणलेलं नविन औषध जेव्हा मेडिकल रेप्रेझेंटेटिव्ह डॉक्टर्सना देतात तेव्हा किती डॉक्टर्स प्रत्येक औषधाची सखोल माहिती (एम.आर. ने मार्केटिंग करताना दिलेल्या माहिती व्यतिरिक्त) इतर मार्गाने करुन घेतात? की निव्वळ कंटेंट्स आणि केमिकल नेम पाहून पेशंट्सना लिहून देणे योग्य किंवा पुरेसे आहे?

सुवर्णभस्मापासून विषयांतर होतंय, पण इतर औषधांच्या बाबतीतही हेच मनात येते.

चिनूक्सजी,
१. कुणाचेही कोणतेही "संशोधन" कुणीही नाकारलेले नाही.
२. आपणच सांगितलेल्या सुवर्णभस्म बनविण्याच्या कृतीचा व सदर मार्केटिंग मधे सांगितलेल्या 'सिद्धतेचा' संबंध नाही. हे आपणही मान्य केलेले आहे.
३. संशोधन पूर्ण होऊन, वापरात आणले जाई पर्यंत, लहान मुलांवर त्याचा प्रयोग व्हावा हे मला पटत नाही.
४. सोन्याची किंमत व भारतीयांचे सुवर्णवेड हे सुवर्णभस्माभोवती एक वेगळे वलय तयार करते, व माझ्या शोन्याला शोन्याच्या भांड्यातून अन अगदीच्च नै परवडलं तर चांदीच्या भांड्यातून दूध/पाणी पाजीन असल्या कन्सेप्ट बोकाळलेल्या दिसतात. (संदर्भ : सोने महाग अस्ल्याबद्दलची माझी कॉमेंट. याचा तुमच्या रीसर्चशी संबंध नाहीये हो..)
५. अँटीमायक्रोबियल प्रॉपर्टीबद्दलच्या रीसर्चबद्दल आपण बोलत आहात.
हेवी मेटल्स मुळे जिवंत जीव मरतो, इतकाच "अँटीमायक्रोबियल" या शब्दाचा अर्थ, नॅनो गोल्ड्/सिल्व्हर्/कॉपर यांचे बाबतीत आहे.
ब्याक्टेरिया मारताना इतर जिवंत / मानवी पेशी देखिल मरतात काय? याबद्दलचा डेटा कृपया तपासून पहा.
फक्त विशिष्ट जीवांच्या उदा. टीबी चा जंतू- या जिवाला, व फक्त याच जीवाला, जगण्यासाठी लागणारी काही केमिकल प्रोसेस खंडित करणे, व त्या खंडनामुळे इतर मानवी पेशींना (कोणत्याही प्रकारच्या) धोका पोहोचणार नाही, असे व अशा प्रकारचे अणू/रेणू विकसित करणे हे अँटीमायक्रोबियल फार्मॅकॉलॉजीकल एजंट्स बद्दलच्या संशोधनाचे मूळ ध्येय आहे.
नॅनो पार्टिकल्स 'व्हेइकल' म्हणून वापरताना त्वरेने विभाजीत होणार्‍या क्यान्सरच्या पेशी हे सोन्याचे वा तत्सम नॅनो कण वेचून घेतील अशी व्यवस्था करणारे स्टिम्युलण्ट्स देखिल सोबत देता येतात. टार्गेटेड डिलिव्हरी असा तो संशोधन विषय आहे.

असो.

माझ्या व तुमच्या बोलण्यात विसंवाद दिसतो आहे, याचे कारण असे, की मी एक वैद्य म्हणून, लोकांच्या वतीने त्यांनी अमुक अणू/रेणू शरीरात समाविष्ट करून घ्यावे हे निर्णय घेत असतो. त्या अणू रेणूंच्या बर्‍यावाईट परिणामांची माहिती करून घेणे, त्याच वेळी लोकांनी अनवधानाने किंवा कुणा इतरांच्या सांगण्यावरून आपल्या शरीरात घालून घेतलेल्या अणू/रेणू (रसायने) यांच्या परिणामांवर उपचार करण्यासाठी जबाबदार असणे, हे देखिल माझ्या कर्तव्यात / अभ्यासात येते. असे करण्यापासून लोकांना परावृत्त करणे हेदेखिल मी माझे कर्तव्य समजतो.

तुम्ही शुद्ध अणूंच्या विशिष्ट गुणधर्मांबद्दल, त्याबद्दलच्या संशोधनाबद्दल जरी बोलत असलात, व ते मला समजत असले, तरीही, तुमच्या शब्दांतून लोकांपर्यंत पोहोचणारा संदेश व त्यातून होणारे संभाव्य परिणाम मला दिसत असतात. त्यामुळे मला तुमचे बोलणे खोडून काढावे लागते.

केवळ जुन्या ग्रंथात अमुक आहे म्हणून तुम्ही संशोधन करीत नाही, हे मला ठाऊक आहे. सोने महाग म्हणून तुम्ही त्याचे नॅनोपार्टिकल्स बनवित नाही हे देखिल मला ठाऊक आहे.

पण,
तुम्ही नॅनॉ पार्टिकल्स सिद्ध केल्या नंतर तुमच्या तीक्ष्ण निरिक्षणशक्तीच्या जोरावर, "अरेच्चा! हे अशासारखे काहीतरी जुन्या ग्रंथांत ऑलरेडी आहे की!" असे म्हणता. त्या ग्रंथातल्या इतर कल्पनाविलासाला तुमचे अनुमोदन नसते, हे तुम्हाला मनोमन ठाऊक व अध्यहृत असले, तरी तुमच्या त्या वाक्यानंतर, इतर पुराणढोलबडवमतवादी तुमचे नांव घेऊन वेगळेच मर्कटिंग करतात, Sad हे मात्र मला सहन होत नाही Happy

तुम्ही नॅनोटेकबद्दल बोला. मी वैद्यकाबद्दल बोलतो. अशी मांडवली करायची का? Wink

(ऑल्मोस्ट-लिंटी-लेन्ग्थ-प्रतिसाद-पटू) इब्लिस.

Pages