स्वर्णप्राश - आयुर्वेदिक औषध

Submitted by गजानन on 4 August, 2013 - 07:09

नमस्कार,

काल मुलीच्या शाळेत आयुर्वेदातल्या एका तज्ज्ञांचे व्याख्यान होते. त्यांनी स्वर्णप्राश या आयुर्वेदातल्या एका औषधाविषयी पालकांना पुढील माहिती दिली. शुद्ध सोने हे इतर आयुर्वेदिक औषधांबरोबर १००० ते १५०० °C पर्यंत उकळले जाते. ही क्रिया दहा ते पंधरा वेळा केली जाते. असे केल्याने ते सोने आपल्या शरीरात १००% शोषण्यायोग्य होते. मग हे सुवर्णभस्म मध आणि गायीचे तूप यांत घालून स्वर्ण प्राश तयार केले जाते. एक ते सहा या वयोगटातील मुलांना हे नियमितपणे (महिन्यातून तीन ते चार थेंब) दिल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढणे, योग्य शारिरीक वाढ, स्मरणशक्ती वाढणे इ. अनेक फायदे सांगण्यात आले. त्यांनी दिलेला फॉर्म भरून दिल्यावर शाळेत मुलांना हे दर महिन्याला देण्यात येईल. द्यायचे की नाही हे पालकांसाठी ऐच्छिक आहे. कोणाला याबाबत काही अनुभव आहे का? असल्यास कृपया इथे लिहा. धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिनूक्स, लगे रहो!! (आता ह्याच्यावर डॉ. इब्लिस ह्यांनी कृपया चिडू नये... चिनूक्स पुर्ण अभ्यासाने आणि संतुलित प्रतिसाद देतो आहे म्हणून त्याला हे प्रोत्साहन आहे).

मात्र या कणांमुळे स्मरणशक्ती वाढते, हे अजून कोणी लिहिलेलं नाही.>>> भ्रमरने वर रिप्रोड्यूस केलेल्या पॅरामधील "There have also been some in vitro experiments which have proved that gold nanoparticles combined with microwave radiation can destroy the beta-amyloid fibrils and plaque which are characteristic for Alzheimer’s disease." ह्या स्टेटमेंटशी काही रिलेशन असू शकते का?

अवांतर :- मला फारच क्वचित कफ, खोकला होतो. पण जेव्हा होतो तेव्हा तो फक्त सितोपलादि चूर्णाने ठणठणीत बरा होतो... शप्पथ :-P. माझ्या वयस्कर वडिलांना आत्ता पावसाळ्यात कफाचा खूप त्रास झाला होता. १-२ दिवस घरगुती औषधे घेतल्यावर अ‍ॅलोपॅथीच्या फॅमिली डॉक्टरकडे घेऊन गेले. त्यांनी दिलेला त्यांच्याकडील औषधाचा डोस किंवा लिहून दिलेल्या गोळ्या आणि सिरप्स पुर्ण घेतल्यावरही ५%ही फरक पडला नव्हता. ती औषधं संपल्यानंतर सितोपलादि चूर्ण सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्री झोपताना पाव वाटी कोमट पाण्यातून अर्धा चहाचा चमचा सितोपलादि ४ दिवस दिले. कफ पुर्णपणे नाहिसा झाला. त्यानंतर एक एक डोस कमी करत ८ दिवसांनी पुर्ण बंद केले. पहिल्या दिवशीच फरक पडल्यामुळे अजून वाट पाहिली. नाहीतर न्युमोनियावर जाईल काय ह्या भितीने हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार होते त्यांना.

<तर केवळ माझे आऊट ऑफ काँटेक्स्ट शब्द घेऊन मी "आयुर्वेदाला" विरोध करतो आहे, हा आभास का निर्माण करणे सुरू आहे?
धाग्यात दिलेल्या औषधात सुवर्णभस्म हा शब्द/वस्तू आहे! हे जे केलं त्याचा अन सुवर्णभस्माचा कस्ला बोडक्याचा संबंध येतो त्यात?>

तुम्ही पुढचा प्रतिसाद योग्य भाषेत द्याल, ही अपेक्षा व्यक्त करून प्रतिसाद लिहितो आहे.

तुमचं कुठलंही विधान मी संदर्भ सोडून घेतलेलं नाही.
मुद्दा 'सुवर्णभस्माची उपयुक्तता' हाच आहे. सुरुवातीपासून.
तुम्ही तापमानावर शंका घेतली, त्याला मी उत्तर दिलं.
सोनं वितळवताना त्यात वनस्पती घातल्या, तरी ते योग्य आहे, कारण अनेक धातूंच्या शुद्धीकरणासाठी अशा वनस्पती रोज वापरल्या जातात. आणि हे औषधांच्या निर्मितीत नव्हे. तर मोठाल्या उद्योगांमध्ये. बारावीच्या रसायनशास्त्राच्या पुस्तकात याबद्दल वाचायला मिळेल.
पुढे सोन्याच्या नॅनोकणांच्या गुणधर्माबद्दल शंका घेतली, त्यालाही मी उत्तर दिलं.

<सोन्याचांदीतला चांदीच बरा दिसला? सोन्याचे कोणते गुणधर्म सिद्ध झाले बा?>

हे तुम्ही गुगलून बघा, असं सांगितलं होतं. सिल्व्हरनॅनो हा शब्द जाहिरातींमध्ये अनेकवेळा वापरला जातो, म्हणून तुम्हांला निदान तो माहीत असेल, अशी अपेक्षा होती, आणि म्हणून फक्त चांदीबद्दल लिहिलं. सोन्याच्या नॅनोकणांच्या गुणधर्मासाठी शेकडो पेपर उपलब्ध आहेत. कृपया गुगल करा. Happy

प्रत्येकच वेळी आयुर्वेदिक औषधे अ‍ॅलिपथिक वापरत असलेल्या गृहितकांतून बघणे चुकीचे.
एखाद्याच्या हातात मेजरटेप देवून त्याला एखादा पदार्थ गोड आहे की कडू हे मोजायला लावण्यासारखे आहे.
Wink

(अर्थात होमिपदीच्या बाबतीत हे नाही कारण ते आमचेच मॉलेक्यूलस अतार्कीकरीत्या डायल्यूट करून वापरतात.)

असो.
सुवर्णभस्माबद्दल काही माहिती नाही.
आम्ही लहान असताना गुटीतून सोने दिले गेलेय कारण आईचे त्यावर विश्वास होता.
आम्ही काही आमच्या मुलांना दिले नाही. आमच्या इथे आयुर्वेदिक महाविद्यालयात दर पुष्य नक्षत्राला नि:शुल्क मिळते.
बाकी दर महिन्याला सुवर्णभस्म दिल्यानंतर हेवी मेटल पॉईजनिंग होईल का,अशी काळजी वाटते.

असो. या एका पिढीवरच्या अभ्यासातून हे भस्म चांगले/वाईट की कसे हे एकदा सिद्ध झाल्यास आमच्या नातवंडांच्यावेळी इनफॉर्म्ड डिसीजन घेता येईल. Happy

अश्विनी,

अल्झायमर डिसीज आणि सोन्याचे नॅनोकण यांबद्दल काही संशोधन सुरू आहे. उदाहरणार्थ, http://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/22915547 हा पेपर. आणि http://www.scacadscience.org/sites/all/themes/precision/docs/journal/vol... हा पेपर.

मात्र त्याचा स्मरणशक्तीच्या वाढीशी संबंध नाही.

ह्म्म. वाढीशी नसेल पण स्मरणशक्ती अजून नाहिशी न होण्याशी आहे का? कारण अल्झायमरमध्ये मेंदू श्रिंक होतो. तो श्रिंक होण्यामुळे वेगवेगळी केंद्रं निकामी होतात आणि एकंदरच कार्य बाद होते. ते श्रिंक होणे जर थांबवता किंवा स्लो करता येत असेल तर इनडायरेक्टली स्मरणशक्ती नाहिशी होणेही थोपवता किंवा वेग कमी करता येईल ना?

<ते श्रिंक होणे जर थांबवता किंवा स्लो करता येत असेल तर इनडायरेक्टली स्मरणशक्ती नाहिशी होणेही थोपवता किंवा वेग कमी करता येईल ना?>

हो.

गमभन,

नॅनो हा शब्द नॅन्नोस या ग्रीक शब्दावरून आला आहे. अर्थ - लहान. हिंदीत नन्हा हा शब्द आपण वापरतो.
आपण वेळ, अंतर इत्यादी मोजण्यासाठी काही परिमाणं वापरतो. त्यांना आपण मिली, सेंटी, किलो असे प्रत्यय देतो. किलो म्हणजे १०^३. तसं नॅनो म्हणजे १०^-९. दहाचा उणे नववा घात. म्हणजे १ नॅनोमीटर = १०^-९ मीटर.

आता १ नॅनोमीटर - १००० नॅनोमीटर असा आकार असलेल्या कणांना नॅनोकण म्हणतात. अर्थात ही व्याख्या फारच ढोबळ आहे. कारण कुठल्या पदार्थाचे नॅनोकण आहेत, त्यावर या आकाराची मर्यादा ठरते. उदाहरणार्थ, कॅडमियम सल्फाइअडचे नॅनोकण हे ५.५ नॅनोमीटरच्या वर नॅनोकण राहत नाहीत.

या कणांच्या अतिलहान आकारामुळे त्यांचे गुनधर्म फार वेगळे असतात. उदाहरणार्थ, सोन्याच्या नॅनोकणांचा रंग त्यांच्या आकारमानानुसार बदलतो. हा रंग गुलाबी, निला, हिरवा असा असू शकतो. चांदीचे ४० नॅनोमीटर आकाराचे कण पिवळे असतात.

या कणांच्या वापर असंख्य क्षेत्रांमध्ये हल्ली रोज होत असतो.

औषधांशी संबंधीत कुठेतरी 'सोने' असा उल्लेख आल्यावर सदर व्यक्ती सरळ सरळ सोन्याने प्रतिकार शक्ति वाढते अन स्मरणशक्ती वाढते असा वाट्टेल तो दावा करीत आहे. अन असल्या भोंदू प्रकाराला परवानगी देणारे शाळावाले शुद्ध निष्काळजी आहेत असे माझे म्हणणे आहे.

इब्लिस, तुम्ही खरोखरंच पुरेशा गांभीर्याने हे लिहिलं असलंत आणि हा भोंदूपणा उघड करण्यात तुम्हाला रस असेल तर किंवा तुमच्या (डॉक्टर म्हणून) आणखीही काही शंका असतील (ज्या आमच्यासारख्यांच्या डोक्यात सहसा येणार नाहीत) तर या व्यक्तिची संपर्कमाहिती शाळेकडून घेऊन मी तुम्हाला देऊ शकेन.
>>>>

यावर काहीच लिहिलं नाही इब्लिसांनी.

गजानन ,शाळा किंवा आयुर्वेदाचार्य ही सेवा सशुल्क देणारेत की नि:शुल्क?

हे जाणून घेण्यात मला खरंच रस आहे . निशुल्क असेल तर प्रश्नच नाही . सशुल्क असेल तर मात्र शाळा आणि ते आयुर्वेदाचार्य दोघांच्याहीकडून अनैतिक आहे.

कुठलीही शाळा अशी औषधे प्रमोट करू शकत नाही. अत्यंत चुकीचे. खरे तर शाळांनी औषधेच काय कोणत्याही पदार्थाची अशी जाहिरात करू देऊ नये. मूळात सरकारी लशीकरणाच्या कार्यक्रमात /सप्लिमेंटसच्या कार्यक्रमात नसलेले असे काहिही औषधी प्रॉडक्ट देऊ केल्याबद्दल शाळेवर कारवाईसुद्धा होऊ शकते.
कुठलाही डॉक्टर असा शाळेत जाऊन पालकांना आपल्या औषधाची माहिती देऊन खरेदी करायला लावू शकत नाही.
ती औषाधाची चुकीच्या अनैतिक पद्धतीने जाहिरात ठरेल.
किमान हेच जर एखाद्या अ‍ॅलोपथिक औषधाच्या बाबत झाले तर एम सी आय अश्या प्रॅक्टीशनरची सनद काढून घेऊ शकेल.

माहितीसाठी विचारतो आहे, आमच्या शाळेत दरवर्षी दंतरोगतपासणी कँप व्हायचे, आणि दंतमहाविद्यालयातले विद्यार्थी आणि डॉक्टर दाढा काढणं वगैरे शाळेत करायचे. अमूक एक टूथपेस्टच वापरा, असंही सांगायचे. हेही बेकायदेशीर आहे का?
टिव्हीवरच्या जाहिरातींमध्येही डॉक्टर विद्यार्थ्यांना वर्गातच अमूक एक टूथपेस्ट वापरा, असं सांगताना दिसतात.

मूळात सरकारी लशीकरणाच्या कार्यक्रमात /सप्लिमेंटसच्या कार्यक्रमात नसलेले असे काहिही औषधी प्रॉडक्ट देऊ केल्याबद्दल शाळेवर कारवाईसुद्धा होऊ शकते.
>> ओके!!
पण मग त्याचा ती सेवा सशुल्क किंवा नि:शुल्क असण्याशी काही संबंध असू नये.

मूळात आयुर्वेदिक औषधांबाबत 'एकदम छान, साईडैफेक्टरहित' हा एक तर 'ह्या,एकदम बकवास ,थोतांड नुसते' अशॉ दुसरी या दोनच टोकाच्या प्रतीक्रिया येतात.
असे काही नसते. औषधे नक्कीच चांगली असतात पण त्यापै़की बर्याच औषधांचे प्रमाणीकरण झाले नाहीये.
कुठल्या वयात किती डोस असे काही निश्चित नसते.
कुठली औषधे ओवर द काऊंटर्,कुठली डॉक्टरकडे,कुठली केमिस्टकडे असे काही नीट नसते.

त्यात भोंदू,अशिक्षित लोकही सर्रास ही औषधे विकतात. (आमची औषधेही कंपाउंडर्स विकतात म्हणा पण बर्याचदा घेणार्यालाही आपण कंपाउंडरकडून औषधे घेतोय आणि हे चुकीचे आहे हे ओळखून असतात Wink )

कधी यात प्रमाणीकरण झाले तर मीसुद्धा ही औषधे वापरीन.

दंतमहाविद्यालयातले विद्यार्थी आणि डॉक्टर दाढी काढणं वगैरे शाळेत करायचे.>> दाढा करा हो ते >>>> Rofl मी पण दचकले होते ते वाचून. शाळेत दाढी अलाऊड नव्हती की काय असं वाटलं Rofl श्याआआ! चला सगळ्यांनी परत सिरियसली बोला.

चिनूक्स्,हो ते सरसकट सांगत असतील तर चूकीचे.
तुमचे दात आणि त्याबद्दल्चे प्रॉब्लेम पाहून सुचवित असतील तर प्रिस्क्रीप्शन.

मंजूडी, सशुल्क आणि निशुल्क यात फरक आहे. सुवर्णभस्माचे काही साईड इफेक्ट झाले तर कोण जबाबदार? ते देत असलेला डोस योग्य की अयोग्य याचे काही डॉक्युमेंटेशन आहे का?

आमच्या इथल्या आयुर्वेदिक महाविद्यालयात हे ट्रायल बेसिसवर रन होत आहे.
सगळी माहिती गठन होत आहे आणि औषध निशुल्क आहे.
इथे पालकांकडून कन्सेन्ट घेतली जातेय औषध घेण्याबाबत. म्हणजे कदाचित ही ट्रायल असू शकते.

सशुल्क आणि निशुल्क यात फरक आहे. सुवर्णभस्माचे काही साईड इफेक्ट झाले तर कोण जबाबदार?>> नि:शुल्क असले तर अपायांची जबाबदारी नाही घेतली तर चालते का?

<सुवर्णभस्माचे काही साईड इफेक्ट झाले तर कोण जबाबदार? ते देत असलेला डोस योग्य की अयोग्य याचे काही डॉक्युमेंटेशन आहे का?>

साती,
नॅनोकणांच्या सायटोटॉक्सिसिटीवर बरंच काम सुरू आहे. हे नॅनोकण जास्त प्रमाणात शरीरात गेले, तर हानिकारक असू शकतात, असं काही संशोधकांचं म्हणणं आहे, मात्र अजून ठाम निष्कर्ष काढता आलेले नाहीत. मात्र किती लहान मुलांना हे भस्म द्यायचं, किती द्यायचं, यावर काम व्हायलाच हवं. कारण गावोगावी हल्ली हे भस्म मुलांना दिलं जातं.

ऑपरेशन किंवा कुठल्याही छोट्याश्या प्रोसिजरच्या आधीही कन्सेन्ट घेतली जातेच की.

मंजूडी,ट्रायल असेल आणि निशुल्क औषधे असतील तर साईडैफेक्टची जबाबदारी कन्सेन्ट देणार्यावर असते.
ट्रायल असेल तर सशुल्क औशधे नैतिकदृष्ट्या देता येत नाहीत.

नॅनोकणांच्या सायटोटॉक्सिसिटीवर बरंच काम सुरू आहे. हे नॅनोकण जास्त प्रमाणात शरीरात गेले, तर हानिकारक असू शकतात, असं काही संशोधकांचं म्हणणं आहे, मात्र अजून ठाम निष्कर्ष काढता आलेले नाहीत. मात्र किती लहान मुलांना हे भस्म द्यायचं, किती द्यायचं, यावर काम व्हायलाच हवं. कारण गावोगावी हल्ली हे भस्म मुलांना दिलं जातं.>>>>> मॅक्सिमम डोसेज अजून ठरलं नसलं तरी हमखास सेफ डोस किती? इथपर्यंत आलं आहे का हे काम? तिथपर्यंत आलं असेल तर तो क्रायटेरिया लावून असं वाट्टेल तसं भस्म देण्यापासून रोखलं जाऊ शकतं का?

गजानन ,शाळा किंवा आयुर्वेदाचार्य ही सेवा सशुल्क देणारेत की नि:शुल्क? <<< साती, या डोसांचे शुल्क असे - सुरुवातीला तीस रुपये, त्यापुढच्या डोसांकरता प्रत्येकी वीस रुपये. तुमच्या पोस्टीतला नि:शुल्क हा पर्याय वाचून मला थोडे नवल वाटले होते. कारण पूर्ण व्याख्यानभर 'सोन्यावर असल्या खर्चिक प्रक्रिया करायच्या म्हणजे या प्राशाचे शुल्क नेमके किती असेल?' असा सौंसारी पिताप्रश्न माझ्या मनात अधून मधून डोकावत होता. Proud

तुमच्या त्यापुढील पोस्टी वाचून तुमचा मुद्दा समजला.

....

म्हणजे कदाचित ही ट्रायल असू शकते. <<< हे मुलांना देण्यापूर्वी त्याच्या प्राण्यांवर चाचण्या घेण्यात आलेल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

ट्रायल असेल आणि निशुल्क औषधे असतील तर साईडैफेक्टची जबाबदारी कन्सेन्ट देणार्यावर असते.
ट्रायल असेल तर सशुल्क औशधे नैतिकदृष्ट्या देता येत नाहीत.>> नाही, समहाऊ हे पटत नाहीये. पण ठीक आहे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

हे मुलांना देण्यापूर्वी त्याच्या प्राण्यांवर चाचण्या घेण्यात आलेल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.>>>> माणसांवर केल्या गेल्या नाहियेत का? हे विचार गजा त्यांना.

Pages