स्वर्णप्राश - आयुर्वेदिक औषध

Submitted by गजानन on 4 August, 2013 - 07:09

नमस्कार,

काल मुलीच्या शाळेत आयुर्वेदातल्या एका तज्ज्ञांचे व्याख्यान होते. त्यांनी स्वर्णप्राश या आयुर्वेदातल्या एका औषधाविषयी पालकांना पुढील माहिती दिली. शुद्ध सोने हे इतर आयुर्वेदिक औषधांबरोबर १००० ते १५०० °C पर्यंत उकळले जाते. ही क्रिया दहा ते पंधरा वेळा केली जाते. असे केल्याने ते सोने आपल्या शरीरात १००% शोषण्यायोग्य होते. मग हे सुवर्णभस्म मध आणि गायीचे तूप यांत घालून स्वर्ण प्राश तयार केले जाते. एक ते सहा या वयोगटातील मुलांना हे नियमितपणे (महिन्यातून तीन ते चार थेंब) दिल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढणे, योग्य शारिरीक वाढ, स्मरणशक्ती वाढणे इ. अनेक फायदे सांगण्यात आले. त्यांनी दिलेला फॉर्म भरून दिल्यावर शाळेत मुलांना हे दर महिन्याला देण्यात येईल. द्यायचे की नाही हे पालकांसाठी ऐच्छिक आहे. कोणाला याबाबत काही अनुभव आहे का? असल्यास कृपया इथे लिहा. धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिनूक्स ,मी तेच म्हणतेय.
अश्विनी, एकदा कंसेंट दिल्यावर ऑपरेशन मध्ये रूग्णं दगावल्यास डॉक्टर रिस्पॉन्सिबल नसतात.
डॉक्टरावर केस घालण्यापूर्वी दुसरी काही हलगर्जी झाली असे दाखविल्याखेरिज डॉक्टरवर कारवाई होत नाही.

गजानन,
अशा ट्रायली घेतल्या असण्याची शक्यता मला कमी वाटते. ते कुठल्या कंपनीचं सुवर्णभस्म वापरतात, हे मला इमेलीतून कळवशील का कृपया?

आम्हाला ज्यांनी व्याख्यान दिले त्या व्याख्यात्यांच्या मते पाण्यात सोने ठेवून किंवा पाण्यात उकळल्याने त्या पाण्यात सोन्याचा काहीच अंश उतरत नाही. खारीक किंवा इतर बालखाद्यांबरोबर जे सोने उगाळले जाते ते सोने शरीराकडून स्वीकारले (शोषले) जात नाही, असेही त्यांनी सांगितले. >>>
मी आधी लिहिलेल्या वैध्यांचे म्हणणे आहे. मला स्वतः:ला पटत नव्हते.पण ३-४ वर्षे सोने उगाळून/ गरम करून
पाण्यात घालून/ १ पेला पाणी आटवून अर्धा पेला करणे इ.प्रकारे निश्चितच केले.स्मरणशक्तीच्या वाढीसाठी नव्हे तर वेगळाच प्रॉब्लेम होता
वैद्य कनिटकरांच्या मतानुसार सुवर्णभस्म हे तज्ञांच्या सल्ल्यानुसार घ्यावे.तेही वारंवार
देण्यात येऊ नये!

साती, तेच तर! कंसेंट्स नक्की कश्या कश्यासाठी घ्यावा/घेतला पाहिजे ह्या बद्दलही काही नियम आहेत का? आयुर्वेदवाल्यांना कन्सेन्टचा कन्सेप्ट लागू होतो किंवा नाही आणि का?

येळेकर, मेटल्स हे चुकीच्या पद्धतीने आणि परमिसिबल लिमिटच्या बाहेर शरिरात गेले तर लिव्हरवगैरेला डॅमेज करतात म्हणून असेल.

अश्विनी के
काहीच कल्पना नाही.माझा मुलगा लहान असताना गुटी इ. काहीच दिली नव्हती.पण ६ वर्षाचा असताना त्याला
वरीलप्रमाणे सोने दिले होते.

प्राण्यांवर टेस्ट केले असले तर डॉक्युमेंटेशन मागा. त्याचे प्राण्यांवर झालेले दुष्परिणाम कुठेच प्रसिद्ध झालेले नाही आहेत. बिसाइड्स इट इस बॅड कर्मा इफ यू बिलिव्ह इन इट. इतक्या लहान वयात खरे तर मुलांची स्मरण शक्ती व कल्पना शक्ती अति शय छान असते. त्याला हे आर्टिफि शिअल स्टिम्युलंट का लागावे. त्यांची नैसर्गिक ब्रेन डेवल प मेंट हँपर नाही का होणार? म्हणजे जातीच्या अ‍ॅक्टिव मुलाला उगीच्च रेड बुल पाजवायचे असे होत नाहीना ते पालकांनी बघावे. औषधाचे असे मार्केटिंग बरोबर नाही. तुम्ही पालक म्हन जे कंपनीला कॅप्टिव कस्टमर बेस मिळाल्यावाणी आहे.

कॉं प्लान वगैरे चे क्लेम्स पण अति असतात व मुले त्यामुळे सफर होतात. मानसिक त्रास त्यांना होतो तो वेगळाच. म्हऩ जे तो बघ तो सुवर्ण भस्म घेतो आणि टेस्ट मध्ये पहिला आला नाहितर तू. असे ग्रेडिंग क्लास मधे झाले तर मुलाच्या सेल्फ एस्टीमला धक्का पोहोचेल.

इतक्या लहान वयात खरे तर मुलांची स्मरण शक्ती व कल्पना शक्ती अति शय छान असते. <<< अमा, त्यांचा जास्तीत जास्त भर हा 'रोगप्रतिकारशक्ती सुधारण्या'वर होता. स्मरणशक्तीच्या बाबतीत त्यांनी नेमकी कोणती टर्म वापरली होती मला आठवत नाही, पण मी वापरलेल्या ' स्मरणशक्ती वाढणे' ऐवजी 'स्मरणशक्ती सुधारणे' हा शब्दप्रयोग जास्त बरोबर ठरेल असे वाटते.

बॅड कर्मा <<< बॅड कर्मा म्हणजे काय? (आस्था वगैरे चॅनेलवर जाता जाता ऐकल्यासारखे वाटतेय. )

गजानन,
हे बघ - http://www.dailymail.co.uk/health/article-2348220/Vaccine-using-GOLD-DUS...

हा पेपर माझ्याकडे आहे. मात्र या पेपरात थेट नॅनोकणांचा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यातला सहभाग स्पष्ट होत नाही.

साती,
पेपर आणि बातमी यांतला फरक मला सुदैवानं उत्तम कळतो. Happy
'पेपर माझ्याकडे आहे', असं खाली मी लिहिलं आहे. 'मात्र या पेपरात थेट नॅनोकणांचा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यातला सहभाग स्पष्ट होत नाही', असंही पुढे लिहिलं आहे.

हा पेपर - http://iopscience.iop.org/0957-4484/24/29/295102
गजाननला कदाचित तो वाचता येणार नाही, म्हणून बातमीची लिंक दिली आहे.

हा 'रोगप्रतिकारशक्ती सुधारण्या'वर होता.>>> च्यवनप्राश ने वाढते का इम्युनिटी?
आवळे खाल्याने?

ओके. सांसदिय शब्द वापरायचा प्रयत्न करतो.

१. सुवर्णभस्म नावाखाली जे काय खपवलं जातंय ते नॅनो पार्टिकलाईज्ड सोने आहे काय?
२. असल्यास, ते तोंडाने गिळल्यानंतर त्याचे नक्की काय होते शरीरात याचे फार्मॅको कायनेटिक्स व डायनॅमिक्स काय?

चिनुक्स यांचे प्रतिसाद वाचलेत, तर
१. त्यांच्या प्रतिसादाचा लेखाशी संबंध नाही.
>> चिनूक्स | 5 August, 2013 - 12:58

इब्लिस,
वरच्या लेखाचा इथे संबंध नाही.'
<<

२. लेखात सांगितलेली माहिती चुकीची आहे.
>.हे गजाननला त्या वैद्यांनी सांगितले. ही पद्धत योग्य नाही, याची मी खात्री करून घेतली आहे<<

हे वानगिदाखल.
*-*
एक भोंदू प्रकार शाळेत करण्यात आला, त्याबद्दल मी लिहिले की असे असे हिर्‍याचेपाणी देऊन पहा, अजून काही होईल. हा माझा विनोदी क्लेम आहे.
यावर उत्तर काय आले?

महोदय,
आयुर्वेदिक औषधांवर संशोधन व्हावे. व्हावेच.
पण मी जे लिहितोय ते आयुर्वेदिक औषधांबद्दल नव्हे, तर त्याच्या नावावर जे काय खपवले जाते आहे त्याबद्दल आहे.
मिर्‍याची वेल 'गुंडाळण्याचे' उदाहरण तुम्हीच दिले आहे ना?
त्या वस्तूच्या दुर्मिळपणामुळे व महाग असण्यानेच त्या वस्तूला औषधी गुण चिकटवले गेले आहेत.
आता याचा संबंध जर तुम्ही नॅनोटेक्नॉलॉजीने मिर्‍यांत अँटीऑक्सिडंट्स सापडले असला काही लावणार असलात तर कठीण आहे.

आयुर्वेदिक औषधांवरील संशोधनासाठी वेगळा धागा काढा. प्रत्येक इण्डिव्हिज्युअल औषधांबद्दल योग्य त्या रेफरन्सेस सह (पीअर रिव्हूड. गूगल्ड नव्हे) बोलेन.

पण हा धागाच मुळात एका भोंदू अन फसव्या गोष्टीच्या जाहिराती बद्दल चौकशी करणारा आहे. ते सोडून केवळ आयुर्वेदावर संशोधन हे धोपटणे चालू झाले आहे.

उद्या समजा, मी जाहीर केले की मुलांची मेमरी वाढावी म्हणून मी एक लस तयार केली आहे. पूर्ण ऐच्छिक आहे. शाळेत फक्त ३० रुपयांत टोचून देईन.

तुमची रिअ‍ॅक्शन यावर काय येईल?? किती लोक घेणार?

हेच कस्तुरी बेस्ड आयुर्वेदिक / चिनि / युनानी वै..

हेच फिंगरप्रिंट्स वरून करिअर म्यापिंग..

अरे काय चाललं आहे??

कम ऑन. I said, i was expecting a sensible response from a person like you. the information you are giving, i also have. and i DO agree to some of it. but look at what impression is being created?
impression is : let the children take this "medicine." its "Ayurvedic" and research is needed, so giving it to chidren will create data!

would u let ur children participate willingly in such unauthorised, uncontrolled clinical research trial???

do u still think i should keep using parliamentary words??

bah!

हा धागा आणि त्यावरचे प्रतिसाद वाचून आमच्या धोंडोपंत जोशांच्या तीर्थरूपांचे शब्द आठवले.
'तस्मात् बेंबट्या कुंभार हो, गाढवांस तोटा नाही'

आधुनिक विज्ञानातल्या संशोधनातलाच काही सोयीस्कर भाग उचलून तो वाटेल तसा करप्ट करून आपल्या 'शास्त्राला' आधार द्यायचा आणि त्याच्या जोरावर आपापले दुकान चालवायचे हे तत्व आता अध्यात्मिक गुरू, वास्तुशास्त्रवाले, होमिओपॅथिक कुडबुडे यांनी चांगलंच आत्मसात केलं आहे. आयुर्वेदवालेही त्यात मागे नाहीत असं दिसतं. नॅनोपार्टिकलवर होतही असेल संशोधन, आणि असतील त्यात काही गुणधर्म, पण,
>>>शुद्ध सोने हे इतर आयुर्वेदिक औषधांबरोबर १००० ते १५०० °C पर्यंत उकळले जाते. ही क्रिया दहा ते पंधरा वेळा केली जाते.
ही नॅनोपार्टिकल्स बनवण्याची शास्त्रीय पद्धत आहे काय? आणि १००० ते १५०० °C पर्यंत दहा ते पंधरा वेळा उकळली गेलेली ही औषधे आपले गुणधर्म तसेच टिकवून ठेवतात? एखाद्या शाळकरी मुलालादेखील जो प्रश्न पडेल तो या मंडळींना का बरे पडत नसावा?
आणि हे दिव्य भस्म पाजल्यावर
>>>एक ते सहा या वयोगटातील मुलांना हे नियमितपणे (महिन्यातून तीन ते चार थेंब) दिल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढणे, योग्य शारिरीक वाढ, स्मरणशक्ती वाढणे इ. अनेक फायदे सांगण्यात आले.
या क्लेम्सना आधार कोणता? याच्या काही ट्रायल्स घेतल्या गेल्या आहेत?
दुसरा मुद्दा असल्या प्रकारची दुकाने शाळांतून चालवली जाण्याबद्दल आहे. वर कोणीतरी 'दंतचिकित्सेचे कॅंप चालतात मग हे का नाही' असं म्हटलं आहे. पण मुलाच्या दातांची तपासणी करून एखादी आधुनिक अँटि-कॅव्हिटी टूथपेस्ट रेकमेंड केली जाणे, जिच्यावर कोट्यावधी रुपयांचं संशोधन आधीच झालं आहे, आणि 'ही जडीबुटी घेतली की तुमच्या मुलाची आयक्यु दुप्पट होईल, स्मरणशक्ती वाढेल असे क्लेम्स करणं एकाच मापात मोजायचं? मग उद्या शाळेत एखाद्या बाबाचाही कँप घेऊन 'या बाबांचा अंगारा खाल्ल्यावर तुमच्या मुलाला दुष्ट शक्तींचा त्रास होणार नाही. पहिल्या पुडीचे तीस रुपये, नंतर फक्त वीस' असले प्रकारदेखील सुरू करता यावेत.

याचं उत्तर अगोदर देतो.
हो. आणि का ते तुम्ही जाणताच. Happy

१. <सुवर्णभस्म नावाखाली जे काय खपवलं जातंय ते नॅनो पार्टिकलाईज्ड सोने आहे काय?>

यचं उत्तर आधीही दिलं आहे, परत देतो. बाजारात मिळणार्‍या सुवर्णभस्मावर चाचण्या झाल्या आहेत. त्यांत ९०% किंवा अधिक हे नॅनोगोल्ड आहे.

आता तुम्ही तुमचे प्रतिसाद बघा. तुमची पहिली टिप्पणी ही सोन्याच्या किमतीबद्दलची आहे, ती अस्थानी आहे. माझ्याच लेखातलं वाक्य इथे देणं हे सर्वस्वी विनोदी आहे. मी शास्त्रीय संशोधनाबद्दल बोलतोय, तुमच्याकडूनही तीच अपेक्षा आहे.

२. < the information you are giving, i also have. and i DO agree to some of it.>
तुमच्या प्रतिसादांत हे दिसलं नाही. तुम्ही सतत मला नॅनोसोन्याच्या गुणधर्मांबद्दल, ते तयार करण्याच्या प्रक्रियेबद्दल विचारात राहिलात. ते का? ही माहिती तुम्हांला असती तर तुमचे सुरुवातीचे प्रतिसाद आलेच नसते.

३. गुगल केल्यावर पीअर रिव्ह्यूड पेपर येतात हो. तिथे फक्त 'बातम्या' नसतात. वर दिल्या आहेत मी काही लिंका. अजूनही भरपूर मिळतील. तुम्ही सतत नॅनोकणांबद्दल विधानं करत राहिलात. जरा गुगलून बघितलं असतं तर बरीच माहिती मिळाली असती.

४.

इथे डेटाबद्दल मी बोललेलो नाही. मुलांचा गिनीपीग म्हणून वापर करा, असंही कोणी लिहिलेलं नाही.

माझे मुद्दे कायम हेच राहिले आहेत -

अ. सुवर्णभस्मात नॅनोगोल्ड आहे.
ब. नॅनोगोल्ड अँटिमायक्रोबियल आहे. त्याचे इतरही अनेक औषधी उपयोग आहेत.
क. नॅनोगोल्ड उच्च तापमानावरही तयार होतं.

हे तीन मुद्दे तुम्हांला मान्य नव्हते. केवळ लोकांनी आयुर्वेदिय औषधं घेऊ नयेत, म्हणून मी हे मुद्दे नाकारणार नाही, किंवा त्याबद्दल दिशाभूल करणारंही लिहिणार नाही. या तीन मुद्द्यांना आधार देणारं काम मी पाहिलेलं / वाचलेलं / केलेलं आहे. माझी पीएचडीच सोन्याचांदीच्या कमी तापमानावर तयार होणार्‍या संयुगांवर आहे.

आता सुवर्णभस्म म्हणून शाळेत दिल्या जाणार्‍या औषधांवर डोस ठरवण्यासाठी चाचण्या व्हायल्या हव्यात, हे मी लिहिलंच आहे. सुवर्णभस्मावर संशोधन करणार्‍यांकडून मी माहिती मिळवतो, हेही मी लिहिलं आहे. नॅनोगोल्डमुळे स्मरणशक्ती वाढते, हे अजून कोणी सिद्ध करत नाही, हेही लिहिलं आहे.

तुम्ही सतत तुमचे मुद्दे बदलत राहिलात. तुमचा विरोध नक्की कशाला आहे?

सोनंचांदीप्लॅटिनम यांच्या औषध म्हणून वापराला?
सुवर्णभस्म उच्च तापमानावर तयार करण्याला?
नॅनोगोल्ड औषध म्हणून वापरण्याला?

तुमचा विरोध सुवर्णभस्माला औषध म्हणून मान्यता मिळण्यास असेल, तर तसं लिहा की. तुमच्या कुठल्याच प्रतिसादात मला ते दिसत नाहीये.

बाकी, वैयक्तिक टिप्पण्या नकोत. माझी हुशारी, माझं शहाणपण याची मला पूर्ण जाणीव आहे. तुम्ही ती वारंवार मला करून दिली नाही, तरी चालेल. Happy

चिनूक्स तुला फरक उत्तम कळतो ते मला ठाऊक आहे. Wink
पण तू दिलेली लिंक न वाचताच चिनूक्स 'पेपरची' लिंक देतोय असं चुकून कुणाचा गैरसमज न व्हावा म्हणून दिलीय.
आणि प्लीज तूच एकदा तो प्रतिसाद वाचून पहा . ती बातमीची लिंक न वाचता संशोधनात्मक पेपरची लिंक वाटतेय.

अजून संशोधन वगैरे डीटेल्स वाचले नाहीत, पण शाळेत येऊन कोणी अमुक टूथपेस्ट वापरा असं सजेस्ट करत असेल तर मला शंकाच येईल.
नुसतं डेन्टल हायजीनबद्दल शिकवणं निराळं आणि ब्रॅन्ड प्रमोट करणं निराळं.
तोच मुद्दा सुवर्णभस्माबद्दल. ते जनरल लशीकरणासारखं 'रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी' घ्या असं सांगतायत का? मग तसं असेल तर त्यांनी लशीकरणासारख्याच त्याच्या गाइडलाइन्स (कुठल्या वयात किती इ.) ठरवाव्यात आणि आपापल्या पीडिआट्रिशियनकडून घ्या असं सांगावं. आमच्या ब्रॅन्डचं घ्या, नव्हे, आम्हीच देतो की - असं म्हणणार्‍याकडून मलातरी घ्यायची इच्छा होणार नाही.

चिनुक्स ब्राव्हो....

१. १०००-१५०० डिग्री तापमान म्हणजे काहिच नाही हो. त्यापेक्षाही कितीतरी जास्त तापमानात संशोधक काम करतात.
२. नॅनो-पार्टीकल बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आनि प्रत्येक पदार्थाचे नॅनो लेवलला गुणधर्म आश्चर्यकारकरीत्या बदलतात. उदा. विद्युत-रोधक असणारा कार्बन चक्क वाहक होतो. वगैरे.
३. आपल्या पुर्वजांना नॅनो पार्टीकल माहिती नव्हते असे म्हणणे धाडसाचेच ठरेल. कारण ते आधीच सिद्ध झालय. (अल्केमी हाही त्यात्लाच प्रकार)
४. काही वेळेला अतिसुलभीकरणात सोने उकळुन वगैरे म्हटल्या जात असले तरी ते तसे (१००० डीग्रीला) करणे शक्य नसते. तसेही सोन्याचे दागीणे आणि ओतिव काम फार पुर्वीपासुन होत आले आहे त्यामुळे नॅनो-सोने तयार करणे इतकेही कठीण नाही.

अजुन आठवले की लिहितोच. बाकी आयुर्वेदिक औषधाच्या ट्रायल्स झाल्या होत्या का आधी कधी ?

हे काही पेपर.

१. http://onlinelibrary.wiley.com/doi/10.1034/j.1600-0773.2002.900505.x/full
२. http://progenresearchlab.com/aricles/swarnabhasma%20nano.pdf
३. http://medind.nic.in/ibi/t00/i6/ibit00i6p339.pdf
४. http://onlinelibrary.wiley.com/doi/10.1111/j.1742-7843.2005.pto_96610.x/...
५. http://www.sciencedirect.com/science/article/pii/S004060900900683X
६. http://informahealthcare.com/doi/abs/10.1080/00207450212018

हा अजून एक रोचक पेपर. पण या जर्नलाची विश्वासार्हता मला ठाऊक नाही.
http://ijrap.net/admin/php/uploads/866_pdf.pdf

ही सुवर्णबिंदुप्राशनाची प्राण्यांवर झालेली ट्रायल -
१. http://182.48.228.18:8080/jspui/handle/123456789/497
२. http://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/11968954
३. http://182.48.228.18:8080/jspui/handle/123456789/494

या पेपरांबरोबरच नॅनोकण पाण्यात जाऊन होणारं प्रदुषण, नॅनोकणांमुळे होणारे श्वसनाचे विकार यांवरही संशोधन सुरू आहे. याबद्दल मी आधी लिहिलंच आहे.

पुन्हा एकदा - गुगलवर पीअर रिव्ह्यूड जर्नलं सापडत नाहीत, हे चूक आहे. पेपर, संदर्भ शोधण्यासाठी वापरली जाणारी सॉफ्टवेअरं इथे उपलब्ध नाहीत, म्हणून तुम्हांला गुगल करा, असं सांगितलं होतं. हे वरचे अनेक पेपर उत्तम इम्पॅक्ट फॅक्टर असलेल्या जर्नलांमधले आहेत.


बाकी, सुवर्णभस्म देऊन लहान मुलांवर चाचण्या केल्या जात आहेत, हा निष्कर्ष का काढला गेला, हे माझ्या आकलनाच्या बाहेर आहे.

इथे जनरल सुवर्णभस्माच्या प्रॉपर्टीज / उपयुक्तता याबद्दल चर्चा करायची आहे की गजाभाऊंच्या लेकीच्या शाळेत विकायला आलेल्या 'सुवर्णप्राश'बद्दल?
या कंपनीने जे काही दावे केले आहेत त्याची सत्यासत्यता कशी पडताळणार? भारतात FDAसारखी जी कुठली अथॉरिटी असेल त्यांनी हे पर्टिक्युलर औषध अप्रूव्ह केलं आहे का?

रोगप्रतिकारक शक्ती वाढली की शाळेत रोज जाणार आणि अर्थातच जास्त गुण = स्मरणशक्ती वाढली... ( एका जाहीरातीत असच काहिसं म्हटल होत ना?) असं काही लॉजिक असेल. Wink

<इथे जनरल सुवर्णभस्माच्या प्रॉपर्टीज / उपयुक्तता याबद्दल चर्चा करायची आहे की गजाभाऊंच्या लेकीच्या शाळेत विकायला आलेल्या 'सुवर्णप्राश'बद्दल?>

गजाभाऊंच्या लेकीच्या शाळेत विकायला आलेल्या सुवर्णप्राशाबद्दल त्याचं नाव कळल्यास खात्री करून घेता येऊ शकते.

मात्र इब्लीस यांनी सुरुवातीला उपस्थित केलेले मुद्दे हे एकूणच सुवर्णभस्म आणि नॅनोगोल्ड तयार करण्याची प्रक्रिया, त्यांचे गुणधर्म यांबद्दल शंका घेणारे आहेत. त्यामुळे पुढे चर्चा एकूण सुवर्णभस्माबद्दल सुरू आहे.

शाळेत औषधं विकावीत किंवा नाही, किंवा औषधांची गुणवत्ता यांबद्दल एकूण सर्वांचंच एकमत आहे.

वरचा सगळा वाद-विवाद वाचला. माझेही दोन पैसे -
मुद्दे दोन -
१. स्वर्णभस्माची उपयुक्तता
२. शाळेतून लहान मुलांना देणं

पहिल्या मुद्यावर संशोधक मंडळी जे म्हणतील ते, कारण मला त्यातलं कळत नाही

दुसर्‍या मुद्यावर मात्र अश्विनीमामींना अनुमोदन. एरवी मूल निरोगी असेल तर मुद्दाम बाहेरून औषध, टॉनिक वगैरे द्यायचं कशासाठी?
शिवाय एखाद्या शाळेतून असं काही मार्केट करणं मला योग्य वाटत नाही. ही एक मार्केटींग गिमिक आहे आणि खूपसे पालक केवळ 'शाळेतर्फे' असं काही उप्तादन सुचवलं जातंय म्हणून बळी पडू शकतात. या उत्पादनांमधे अगदी वरती चिनूक्सने म्हणलंय ते टूथपेस्ट वगैरे पण आलंच. जर शाळेला खरंच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी असेल तर स्वतंत्रपणे वैद्यकीय, दंतवैद्यकीय तपासण्या करायची व्यवस्था करून घ्यावी (आमच्या शाळेत अधूनमधून व्हायच्या). त्याच्याशी कुठल्याही उत्पादनाचा संबंध नसावा..

विजय देशमुख -
<<३. आपल्या पुर्वजांना नॅनो पार्टीकल माहिती नव्हते असे म्हणणे धाडसाचेच ठरेल. कारण ते आधीच सिद्ध झालय. (अल्केमी हाही त्यात्लाच प्रकार)>>
हेही जरा धाडसाचंच विधान आहे हो. पूर्वज रसायनशास्त्र (केमिस्ट्री नव्हे) या विषयात काम करत असले तरी आपल्याला ज्या 'आधुनिक वैज्ञानिक' अर्थाने नॅनो पार्टिकल्स माहित आहेत त्या अर्थाने त्यांना माहित असल्याचे कुठलेही पुरावे नाहीत. एखादा धातू काही विशिष्ट प्रक्रिया केल्याने त्याचे कसकसे गुणधर्म बदलतात हे नक्कीच तपशीलवार माहित होतं (अनुभवाने) पण त्यामागच्या केमिकल, फिजिकल कारणांविषयी त्यांना निश्चितच माहिती नव्हती. त्यांच्याकडे आधुनिक प्रयोगशाळा नव्हत्या

Pages