करवंद आणि खजुर चटणी[चटक-मटक]

Submitted by प्रभा on 30 July, 2013 - 13:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

करवंद अर्धी वाटी, खजुर[सिड-लेस]१०-१२, साखर १-२ चमचे, गुळ आवडीप्रमाणे, तिखट, मीठ, कोथिंबीर,कढीपत्ता २-३ पाने, हिरवी मिरची २-३, जिरे, हिंगाची फोडणी.

क्रमवार पाककृती: 

प्रथम करवंद चिरुन घ्यावीत. त्यातील बिया काढाव्यात. खजुर, करवंद ,मिरची,जिरे,कढिपत्ता, मा वे. त ३० सेकंद ठेवावे. नंतर बाहेर काढुन त्यात तिखट, मीठ, कोथिंबीर घालुन मिक्सर मधे बारीक करुन घ्यावे. त्यानंतर त्यात आवडीनुसार साखर व गुळ घालुन परत मिक्सर मधे बारीक कराव. बाउल मधे काढुन हिंगाची फोडणी द्यावी. चटक-मटक चटणी तयार. ही फ्रीझमधे बरेच दिवस टिकु शकते. पोळी, ब्रेड, वडे, कटलेट, याबरोबर खुप छान लागते.

वाढणी/प्रमाण: 
आपल्यावर अवलंबुन.
अधिक टिपा: 

चटणी पातळ हवी असल्यास थोड पाणी घालता येइल. यात खोबर, दाण्याच कुटही घालता येत.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users