’जगते’ म्हणजे

Submitted by मुग्धमानसी on 29 July, 2013 - 08:35

’असते’ म्हणजे थोडेफार
शुद्धित असतात माझे भास
नाहितर नुसतेच घुम्यासारखे
छातीत झिरपत असतात श्वास!

’हसते’ म्हणजे काळजातून
उगवू देते चांदणवेल
नाहितर दृष्टीआड सगळे
असतेच नेहमी आलबेल

’जाते’ म्हणजे माझ्यामधून
उडून जाते अत्तर बनून
नाहितर बंद रेडिओत सुद्धा
रेंगाळतेच ना चिवट धून...

’रडते’ म्हणजे खरंच काही
ओतून देते डोळ्यांपार
नाहितर नुसत्या पाण्याची तर
आभाळीही लागते धार

’जगते’ म्हणजे विरघळते मी
क्षणाक्षणाने परमेशात
नाहितर नुसतं जिवंत असणं
मंजूर नसतं आकाशात!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रडते’ म्हणजे खरंच काही
ओतून देते डोळ्यांपार
नाहितर नुसत्या पाण्याची तर
आभाळीही लागते धार>>>>>> मस्तं मस्तं

धन्यवाद सर्वांना!
रिया... बोटभर प्रतिसादांवरून एकदम एका स्माईलीवर का आलीस? तुझा प्रतिसाद नसला की चुकल्यासारखं वाटतं गं... Happy

आहाहा काय जगावेगळीय कविता !!!!!!!

मास्टरपीस आहे ही रचना मास्टरपीस !!!!

धन्यवाद तुमच्या आजवरच्या आजच्या व यापुढच्यासह्गळ्या कवितांसाठी

मु.मा. लिहीत रहा !!!! विठ्ठलाने तुम्हावर अलोट कृपा बरसवली आहे तुम्हाला जगावेगळी कवियत्री बनवलय त्यानं...अश्याच स्वतःतलं जागावेगळेपण शोधत रहा गाठत रहा आमच्या सोबत शेअर करत रहा

’जगते’ म्हणजे विरघळते मी
क्षणाक्षणाने परमेशात
नाहितर नुसतं जिवंत असणं
मंजूर नसतं आकाशात! <<<
अप्रतिम ...केवळ अप्रतिम !:)

मनःपुर्वक धन्यवाद!

वैभव>>> खरोखर ही विठ्ठलाची कृपाच असावी. त्यानेच माझी तुमच्याशी गाठ घालून दिली.
बेफिकीर>>> विशेष धन्यवाद!

मानसी, तुला म्हणलं ना की आजकाल तुझ्या लेखनाला प्रतिसादच सुचत नाही Happy
खुप खोलवर घुसतात तुझ्या रचना Happy
एक अनुभुती देऊन जातात..... आणि त्या अनुभुतीला प्रत्येक वेळेला शब्दात मांडायला जमेना झालय आजकाल Happy

लिहित रहा ग! अशीच! अखंड Happy

नमस्कार मायबोलीवर तसा जुनाच
परन्तु लिखानाची पहीलीच वेळ तुमची कविता आवडली
छान वाटली....आसेच लिहीत रहा...पुढील कवितेसाठी शुभेच्छा.........

क्या बात! क्या बात! अतिशय आवडली ही कविता Happy

अताशा पुन्हा इकडे काही चांगल वाचायला मिळू लागल आहे. जिओ दोस्त Happy

Pages