Submitted by मुग्धमानसी on 29 July, 2013 - 08:35
’असते’ म्हणजे थोडेफार
शुद्धित असतात माझे भास
नाहितर नुसतेच घुम्यासारखे
छातीत झिरपत असतात श्वास!
’हसते’ म्हणजे काळजातून
उगवू देते चांदणवेल
नाहितर दृष्टीआड सगळे
असतेच नेहमी आलबेल
’जाते’ म्हणजे माझ्यामधून
उडून जाते अत्तर बनून
नाहितर बंद रेडिओत सुद्धा
रेंगाळतेच ना चिवट धून...
’रडते’ म्हणजे खरंच काही
ओतून देते डोळ्यांपार
नाहितर नुसत्या पाण्याची तर
आभाळीही लागते धार
’जगते’ म्हणजे विरघळते मी
क्षणाक्षणाने परमेशात
नाहितर नुसतं जिवंत असणं
मंजूर नसतं आकाशात!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रत्येक कडव्यातले स्टेटमेंट
प्रत्येक कडव्यातले स्टेटमेंट खासच आवडले.
नुसतं जिवंत असणं मंजूर नसतं
नुसतं जिवंत असणं
मंजूर नसतं आकाशात . . . . . .
व्व्व्वा !
(No subject)
कविता आवडली.
कविता आवडली.
आवडली....
आवडली....
रडते’ म्हणजे खरंच काही ओतून
रडते’ म्हणजे खरंच काही
ओतून देते डोळ्यांपार
नाहितर नुसत्या पाण्याची तर
आभाळीही लागते धार>>>>>> मस्तं मस्तं
अप्रतिम ...
अप्रतिम ...
धन्यवाद सर्वांना! रिया...
धन्यवाद सर्वांना!
रिया... बोटभर प्रतिसादांवरून एकदम एका स्माईलीवर का आलीस? तुझा प्रतिसाद नसला की चुकल्यासारखं वाटतं गं...
जगते’ म्हणजे विरघळते
जगते’ म्हणजे विरघळते मी
क्षणाक्षणाने परमेशात<<< व्वा व्वा
सुंदर! आवडेश! प्रत्येक
सुंदर! आवडेश!
प्रत्येक कडव्यातले स्टेटमेंट खासच आवडले. >> +१
खुपच छान..!!
खुपच छान..!!
प्रत्येक कडव्यातले स्टेटमेंट
प्रत्येक कडव्यातले स्टेटमेंट खासच आवडले.
शेवट विशेष आवडला.
शेवट विशेष आवडला.
आहाहा काय जगावेगळीय कविता
आहाहा काय जगावेगळीय कविता !!!!!!!
मास्टरपीस आहे ही रचना मास्टरपीस !!!!
धन्यवाद तुमच्या आजवरच्या आजच्या व यापुढच्यासह्गळ्या कवितांसाठी
मु.मा. लिहीत रहा !!!! विठ्ठलाने तुम्हावर अलोट कृपा बरसवली आहे तुम्हाला जगावेगळी कवियत्री बनवलय त्यानं...अश्याच स्वतःतलं जागावेगळेपण शोधत रहा गाठत रहा आमच्या सोबत शेअर करत रहा
सुंदरच .. मानसी, काही ओळी खूप
सुंदरच .. मानसी,
काही ओळी खूप आवडल्या . लिहीत रहा... शुभेच्छा!
’जगते’ म्हणजे विरघळते
’जगते’ म्हणजे विरघळते मी
क्षणाक्षणाने परमेशात
नाहितर नुसतं जिवंत असणं
मंजूर नसतं आकाशात! <<<
अप्रतिम ...केवळ अप्रतिम !:)
जगते’ म्हणजे विरघळते मी<<< ही
जगते’ म्हणजे विरघळते मी<<<
ही ओळ डोक्यात गेली आहे.
काय विचार आहे! खलास!
मनःपुर्वक धन्यवाद! वैभव>>>
मनःपुर्वक धन्यवाद!
वैभव>>> खरोखर ही विठ्ठलाची कृपाच असावी. त्यानेच माझी तुमच्याशी गाठ घालून दिली.
बेफिकीर>>> विशेष धन्यवाद!
कविता आवडली
कविता आवडली
मानसी, तुला म्हणलं ना की
मानसी, तुला म्हणलं ना की आजकाल तुझ्या लेखनाला प्रतिसादच सुचत नाही
खुप खोलवर घुसतात तुझ्या रचना
एक अनुभुती देऊन जातात..... आणि त्या अनुभुतीला प्रत्येक वेळेला शब्दात मांडायला जमेना झालय आजकाल
लिहित रहा ग! अशीच! अखंड
आहा !.... सुरेख !
आहा !.... सुरेख !
नमस्कार मायबोलीवर तसा
नमस्कार मायबोलीवर तसा जुनाच
परन्तु लिखानाची पहीलीच वेळ तुमची कविता आवडली
छान वाटली....आसेच लिहीत रहा...पुढील कवितेसाठी शुभेच्छा.........
धन्यवाद सर्वांना. रिया>>
धन्यवाद सर्वांना.
रिया>>
मस्त आहे..
मस्त आहे..
धन्यवाद योगेश.
धन्यवाद योगेश.
ख़ास..आवडली कविता..निवडक दहात.
ख़ास..आवडली कविता..निवडक दहात.
व्वा! फार फार सुंदर. प्रचंड
व्वा! फार फार सुंदर. प्रचंड आवडली, प्रत्येक कडवं बढिया.
धन्यवाद!
धन्यवाद!
खूप सुंदर !
खूप सुंदर !
क्या बात! क्या बात! अतिशय
क्या बात! क्या बात! अतिशय आवडली ही कविता
अताशा पुन्हा इकडे काही चांगल वाचायला मिळू लागल आहे. जिओ दोस्त
Pages