डॅडी, मुसलमान म्हणजे काय ?

Submitted by उद्दाम हसेन on 4 July, 2013 - 13:17

रविवारी मित्राकडे पार्टीला गेलो होतो. आम्ही गप्पा मारत असताना त्याचा लहान मुलगा - वय वर्षे पाच आमच्याजवळ आला. त्याने मित्राचे गाल धरून विचारलं, डॅडी मुसलमान म्हणजे काय ? मित्राचा चेहरा पडला.कारण एक मुसलमान मित्रही बरोबर होता. मित्राच्या बायकोने अरे असं काही नसतं असं सागून त्याला ओढलं. तेव्हां आमचा मुस्लीम मित्र मधे पडला. मित्राने मग सावरत त्याला विचारल कुठूनही काहीही ऐकून येतोस. कुणी सांगितला तुला हा शब्द. तर त्याने आईचं नाव घेतलं. आता त्याच्या बायकोचा चेहरा खर्रकन उतरला. ती कावरी बावरी होऊन इतर बायकांना सांगू लागली कि मुलाने विचारलं कि आमीर खानचं नाव आमीर खान का आहे ? आप्लं नाव खान का नाही, तेव्हां तिने घाईत असल्याने तो मुसल्मान आहे ना म्हणून खान असं उत्तर दिलं होतं. त्यांची समजूत काढली.

पण डोक्यातून ते गेलं नाही. घरी आल्यावर बायकोला म्हटलं हे कुणाच्याही बाबतीत घडू शकतं. माझाही मुलगा त्याच वयोगटाचा. त्यालाही हे माहीत नाही. पण आपण २४ तास सावध असू शकत नाही. एखादे वेळी मूल आजूबाजूला आहे याचं भान न राहवून अनेक गोष्टी तोंडातून निसटतात. मुलांना या वयात या गोष्टी समजूच नये असं सर्वांचंच मत असतं. पण मित्राकडे झाला तसा प्रसंग कुठेही आणि कुणाच्याही बाबतीत घडू शकतो असं वाटतं. शाळेत अभ्यासक्रमात देखील हे नसतं. मुलांच्या तोंडात हिंदू मुसलमान असे शब्द आले तर टीचर बोलावून घेऊन समज देतील असं वाटतं. एक ना एक दिवस हे मुलांना समजणार आहे हे नक्की. हे बोलणं चालूच होतं तर माझ्याही मुलाने तोच प्रश्न विचारला. मुलाला मित्राकडे नेलं होत, तिथं या मुलांच्या गप्पा झाल्या असणार.

खरंच या मुलांना कुठल्या वयात कुठल्या गोष्टी आणि कशा प्रकारे सांगाव्यात ? माझी तर मतीच गुंग झाली आहे. साधक बाधक परिणामांचा विचार करून काय करता येईल याबद्दल प्लीज बोला ही विनंती.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय नाजूक विषय. मीही संभ्रमित किरण.
अशोकजी, दाद, परब्रह्म यांनी वेगवेगळ्या पद्धतीने संतुलित प्रतिसाद दिलेत..
फाळणी जणू हृदयांची झालीय.इतके सोपे नाहीत सेतू बांधण्याचे प्रयत्न. जावेदजींचे शब्द आठवतात-
बातोंमे दोस्तीका अमृत सीनेमें जहर नफरतोंका
परबतपे फूल खिल रहे हैं,बैठा हैं गारमें दरिंदा..

माझ्या शेजारचे, ओळखीचे जे कोणी मुसलमान आहेत त्यापैकी एकालाही वर सांगितलेली गोष्ट आवडली नाही किंवा त्यांनी त्या गोष्टीचे समर्थन केले नाही. त्यामुळे माझ्या मते ते शांतिप्रियच आहेत. उद्या माझ्या मुलाला मी हेच सांगेन कि ते सगळे वाईट वागले म्हणून आपल्या शेजारचे सुद्धा वाईट आहेत असे नाही. जो आपल्याशी चांगला वागतो तो चांगलाच असतो मग तो कोणीही असो.

वर सांगितलेली गोष्ट आवडली नाही <<<<<<<<<<<< मलाही आवडली नाही पण सत्य तर स्वीकारावेच लागते ना

पण सत्य तर स्वीकारावेच लागते ना>>> सत्य स्विकारले आहे म्हणूनच तर आपण शांततेने जगतोय. त्यांनी केलेल्या या प्रत्येक कृतीला नेमके तसेच प्रतिउत्तर दिले असते तर सगळेच उद्ध्वस्त झाले असते.

मी इथं सल्ला मागितला होता, मन मोकळं करायचा प्रयत्न केला होता.. म्हणूनच पुन्हा पुन्हा पोस्टस टाकणं बरं वाटत नाही. कारण विचार कितीही आदर्श असले तरी आचरणात आणणे कठीण असतं हे मान्यच आहे. इथे प्रॅक्टीकल सल्ले देणारे चुकले असं अजिबात म्हणता येत नाही. प्रॅक्टीकल विचार करता येणं (वस्तुनिष्ठ ) हे देखील कौशल्याचं काम आहे. बलात्काराच्या धाग्यावर मला वाटल्याप्रमाणे मी सल्ला दिला होता कि आपण गाडी नियमांचं पालन करून चालवत असलो आणि समोरून येणारं वाहन नियम तोडून अंगावर येत असेल तर तो चुकला म्हणून साईड देणार नाही, मागे हटणार नाही ही भूमिका घेणं म्हणजे कपाळमोक्ष. पण तिथे संवेदनशीलतेचा मुद्दा उपस्थित झाला होता. म्हणतात ना, ज्याचं जळतं त्यालाच कळतं.. हे मान्यच आहे. स्त्रियांच्या प्रश्नाबाबत कितीही सहानुभूतीने प्रयत्न केला तरी शंभर टक्के संवेदनक्षम असणं हे जरा अवघड आहे. कारण अनुभव !

मा़झ्यासारखे ज्या अनुभवातून जातात त्यातून गेल्यावर धर्म, जातपात यावरचा विश्वास उडतो. कॉलेजच्या भाबड्या वयात प्रत्येकाने फक्त माणूस ही जात सांगायची अशा शपथा घेतल्या होत्या. पण बाहेरच्या जगात ती अंमलात आणणं कित्तीतरी कठीण आहे.

दिल्ली बलात्काराच्या वेळी ज्याप्रमाणे सामूहीक शपथा घेतल्या गेल्या, इंडीया गेटला युवाशक्ती एकत्र आली, २६/११ च्या हल्ल्याच्या वेळी ज्याप्रमाणे गेट वे ऑफ इंडीयाला मेणबत्त्या लावल्या गेल्या, अहिंसा दिनाला ज्याप्रमाणे राष्ट्र सामूहीक शपथ घेते.. तसंच मेडीयाने ठरवलं, सरकारने ठरवलं तर वातावरण पेटवून मी माझ्या पुढच्या पिढीला धर्माची, जातीची ओळख करून देणार नाही अशी शपथ घेणं अवघड नाही. त्यासाठी ज्या काही घटनादुरुस्त्या कराव्या लागतील त्या कराव्यात. इच्छाशक्ती हवी. हा टोकाचा आदर्शवाद असेल पण अशक्य नाही. नाहीतर मग इथे कुठल्याही इश्यूवर चर्चा करण्यात अर्थ नाही, कारण त्या सर्वच चर्चा तकलादू आहेत हे मान्य करावे लागेल.

जे कुणी संवदनशील आहेत, ज्यांना स्त्रीचं दुय्यम स्थान खटकतं, ज्यांना समाजातले थर खटकतात, ज्यांना माणसाच्या कल्याणासाठी निर्माण झालेला धर्म माणसामाणसात भांडणं लावायला कारणीभूत झालाय हे जाणवतं, ज्यांना लहान मुलाच्या शुद्ध मनावर मानवनिर्मित अशुद्ध धर्मांची लिंपणं थापणं खटकतं अशा सर्वांनी खूप समरसून लिहीलंय.

माझ्यासाठी हे खूप होतं....!!!

@ भारतीतै
मी ही संभ्रमित !!!
मी फक्त इतकंच म्हणेन, तुमच्यासारख्या संवेदनशील विदुषीचा हा प्रामाणिकपणा प्रचंड आत्मविश्वास आणि विचारांची खोली दर्शवतो... धन्यवाद भारतीतै !!

विजयराव....

सगळंच सरकारने केले पाहिजे असा आग्रह तुम्ही वा मी धरून चालत नाही हे जरी मान्य केले तरीही केन्द्रस्थानी 'प्रशासक' म्हणून जी कुणी एक यंत्रणा आपण निवडून देतो तिने देशात सुजलाम् सुफलाम् वातावरण राहाण्यासाठी नित्यनेमाने तसेच प्रसंगी कायद्याच्या रुपाने आवश्यक त्या उपाययोजना करणे सर्वसामान्य नागरिकाला अभिप्रेत असते. यात गैर काहीच नाही.

उलटपक्षी वर किरण आपल्या अभिप्रायात म्हणतात "...पुढच्या पिढीला धर्माची, जातीची ओळख करून देणार नाही अशी शपथ घेणं अवघड नाही. त्यासाठी ज्या काही घटनादुरुस्त्या कराव्या लागतील त्या कराव्यात...." त्याला अनुसरून म्हणता येते की यासाठी आवश्यक तो दबाव मतदार या भूमिकेतून आपण आपल्या संसद प्रतिनिधीवर आणल्यास आपलेही दोन पैसे अशा आदर्श म्हटल्या जाणार्‍या कार्यात लागू शकतील. हे कुणी करावे तसेच करायला किती वेळ लागेल ? असले नैराश्यजनक प्रश्न उभे करण्यात काही अर्थ नसतो. शेवटी कुठून तरी सुरुवात होणे गरजेचे असते. दिल्ली बलात्कार प्रकरणातील "कॅन्डल मार्च" वर टीका करणारे जे कुणी आहेत्/होते, ते याच समाजातील होते, परंतु हेही सत्यच की तसल्या मार्चमुळेही त्या केसबाबत कमालीची एकी दिसून आली जनतेमध्ये. समाजात प्रतिदिनी अशी उदाहरणे घडत असतात की ज्यासाठी सरकारनेच पुढाकार घेतलेला दिसून येत नाही तर सामाजिक पातळीवर वैचारिकदृष्ट्या उठाव झाला की योग्य त्या खात्यात जाग दिसून येते.

"लोकशाही प्रणाली" नामक जी यंत्रणा या महाकाय देशात आहे तिला जगात कुठेच तोड नाही आणि यंत्रणेचे जे फायदेतोटे आहेत ते ध्यानी ठेवूनच सरकार काय करते वा सरकारने काय केले पाहिजे असले प्रश्न आपण अगदी चहा घेता घेता सकाळपासून विचारू शकतो. तसेच तसे विचारले म्हणून आपल्याला त्याबद्दल कुठे जाबही द्यावा लागत नाही. हा एक जबरदस्त फायदा आहे आपल्यासाठी.

अशोक पाटील

अशोक,

हे कुणी करावी तसेच करायला किती वेळ लागेल ? असले नैराश्यजनक प्रश्न उभे करण्यात काही अर्थ नसतो. शेवटी कुठून तरी सुरुवात होणे गरजेचे असते.

+ १००, आणी ह्यासाठी प्रचंड अनुमोदन.

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे . . . .

"डॅडी, सलमान म्हणजे काय ?

छोट्या आराध्याने ऐश्वर्या समोर अभिषेक ला प्रश्न विचारला...:खोखो:
.
:- श्री अमित यांच्याकडुन सभार ..

खुपच दिशादर्शक उत्तरे आहेत तुमची अशोकमामा. परब्रह्म तुमचीही. आमच्या वयातल्या सर्व पालकांसाठी अत्यावश्यक. 'थोडी मेहनत तो आपको भी करनी पडेगी' हे मान्यच, पण कोणत्या क्षणी कोणत्या प्रश्नाला सामोरं जावं लागेल आणि त्या क्षणी असेल तो प्रत्येक प्रश्न सहजपणे घेऊन तारतम्याने व्यक्त होणं ही कसरत आहे. पण अशा मार्गदर्शनांनी सुकर होईल ती कसरत.

किरण, मनातले इथे मांडल्याबद्दल तुमचेही धन्यवाद. अन्यथा हे विचार वाचायला मिळाले नसते. फक्त मुलांबद्दलच नव्हे, एकंदरीतच वैयक्तिक पातळीवरही अजून खुप प्रगल्भ व्हायला हवंय याचीही जाणीव झाली मला.

Rofl

अशोक.,

>> "शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा कसा काढला" शिकवित असत ते ऐकताना माझ्या
>> मुस्लिम मित्रांना त्यावेळी नेमके काय वाटत असेल याचा विचार मनी येई.

अफझलखानाने तुळजाभवानीच्या देवळात गाय कापून मूर्तीवर गोमांस थापले आणि नंतर ती फोडून टाकली. हे वाक्य ऐकतांना कोट्यावधी हिंदूंना काय वाटत असेल याचा विचार मनी येतोच.

यावर एकाच उपाय आहे. तो म्हणजे इस्लामचे भारतीयीकरण करून घेणे. जर तुर्कस्थान मुस्लिमबहुल असूनही इतर पंथीयांवर इस्लाम लादत नाही, तर भारतीय मुस्लिम हिंदूंचा वारंवार का अपमान करतात? इंडोनेशियातले मुस्लिम रामाला मानतात तर भारतीय मुस्लिमांना रामाचा एव्हढा तिटकारा का? तुर्कस्थानात मातृभूमी पक्ष इस्लामविरोधी नाही, मात्र भारतात वंदे मातरम इस्लामविरोधी कसंकाय?

या प्रश्नांची तड लागायलाच हवी असं नाही वाटंत?

आ.न.,
-गा.पै.

>> "शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा कसा काढला" शिकवित असत ते ऐकताना माझ्या
>> मुस्लिम मित्रांना त्यावेळी नेमके काय वाटत असेल याचा विचार मनी येई.

या मोहिमेत महाराजांबरोबर एक मुस्लिमांची फौज होती (नाव विसरलो) ते का नाही शिकवत ? तो महराजांसोबत निवडक १० मध्ये होता (!)

अहो इशरत जहान म्हणजे मुसलमान असं सांगायचं>>
आणि हिंदु म्हणजे कोण असं विचारलं तर 'असा' नसतो हिंदु म्हणुन सांगायचं Lol

गा_पै.

तुळजाभवानी देवी मंदिराचे तुम्ही दिलेले उदाहरण जसेच्यातसे मी स्वीकारूनदेखील त्याबाबत मी ना अफझलखानाच्या आक्रमकतेबद्दल या क्षणी काही बोलू शकेन वा त्या काळातील आपल्या हिंदू भावंडांनी त्याबाबत घेतलेल्या नेमस्त भूमिकेबद्दल. इतिहास साक्षीला आहे आपल्या की अशा आक्रमणकर्त्यांनी त्या जोशात स्थानिक जनतेत असलेल्या देवाप्रती भावना आपल्या हत्यारांनी कोळपून टाकल्या होत्या. जेत्यांची ती शैली केवळ अफझलखानाच्या उदाहरणापुरतीच मर्यादित राहू शकत नाही.

पण आधुनिक काळात मुलांना त्या घटना अभ्यासक्रमातून सांगताना शिक्षकांनी किमान काही पातळीवर सौम्यता तसेच विवेक पाळणे नीतांत आवश्यक ठरते. इतिहासाच्या अभ्यासक्रमात माझ्या शालेय काळात अफझलखानाने तुळजाभवानी मंदिराची केलेली दुर्दशा नेमक्या तुम्ही दिलेल्या वाक्यात आढळली नाही. फक्त दक्षिण स्वारीत त्याने हिंदुंची देवळे नष्ट केली तसेच मालमत्ता बळकाविली असा मोघम उल्लेख असे. त्याच्या वधाबद्दलचे प्रतापगड प्रकरण मात्र क्रमिक पुस्तकात जितके होते त्यापेक्षा अधिक रंगवून सांगण्यात शिक्षकांना अधिकचा उत्साह वाटत होता ही खरी बाब आहे..... किमान आमच्या कोल्हापूरात तरी हा प्रकार होता.

इंडोनेशियातील मुस्लिम रामाची पूजा करतात ही बाब आदर्शवत वाटते. इतकेच नव्हे तर पु.ल. आणि सुनिताबाई जेव्हा तिथे गेल्या होत्या त्यावेळी तेथील लोकांना आम्ही भारतीय रामाला मानतो हे ऐकून नवल वाटल्याचे दिसले. म्हणजे राम त्या मातीतीलच आहे व तिथून तो वनवासासाठी भारतात गेला होता अशी त्यांची पक्की भावना. प्रत्येक राष्ट्रातील धर्म आणि ईश्वर यांच्या व्याख्या अलग असू शकतात हाच याचा अर्थ.

धर्म आणि त्याबाबतची मार्गदर्शक तत्वे याबद्दल या क्षणीही मतभेदाचे वातावरण दिसून येत असल्याने मुस्लिमांनी वंदे मातरमच्या विरोधात भूमिका घेणे काहीच आश्चर्याचे नाही.

अशोक पाटील

अमुक तमुक व्यक्ति "मुसलमान" आहे म्हणजे "सावध" व्हा हा संदेश मुस्लिमांच्या धर्मग्रंथातील विशिष्ट अपरिवर्तनीय सुधारू न शकणार्‍या आदेशामुळे आला आहे, व तो तसाच रहाण्याची शक्यता सर्वात जास्त.
जे जे कुणी मुस्लिम नाही ते ते सर्व "काफर" व नष्ट करण्यालायक ही शिकवण असलेल्या धर्माचे जसेच्च्यातसे पालन करणार्‍या पाईकांकडे कुणीही "काफर" (म्हण्जे हिन्दू/ख्रिश्चन/ज्यु इत्यादीक) विश्वासाने पाहू शकेल ही अपेक्षा कशी काय? असो.

>>त्याच्या वधाबद्दलचे प्रतापगड प्रकरण मात्र क्रमिक पुस्तकात जितके होते त्यापेक्षा अधिक रंगवून सांगण्यात शिक्षकांना अधिकचा उत्साह वाटत होता ही खरी बाब आहे....>><<

मग त्यात चुक काय आहे? कि आता कोणितरी अफझल खानाला न्याय मिळेल का, असा धागा काढावा?

Terence tao, आय थिंक यु आर कंफ्युज्ड. मुलाने मुसल्मान म्हणजे काय, हा प्रश्न विचारला आणि तुमचा चेहेरा शीवी ऐकल्या सारखा झाला. तुमच्या माबोवरील प्रतिक्रिया/धाग्यांची निर्मितीतलं योगदान पहाता, या प्रश्नानं खरतर तुम्ही गोंधळुन जायला नको. पण वर म्हटल्याप्रमाणे तुम्ही कंफ्युज्ड झाला आहात अशी दाट शंका वाटतेय...

यासंदर्भात, बैराग चित्रपटातील या गाण्याची आठवण झाली: पीते पीते कभी कभी युं जाम बदल जाते है...
धाम बदल जाते है, काम बदल जाते है, लोगोंके नाम बदल जाते है... Happy

>>>> कि आता कोणितरी अफझल खानाला न्याय मिळेल का, असा धागा काढावा? <<<<<
नुस्ता धागाच नाही राज, तर सर्वान्नी सर्वधर्मसमभावी बनुन प्रतापगडाचे पायथ्यास जाऊन अफजलखानाचे कबरीवर चादर चढवावी Happy

Terence tao, आय थिंक यु आर कंफ्युज्ड. मुलाने मुसल्मान म्हणजे काय, हा प्रश्न विचारला आणि तुमचा चेहेरा शीवी ऐकल्या सारखा झाला. तुमच्या माबोवरील प्रतिक्रिया/धाग्यांची निर्मितीतलं योगदान पहाता, या प्रश्नानं खरतर तुम्ही गोंधळुन जायला नको. पण वर म्हटल्याप्रमाणे तुम्ही कंफ्युज्ड झाला आहात अशी दाट शंका वाटतेय...

>>>

Biggrin मर्मावर बोट ठेवलेत.
ट्रेन्स टओ, सत्य तर ठाऊक आहे. पण आव तर असा आणायचा की यंव. Proud

असा,

>> ...सत्य तर ठाऊक आहे. पण आव तर असा आणायचा की यंव.

खरोखरच चिंतेची बाब आहे ही. terence tao यांचं इतर लेखन (उदा. : पुणे मेट्रो) पाहिलं तर त्यांच्यात कळकळ आहे हे दिसून येतं. परंतु मुसलमान हा शब्द उच्चारला जाताच त्यांचं जे काही झालं ते व्हायला नको होतं. त्यास झिम्मीगत म्हणता येईल. समाजातले प्रतिष्ठित लोक असे घाबरून वागत राहिले तर एक दिवस जिझिया द्यायची वेळ येईल त्यांच्यावर! Sad

आ.न.,
-गा.पै.

Rofl

:पालथा घडा क्लब अपेक्षेप्रमाणे गुण उधळताना दिसल्याने सुखावलेला बाहुला:

terence tao,

>> ज्यांना लहान मुलाच्या शुद्ध मनावर मानवनिर्मित अशुद्ध धर्मांची लिंपणं थापणं खटकतं अशा सर्वांनी
>> खूप समरसून लिहीलंय.

तुमचं निरीक्षण समर्पक आहे. हिंदू धर्म मानवनिर्मित नसल्याने लहान मुलांवर हिंदू संस्कार करणं सर्वात चांगलं. आपण जे पुढील पिढीस धर्म, जात, इत्यादीची ओळख करू न देण्याचं म्हंटलंय त्याबद्दल थोडी चिंता वाटते. धर्म वेगळा असतो तर जात वेगळी असते. धर्माने माणसाचे ऐहिक आणि पारलौकिक कल्याण साधले गेले पाहिजे अशी अपेक्षा आहे. म्हणूनच जाती टाकून देणं स्वागतार्ह असलं तरी धर्म टाकणे इष्ट नाही.

मुलांना लहान वयात धर्माचरणाची सवय लागणे महत्त्वाचे असते. यासाठी बालसंस्कार हे संकेतस्थळ उपयुक्त आहे. त्याचा निर्देश : http://www.balsanskar.com/marathi/

आ.न.,
-गा.पै.

डॅडी , मुसलमान म्हणजे काय? या प्रश्नानंतर निर्माण झालेली अस्वस्थता नेमकी का निर्माण होते आहे?

आवश्यक त्या किमान पातळी वर चा विवेक वापरून छापलेल्या इतिहासाच्या आजवरच्या पाठ्यपुस्तकांमधून च शिकलेल्या पिढीमधे पण या प्रश्नाने अस्वस्थता निर्माण का होते?

प्रतापगडाचे प्रकरण अधिक रंगवून सांगावस शिक्षकांना का वाटत?

थोडक्यात मुस्लिम समाजाची प्रतिमा - जी काय बरी वाईट आहे ती- ही अशी नेमकी का आहे?

या सार्‍याच प्रश्नांची उत्तरं फक्त इतिहासात नव्हे तर वर्तमानातही आहेत. एक व्यक्ती म्हणून अनेक माणसे चांगली असतात. पण एक समाज म्हणून त्यांचे वर्तन कसे असते? इथे खरी मेख आहे . मुस्लिम समाजातील सर्वच व्यक्ती वाईट नसतातच, असूच शकत नाहीत पण जेव्हा अशी काही जी काय असेल ती प्रतिमा अन्य लोकांच्या मनात बनते तेव्हा त्या मागे त्या समाजातील अनेकांचे वर्षानुवर्षांचे वर्तन व त्याला हव्या त्या तीव्रतेने विरोध न केला जाण हे ही असत. महाराष्ट्रात अनेक सुधारकांच नाव आदरानी घेतल जात पण हमीद दलवाईंच काय? मुस्लिम समाजातल्या शेकडा किती लोकांना त्यांच नाव ठाउक असत? अन असल तर आदर असतो की तिरस्कार? आत्मपरिक्षण करीत, आपल्या दोषांवर कठोर प्रहार करीत आपल्या समाजात असलेले दोष दूर करण्या चा प्रयत्न अन्य समाजाच्या तुलनेत मुस्लिम समजात किती होतांना दिसतो? आपल्या देशातले सेक्यूलॅरिझम नावाचे ढोंग हे सुध्दा मुस्लिम समाजाच्या प्रगती न होण्यास व प्रतिमा न बदलण्यास कारणीभूत आहे अस मला वाटत. कारण त्या समाजातील प्रगतीशील लोकांपेक्षा चौदाशे वर्षापूर्वीच्या काळात जगणार्‍या मुल्ला मौलवींना व तशा पुढार्‍यांना मतपेटीच्या राजकारणासाठी आपल्या देशात जास्त महत्व दिल जात. अशी या प्रश्नाची कारण मीमांसा आहे.....अवघड आहे सार.

Pages