डॅडी, मुसलमान म्हणजे काय ?

Submitted by उद्दाम हसेन on 4 July, 2013 - 13:17

रविवारी मित्राकडे पार्टीला गेलो होतो. आम्ही गप्पा मारत असताना त्याचा लहान मुलगा - वय वर्षे पाच आमच्याजवळ आला. त्याने मित्राचे गाल धरून विचारलं, डॅडी मुसलमान म्हणजे काय ? मित्राचा चेहरा पडला.कारण एक मुसलमान मित्रही बरोबर होता. मित्राच्या बायकोने अरे असं काही नसतं असं सागून त्याला ओढलं. तेव्हां आमचा मुस्लीम मित्र मधे पडला. मित्राने मग सावरत त्याला विचारल कुठूनही काहीही ऐकून येतोस. कुणी सांगितला तुला हा शब्द. तर त्याने आईचं नाव घेतलं. आता त्याच्या बायकोचा चेहरा खर्रकन उतरला. ती कावरी बावरी होऊन इतर बायकांना सांगू लागली कि मुलाने विचारलं कि आमीर खानचं नाव आमीर खान का आहे ? आप्लं नाव खान का नाही, तेव्हां तिने घाईत असल्याने तो मुसल्मान आहे ना म्हणून खान असं उत्तर दिलं होतं. त्यांची समजूत काढली.

पण डोक्यातून ते गेलं नाही. घरी आल्यावर बायकोला म्हटलं हे कुणाच्याही बाबतीत घडू शकतं. माझाही मुलगा त्याच वयोगटाचा. त्यालाही हे माहीत नाही. पण आपण २४ तास सावध असू शकत नाही. एखादे वेळी मूल आजूबाजूला आहे याचं भान न राहवून अनेक गोष्टी तोंडातून निसटतात. मुलांना या वयात या गोष्टी समजूच नये असं सर्वांचंच मत असतं. पण मित्राकडे झाला तसा प्रसंग कुठेही आणि कुणाच्याही बाबतीत घडू शकतो असं वाटतं. शाळेत अभ्यासक्रमात देखील हे नसतं. मुलांच्या तोंडात हिंदू मुसलमान असे शब्द आले तर टीचर बोलावून घेऊन समज देतील असं वाटतं. एक ना एक दिवस हे मुलांना समजणार आहे हे नक्की. हे बोलणं चालूच होतं तर माझ्याही मुलाने तोच प्रश्न विचारला. मुलाला मित्राकडे नेलं होत, तिथं या मुलांच्या गप्पा झाल्या असणार.

खरंच या मुलांना कुठल्या वयात कुठल्या गोष्टी आणि कशा प्रकारे सांगाव्यात ? माझी तर मतीच गुंग झाली आहे. साधक बाधक परिणामांचा विचार करून काय करता येईल याबद्दल प्लीज बोला ही विनंती.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy

असाच प्रश्न माझ्या भाची ने विचारला होता ,

४ वर्षाची असताना ,

मी सांगितले , तुला कोणता कलर आवडतो ... पिंक (गुलाबी)..म्हणून तु गुलाबी ड्रेस्स घेतेस ..
तसाछ ज्याला जो देव बाप्पा आवडतो तो त्याच्या देवळात जातो ...
मग तीनं विचारला..मला पण व्हाईट ड्रेस घालून चर्च मधे जाता येइल का ..मी एकदाच बघून आले तरी खिश्चन होइन का ?
मी म्हणालो , मोठी झालीस की तुला हवं ते होता येइल!!

दाखल्यावर जात नोंदवणे हा एक वेगळाच प्रकार ..त्याचीही उत्तरे द्यावी लागत होती

Happy

काही वर्षापुर्वी तरूण भारत मध्ये , मुज्जफर हुसेन की अजुन कोणी लेखक नेमके आठवत नाहीत त्यांनी लिहीले होते की मुसलमान म्हणजे यादवांच्या काळात दोन पक्षात घणघोर संग्राम झाला त्यांना पिटाळून लावण्यासाठी यादवांनी मुसळ (जे धान्य कुटण्यासाठी वापरत असत) त्याचा शस्त्रा सारखा वापर कित्येकांच्या मानेवर प्रहार करुन त्यांना सळोकीपळो करुन दूर हाकलुन लावले तेव्हापासुन त्यांना मुसलमान म्हणतात.

.

सनातन धर्म हे बोलण्यापुरते आहे. जोपर्यंत शाळेच्या दाखल्यावरून जात आणि धर्म हा कॉलम हद्दपार होत नाही तोपर्यंत सर्वधर्मसमभाव वगैरे सब झूठ आहे. कारण या धर्माचा वापर आध्यात्मिक उन्नतीसाठी नाही तर आरक्षणे मिळविण्यासाठी, राजकारणात दबाव टाकण्यासाठी केला जातो. त्यामुळे जेव्हा धर्म पाळणे ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब होईल, तिला सरकारी कागदपत्रात नव्हे तर देशाच्या घटनेतच स्थान असणार नाही, ज्या दिवशी भारतात फक्त मानवजात राहील त्या दिवशी सनातन धर्म अस्तित्वात येईल. तोपर्यंत जन्माने (आणि समाजानेही ) दिलेला धर्म पाळावाच लागेल.

शाळेच्या दाखल्यावरून जात आणि धर्म हा कॉलम हद्दपार होत नाही तोपर्यंत सर्वधर्मसमभाव वगैरे सब झूठ आहे.+१११

मंडळी प्रतिसादाबद्दल, आपापले व्ह्यु पॉइंटस, मतमतांतरे मांडत असल्याबद्दल आभार. सर्वांनीच चांगली उत्तरं दिलीत. दादची न दुखावता आतपर्यंत योग्य तो संदेश पोहोचवण्याच्या शैलीपुढे साष्टांग दंडवत. ही दैवी देणगी आहे दाद. नतमस्तक !!

खरं म्हणजे कालच उत्तरं मिळाली. पण ती रिसीव्ह करण्याच्या मनःस्थितीत नव्हतो. आता सर्वांशी शेअर करायला काहीच हरकत नाही. जेव्हा मुलाने प्रश्न विचारला तेव्हां अशा माहितीचं वय किती अलिकडं आलंय या जाणिवेने अस्वस्थ व्हायला झालं. पाच -सहा वर्षापर्यंत तरी मुलाचं निरागसत्व जपावं हा माझा विचार. पुतणी मोठी आहे. तिच्या वेळीच दुसरीपासून धर्म वगैरे समजावून सांगताना चिडचिड झाली होती. त्या वेळी चौथीत गेल्यावर पाहू असा विचार होता. माझ्या लहानपणी तर आंम्ही बधीरच म्हणायला हवेत. तिसरी कि चौथीत कुठल्या सिनेमाच्या निमित्ताने हे माहीत झालं. आपण कोण हे ही माहीत नव्हतं.शाळेचे दाखले आमच्या बाबतीत तरी पालकच परस्पर भरत असत. ते कसे भरावेत हे समजण्याचं वय नव्हतं ते. खरं म्हणजे आताही मुलांचे दाखले मीच भरले. मुलांना त्यावर काय लिहीलंय याची कल्पना नाही.

बाहेरून मिळणारी माहिती हे अस्वस्थतेचं कारण. यावर नियंत्रण नाही. आणि हे वय देखील समजण्याचं नाही. मुद्दामहून या वयात कुणी लहान मुलांना शिकवत नाही पण कुणाच्या चुकीने विद्वेषाची विचारसरणी, तिरस्कार असंही त्यांच्यापर्यंत पोहोचेल का ही भीती वाटली. हे नीट बायकोजवळ देखील मांडता आलं नाही. ती दोन दिवस शांत राहिली. त्याचं रहस्यही लक्षात आलं Wink बायका हुषारच Proud

इथं बोलल्यावर मन मोकळं झाल्यासारखं वाटू लागलं हे ही तितकंच खरं. इथं वाचलेले सल्ले दुपारपर्यंत आठवत राहीले आणि शांत वाटलं. आता अगदी शांतपणे बायकोनेही क्लास घेतला Lol कोतबोचा हा मला झालेला फायदा.

नंदिनी
एक तर मुलं लाजवतील असे किस्से हा बाफ माझ्या लक्षात नव्हता. मा़झ्या पाहण्यात देखील नाही आलेला जास्त तो बाफ. तिथं हे सगळं बोलता आलं असतं का ? दुसरं म्हणजे, कोतबोचा उद्देश मन मोकळं करणे हाच आहे ना ? काल मुलांचे प्रश्न, मुसलमान अशा अनेक सर्च स्ट्रिंग दिल्या त्या वेळी जुने बाफ मिळाले नाहीत. इब्लिसांनी असा बाफ आहे आं सांगितल्यावर उडवायची तयारी दर्शवली. रोज उठून काही मी बाफ काढत नाही किंवा तशी हौसही नाही. कदाचित, माझ्यापेक्षा तुमचेच बाफ जास्त असू शकतील. तरीही हा बाफ अनावश्यक असल्यास उडवून टाकावा. पण अर्थातच तुम्ही हे काही मला एकट्याला सांगत नाही आहात याची कल्पना असल्याने त्या सांगण्याचं काहीच वाटलं नाही. पण तुम्ही इतके भीडभाड न ठेवता लिहीतच आहात तर एका दिवशी पाच पाच धागे आणि ते ही एकाच टीव्ही वाहीनीच्या मालिकांबद्दल काढणा-या एका आयडीला गंमतीने तुम्ही त्या वाहीनीचं मार्केटिंग पाहता का असं विचारणं गुन्हा होतो का ? एक काही तरी धोरण असावं याबाबतीत. उगाचच कुणीतरी च्यायला मायला काढत अक्कल काढत आलेलं चालवून घेतल जाणार नाही. त्या आयडीने हे पहावं. एक धागा काढला तरी का काढला हे विचारणं मायबोलीवर नॉर्मल गोष्ट आहे.

तरी पण दुसरी किंवा चौथी हे वय लहानच वाटेल जर आपण धर्म-जात...त्यांची जीवन पद्धत, विचार सरणी असे काही मोठे शब्द वापरले तर. प्रश्न आहे तो हा विषय सोपा कसा करुन सांगायचा ते....आणि तो आपल्याला आधि सोपा वाटायला हवा.

आमच्या शेजारीच मुसलमान रहात होते. माझे वय तेव्हा ३-४ वर्षे असेल. ते व्यवस्थित मराठी बोलायचे त्यामुळे ते आपल्यासारखेच असे मला वाटायचे....पण तरी सुद्धा तेव्हा त्या काकूंना सगळे 'भाभी' का बोलावतात?, त्या टिकली का लावत नाहित? आपल्या घरात आहेत तसे बर्याच देवांचे फोटो त्यांच्या घरात का नाहीत? हे त्या वयातल्या मला काय कोणत्याही मुलाला पडू शकतात. तेव्हा आईने फक्त सोप्या शब्दात समजावले होते.

पण तुम्ही इतके भीडभाड न ठेवता लिहीतच आहात तर एका दिवशी पाच पाच धागे आणि ते ही एकाच टीव्ही वाहीनीच्या मालिकांबद्दल काढणा-या एका आयडीला गंमतीने तुम्ही त्या वाहीनीचं मार्केटिंग पाहता का असं विचारणं गुन्हा होतो का ? एक काही तरी धोरण असावं याबाबतीत. उगाचच कुणीतरी च्यायला मायला काढत अक्कल काढत आलेलं चालवून घेतल जाणार नाही. त्या आयडीने हे पहावं. एक धागा काढला तरी का काढला हे विचारणं मायबोलीवर नॉर्मल गोष्ट आहे.>मी विचारलं होतं का तसं?? मी त्या बाफवरच्या चर्चमधे होते का? तिथला विषय इथे आणून इथे चर्चा करायची आहे का? त्यासाठी हा धागा उघडला आहे का? तुम्ही इतराना वाट्टेल तसे बोललात की लोकांनी ते खेळकरपणे घ्यायचं, तुम्हाला कुणी काही म्हटलं तुम्ही आयडी बदलणार, शंभरेक धागे उघडणार, कुठल्याही बीबीवर जाऊन कसलाही विषय आणून लिहत बस्णार. यातून तुम्हाला नक्की काय मिळतं तुम्हाला ठाऊक!!!

(ता.क.: मी लेखन केलेले सर्व धागे नंदिनी या नावानेच आहेत. डु आयडीबद्दल मागच्य वेळेला सांगितले होते तुम्हाला. लक्षात असेलच)

ज्याला हे समजायचं त्याला ते समजलेलं आहे. तुम्हाला उद्देशून आताही काहीही लिहीलेलं नाही. तुम्ही नीट वाचत चला मग उत्तर द्या. मात्र एका आयडीला धागे काढण्याबद्दल समज आणि एका आयडीने एकाच वेळी भरमसाट धागे काढले म्हणून गंमतीने विचारणा-यावर आयला मायला असं इतरत्र सांगत त्वेषाने चालून जाणं योग हे समजण्यापलिकडे आहे. दोन्ही पार्ट्यांनी एक काय ते ठरवावं. आमच्यासारख्यांचा खूपच गोंधळ होतो. म्हणजे एकाच दिवशी भरमसाट धागे काढणे हा टी पी मान्य करायचा कि अनेक दिवसांनी धागा काढला तो का काढला याला उत्तर द्यायचं ?

माझ्यासाठी हा विषय बंद.

अरे बाप रे!! कीती तो 'विचार' करायचा , एव्हढ्याशा प्रश्नासाठी!! आमच्या लहानपणी तर मला आठवत नाही कोणी काहीही मुद्दामून शिकवलेले. पण अगदी जसे आठवतेय तसे मुस्लिम , हिन्दू आणि ख्रिश्चन या धर्मांची बेसिक ओळख होतीच. शिवाय हीन्दी पिक्चर होतेच की शिकवायला. ओळखीत एखादी व्यक्ति मुस्लिम किन्वा ख्रिश्च्न असेल तर ते सांगताना कधी आई/बाबांना लाज वाटली नाही की चेहरा पडला नाही.
तुमचा मुलगा केव्हढा आहे? आजच्या केबल्च्या जमान्यात त्याला मुस्लिम माहित नाही म्हण्जे आश्चर्य आहे.
मुलाला 'अमर अकबर अ‍ॅन्थनी' दाखवा बरे. झालेच तर त्याच्या जोडीला ६०-७० च्या दशकातले इतर अनेक हिन्दी पिक्चर दाखवता येतील ज्यामधे मुस्लिम हिरो + हिन्दू हिरो अशा मित्रांच्या जोड्या आहेत.

तुमचा मुलगा केव्हढा आहे? आजच्या केबल्च्या जमान्यात त्याला मुस्लिम माहित नाही म्हण्जे आश्चर्य आहे. >>>:अओ:

वर दिलंय कि सगळं. सल्ले देताय कि टोमणे मारायची हौस भागवताय ? या वयातल्या मुलांना माझ्या घरी जास्त वेळ टीव्ही पाहू दिला जात नाही. खेळ, अभ्यास, तायक्वांदो आणि मुलीसाठी नृत्य, गाणं यांचे क्लासेस हे पुरेसं आहे. तुम्ही सुचवलेले सिनेमे आणि बिनडोक मालिका यात त्यांचा वेळ जावा असं किमान मला तरी वाटणार नाही. तुम्ही तुमच्या मुलांना हे सिनेमे दाखवणार असाल तर माझा आक्षेप असण्याचं कारण नाही.

(ता.क. : मुलांना असे सिनेमे दाखवा असं फोरममध्ये लिहील्याने दखल घेतली अन्यथा दखल घ्यायची काहीच गरज नव्हती).

वरती सगळ्यांनी म्हटले आहेच पण मलाही इतके घाबरण्यासारखे असे काहीही वाटले नाही ह्या प्रश्णात.
उलट इतके घाबरून किंवा अपराधी वाटून उत्तर द्याल तर मुलगा वेगळाच अर्थ काढेल... मुलं खूप हुशार असतात लहान सहान गोष्टी टिपण्यात व अंदाज काढण्यात्..(खास करून आई वडीलांच्या चेहर्‍यावरचे भाव वाचण्यात..)

किरण....

समाजात आजही ज्याला गांभिर्याने घेतले जात आहे अशा एका नाजूक प्रश्नाला या निमित्ताने तुम्ही इथे शब्दबद्ध केले आहे. "डॅडी, मुसलमान म्हणजे काय ?" या ऐवजी त्या मुलाने 'डॅडी, जैन म्हणजे काय ?" किंवा "डॅडी, ख्रिश्चन म्हणजे काय?" असा प्रश्न विचारला असता आणि तुमच्या ग्रुपमध्ये त्यावेळी एखादा जैन वा ख्रिश्चन असता तरी वातावरण खेळीमेळीचे राहिले असते यात संदेह नाही. पण गेली कित्येक शतके आपल्या समाजाची जडणघडणच अशी काही नादुरुस्त झाली आहे की 'मुसलमान' हे नाम आपल्या कंठीमाथी दुष्मन म्हणूनच कोरले गेले आहे. शालेय शिक्षणातही वर्गात मुस्लिम मुले असतानाही ज्या आवेशाने आमचे शिक्षक "शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा कसा काढला" शिकवित असत ते ऐकताना माझ्या मुस्लिम मित्रांना त्यावेळी नेमके काय वाटत असेल याचा विचार मनी येई. पण त्याबद्दल त्यांच्याशी चर्चा करण्यातही अर्थ नव्हता कारण त्यांचीही समज त्या काळात तितकीच असणार. अर्थात दुहीचे बीज त्या क्षणापासून त्यांच्या मनी रुजले असेल असे समजण्यास भरपूर वाव आहे.

तुमच्या लेखात केवळ 'मुसलमान' ही व्यथा नसून शेवटी तुम्ही "खरंच या मुलांना कुठल्या वयात कुठल्या गोष्टी आणि कशा प्रकारे सांगाव्यात ? ..." असाही एक उपयुक्त प्रश्न उभा केला आहे. त्याला उत्तर देण्याप्रती मी इतकेच म्हणू शकेन की ज्या संवादामुळे त्यांच्या मनात समवयस्क मुलांबाबत काहीतरी विचित्र चित्र निर्माण होऊ शकेल ते टाळणे युक्त ठरेल. उदा. मुस्लिम समाज आणि त्यांच्या चालीरिती, ख्रिश्चन आणि त्यांचे धर्मप्रसारणाचे कार्य. तसे पाहिले तर या जगात नित्यदिनी शेकडो गोष्टी उत्साहवर्धक वाटाव्यात अशा घडत असतात, त्याबद्दल चर्चा अपेक्षित आहेच आहे. तरीही सायंकाळच्या सुमारास अन्य मित्रांसमवेत घरी रंगलेल्या गप्पागोष्टीमध्ये मुलांनी प्रवेश केलाच तर घटनांमध्ये कोणत्याही विषयाने कटुता निर्माण होणार नाही हे कटाक्षाने पाहिले जावे.

मोबाईल क्रांतीच्या या दिवसात मुलांपासून कोणतीही माहिती लपून राहाणे शक्य नाही हे जरी ध्यानी घेतले तरी मुलेही त्यामुळे अकाली प्रौढ होत चालल्याचे दिसून येत आहे. सबब ज्येष्ठांनी "मुसलमान" ची व्याख्या सौम्य वा कठोर केली तरी हिंदू मुलांपासून ती दूर राहात नाही हेही तितकेच खरे.

अशोक पाटील

अशोक,

तुमच्या लेखात केवळ 'मुसलमान' ही व्यथा नसून शेवटी तुम्ही "खरंच या मुलांना कुठल्या वयात कुठल्या गोष्टी आणि कशा प्रकारे सांगाव्यात ? ..." असाही एक उपयुक्त प्रश्न उभा केला आहे. त्याला उत्तर देण्याप्रती मी इतकेच म्हणू शकेन की ज्या संवादामुळे त्यांच्या मनात समवयस्क मुलांबाबत काहीतरी विचित्र चित्र निर्माण होऊ शकेल ते टाळणे युक्त ठरेल. उदा. मुस्लिम समाज आणि त्यांच्या चालीरिती, ख्रिश्चन आणि त्यांचे धर्मप्रसारणाचे कार्य. तसे पाहिले तर या जगात नित्यदिनी शेकडो गोष्टी उत्साहवर्धक वाटाव्यात अशा घडत असतात, त्याबद्दल चर्चा अपेक्षित आहेच आहे. तरीही सायंकाळच्या सुमारास अन्य मित्रांसमवेत घरी रंगलेल्या गप्पागोष्टीमध्ये मुलांनी प्रवेश केलाच तर घटनांमध्ये कोणत्याही विषयाने कटुता निर्माण होणार नाही हे कटाक्षाने पाहिले जावे.


> > > >
+१००.

अशोकजी
बाफचा विषय नीट समजावून घेऊन अत्यंत संतुलित आणि योग्य असा प्रतिसाद देण्यात तुमचा हात कुणी धरू शकेल असं वाटत नाही. मुसलमान म्हणजे काय या बाफवर अपेक्षेप्रमाणे अतिशय संवेदनशीलतेने आणि सहृदयतेने दिलेल्या प्रतिसादाबद्दल अत्यंत आभारी आहे.

आपण जसे स्वतःला हिंदु म्हणवुन त्याचा इतिहास जाणतो, तद्धत आजकालच्या काळात पालकांना आपल्याच समान इतर धर्मांचे ही थोडे बहुत ज्ञान ( किमान त्यांचे उगम, धोरणे, ह्या धर्मांची संत मालिका वगैरे ) असणे अत्यंत आवश्यक आहे.

आणी ह्यात काहिच वावगे नाही, उद्या असा कोठला प्रश्न मुलांनी निरागसपणे विचारलाच तर आपण मोठ्या सहजतेने त्याचे उत्तर सर्वांसमोर व्यवस्थित पणे देऊ शकु अशी परिस्थीती असलीच पाहिजे.

इतर धर्मांचे इतिहास माहिती करुन घेणे व त्यांमधुन कैक गोष्टी ज्या सर्व धर्मांत समान आहेत त्या ज्ञात करुन घेणे आपले कर्तव्य आहे.

Kiranu . . . .

आज आपण ह्या धड्यातुन हे मर्म ओळखुन हे केले तर उद्या आपली स्वतःची समाजाबद्दल समजाची पातळी उच्च होईल ह्यात काहिच शंका नाही.

खात्री आहे मी काहीही वावगे बोललो नाहीये.

आपण जसे स्वतःला हिंदु म्हणवुन त्याचा इतिहास जाणतो, तद्धत आजकालच्या काळात पालकांना आपल्याच समान इतर धर्मांचे ही थोडे बहुत ज्ञान ( किमान त्यांचे उगम, धोरणे, ह्या धर्मांची संत मालिका वगैरे ) असणे अत्यंत आवश्यक आहे.

आणी ह्यात काहिच वावगे नाही, उद्या असा कोठला प्रश्न मुलांनी निरागसपणे विचारलाच तर आपण मोठ्या सहजतेने त्याचे उत्तर सर्वांसमोर व्यवस्थित पणे देऊ शकु अशी परिस्थीती असलीच पाहिजे.

इतर धर्मांचे इतिहास माहिती करुन घेणे व त्यांमधुन कैक गोष्टी ज्या सर्व धर्मांत समान आहेत त्या ज्ञात करुन ( शिकुन ), घेणे आपले कर्तव्य आहे. अश्याने धर्म निरपेक्षता वाढु शकेल.

Kiranu . . . .

आज आपण ह्या धड्यातुन हे मर्म ओळखुन हे केले तर उद्या आपली स्वतःची समाजाबद्दल समजाची पातळी उच्च होईल ह्यात काहिच शंका नाही.

खात्री आहे मी काहीही वावगे बोललो नाहीये.

खात्री आहे मी काहीही वावगे बोललो नाहीये. >>> +1

उलट चर्चा योग्य ट्रॅकवर आल्याचं समाधानच आहे परब्रह्मजी.

परब्रम्ह....

आपल्या प्रतिसादात तुम्ही "इतर धर्मांचे इतिहास माहिती करुन घेणे व त्यांमधुन कैक गोष्टी ज्या सर्व धर्मांत समान आहेत त्या ज्ञात करुन घेणे आपले कर्तव्य आहे. " या वाक्याचे जे प्रयोजन केले आहे ते स्वत:ला सर्वार्थाने सुशिक्षित समजून घेत असलेल्या जनांनी अंगिकारले तर बर्‍याच अशा ताणतणावाच्या प्रसंगाच्या उत्तराला ते सामोरे जाऊ शकतील. मी यथाशक्ती हा प्रयत्न करीत असतो. पण या देशात "धर्म आणि जात" या प्रश्नांची राजकारण्यांनी अशी काही विषवल्ली फैलावली आहे की ज्याद्वारे धर्मातील दरीची रुंदी दिवसेदिवस भयावह स्थितीत वाढत चालल्याचे उघडउघड दिसून येते. इथे उदाहरणे देणे गरजेचे नाही तरीही असा कोणताही पक्ष नाही/नसेल जो आपल्या कृतीने दोन धर्मातील तेढ दूर करण्याचे प्रामाणिक प्रयत्न करताना दिसेल. कागदोपत्री घोषणा भरपूर होत असतात वेळोवेळी, पण त्याच्या सावलीचा गारवा ना लोकसंख्येने अधिक असलेल्या धर्माला मिळतो ना अल्पसंख्याकांना.

विचाराने पुरोगामी असलेले माझे दोनतीन मुस्लिम मित्र चाळीशीनंतरही "आपल्याला इथला समाज भारतीय न समजता मुसलमान समजतो" असे ज्यावेळी खिन्नतेने म्हणू लागले त्यावेळी साहजिकच मनी येते की, स्वातंत्र्याच्या पहाटेनंतर असे काय नेमके चुकले आपले की मुसलमानांतील जी संख्या पाकिस्तानात गेली नाही ती "हिंदुस्थानी" राहिली नसून हिंदुस्थानातील पाकिस्तानी बनले आहेत, अशी आम्ही समजूत करून घेतली ? बरे, तो समज त्यानंतर आठदहा वर्षात संपुष्टात आला असता तर आज स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही किरणच्या घरात तो मुलगा "डॅडी, मुसलमान म्हणजे काय ?" असे विचारू शकला नसता, ना त्या मित्राचा चेहराही पडला नसता.

देशाच्या शैक्षणिक क्षेत्रात कितीही तर्‍हेची प्रगती होवो पण एक गोष्ट पक्की ती म्हणजे कुणी कितीही नाकारले तरी या देशात जन्माने मिळालेली जात व धर्म सुटत नाही. तुम्ही जाणीवपूर्वक एकाही ऑफिशिअल रेकॉर्डवर धर्म लिहिलेला नसला तरी आजुबाजूच्या लोकांना या ना त्या निमित्ताने तो कळत असतोच. तुमचा मुसलमान मित्र एरव्ही कलाकार असेल, चित्रकार, क्रिडापटू, पत्रकार, अधिकारी, कामगार असेल; त्याच्यात लक्षणीय असे गुणही असतील पण त्याची तिसर्‍याला ओळख करून देताना त्याचा धर्म त्याला समजतोच आणि मग त्या तिसर्‍याकडून मुसलमानाला सामाजिक पातळीवर चांगलाच अनुभव येईल याची फार धूसर शक्यता आहे. असे अनुभव घेतलेले मुस्लिम संख्येने लक्षणीय आहेत हेही सांगतो. या मुस्लिमांना कित्येक हिंदू कुटुंबाकडून चांगले अनुभवही मिळालेले आहेत, पण वाईट अनुभवाच्या जखमा इतक्या खोल आहेत की त्याना आजही आपण परके आहोत असेच वाटत राहिले आहे ही कटू असली तरी वास्तव परिस्थिती आहे.

@ Kiranu....इब्लिस, भरत जी.... थॅन्क्स. तुम्हा तिघांनीही प्रतिसाद आवडला असे कळविले यातच सारे काही आले.

अशोक पाटील

अशोकजी

खालील प्रतिसाद इथे देण्याचा टाळला होता. फक्त इब्लीस यांना विपु करून उडवून टाका ही विनंती केली होती. पण आपल्या प्रतिसादानंतर आता हा प्रतिसाद इथे दिला तर चालेल असं वाटलं. -----------------------------------------------------------------------------------------------
(इब्लीस यांच्या विपुतून..)
वाचून ताबडतोब डिलीट करून टाका.
पाचवी सहावीत् असताना गावी चुलतभावाबरोबर् गावच्या महादेवाच्या देवळात् गेलो होतो. तेव्हां त्याच्या कानाखाली वाजवून् देवळाबाहेर् काढण्यात् आलं. मला कुणी ओळखलं नाही. त्याला का मारलं याचं उत्तर् माझ्या चुलत्याने दिलं. त्या वयात् मनाल् असह्य् यातना झाल्या होत्या. असं काही असतं, आपण् वेगळे आहोत् याची बोच् आजही मनात् आहे. आड्नाव् काय्, गाव् कुठलं.. चालतं हल्ली !! अशा संवादांचा अर्थ कळू लागला.

मग् आता कळलंच् आहे तर् प्रत्येकाने आपापले अनुभव् सांगितले. ते दिवस् अत्यंत् वा‌ईट् होते. अस्वस्थ् करणारे होते. जेव्हां माझे वडील् कसे शिकले, काय् अनुभव् आले हे ऐकलं तेव्हां मात्र् एकीकडे या व्यवस्थेचा राग् आणि समाजातले आपले स्थान् याबद्दलची असुरक्षितत् मनात् घर् करून् राहीली.ही बोच् मनात् असेल् तर् असुरक्षितता, चीडचीड् होणारच्. जगात् प्रत्येकाच्या वाट्याला सगळेच् अनुभव् येतात् असं नाही. माझ्या मुलाची पिढी सुदैवी असेल् असं वाटत् होतं. पण् नेटवरच् पाहतोय् ना, सुशिक्षितांमध्येच् किती विद्वेष् ठासून् भरलाय्. याची सुरुवात् जिथून् होते त्या पॉ‌ईण्टकडे ज्या संवेदनशीलतेने मी पाहीन् तितकं इतर् कुणी पाहील् असं नाही. हे सगळं जसं बोलून् दाखवता आलं नाही तसं मुलांना हो‌ऊ नये यासाठी दाखल्यावर् जात् नाही. पण् त्याने काही फरक् पडेल् ? मुलांना हे ही एक दिवस समजावून सांगावं लागणार आहे ही सुप्त आणि कटु जाणिव जागृत झाली. त्या वेळी मी हे कस्ं सांगेन, मुलाची प्रतिक्रिया काय असेल हे सगळ्ं विस्कळीत स्वरूपात मनात आलं. हे इथं सांगायचं नव्हतं खरंतर..

हे सगळे विचार् व्यर्थ् आहेत् हे कळत् होतंच्. फक्त् शे‌अर् करण्याने हलकं वाटलं इतकंच्.

मस्त विनोदी लेख आहे. Proud
हसुन हसुन गडाबडा लोळलो.

बादवे.. हा लेख कुणी 'माझे व्यायामाचे प्रयोग' नावाच्या आयडीने लिहीलेला होता ना.

किरणराव
पहिल्या प्रतिसादापासून मी मुद्दाम बगल मारली होती तुमच्या प्रश्नाला. पण गाडी शेवटी यायची तिथे आलीच.
सध्या हातात टॅब आहे. कीबोर्ड व वेळ सपडला की पुधचे लिहितो.

टॅबवर मी डायरेक्ट नवे लेखन पहातो म्हणून तुमची विपु पाहिली नव्हती. ठेवू की उडवू आता?

काही वर्षापुर्वी तरूण भारत मध्ये , मुज्जफर हुसेन की अजुन कोणी लेखक नेमके आठवत नाहीत त्यांनी लिहीले होते की मुसलमान म्हणजे यादवांच्या काळात दोन पक्षात घणघोर संग्राम झाला त्यांना पिटाळून लावण्यासाठी यादवांनी मुसळ (जे धान्य कुटण्यासाठी वापरत असत) त्याचा शस्त्रा सारखा वापर कित्येकांच्या मानेवर प्रहार करुन त्यांना सळोकीपळो करुन दूर हाकलुन लावले तेव्हापासुन त्यांना मुसलमान म्हणतात.

Proud

पु ना ओकांच्या भारतीय इतिहासातील घोडचुका नावाच्या पुस्तकातील तो पुनाओकी शोध आहे.

( संदर्भ अचूक द्या. नाहीतर मायबोलीवरील घोडचुका असेही पुस्तक निघेल Proud )

Pages