इ मेजवानी - भाग ४ - अल्पोपहार स्पेशल

Submitted by दिनेश. on 27 June, 2013 - 06:42

काही जण म्हणताहेत, जेवायला वेळ नाही. त्यांच्यासाठी हे खास !

बाटी चूर्मा

भानोले बर्गर ( कोबीचे भानोले आणि बगेत )

दाल बाटी ( माझी अत्यंत आवडती ) यात मला कोथिंबीर आवडत नाही.

गाजर मटार बिर्याणी

आपल्या पद्धतीचा शिरा आणि घरचे लिंबाचे लोणचे.. लहानपणापासून आवडता प्रकार.

इसका नाम नही.. ( सॉते केलेल्या भाज्या, खरपूस भाजलेल्या पावावर, आणि वर चीज )

अनयन पराठा

अनयन उत्तप्पा ( आणि कच्च्या टोमॅटोची भाजी )


~

पास्ता इन टोमॅटो बेस्ड सॉस

पोटॅटो रोस्टी विथ ग्लेज्ड कॅरट्स

राजमा चावल ( फोटो रात्री काढला आहे ) माझे कम्फर्ट फूड

आपल्या सर्वांची सखी, सा. खि. सोबत खमंग काकडी

तिखट शिरा म्हणजेच सांजा म्हणजेच उप्पीट Happy

वर्षू स्पेशल पोहे

त.टि... हे सर्व पदार्थ मी स्वहस्ते रांधलेले आहेत आणि शुद्ध शाकाहारी आहेत Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जळवा जळवा अजुन.... अरे काय हे, बरं झालं सौ.ला माहीती नाही नाहीतर अजुन एकदा, " बघा ते दिनेशदा, नाहीतर तुम्ही...."

मस्त मस्त मस्त.... कसं काय जमतं बुआ तुम्हाला :-?

व्वा! दाल बाटी माझीही आवडती! इथे नगरात मारवाडी समाजातील घरात जी ऑथेन्टिक दाल बाटी मिळते त्याला जगात तोड नाही.
सगळेच पदार्थ मस्त!
अनयन काय आहे?

साष्टांग दंडवत तुम्हाला.
इतक सुंदर की आत्ताच करावसे वाटत आहे. कधी करणार ते माहित नाही
पोटॅटो रोस्टी विथ ग्लेज्ड कॅरट्स ची रेसिपी दिली आहे का?
नसेल तर प्लीज शेअर् करा ना.

भाऊ, मस्तच प्रतिसाद.
आश, डोनटप्रमाणे आरपार नाही पण त्यात खळग्यात तूप घालून खाता येते.
टुनटुन.. नक्कीच.
अंन्जू-- थोडेफार श्रेय माझ्या कॅमेराला पण द्यायला हवे !

पिन्की.. नक्कीच.. !
हेमाली, वर्षूची कुर्रुम कुर्रुम पोहे रेसिपी आहे इथेच. तीच वापरलीय. मी फक्त थोडे शेंगदाणे वापरलेत.
मृणाल १ -- पोटॅटो रोस्टी हि एक स्विस डिश आहे. आपल्या ललितांनी इथे ऑथेंटीक रेसिपी लिहिली होती. ( त्या तिथेच असतात. ) ग्लेज्ड कॅरेट्स पण आहेच.

सगळ्यांच्या प्रतिक्रियांनी कसे भरून पावल्यासारखे वाटतेय.

<< थोडेफार श्रेय माझ्या कॅमेराला पण द्यायला हवे ! >> दिनेशदा, तुमच्याशीं असहमत होणं केंव्हांही कठीणच असलं तरीही इथं व्हावंच लागतंय ! उद्यां कुणी असंही म्हणेल, मोना लिसाच्याही हास्यातल्या जादूचं कांहीं श्रेय मूळ पेंटींगचा फोटो काढला त्या कॅमेराला जातं !! Wink

माझ्या बहीणी / लेकिंसाठी माझे घर नेहमीच स्वागतासाठी सज्ज असते. मी तिथे असलो आणि नसलो तरीही !

भाऊ, काय बोलू आता ?

आह्हाहा.........डोळ्याचं पारणं फिटणं कसं अस्तं ते आज समजलं.. Happy

भाऊंचं चित्रही अ‍ॅप्रोप्रिएट !!!

दिनेश दा.. हे वाक्य तुम्ही हजारदा ऐकलं असेल तरी पुन्हा एकदा,' तुस्सी ग्रेट हो ज्जी"

अनिश्काच्या पहिल्या दोन प्रतिक्रियांना माझे अनुमोदन. भाऊ यांनी perfect लिहिलेय, मुळात रेसिपीज सुंदर आहेत.

मला पण एखादी रेसिपी लिहाविसं वाटू लागलंय.

वडापाव
-------

साहीत्य : वडा, पाव, मिरच्या, चिंचेची चटणी

एक पावाची लादी आणावी. जोशींकडून वडे आणावेत. पावाचं ऑपरेशन करून उघडता येणारा कप्पा करावा. या कप्प्यात हळूच वडा सारावा. त्यावर चिंचेचं पाणी टाकावं आणि तळलेल्या मिरचीबरोबर सर्व करावा..

टंकतानाच तोंडाला पाणी सुटलंय, तिकडे वाचताना बिच्चा-या दिनेशदांचं काय होईल ? तिथं कोण म्हणणार त्यांना भिऊ नकोस...

मस्त दिनेशदा! बाटी खायची हुक्कि आलिये आता तुम्च्या फोटो मधलि बघुन. बरेच वर्ष झाले खाऊन.

अतिशय सुंदर दिनेशदा,
तुम्ही पदार्थ तर छान करताच, पण पदार्थाला नटवून/सजवून ज्या नजाकतीने डिशमध्ये पेश करता त्याचं खूप कौतुक वाटतं. सु प र्ब !

सायली, अंगोल्याला येणं अगदी सोप्प आहे. फक्त नैरोबी, अदीस अबाबा, दुबई, जोहान्सबर्ग, ब्रसेल्स... असा एखादा भोज्जा करावा लागतो. कधी कधी २४ तासाचा मुक्काम Happy

माशा ती हौस आहे. भाऊ म्हणताहेत तसे मला यात चित्रकलेचे रंगच दिसतात.

Pages