इ मेजवानी - भाग ४ - अल्पोपहार स्पेशल

Submitted by दिनेश. on 27 June, 2013 - 06:42

काही जण म्हणताहेत, जेवायला वेळ नाही. त्यांच्यासाठी हे खास !

बाटी चूर्मा

भानोले बर्गर ( कोबीचे भानोले आणि बगेत )

दाल बाटी ( माझी अत्यंत आवडती ) यात मला कोथिंबीर आवडत नाही.

गाजर मटार बिर्याणी

आपल्या पद्धतीचा शिरा आणि घरचे लिंबाचे लोणचे.. लहानपणापासून आवडता प्रकार.

इसका नाम नही.. ( सॉते केलेल्या भाज्या, खरपूस भाजलेल्या पावावर, आणि वर चीज )

अनयन पराठा

अनयन उत्तप्पा ( आणि कच्च्या टोमॅटोची भाजी )


~

पास्ता इन टोमॅटो बेस्ड सॉस

पोटॅटो रोस्टी विथ ग्लेज्ड कॅरट्स

राजमा चावल ( फोटो रात्री काढला आहे ) माझे कम्फर्ट फूड

आपल्या सर्वांची सखी, सा. खि. सोबत खमंग काकडी

तिखट शिरा म्हणजेच सांजा म्हणजेच उप्पीट Happy

वर्षू स्पेशल पोहे

त.टि... हे सर्व पदार्थ मी स्वहस्ते रांधलेले आहेत आणि शुद्ध शाकाहारी आहेत Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा, खरचं तुमच्याकडे माहेरपणाला यावसं वाटतयं मलाही Happy जळावु प्रचिंसाठी णिशेध Wink
बाकी अ प्र ति म!!!!!!!!!!

दिनेश
यू आर टू मच. नेक्स्ट टाईम आलात की माझ्या घरी यातला एक तरी पदार्थ मला करून घालायचाच तुम्ही
त्याशिवाय तुम्हाला जाऊच देणार नाही मी. Proud

दिनेशदा..... खंरच अ प्र ति म...... तों पा सु......
शिरा आणि लोणचे पहिल्यांदाच ऐकत्र बघितल...... आता खाउनहि बघेल....... Happy

दा,
मस्तच!! अवेळी देखील भुक लागते ही पाने पाहुन.
भुक लागण्याचे औषधाचे पेटंट घ्यायला काही हरकत नाही तुम्हाला Happy

छान .ब्रेड पुडिंग (बिन अंड्याचे )कसे करतात ?चीझ मकरोनी ,केळा चपाती कधी केले आहे का दिनेशदा ?

छानच डिशेस.
डिनेशदा, दालबाटीला जीरे मोहरीची फोडणी नाही का देत? मस्त काळे दाणे उठुन दिसतात. आणि चव पण मस्त लागते.

माझ्यासाठी एक्ष्ट्रा दाल - बाटी आणि सा. खिचडी- ख.काकडी बनवून ठेवा ... जरा जास्तच बनवा मी भरपूर खातो ...हे दोन पदार्थ असलेकी !!!:)

खरंच, सगळ्यांना प्रत्यक्ष कधी खायला घालू शकेन तो भाग्याचा दिवस.. एरवी तूम्हा सगळ्यांपासून मी एवढा दूर आहे कि जेवायला कुणी सोबत असावे, हे स्वप्नच आहे सध्या तरी.

दक्षे नक्कीच, झक्या.. तूच ये अंगोलाला !

सुमंगल.. का कुणास ठाऊक पण पहिल्यांदा राजस्थानात धाब्यावर अशी डालबाटी खाल्ल्यापासून त्यात जिरे, मोहरी, कोथिंबीर असे काहीच आवडत नाही.

एस. आर. डी... बिनअंड्याचे पुडींग मी लिहिले होते इथेच.

मस्तच
पहिल्या दोनांबद्दल माहिती नाही, पण ट्राय करावंसं वाटतंय. ( तुमचे जुने बाफ पहायला हवेत) पण बाकिचे सगळेच सही आहेत. प्याज पराठा माझा आवडता. मला शिरा नको फक्त.

हलक्या फुलक्या ब्रेकफास्टबद्दल पण लिहा एकदा दिनेशदा ( आपल्या महाराष्ट्रातल्या , त्यातही घाटावरच्या वातावरणासाठी योग्य असा )

व्वा! स्लर्प.. दिनेशदा तुम्हीच ड्बल मास्टर शेफ आहात Happy
दक्षिणातै.. तुझ्याकडे आले ना दिनेशदा तेव्हा मलापण बोलवं हं प्लीजच Wink

स्लर्प स्लर्प .................सगळं एक्दम तोंपासू...............:स्मित:

दिनेशदा, माझी प्रतिक्रिया मागच्या वेळी दिली होती तीच, स्क्रीनमधे हात घालून खाता आले असते तर किती बहार आली असती, सगळ्यांनी असंच केले असते आणि तुम्हाला सारखं-सारखं करत राहायला लागले असते.

दिन्नेशदा....कस्सल्ले भ्भार्री दिस्सत्ताहेत हो हे पदार्थ.........लाळ गळ्ळतेय नुस्सत्ती.................... मी येतेच हो तिथे.....

1_3.jpeg

मला शिरा हवा म्हणजे हवाच्.:स्मित: आणी त्याबरोबर कैरीचे लोणचे पण चालेल. दोन्ही आवडते.:स्मित:

साबुदाणा खिचडी दुपारी खाईन जेवणा ऐवजी.:फिदी:

Pages