निसर्गाच्या गप्पा (भाग - १५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 26 June, 2013 - 03:52

निसर्गाच्या गप्पांच्या १५ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

धुवाधार पावसाने निसर्ग पुर्ण हिरवागार, शांत केला आहे. निसर्गानेही पशु-पक्षांच्या, माणसांच्या अन्न-धान्याच्या, पाण्याच्या तरतूदीची सोय करण्यास सुरुवात केली आहे. आनंदी आनंद वातावरण काही ठिकाणी पसरले आहे तर उत्तरांचलसारख्या भागात निसर्गाचे संतुलनही ढासळले आहे. हजारो जीवांचा बळी त्या प्रलयात गेला आहे. त्या सर्व मृतात्म्यांना श्रद्धांजली.

आपले बरेचसे निसर्गमय आयडी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपाआपल्यापरीने खारीचा वाटा उचलतात मग तो त्यांचा छंद असो व निसर्गाविषयी आस्था. पण आता आपणही एक पण करुया आपल्याला जमेल तसे महिन्यातून, सहामहिन्यातून, किंवा वर्षातून एकदातरी प्रत्येकाने आपल्या घराभोवती किंवा आपल्या कॉलनीत किंवा रस्त्याच्या कडेला किंवा पटांगण किंवा गार्डन मध्ये एक तरी झाड लावायचे. झाड फळा फुलांचेच हवे असे काही नाही. आपल्याला जे उपलब्ध असेल ते लावू. बियाही रुजवू शकतो आपण त्या ठिकाणी. मागे काहींनी झाडांच्या बियाही जंगलात फेकल्या आहेत त्याची आता नक्कीच झाड झाली असणार. तो उपक्रम पुढेही आपण सगळेच चालू ठेऊया. तसेच ज्याला जमेल त्याने पावसाचे पाणी साठवण्याचा प्रयत्न करुया जेणेकरून आपल्याकडून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास काही अंशी मदत होईल.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कृष्णकांचन म्हणजे कुठले झाड/फुल? इंदिरा संतांच्या मृद्गंध मध्ये उल्लेख आलाय. हे झुडुप असावे कारण याचे, रातराणीचे (चटकचांदणीचे) वाफे होते असे म्हटलय त्यांनी.

Dadaralaa Dr Ambedakar Road var kadamb mast fulalaay. Juhulaa paN Sabghavee School javaLachaa kadamb mast fulalaay.

हे वाचा . भारी आहे. Happy (काही जणांना लिंक बघता येत नाही, म्हणून पूर्ण बातमी इथे दिलेय. Happy )
माकडेही झाले 'मोबाईल सॅव्ही'
- योगीराज प्रभुणे - सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2013 - 07:59 AM IST

Tags: monkey, mobile, pune, kothrud
पुणे - लहानपणी माकडांनी टोप्या पळविल्याची गोष्ट सर्वांनी ऐकली आहे. टोपीवाला जसा करतो तशी कृती माकडे करतात. आताचीही माकडे माणसांची कॉपी करीत आहेत. फरक इतकाच, की टोपीची जागा "मोबाईल'ने घेतली आहे. कोथरूडमधील करिष्मा सोसायटी ते भुसारी कॉलनी या परिसरात लंगूर जातीच्या नऊ माकडांची टोळी आहे. त्यांच्यात मोबाईलची प्रचंड "क्रेझ' निर्माण झाली आहे. ही माकडे मोबाईल पळवीत आहेत. ते त्यावरची गाणी ऐकतात, त्याची बॅटरी संपताच तो मोबाईल एकाच ठिकाणी ठेवतात. मात्र, फेकून देत नाहीत!

गेल्या काही महिन्यांपासून कोथरूडमध्ये मोबाईल चोरी ही नित्याचीच बाब झाली आहे. मात्र, ही मोबाईल चोरी करणारी माकडांची टोळी आहे. चार्जिंगसाठी सकाळी खिडकीत ठेवलेल्या मोबाईलवर नजर पडताच माकडे टणाटण उड्या मारत काही क्षणात तिथे पोचतात. चार्जिंगची वायर काढून टाकतात आणि मोबाईल घेऊन पसार होतात. माकडाच्या हातातील मोबाईलवर फोन केला, तर ते माकड हॅंडसेट पोटाशी घट्ट धरते. मोबाईलमधून आवाज येतो, या आगळ्यावेगळ्या प्रकाराकडे ते माकड तासन्‌तास बघत बसते. त्यातच परत फोन आल्यास ते तोंडातून विचित्र आवाज काढत त्याचा आनंद व्यक्त करते, अशी माहिती या घटना पाहणाऱ्या काहींनी दिली. मोबाईलची बॅटरी उतरताच माकडासाठी हा मोबाईल निरुपयोगी वस्तू होते. त्यावर फोन येत नाही, की त्यातून गाण्यांचा आवाज येत नाही. शेवटी बंद पडलेले मोबाईल कोथरूडच्या सिटी प्राइड चित्रपटगृहाच्या गच्चीवर ठेवतात. आतापर्यंत तेथे सापडलेल्या वीसपैकी कोणताही मोबाईल माकडाने फेकून दिल्याचे जाणवत नाही, असेही येथील नागरिकांनी स्पष्ट केले.

...अन्‌ साहेब जीव तोडून पळाले
कोथरूडमधील एका कार्यालयातील एका साहेबांचा मोबाईल माकडाने पळविल्याचे लक्षात येताच त्या साहेबांनी मोबाईलसाठी त्याचा पाठलाग सुरू केला. त्या "स्मार्ट फोन'मध्ये कार्यालयाची सर्व माहिती साठवली होती. त्यामुळे ते जीव तोडून माकडाच्या मागे पळत होते. अखेर एका झाडावर ते माकड बसले. त्या वेळी त्याने मोबाईलचे बटन दाबताच "एफएम' सुरू झाला. बघताबघता त्यातील गाण्यांचा आवाज वाढला. मोबाईलकडे हताशपणे बघत राहण्यापेक्षा त्या साहेबांच्या हातात काहीच उरले नव्हते.

प्राणितज्ज्ञ नीलिमकुमार खैरे म्हणाले, ""या भागात माकडांना भरपूर खायला मिळते. त्यामुळे माकडांची ही टोळी हा परिसर सोडून जात नाही. टचस्क्रीनसारखे मोबाईल तंत्रज्ञान वापरण्यासाठी आवश्‍यक असणारी किमान बौद्धिक पातळी लंगूर जातीच्या माकडांकडे असण्याची शक्‍यता आहे.''

दिनेशदा,
कदंब परवा पुण्यात सहकारनगरला आबा बागुल उद्यानात छान फुललेला पाहिला,खुप फुले लागली आहेत,न फुललेली फुले दिसायला एखाद्या फळासारखी वाटली.
(विषेश म्हणजे कैमेरा विसरुन गेलो होतो...)

मला मेथी छळ्ते..किती विविध प्रकारे लावली तरी बुरशी येते..का?

जागु तुझी किती छान आली आहे..मी १० वेळा लावली तर १ अशी येते..बाकी वेळी फुकट जाते Sad

शोभा, अगं मागच्या आठवड्यात मला सिटीप्राईड जवळच काही लोकं एका ठिकाणी गोळा झालेली दिसली. दोन पोलीसही होते मोटरसायकलवर. सगळे वर झाडाकडे पहात होते. शेवटी गाडी थांबवून मीही पाहिले, तर झाडावर माकड मोबाईल घेऊन ! : )

कदंब फुलला.....

पश्चिम रेल्वे, बोरिवलीहून सांतक्रुझकडे जाणारी स्लो लोकल पकडायची. पार्ला स्टेशन गेल्यानंतर एक फ्लायओव्हर आहे त्यानंतर पश्चिमेकडे बैठी, चाळी सारखी वस्ती गेल्यानंतर एक गुलाबी-पीच रंगाची आडवी बिल्डींग आहे. तिच्यासमोर पण रेल्वेलाईन मधे कदंब फुलला आहे. आजुबाजूला कसलीही गर्दी नाही त्यामुळे हा चटकन दिसतो.

ऑफिसच्या दारातला अजून फुलला नाही. तोही बहुदा बहाव्यासारखा लेट-लतिफ आहे.

आज घोडबंदर मार्गे ठाण्याला गेले होते, परतीच्या प्रवासात एका ठिकाणी लहानसे झाड फुललेले दिसले.

एखादे झाड ओळखायला लागले कि पुन्हा पुन्हा दिसते.... भेटते.... आपलेसे वाटते.

दिनेशदा, तुम्हाला ईतके लांब राहून ईथल्या सगळ्या झाडांची बित्तमबातमी असते.

I had gone to Babulanath Temple ( Swiss visa office is nearby ) I saw a Double Madhumalate at Babulanath temple ( on the left side of last set of steps ) If anybody goes there, must see it. ( Sorry my new laptop does not allow devnagaree yet ! ) It looks more beautiful than our regular madhu malatee.

BTW my journey begins tomorrow Mumbai-Pune_Miraj_Kolhapur_Malvan - Ratnagiri Deorukh Sangameshwar Mumbai Doha Zurich Doha Mumbai Nairobi....Luanda

एका मित्राने पाठवलेली एक इंटरेस्टिंग मेल मिळाली ती इथे शेअर करीत आहे -

कोकोनट ऑइल - डॉ. मीना नेरुरकर -
कोणाचे नशीब कधी पालटेल सांगता येत नाही. गेली तीस वर्षे नारळाच्या खोबर्‍याला,खोबरेलतेलाला आरोग्यबाधक ठरवल्यावर अचानक त्याचे ग्रह पालटले आहेत. दिवसागणिक वाढत असलेल्याअल्झायमर या रोगावर जालीम उपाय म्हणून खोबरेल तेलाला आता महत्त्व आलेले आहे. नर्सिंगहोम्स व वृद्धाश्रमातले डॉक्टर पेशंटना टोस्टवर खोबरेल तेल लावून द्या असे सांगत आहेत.इतके दिवस आजूबाजूचा काहीही गंध नसलेली अल्झायमर पीडित जनता महिनाभराच्या टोस्टवरच्याखोबरेल तेलाने एकेकाळचे परिचित जग परत नव्याने ओळखायला लागलेली आहे.ते पाहून त्यांच्याप्रियजनांच्या मुद्रेवर हसू झळकत आहे. लोकहो, नित्यनव्या डाएट फॅडमध्ये कोकोनट ऑइलसध्या शायनिंग स्टार झाले आहे.
माणसाचे नशीब पालटवायला जसा एखादा गॉडफादर लागतो तसं कोकोनट ऑइलचे भाग्य पालटायला डॉ.ब्रूस फाइफ याच्या रूपाने गॉड़ादर लाभला. अमेरिकेच्या र्‍होड आयलंड राज्यात राहणार्‍याया न्यूट्रिशनल डॉक्टरचा शेजारी पॉल सोएर्स नावाचा फिलिपिनो माणूस होता. छोट्या चणीचापॉल स्वत:सारखेच छोटेसे दुकान चालवायचा व त्यात मिरॅकल ऑइल विकायचा. आजूबाजूची फिलिपिनोजनता काहीही झाले की, त्याच्या दुकानात धावत यायची व तेल घेऊन जायची. कुतुहल म्हणूनब्रूसने एके दिवशी पॉलला कसले तेल विकतोस, कुठून आणतोस अशी विचारणा केली. पॉल म्हणाला,थायलंड वा फिलिपाइन्स देशातून नारळ आणतो, नारळाच्या डोळ्यात खिळा घालून पाणी काढतो,मग तो हातोड्याने फोडतो, आतले खोबरे किसतो, ते पाण्यात उकळत ठेवतो, पाणी आटून वर राहतेते कोकोनट ऑइल. कसल्याही व्याधीवर उपचार म्हणून ते देतो. ब्रूस न्यूट्रिशनिस्ट असल्यामुळेत्याला प्रक्रिया न झालेल्या नैसर्गिक खाद्यपदार्थामध्ये रस होता. त्याने पॉलच्या दुकानातवेळ घालवायला सुरुवात केली. खोबर्‍यातून तेल काढण्याची किचकट प्रक्रिया सोपी करायलाब्रूसने खूप मदत केली. पॉलला खोबरे वाटायला मिक्सर आणून दिला. खोबर्‍यातून तेल काढायलाद्राक्षातून वाइन काढायचा प्रेस आणून दिला. आता तेल काढणे खूप सोपे झाले. पॉलच्या सांगण्यावरूनकाहीही दुखत असले की, ब्रूसने चमचाभर कोकोनट ऑइल तोंडाने घ्यायला सुरुवात केली. कापलेल्याखरचटलेल्या ठिकाणी कोकोनट ऑइल लावायला सुरुवात केली. ब्रूसचे वजन कमी झाले, त्याचीत्वचा तुकतुकीत दिसायला लागली.जखम पटकन भरायला लागली. ब्रूसच्या आश्चर्याला पारावरउरला नाही. इतके दिवस नारळाला का वाईट म्हणत होते याबद्दल त्याने खोलात जाऊन तपास करायलासुरुवात केल्यावर त्याला आढळून आले की, सोयाबीन इंडस्ट्रीने जगात पाय रोवण्यासाठी मुद्दामहूनखोबर्‍याविरुद्ध अपप्रचार करायला सुरुवात केली होती. सगळे जण हार्ट ऍटॅकला घाबरतात.खोबरेल तेलात स्निग्धांश जास्त असल्यामुळे त्याने हार्ट ऍटॅक येतो, पण सोयाबीनचे पदार्थखाल्ले तर हृदयविकार कमी होतात असा प्रचार सुरू केला. झाले. घाबरट लोकांनी हा रिपोर्टवाचल्यावर कोकोनटचे पदार्थ खाणे कमी केले. चाणाक्ष सोयाबीन इंडस्ट्रीने स्वत:चे घोडेपुढे दामटले.
ब्रूस या मिरॅकल ऑइलने इतका झपाटला होता की, त्याने नारळ वापरत असलेल्या देशात जाऊनखोबरेल तेलावर संशोधन केले. खोबर्‍यात असतात हे खरे, पण ते Medium chain fattyacidsअसतात जे शरीराला हितकारक असतात. थायलंड,इंडोनेशिया फिलिपाइन्स, पॉलिनेशियन देशखोबर्‍यावर जगतात. त्यांच्यात हार्ट ऍटॅकचे प्रमाण जगापेक्षा खूप कमी आहे. ब्रूसनेशोधाअंती खोबर्‍यामुळे हार्ट ऍटॅक येत नाही असे विधान केले. शेकडो डॉक्टराकडे जाऊनत्यांना खोबरेल तेलाचे महत्त्व सांगायचा प्रयत्न केला, पण कोणावर ढिम्म परिणाम होतनव्हता. शेवटी डॉक्टरांचा नाद सोडून त्याने कोकोनट ऑइलचे फायदे पुस्तकरूपात लिहायचानिर्णय घेतला. १९९९साली त्याने Coconut Oil miracle या नावाचे पुस्तक स्वत:चप्रसिद्ध केले.

ते वाचून डॉ. मेरी न्यूपोर्ट हिने २००८ साली अल्झायमरच्या रोग्यांमध्येकोकोनट ऑइलचा उपयोग करून पाहिला. फरक बघून तीदेखील चकीत झाली. इंटरनेटमुळे तो रिपोर्टजगभर पसरला. डॉ. ब्रूसने एकूण १८ पुस्तके लिहिली. त्यांच्या अनेक आवृत्त्या निघाल्या.लोक एकमेकाला ही पुस्तके भेट द्यायला लागले. केस, त्वचा यावर खोबरेल तेल लावून बघायलालागले.आता अनेक तरुण मंडळी खोबरेल तेल सर्रास वापरतात. यू ट्यूबवर अनेक हेल्थ फूड डॉक्टरनारळाचे दूध कसे बिनधास्तपणे वापरावे याच्या रोज नव्या रेसिपीज देतात.
माझ्या आजीच्या बटव्यात जगातल्या सगळ्या व्याधींवर अक्सर एकही इलाज म्हणून एकच औषधहोते ते म्हणजे खोबरेल तेल.परीक्षा आली की. डोकं थंड राहावे म्हणून ती माझ्या डोक्यावरखोबरेल तेल थापटायची, केस काळे राहावेत म्हणून आंघोळीच्या आधी डोक्याला खोबरल तेलाचामसाज करायची, कातडी चरबरीत होऊ नये म्हणून अंगाला खोबरेल तेल चोळायची, कान दुखला तरकानात गरम खोबरेल तेलाची धार सोडायची.सर्दी झाली, डोके खाली करून नाकात गरम खोबरेलतेलाचे थेंब घालायची. ती जेव्हा ९५ व्या वर्षी गेली तेव्हा डोक्यावरचे सगळे केस शाबूतहोते व काळे होते. सध्या माझी हॉर्वर्ड विद्यापीठातली हुशार मुलगी अदिती नियमितपणेखोबरेल तेल वापरते. पणजीसारखे डोक्याला अंगाला तर लावतेच, पण तिच्यावरही वरताण म्हणूनब्रूसने सांगितल्याप्रमाणे रोज तीन चमचे तेल पिते. खोबरेल तेलात जेवण करते. खोबरेलतेलावर वाढूनही मी त्याचा वापर थांबवला म्हणून माझी कीव करते.
Coconut oil has come in a full circle in our house. आमच्या घराण्यात दोन पिढ्यांनंतरखोबरेल तेल परत वापरात आले आहे. कोकोनट गुरू डॉ. ब्रूसच्या अथक प्रयत्नांनी अमेरिकेतहीखूप लोकप्रिय होत आहे. आता मीही न बिचकता वाटी वाटी सोलकढी पिते. आमट्या,उसळी,कालवणांनानारळाचे वाटण घालते. अजून मुलीसारखी तेल प्यायला लागलेले नाही, पण कोकोनट ऑइल अँटीएजिंग आहे असल्याचे रोज नवनवे रिपोर्ट बाहेर येत असल्यामुळे तसे करायला मला फार वेळलागणार नाही.
कोणाचे नशीब कधी पालटेल ते सांगता येत नाही. जसे माणसाचे बदलते तसे एखाद्या पदार्थाचेहीबदलते.

डॉ. ब्रूस फाइफ यांच्या मुलाखतींच्या अडतीस चित्रफिती पहायला इथं क्लिककरा:
http://www.youtube.com/watch?v=hqNoPvESoc8&list=PL6DB5017532B65EBA

ATT00005.jpg

<<अनिल, गुलाब मस्तच आहेत ह्या आणि अजून जे गुलाब असतील त्याचा फ़ांद्या मला पाहिजेत. कधी देताय? <<
अगं ए, नुस्त्या फांद्या नाही लागत गुलाबाच्या! तुला कलम करता येतात का किंवा डोळे भरणे इ.?

अगं ए, नुस्त्या फांद्या नाही लागत गुलाबाच्या! तुला कलम करता येतात का किंवा डोळे भरणे इ.?>>>>>>>>>>.अग, ते अनिल करून देईलच . Proud

मला सावन का अंधा म्हणालात तरी चालेल, पण लुटेरा चित्रपटातले एक झाड मला खुपच आवडले. भरभक्कम खोडाचे, आधी हिरव्यागार पानांचे मग लाल पिवळ्या पानांचे पण मेपल नव्हे. छान विस्ताराचे.
ते झाडच नव्हे तर त्यावरचे एक पान यांना नायक नायिकेच्या जीवनात खुप महत्व.. त्या झाडासाठी तरी अवश्य बघा.

शशांक, आम्ही कोकणातले लोक नारळाचे महत्व पुर्वीपासून जाणत होतो हो Happy
सोयाबीन आणि मला वाटते कोको पाम वाल्यांनी पण असा प्रचार केला असणार. या दोन्ही आता फार मोठ्या इंडस्ट्रीज झालेल्या आहेत.

माझी मावशी सांगते, पुर्वी देशावर ओला नारळ मिळतच नसे. राजापूरहून सुक्या खोबर्‍याच्या वाट्या जात. त्यामूळे
कोल्हापूर भागात जेवणात सुके खोबरेच वापरात असे. दुर्मिळ असल्याने देवाला वाढवण्यासाठी म्हणून नारळाचे महत्व.

पण नारळाला संस्कृतमधे श्रीफळ म्हणत नाहीत, ते नाव बहुतेक बेलफळाचे आहे. ( संदर्भ : प्रा. महाजन. )

शशांक पुरंदरे, पोस्ट माहितीपूर्ण आणि रंजक आहे. खोबरेल तेलाची महती दक्षिण भारताला नवी नाही. पूर्व पश्चिम दोन्ही किनारपट्ट्या आणि थोडा अंतर्भाग या प्रदेशात खोबरेल तेल सररास वापरले जाते / जाई. स्वयंपाकात तर असेच पण केसांना, त्वचेला लावण्यासाठी ,बाहेर वंगण म्हणून वापरले जाई. पापड खोबरेलाशिवाय सिद्ध होत नसत. पिठाच्या गोळ्या खोबरेलातच बुडवून ठेवीत. पापड भाजल्यावर खोबरेलाचे बोट फिरवल्याशिवाय खाल्ला जात नसे. पण या किनारपट्टीत तेलाचा वापर एकंदरीत कमीच.ओले खोबरे मात्र हवेच. दक्खन पठारी प्रदेशातले जेवण जसे तिखटजाळ आणि तेलतवंगाचे असते तसे कोंकण-मलबारात नसते.
औषधी गुणाचे म्हणाल तर मुंबईतले सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ मधुमेहतज्ञ डॉ. विजय आजगांवकर हे नेहमी खोबरेलाचा वापर करण्यास सांगतात.
पश्चिम किनारपट्टीतला खोबरेलाचा वापर घटण्याचे मुख्य कारण गुजरातेतल्या शेंगदाणा लॉबीचे आक्रमक मार्केटिंग होय. रीफाईन्ड शेंगदाणा तेल आरोग्यास कसे चांगले याविषयी पंचवीस तीस वर्षांपूर्वी जोरदार प्रसिद्धीमोहिमा राबवल्या गेल्या. हे आक्रमण इतके जोरदार होते की खोबरेल वापरणे मागासलेपणाचे समजले जाऊ लागले. त्यातून पुन्हा शेंगदाण्याच्या बियाण्यामध्ये विविध प्रयोग होउन अधिक तेल देणार्‍या जाती निर्माण झाल्या, परिणामी उतारा वाढून किंमती तुलनेने कमी राखणे शक्य झाले. नारळाच्या बाबतीत असे संशोधन त्या काळात तरी झाले नाही. उंच झाडांवर चढून नारळ पाडणारे लोकही कमी झाले. हळूहळू खोबरेलाची मागणी आणि निर्मिती घटत गेली.
पण खोबरेलातल्या संपृक्त स्निग्धाम्लांच्या कोलेस्टेरॉल संबंधीच्या चांगल्या परिणामांबाबत मात्र नि:संदिग्ध मते वाचनात आलेली नाहीत. इथल्या डॉक्टर लोकांनी मार्गदर्शन करावे.

शशांक, आम्ही कोकणातले लोक नारळाचे महत्व पुर्वीपासून जाणत होतो हो >>>>>>>>>>>हो ना.(जोरदार अनुमोदन Proud ) उगीच नाही त्याला कल्पतरू म्हणत. Happy

खोबरेल तेलाविषयी वाचुन भारीच मनोरंजन झाले. बिचा-या खोबरेल तेलाला आता जरा बरे दिवस येतिल. नाहीतर भारतात आता फक्त ऑलिव ऑइलच आरोग्यदृष्ट्या बेस्ट असा समज रुढ् झालाय.

असेच आता साजुक तुप, घरचे लोणी इ.इ. इतर पदार्थांबद्दलही लवकरच वाचायला मिळो. जोपर्यत फॉरिन रिटर्न्डचा शिक्का बसत नाही तोवर आपल्याकडे जे काही असेल नसेल त्या ज्ञानाला काहीच किंमत नाही. Sad

मला सावन का अंधा म्हणालात तरी चालेल, पण लुटेरा चित्रपटातले एक झाड मला खुपच आवडले. भरभक्कम खोडाचे, आधी हिरव्यागार पानांचे मग लाल पिवळ्या पानांचे पण मेपल नव्हे

हो, मस्त आहे ते झाड. त्या चित्रपटात निसर्ग खुप सुंदर रितीने आलाय. मुंबईत फारसे चित्रिकरण न करता बाहेर जाऊन केल्यानेही एक फ्रेश लुक आलाय... Happy

पण खोबरेलातल्या संपृक्त स्निग्धाम्लांच्या कोलेस्टेरॉल संबंधीच्या चांगल्या परिणामांबाबत मात्र नि:संदिग्ध मते वाचनात आलेली नाहीत. इथल्या डॉक्टर लोकांनी मार्गदर्शन करावे.>>>> सर्व डॉ. ना आवाहन - याबाबत कृपया मार्गदर्शन करावे व खोबरेल तेलाची डॉ नेरुरकरांच्या पोस्टविषयीही अजून प्रकाश टाकावा.

या डॉ मीना नेरुरकर म्हणजे " सुंदरा मनामधि भरली " या नाटकातल्या का ? त्यांचे धन्य ते गायनिक कळा, असे पुस्तक पण आहे.

आपल्या प्रमाणेच श्रीलंका, मालदीव, थायलंड या देशातही नारळाचा वापर बघितलाय मी. आफ्रिकेतल्या किनारे असलेल्या देशांतही आहे. पण तेलाचा वापर श्रीलंकेतच बघितला.

Pages