कारल्याच लोणच

Submitted by प्रभा on 22 May, 2013 - 08:29
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कारले २-३, २ कैरीच्या फोडी, मीठ, लोणच्याचा मसाला, तेल, मोहरी, हिंग

क्रमवार पाककृती: 

चांगले ताजे कारले २-३ घ्यावेत. ते सोलुन चिरुन घ्यावेत. व मीठ लावुन ठेवावे. २-३ तास तसेच ठेवुन नंतर पिळुन कडु पाणी व बिया काढुन घ्याव्यात. कैरी सोलुन चिरुन फोडी करुन घ्याव्यात. नंतर त्याला थोडे मीठ [कारल्याला लावलेले आहे म्हणुन] व लोणच्याचा मसाला लावावा. त्यात कारल्याच्या फोडी घालुन चांगले मिक्स करुन घ्यावे. त्यावर हिंगाची फोडणी घालावी. लोणचे तयार. हे लोणचे २-३ दिवस बाहेरच ठेवावे. ३ दिवसा नंतर खाण्यास योग्य होते. त्यानंतर फ्रीझ मधे १५-२० दिवस तरी टिकतेच. जास्त दिवसही राहू शकेल. चव अतिशय छान. आंब्यामुळे कडु लागत नाही. तेलहि जास्त लागत नाही.
हिंग- मेथी, व कारल्याच प्रमाण आवडीप्रमाणे कमी-जास्त ठेवु शकतो. मी १५ दिवसा पुर्वीच केल.
अजुनही छान आहे. नक्की करुन पहा.

वाढणी/प्रमाण: 
वापरण्यावर.
अधिक टिपा: 

आंब्याचा रस यामुळे बाधणार डायबेटिस व्यक्तींना. चवीलाहि उत्तम.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users