Submitted by मुग्धमानसी on 15 May, 2013 - 07:19
’आताच दमू नकोस फार
जायचं आहे लांब’ म्हण
एकदा तरी हात धरून
मला ’थोडं थांब’ म्हण...
माझं गुर्हाळ तक्रारिंचं
कुरकुर करु लागलं की
जवळ बसवून मला फक्त
’ऐकतो मी तू सांग’ म्हण...
कधी चिडेन जगावरती
कावून जाईन, त्रासून जाईन
हसून माझी धग सोसून
’जगाच्या नानाची टांग’ म्हण...
कधी माझ्या डोळ्यांमधून
निसटून जाईल काहितरी
तेही पकडून शिताफीनं
’याचा पत्ता सांग’ म्हण...
मी हसताना उधाणलेले
मी रडताना गहिवरलेले
अश्रू माझे टिपून ठेव अन्
’जपून ठेवलंय वाण’ म्हण...
मोठेपण सोसणार नाही
पायांत त्राण उरणार नाही
तेंव्हा कुशीत घेऊन मला
’बाळ माझी छान’ म्हण...
फार काही मागत नाही
माझी तहान भागत नाही
हरलेच कधी मी तर हसून
’मी आहे ना सांग?’ म्हण...
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
___/\___ ग्रेट... खुप खुप
___/\___
ग्रेट...
खुप खुप आवडलीय...
सुरेख.... सर्व कडवी आवडली ही
सुरेख.... सर्व कडवी आवडली
ही सुंदर कविता वाचायला दिल्याबद्दल धन्यवाद
कधी माझ्या डोळ्यांमधून निसटून
कधी माझ्या डोळ्यांमधून
निसटून जाईल काहितरी
तेही पकडून शिताफीनं
’याचा पत्ता सांग’ म्हण...
हे कडवे विशेष आवडले
निरतिशय सुंदर कविता. सर्वच
निरतिशय सुंदर कविता.
सर्वच कडवी आवडलीत
अ...प्र.....ति...म मनाला खुप
अ...प्र.....ति...म
मनाला खुप भावली
कधी चिडेन जगावरती
कावून जाईन, त्रासून जाईन
हसून माझी धग सोसून
’जगाच्या नानाची टांग’ म्हण...
>>>.....
सुरेख
खूप छान!
खूप छान!
प्रामाणिकपणे लिहिलेला कोणताही
प्रामाणिकपणे लिहिलेला कोणताही काव्यप्रकार तेवढाच सुंदर असतो
( तुम्हाला पुन्हा सल्ले मिळतील गझल लिहायचे, म्हणून ही आगावू सूचना
)
वॉव, ग्रेट .......
वॉव, ग्रेट .......
मश्त मश्त- आणि लयबद्ध -
मश्त मश्त- आणि लयबद्ध - जाम आवडली
:):-):
कविता आवडली !
कविता आवडली !
खूप छान! खूप आवडली!
खूप छान! खूप आवडली!
सुंदर कविता आहे! आवडली!
सुंदर कविता आहे! आवडली!
मस्तच!
मस्तच!
कसली सुंदर आहे ग कविता! साधं,
कसली सुंदर आहे ग कविता!
साधं, सरळ आणि अप्रतिम हे तुझं शैलीविशेष!
कोणत्या कोणत्या ओळी ग्रेट म्हणून कोट करू ते कळत नाहीये.
ही माझ्या लेखणीतुन का नाही उमटली याचा हेवा वाटतोय.
जियो! पुन्हा पुन्हा पुन्हा वाचली. माझ्या अतिशय आवडत्या कवींच्या लिस्टीत तू आहेसच....
खरचंच खुप सुंदर! खुप लिहित रहा.... तुझ्यासाठी नाही पण आमच्यासाठी......
काहीही झालं तरी आयुष्यात कधीच लिखाण थांबवू नकोस...
प्रचंड "श्रीमंत" आहेस तू!
___/\____
हॅट्स ऑफ!
Wwa... Takrar vala kadva
Wwa... Takrar vala kadva faarch bhaavala..
Overall very much liked because of simplicity...
Faar aatun alyasarkhi vatli..
Pu.le.shu.
अतिशय साधी,सुंदर....आवडली
अतिशय साधी,सुंदर....आवडली
एखाद्या लेखकाच्या संपुर्ण
एखाद्या लेखकाच्या संपुर्ण लिखाणालाच निवडक दहात टाकता नाही येत का?
अ...प्र.....ति...म सुंदर
अ...प्र.....ति...म
सुंदर कविता आहे! आवडली!
नि. १० मधे
सुंदर!
सुंदर!
साधी आणी अतिशय सुन्दर
साधी आणी अतिशय सुन्दर कविता.

मजा आया...
मस्त! आवडेश
मस्त! आवडेश
कविता/ संवाद फार सुंदरआहे.
कविता/ संवाद फार सुंदरआहे.
आवडली कविता. सुंदर!
आवडली कविता. सुंदर!
कधी माझ्या डोळ्यांमधून निसटून
कधी माझ्या डोळ्यांमधून
निसटून जाईल काहितरी
तेही पकडून शिताफीनं
’याचा पत्ता सांग’ म्हण...
अहाहा ..जियो !!!
सुंदर कविता आहे! आवडली
सुंदर कविता आहे! आवडली
Too good...!!
Too good...!!
कविता आवडली. सहज साधी आहे
कविता आवडली. सहज साधी आहे म्हणून समजलीसुद्धा.
लिहित रहा.
कविता आवडली.
कविता आवडली.
कविता खूप आवडली
कविता खूप आवडली
प्रत्येक कडवं निखळ सुंदर!!
प्रत्येक कडवं निखळ सुंदर!!
Pages