आंबोळ्या

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 May, 2013 - 08:03
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तांदुळ १० वाट्या
मुगडाळ, तुरडाळ, मसुरडाळ, चणाडाळ, उडीदडाळ प्रत्येकी १ वाटी, पाव वाटी मेथी दाणे.

मिठ
ताक
तेल

क्रमवार पाककृती: 

आंबोळ्यांचे पिठ बनवण्यासाठी तांदूळ व सगळ्या डाळी एकत्र धुवाव्यत व उन्हात वाळवाव्यात. वाळलेल्या डाळीत मेथीदाणे घालून पिठ दळून आणावे.

आंबोळ्या करायच्या ५-६ तास आधी पिठ पाण्याने जाडसर भिजवायचे. ५-६ तासांनंतर करताना त्यात थोडे ताक घालून सैलसर करायचे व चवीनुसार मिठ घालायचे.


नंतर तव्यात जरासे तेल पसरवून त्यावर आंबोळीचे पिठ पसरायचे.

आता तव्यावर लगेच झाकण द्यायचे.

२ मिनिटांत चर्रर्र आवाज होतो मग झाकण काढायचे आणि आंबोळी उलटी करुन १-२ मिनिटे ठेवायची.

नंतर गरमा गरम आंबोळी चटणी बरोबर सर्व्ह करायची.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी २ संपतातच.
अधिक टिपा: 

काही जण घावण, आंबोळी उलटत नाहीत. पण मी उलटते कारण त्यामुळे कुरकुरीत होतात.
पाककृती हवी आहे माहीत आहे का ह्या धाग्याच्या ८२ व्या पानावर अजुन वेगवेगळ्या टिप्स मुग्धा, मंजूडी आणि सुचारीता यांनी दिलेल्या आहेत. http://www.maayboli.com/node/24273?page=81

माहितीचा स्रोत: 
पाककृती हवी आहे माहीत आहे का ह्या धाग्यावर मुग्धा, मंजूडी, सुचारिता व जुन्या मायबोलीवरील सोनचाफा यांच्या मदतीने ही रेसिपी मिळाली
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागु मस्तच. >
आमच्यकडे पण आंबोळ्या तांदुळ (४ वाट्या) - उडीद डाळ (१ १/२ वाटी) - मेथी दाणे (१ चमचा) या प्रमाणात करतात.
घावणे म्हणजे तांदुळ ४ तास पाण्यात भीजवुन वाटप करुन तव्यावर धीरडी घालतात. हे पीठ आंबवत नाहीत.
खापरोळ्यांमध्ये चणाडाळ , उडीद डाळ, मुग डाळ आणि तांदुळ सम प्रमाणात घेउन आंबोळी सारखी आंबवुन करतात. ही नारळाच्या रसामध्येच खाल्ली जातात.
हे सगळे पदार्थ भीड्याच्या जाड तव्यावर बनवतात.

तव्या विषयी सांगाल का?
नॉर्मल फ्राईंग पॅन वर केले तर चिकटतात आणि गॅस मोठा ठेवला कि तव्याचा वरचा सरफेस (नॉन स्टिक सरफेस) काळा होउन करपुन निघतो...
बीडाचे तवे कुठे मिळ्तिल?
डि-मार्ट वगैरे अशा ठिकाणी मिळतात का?
कसे ओळखायचे?

अविगा केल्या की तुला हाक मारते ग पुढच्यावेळी Happy

मंजूडी मी पण नाही जास्त वाळवत इतर वाळवणही म्हणजे तांदळाचे पिठ करतानाही. ते तर दोन-तिन महिन्यांच एकदाच दळून आणते. पण एका उन्हातच बास होत. हे वरचे पिठ त्या दिवशी दळायला दिल नाही म्हणून परत एकदा एक उन दाखवल नाहीतर तेही तसच ठेवल असत. आणि तु तर आंबोळी मास्टर आहेस. Happy

टुनटुन Lol

आम्ही घावन तांदळाचे पिठ आयत्या वेळीच भिजवून मिठ टाकून करतो.

सुरमयी मी नॉनस्टीक वापरलाय.

जागुताई वरचे फोटो पाहून राहावले नाही म्हणून मगाशी तांदळाच्या पीठाच्या झटपट आंबोळ्या बनवल्या Happy आता तुमची वरील पद्धत वापरुन करुन बघणार...तुमचे खुप खुप आभार Happy

अरे असे आहे होय. म्हणजे कोकणातले लोक याला भीडाचा तवा म्हणतात, तर इकडे पुण्यात आणी नाशिककडे मी कायम बीडाचा तवा असेच ऐकले आहे.:स्मित: माझ्यामुळे दुखावले गेले असल्यास सॉरी.:स्मित:

सूरमयी तू सध्या कुठे असतेस? मसूर कुठे आहे ? ( मसुरी नाही ना? ) डी मार्ट मध्ये मिळायची शक्यता कमी, पण पुण्यात तुळशीबागेत हमखास मिळेल. मी अजून २ तिथुनच घेतले. हे लोखंडी तवे भलतेच जड असतात. आकाराने गोल, चपटे, सपाट आणी कडा असलेले पण मिळतात.

ही लिंक बघ.

http://tastee-n-healthee.blogspot.in/2010/11/beedacha-tawa-aani-kadhaee....

तांदूळ उन्हात सुकवले तर वास नाही येणार का? की सगळ्या तांदळांना नाही येत?
तांदूळ सावलीत सुकवावा असे माहीत होते. आम्ही चणाडाळ घालत नाही.

जाळी छान पडली आहे.

मी सुद्धा कोकणी(कोकणातल्या लोकांना) भीडाच्या तव्यावर असेच एकलेय.

प्रत्येक भागात, उच्चार बदलतात वाटते...

ह्याच्यात तूरडाळ घातलीय ना?
मग आता कोणाला तूरडाळ घातल्याने वरण जळल्याचा वास आला आंबोळी करताना असे सांगणारी पोस्टी पडतील.... Proud

मी देखील ऐकून आहे की तांदूळ उन्हात वाळवत नाहीत नाहीतर त्याला वास येतो. म्हणूनच साठवणीचे तांदूळ उन्हात वाळवत नाहीत पण गहू डाळी वगैरेंना उन्ह देतात. पिठीसाठीचे तां. सावलीत वाळवतात. इथे ज्यांनी प्रयोग केले आहेत ते ह्यावर उजेड पाडतील का?

आपण जे तांदूळ भातासाठी वापरतो ते तांदूळ धुवुन वाळवून ठेवत नाहीत. त्याला उनलागल्याचा थोडा वास येतो. शिवाय आपण भात करताना तांदूळ धुवतो त्यामुळे ते धुवण्याची गरज नसतेच. पण ज्याचे पिठ करायचे असते ते तांदूळ धुवून घ्यावे लागतात कारण त्याला लावलेली बोरीक पावडर किंवा अन्य काही आपल्या पोटात जाऊ नये म्हणून. पण तांदूळाचे पिठ केले की त्या पिठाला तसा वास येत नाही. मी माझ्या लहानपणापासून तांदूळ धुवुन उन्हात वाळवून त्याचे पिठ घरात वापरलेले पहात आहे. आणि आता मीही मधुन मधुन करते पण असा वास येत नाही.

चांगली माहीती दिलीस जागु. मी आता बिनधास्त उन्हात वाळवून ठेवीन आंबोळ्यांचे पिठ. ह्या उन्ह प्रकाराला घाबरुन मी कायम थोडे थोडे पिठ करायचे त्यामुळे सतरांदा चकरा माराव्या लागायच्या गिरणीत. आता जास्तीचे पिठ करून ठेवीन.

मी आंबोळ्यांचं पीठ केलं घरात मसूराची डाळ नव्हती त्यामुळे ते तेवढी स्किप केली.
७-८ दिवस डाळी अणि तांदूळ वाळवले. तांदूळ शर्मिलाने लिहिल्याप्रमाणे वालले नाहीत. म्हणजे ते हाताने सहज तुटत होते. मग मी कच्चा न धुतलेला डब्यातला तांदूळ तोडून बघितला तर तो पण हाताने तुटत होता.
एकतर माझे बासमती तांदूळ बेताचे किंवा माझ्या अंगात लै शक्ती !

तर काल आंबोळ्या केल्या. मस्त जाळी पडली. लसणाची ताजी चटणी करून त्याबरोबर खाल्ल्या.
Ambolya.jpg

रेसिपीबद्दल धन्यवाद जागू.

जागूच्या कृतीतले तांदुळाचे प्रमाण कमी करून मी ज्वारी+ बाजरी +नाचणी +तां असे एक भाग तां च्या आइवजी घेतले. बाकी प्रमाण तेच. तरी धीरडी मस्त झाली आहेत. तां कमी केल्यामुळे थोडे पाप कमी लागेल असे वाटते आहे Happy

जागूतै, धन्यवाद ! जुन्या माबो वरच काय पण इथेही आहे मी :D.. ओळख ठेवल्याबद्दल धन्यवाद.. Happy
तुमच्या आंबोळ्यांच्या फोटोने अगदी तों.पा.सु..
रच्याकने, माझी आई हे पीठ बनवताना मेथीबरोबरच धणे घालते.. खूप छान लागतात चवीला आंबोळ्या.
तिचे प्रमाण माहितीसाठी - दहा वाट्या तांदूळ, एक वाटी प्रत्येकी तुरडाळ, चणाडाळ, उडिदडाळ, मूगडाळ व मेथी व धणे मिळून पाउण ते एक वाटी..
नवर्‍याला आवडत नाहीत त्यामुळे आता अशा आंबोळ्या खाल्याला काळ झाला आहे.. Sad

<<मी माझ्या लहानपणापासून तांदूळ धुवुन उन्हात वाळवून त्याचे पिठ घरात वापरलेले पहात आहे<<
तांदुळ उन्हात वाळवतात का?
माझी आई म्हणते तांदुळ नेहमी सावलीतच वाळवावेत नाहितर त्याचा कस जातो. Uhoh

मी आंबोळ्यांचे पीठ तयार करण्यासाठी डाळ-तांदूळ धुवुन उन्हात वाळवून ठेवले आहेत. मिक्सरवर दळणार आहे. पीठ रवाळ ठेवायचे की बारीक दळायचे? कृपया लवकरात लवकर सांगा!

actuallu परवा केल्या पण विसरले होते कि आधी भिजवुन ठेवायचे पीठ म्हणुन.
एकदम गिच्च झाल्या Sad

गिरणीतूनही चालतेच. जास्त प्रमाणावर असल्यावर कुठे मिक्सरवर करणार? गिरणवाल्याला थोडेसे रवाळ ठेवायला सांगायचे. बारीक असले तरी चालते.

धन्यवाद जागू! मिक्सरवर रवाळ च झाले.
उद्या अजून एक लॉट करणार आहे. दोन तीन किलो होइल एकुण. साधारण किती दिवस टिकेल हे पीठ? फ्रीजमध्ये ठेवू का? तसा उन्हाळा संपत आलाय.

Pages