पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केळीच्या दांड्यातला कोवळा पांढरा भाग असतो ना तो भाजी मार्केटात पाह्यला आज. त्याचं काय करतात काही माहितीये का? भाजी किंवा काप करतात असं कुणीतरी सांगत होतं.
काय प्रकारची चव असते? कशी करतात?

सौथिंडीयन लोक सांबार मध्ये वापरतात तो. आणि भाजीही करतात. जराशी कडूसर तुरट चव असते त्याची असं माझी बंगलोर ची केरळी मैत्रीण सांगत होती.

बंगलोरची केरळी मैत्रिण <<< Lol
तू खाल्लंयस का ते प्रकरण? कडूसर तुरट चव असेल तर प्रयोग करायला नको कुणीतरी शुअरशॉट सांगितल्याशिवाय. Happy

>> कडूसर तुरट चव असेल तर प्रयोग करायला नको कुणीतरी शुअरशॉट सांगितल्याशिवाय.

तशी चव असेल तर मसाल्यांचा मारा करकरून मारून टाकायची ती चव .. Wink

मुगाची डाळ भिजवायची, हा केळीचा गाभा बारीक चिरायचा - कोकणीत कोच्चोल म्हणतात - काकडी कोचवतात तसाच. हिरवी मिरची + चिमूटभर कच्चा हिंग ठेचून मिसळायचा. मीठ, लिंबाचा रस घालून कालवायचे.
गाभ्याची पचडी तयार. हिंग मोहरी घालून फोडणी ऐच्छिक. मिरपूड पण घालतात काही लोक.

नीधप, सेल्व्हीला विचारून सांगते तुला त्या केळीची मद्रासी रेसिपी. ती बर्‍याचदा करते ही भाजी. सशल म्हणाली तसं मसाले घातल्याने कडूसर चव मलातरी कधी लागली नाही.

हसरी, असा तयार मसाला करुन ठेवण्यापेक्षा, आयत्यावेळी केलेली जिरेपूड + हिंग + सैंधव वापरले तरी चालेल.
त्यात मग ताजा आल्याचा रस, कोथिंबीर, साखर हे जिन्नस टाकायचे. पुदीना मिळाला तर फारच छान.

जागुताई, आमच्या घराच्या समोर ओन्ली कोकण नावाचे खास कोकणी पदार्थ विकणारे दुकान आहे,
ओले काजू, काळे वाटाणे हातसडीचा तांदूळ. इत्यादि त्यांच्यात आंबोळीचे पीठ, रेडी मिळते. एक पुडा पाठवू का? इतर पण खूप मस्त मस्त पदार्थ आहेत.

बिल्वाचा पावभाजीचा धागा आहे त्यावर बरेच पर्याय मिळतील. मी स्वतः बादशहा ब्रँडचा पावभाजी मसाला वापरते.

मी माबो होते पन फक्त वाचनाकरिता. आज प्रथमच प्रतिक्रिया टाकत आहे. एक प्रश्न विचारय्चा आहे .. इकद्दे (उत्तरेला) खवा / मावा मिलत नाहि ना.. मिल्क पावदर चे गुलाब जाम खावुन जाम कन्ताला आला आहे ...

जागू आंबोळ्यांचे पिठ कसे करून ठेवायचे?>>>>>>>>>>>>>>>>>
आंबोळ्यांचे पीठ -- १ किलो जाडे तांदूळ + पाव किलो उडिद डाळ + पाव किलो चणाडाळ, स्वछ धुवून चांगले खडखडीत वाळवावे, त्यात १०० ग्राम मेथी दाणे घालून एकत्र दळूण आणावे.
आंबोळ्या करायच्या आधी ५-६ तास पीठ भिजवून ठेवावे, करताना त्यात थोडे ताक, मीठ, जीरेपूड, लसूण, कोथिंबीर घालवी, पीठ पातळसरचं भिजवावे.

ash11, उत्तरेत म्हणजे उत्तर भारतात असेल तर कोणत्याही डेअरीमध्ये खवा /मावा मिळेल. पण क्वालिटीची खात्री नाही देता येणार. पनीर वैगरे ज्या डेअरी मधून घेत असाल, त्या खात्रीच्या डेअरीमध्ये बघा.
उत्तरेत कुठे रहाता तुम्ही?

जुन्या मायबोलीवर आंबोळ्यांसाठी हे प्रमाण लिहिले आहे (कोणी ते आठवत नाहीये Sad शोधायला हवं.) - दहा वाट्या तांदूळ (उकडा, हातसडीचा, कोलम इत्यादी कुठलाही आपल्या आवडीप्रमाणे), प्रत्येकी एक वाटी मुगाची डाळ, उडदाची डाळ, तुरीची डाळ, मसुराची डाळ आणि चण्याची डाळ. डाळी आणि तांदूळ स्वच्छ धुवून टाकून खणखणीत कोरडे करायचे आणि दळून आणून ठेवायचे. थंडीचा मोसम असेल तर त्यात एक वाटी मेथ्या कोरड्या भाजून घालायच्या. गेली तीन-चार वर्ष मी याच प्रमाणात आंबोळी पीठ करून ठेवतेय. मस्त आंबोळ्या होतात. झाकण ठेवावे लागत नाही. छान चुरचुरीत होतात आणि पटापट उरपतल्याही जातात. तव्याला अजिबात चिकटत नाहीत. पीठ आयत्यावेळी पाण्यात भिजवून केल्या तरीही सुरेख आंबोळ्या होतात.

जागू सोनचाफा यानी एप्रिल २००८ ला जुन्या मायबोलीवर लिहीलेले प्रमाण प्रत्येकी एक वाटी चणा डाळ्,उडीद डाळ,मूग डाळ्,तूर डाळ.त्याच वाटीने १० वाटया तान्दूळ,१/२ ते ३/४ वाटी मेथ्या व धणे एकत्र दळणे.
दुसरा प्रकार
२ किलो जाड,जुने तान्दुळ्,प्रत्येकी १ सपाट फुलपात्र गहू व चणा डाळ,१/२ फुलपात्र उडीद डाळ,१ वाटी मेथ्या. तान्दूळ धुवून सावलीत वाळ्वून त्यात बाकीचे सर्व पदार्थ घालून जाडसर दळून आणावे.वयस्कर व्यक्ती किवा बाळन्तीणीस द्यायचे असल्यास चणा डाळी ऐवजी मुग डाळ वापरावी.पिठात मिठ्,साखर्,दुध घालून गोड आम्बोळीही छान लागतात.

मंजूडी 'उरपतणे' हा आमच्या आज्जीचा खास शब्द तू लिहिलेला वाचून खूप नॉस्टाल्जिक झालं.
तुला माझ्याकडून आज दोन गावं इनाम! Wink

सायो, अल्पना , धन्यवाद .. पन मी प्रश्न व्यवस्थित नाही विचारला .. उत्तरेत म्ह्नजे मी उत्तर अमेरिका मध्ये विचारत आहे.. भारतात तर खवा छान मिलायचा ... इथे खवा नाहि का मिलत?

ash11, मिल्क पावडरचे म्हणजे असे करता का? (कृतीत काही फरक असेल तर कदाचित बदल/सुधारणा करून बघता येईल म्हणून लिंक दिली आहे.)

उत्तर अमेरिकेत कुठे असता? भारतीय वाणसामानाची दुकानं आहेत का जवळपास? सायोने सांगितल्यानुसार तिथे नानक ब्रँडचा खवा मिळेल. दीप ब्रँडची मावा पावडरही मिळते. खटाटोप करायचा नसेल तर हल्दीरामचे वगैरे टिनमधले गुलांबजांब मिळतील. Happy

Pages