होमिओपॅथी आणि पेन-किलर्स

Submitted by अमितकरकरे on 25 April, 2013 - 09:12

होमिओपॅथी आणि पेन-किलर्स

“डॉक्टर, बाहेर थंडी पडली, किंवा जरा थोडे श्रम झाले की हा गुडघा लागलाच ठणकायला. हा असा सुजतो म्हणून सांगू! अगदी जीव नकोसा होतो. मग हाडांच्या डॉक्टरांनी दिलेली ‘क्ष’ गोळी घेतली की जरा दोन दिवस बरे, पुन्हा येरे माझ्या मागल्या! तुमच्या होमिओपॅथीमध्ये नसतात का पेनकिलर्स ?” ६८ वर्षांच्या जोशीआज्जी विचारत होत्या.

“एरवी वर्षभर काहीच त्रास होत नाही या डोकेदुखीचा, पण आमची वर्षातून एकदा कॉन्फरन्स असते, त्यात सकाळपासून इतक्या गोष्टी मॅनेज करायला लागतात की नाश्ता, जेवण यांची भेटसुद्धा होत नाही. त्यात तो कामाचा ताण. त्या दिवशी नेमके माझे डोके ठणकायला लागते, मग उलटीचे फिलिंग, मळमळ, आणि उजेड किंवा आवाजाचा अतिप्रचंड त्रास. शेवटी पित्त बाहेर काढल्याशिवाय चैनच पडत नाही! त्या दिवशी घेता येईल असे काही अनाल्जेसिक औषध होमिओपथीमध्ये नाही का?” २४ वर्षाचा आयटी कंपनीत काम करणारा रोहन जाजू विचारत होता.

वेदनाशामक औषधे (पेन किलर्स)

जगात सर्वात जास्त परस्पर (ओव्हर-दी-काउंटर) खपणारी औषधे म्हणजे पेनकिलर्स, अर्थात वेदनाशामक औषधे. पित्ताने उठलेले डोके असो वा गॅसेसमुळे झालेला पोटशूळ, वयाने धरलेले सांधे असोत वा कमरेत भरलेली उसण; वेदना आणि त्यासाठी लागणारी औषधे यांचा संबंध आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाच्या आयुष्यात एकदातरी येतोच. काहींना तर या औषधांवर इतके अवलंबून राहावे लागते की त्या औषधांचाही त्रास (साईड-इफेक्ट) व्हायला लागतो, म्हणजे मग त्या औषधासाठी वेगळे औषध! अशावेळी आठवते साईड-इफेक्ट्स नसलेली होमिओपॅथी . . .

होमिओपॅथिक वेदनाशमन

होमिओपॅथिक पद्धतीमध्ये सरसकट सर्वांसाठी एक-दोन औषधाचा मारा करण्याऐवजी प्रत्येक रुग्णाची प्रकृती आणि स्वभाव-भिन्नता पाहून उपचाराची दिशा ठरवली जाते. यात वेदनेची तीव्रता, भावना (ठणका, जळजळ, आवळणे, टोचणे इ.), रुग्णाची सहनशक्ती, व सर्वात महत्वाचे म्हणजे वेदना कमी-जास्त करणारे घटक जसे चोळणे, शेकणे, मसाज करणे, इ. यांचा विशेष विचार केला जातो. वेदना कोणत्या अवयवातून-भागातून अथवा पेशींपासून होत आहे हे बरेचदा रुग्णाने केलेल्या वर्णनावरून लक्षात येते, त्याचाही डायग्नोसीससाठी व त्यानुसार औषध ठरविण्यासाठी फार उपयोग होतो. गरज पडल्यास रक्ताची (गाऊट सारख्या आजारात) तपासणी अथवा इमेजिंग (एक्सरे, एमआरआय स्कॅन) द्वारे त्यावर शिक्कामोर्तब केले जाते.

वेदनांसाठी उपचार ठरविताना त्याचे सर्वसाधारण तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते:

१. तात्कालिक वेदना:

काही वेदना या तात्कालिक (acute) स्वरूपाच्या असतात – जसे पाय मुरगळणे अथवा अपघातात ईजा होणे. अशा आजारांमध्ये काही काळासाठीच उपचार दिले जातात. होमिओपॅथिक औषधांपैकी आर्निका, ऱ्हसटॉक्स, सिम्फायटम अशी औषधे लक्षणांचा विचार करून दिली असता वेदनांवर त्वरित उतार पडतो.

२. विशिष्ठ कारणामुळे उत्पन्न होणाऱ्या वेदना:

लेखाच्या सुरवातीला दिलेल्या उदाहरणामधील रोहन प्रमाणे काही वेदना काही विशिष्ठ कारणाने अथवा काही प्रसंगानुरूप डोके वर काढतात. बऱ्याच जणांना भूक अथवा उन सहन होत नाही, किंवा काही विशिष्ठ अन्नपदार्थ खाल्ले की पोटात दुखते (जसे खवा, अंडे, काही फळे) किंवा आईस्क्रीम खाल्ले की घसा धरतो किंवा वेगवेगळ्या अॅलर्जी. अशा पेशंट्सना ते विशिष्ट कारण टाळल्यास महिनोंमहिने काहीच त्रास होत नाही, पण जरा संयम सोडला की मात्र...

अशा आजारावर उपचार करताना त्रास देणाऱ्या त्या व्यक्ती-विशिष्ठ कारणाची व त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या लक्षणांची चिकित्सा होमिओपॅथीमध्ये केली जाते व त्यानुसार काहीकाळ औषध दिल्याने त्रास कमी होतो. त्याचसोबत प्रकृती-चिकित्सा करून औषध दिल्याने त्याचा समूळ नाश होण्यास मदत होते. प्रकृतीनुसार दिलेल्या हिपार-सल्फ, बेलाडोना, पल्सेटिला, सबाडीला, ब्रायोनिया, अर्सेनिक अल्बम, किंवा फॉस्फरस यांसारख्या औषधांचा अशा रुग्णांना खूप उपयोग होतो. बऱ्याच मुलींना मासिक पाळीच्या पहिल्या-दुसऱ्या दिवशी प्रचंड पोटात दुखते, अगदी सुट्टी घेऊन घरी बसावे लागते – अशांना मॅग फॉस, क्युप्रम मेट, कोलोसिंथ अश्या औषधांचा खुपच फायदा होतो, आणि पाळी चालू असली तरी अभ्यास अथवा काम थांबून राहत नाही.

माझे बरेचसे पेशंट्स त्यांच्या प्रकृतीनुसार दिलेले असे एखादे औषध नेहमी जवळ बाळगतात. अगदीच अचानक त्रास देणारे कारण घडल्यास किंवा दुखण्याची नुसती सुरवात होत आहे असे वाटल्यास एखादा डोस घेऊन ताबडतोब कामाला लागतात. कोणी विचारले की सांगतात, “हे माझे पर्सनल पेनकिलर आहे.”

३. अगदी रोजच्या झालेल्या वेदना:

वयोमानामुळे झीज होऊन सुजणारे-दुखणारे जोशी-आज्जींचे गुडघे मात्र तिसऱ्या प्रकारात मोडतात. या प्रकारच्या आजारांमुळे शरीरात घडलेल्या बदलांमुळे अगदी दरदिवशी वेदनांचा सामना करावा लागतो. गुडघ्यांची झालेली झीज, जास्त प्रमाणात वाढलेला संधीवात, मणक्यांच्या झिजेमुळे सुरु झालेला स्पॉन्डीलायटीसचा विकार किंवा कर्करोगाच्या अंतिम अवस्थेतील होणाऱ्या वेदना यांचा विचार या प्रकारात होतो. यातील आजारामध्ये पुन्हा फारशी भरून न येणारी झीज अथवा बदल झालेले असतात, अशा वेळी लक्षणांचा विचार करून विशिष्ठ अवयवांवर काम करणाऱ्या होमिओपॅथिक औषधांची (organ remedies) निवड करणे जास्त हितावह ठरते. हेक्ला लावा, कल्केरिया फ्लुर, मर्क्युरीयस, ब्रायोनिया, किंवा एपिस सारख्या औषधांचा वापर करणे जास्त हितावह असते. यातील काही आजारांच्या अवस्थेत वनस्पतींचे मुलार्क जास्त परिणामकारक ठरतात.

थोडक्यात सांगायचे तर होमिओपॅथीमध्ये सुद्धा अत्यंत परिणामकारक अशी वेदनाशामक औषधे उपलब्ध आहेत. या उपचारपध्दतीच्या तत्वाप्रमाणे आजार हळुवारपणे पण नेमका आणि कायमचा बरा करणे या औषधांच्या मदतीने अगदी सहज साध्य होते. फक्त त्यासाठी रुग्णाकडून आपल्या प्रकृतीचे आणि आजाराचे योग्य वर्णन व निरीक्षण, व त्याचप्रमाणे त्यानुसार डॉक्टरांकडून योग्य औषधाची निवड होणे महत्वाचे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

असा | 11 May, 2013 - 19:48

poojas - अतिशय अप्रतीम पोस्ट्स. चांगला दणका दिलाय. माबोच्या भाषेत तुत्तरफोड का काय म्हणतात तसे उत्तर. स्मित

-----

अवांतर: मॅलप्रॅक्टीस करणारे डॉक्टर >> हा विषय तर सत्यमेव जयतेच्या एका धाग्यावर चर्चिला गेला होता आणी त्या वेळी देखील यांपैकीच डॉक्टर महाशयांनी भयानक थयथयाट केला होता ते आठवले. डोळा मारा
<<

१. तुत्तरफोड नव्हे. त्याला मिसळपावच्या भाषेत थुत्तरफोड असे म्हणतात. हि माबोची भाषा नव्हे.
२. थयथयाट केल्याने तुमचाच एक आयडी तिथून ब्यान केला होता का म्हणे अ‍ॅडमिन यांनी?

सेनापती, जरा मालकांना विचारत चला हो टायपण्या आधी Wink

मॉडर्न मेडिसिन धर्मा सारखे नाही (ज्याची दारे बंद असतात) असे लिहा ते Happy

थुत्तरफोड माबोचा सुद्धा शब्द आहे.. बहुतेक टॉणगा कम हुडाने तो पहिल्यांदा वापरला बहुतेक (की लोलाने की सायोने की अजूनच कुणी?)

टण्या,
थुत्तरफोड हा शब्द अर्वाचिन काळात पक्षी माझ्या अवतारानंतर माबोवर आभावानेच आढळतो. याउलट मिपावर लैंदा पाहिलाय Wink
धर्माचा अ‍ॅडेंडम लावला आहे तिकडे. चूभूद्याघ्या..

बुवा ते रच्याकने मॅडमसाठी आहे. कंपाऊंडरसुद्धा १५ दिवसांत अ‍ॅलोपथी शिकतो अशी शब्दमौक्तिके आहेत त्यांची Wink

Nux vomica is a member of the Loganiaceae family. The medicine is prepared from dried seeds of the plant. Nux vomica contains as active principles two alkaloids known as Strychnia and Brucia.

Strychnia being a poison causes restlessness, trembling of the limbs, stiffness of the neck and jaws constriction of the throat and tetanic convulsions with opisthotonos. These Strychnia convulsions are re-excited by impressions made on the senses, particularly by the slightest touch, and the patient is conscious throughout the attack. In Nux vomica, as Strychnia is its principal ingredient, we will find running all through its symptomatology this over-impressibility; that is, everything impresses the patient excessively. External impressions such as sounds, odors and noises excite him, and this symptom is characteristic of the drug......

>>>>>

this is how the study of homoeopathic drugs starts!!

Physiologic action, pharmacological & toxicological actions are studied & then the remedy is proved on healthy human beings to derive finest symptomatology.

Homoeopathy is definitely a science.

-----to verify as to where from the materia medicas have been "written":
pls refer toxicology of Scorpio & symptom list of Hom drug Tarentula hispanica (animal);
toxicology of arsenic & symptomatology of Hom drug arsenicum album (mineral); & that of cannabis indica (vegetable)

----to see the efficacy :
-Reserpine is an indole alkaloiद antipsychotic and antihypertensive drug that has been used for the control of high blood pressure and for the relief of psychotic symptoms (ALTHOUGH IT IS USED RARELY THESE DAY). Homoeopathic druug- Raulfia serperntina contains this very same alkaloid- reserpine & is used for the treatment of Hypertension.

------ Ayurvedic physicians too can cross check the symptomatology of mercury, silver & alike minerals in their respective books & that in homoeopathic materia medicas.

भोन्दूगिरी करन्यासाठी कुणी आयुश्यातली ५ -१/२ वर्शे वाया घालवत नाही....

अलबत हे मान्य की काही लोक malpractice करतात, पण सगळ्यना त्यात consider करू नये.

इब्लिसः

<<जे अर्धा पाव टक्का अर्धशिक्षित "अ‍ॅलोपॅथ्स" साबुदाणे विकून जास्त पैसे मिळतात असे म्हणून तिकडे वळले ते अ‍ॅलोपथीचे दिग्गज. अन रोज उठून टेट्रा/वोवेरान्/डेक्सा प्लस एनेस, आरेल, डी५ मिळून किती नोटा पाडता येतात या विवंचनेत आलेले ९९% डीएच्चेमेस डबडे त्यांच्या पॅथीतले दिग्गज होतात का हो?? >>

जरा नीट वाचा, कि माबोवरच्या संगतीचा परिणाम? मी संदर्भ दिलेले दिग्गज अ‍ॅलोपथीचे प्रोफेसर होते, तरी ते अर्धशिक्षित? आता तर तुम्हाला दारुची नाहि, दुवाची गरज आहे. Happy

माझ्या माहितीप्रमाणे (चुभुद्याघ्या) या धाग्यावर अ‍ॅलोपथी बंद करा आणि फक्त होमिओपथी चालु ठेवा असं कोणिहि म्हटलेलं नाहि. असं असुन देखील, एक्-दोन प्रतिसाद होमिओपथीच्या समर्थनात आले काय आणि तुमच्यातला "जिहाद" जागा झाला. अ‍ॅलोपथीच्या हि काहि मर्यादा आहेत, हे सत्य मान्य कराल कि नाहि? आणि या गॅप्स होमिओपथी, आयुर्वेद किंवा आणखी कुठल्यातरी पथी ने भरुन काढल्या तर का नको?

तुमचा प्रॉब्लेम काय आहे? गरज नसताना, अर्थाचा अनर्थ करुन रान पेटवायचं, समोरच्याचा मुद्धा अजिबात लक्षात न घेता, वेगळेच फाटे फोडायचे, मीच खरा, मलाच सगळं येतं अशा भ्रमात राहायचं. आता याच्या पुढची स्टेप काय? - मला पहा आणि फुले वाहा???

शेवटी माझ्याविषयी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याची उत्तरं माबोवरच शोधा. माझा वावर कमी असतो, (बिगर फिश टु फ्राय) पण चिकाटीने शोधलंत तर सापडेल.

होमिओपॅथी विरुद्ध मॉडर्न मेडिसिन असा वाद कायमच चालू राहील असे वाटते. लेखक म्हणून मला यात पडायचे नाही. होमिओपॅथी कशी श्रेष्ठ असे सांगण्याचा हेतू अथवा भाषा या लेखाची नाही, तसेच दुसऱ्या वैद्यकशास्त्राला हिणवून दाखवण्यासाठी हा लेखन प्रपंच नाही.
पूजा यांचे मी विशेष आभार मानतो की त्यांनी अत्यंत संयमाने खूप चांगले मुद्दे मांडले आहेत जे कदाचित मलाही जमले नसते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे खरच त्रागा होण्यावरही आमच्याकडे औषधे आहेत. गरजूंनी लाभ घ्यावा.

शेवटी कोणताही डॉक्टर असो, पेशंटला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे बरे वाटावे याच साठी झगडत असतो. त्याबद्दल जास्त बोलूया. हेच बरोबर, तेच चूक, असंच असतं, असे 'च' लावून बोलणं विवेकनिष्ठ नाही.

होमिओपॅथिक असो वा इतर वैद्यकीय तज्ञ... दोघांनी आज इतरांकडे बघण्याचे विशिष्ठ रंगांचे चष्मे झुगारून देण्याची वेळ आली आहे. अ‍ॅलोपथी म्हणजे विष नव्हे आणि होमिओपॅथी म्हणजे फसवणूक / प्लासिबो नव्हे. प्रत्येक व्यक्तीत जसे गुण-दोष आहेत तसेच ते या वैद्यकशास्त्रात ही आहेत. त्याचा योग्य समन्वय साधून वापर केला म्हणजे मिळवले.

जरा नीट वाचा, कि माबोवरच्या संगतीचा परिणाम? मी संदर्भ दिलेले दिग्गज अ‍ॅलोपथीचे प्रोफेसर होते, तरी ते अर्धशिक्षित? आता तर तुम्हाला दारुची नाहि, दुवाची गरज आहे.

>>>

Rofl जौद्यात हो राज, कुछ नै हो सकता Proud

सध्या तुमच्या साठी हे घ्या...

http://www.time.com/time/health/article/0,8599,1114166,00.html

The End of Homeopathy?

By Leon Jaroff Tuesday, Oct. 04, 2005

i
Follow @TIME

Millions of people around the world swear by the alternative medicine homeopathy. In Britain, the Royal Family endorses and uses it. But that hasn't deterred the editors of The Lancet, the prestigious British medical journal, which has launched an all-out attack on homeopathy. In its current issue, The Lancet published a massive study that compared the results of 110 trials of homeopathy with the same number of trials of conventional medicine. The conclusion: benefits attributed to homeopathy were, at best, placebo effects.
The study is accompanied by an article featuring criticism of a World Health Organization (WHO) draft report that, as currently written, gives homeopathy some leeway, as well as a commentary on bias in research and The Lancet's no-holds-barred editorial comment.

Homeopathy was invented by an 18th Century German physician named Samuel Hahnemann, who argued that diseases could be cured by administering substances, mostly herbs or minerals, that produce the same symptoms as the disease. And, he claimed, the effects of these substances could be enhanced by diluting them. How much? The greater the dilution, it seems, the greater the benefit.

That theory, for which there is not a shred of evidence, is evident in the homeopathic sections of health food stores and major drugstore chains. There, consumers can see, on the homeopathic containers, such notations as 10X, or 80X or even 30C. Each X signifies that the active substance has undergone a ten-to-one dilution, each C a hundred-to-one dilution. Between each dilution, the solution is shaken vigorously, an action that proponents claim transfers the properties of the substance to the surrounding water.

But by the laws of chemistry, at 24 X there is just a 50 percent chance that s single molecule of the active substance remains. And at 200C, the dilution of a popular homeopathic flu remedy, the active ingredient is long gone. What nonsense!

Chances are that The Lancet is somewhat premature in announcing the "death" of homeopathy, which involves a large and very profitable industry and the loyalty of many of the consumers it has duped. In fact, The Lancet notes, ""the debate continues, despite 150 years of unfavourable findings. The more dilute the evidence for homoeopathy becomes, the greater seems its popularity."

But there are encouraging signs. The Swiss Government, after a five-year trial, has withdrawn insurance coverage for homeopathy. Even the U.S. National Center for Complementary and Alternative Medicine, which has been criticized for being too open to spurious alternative medicine claims, has little good to say abut homeopathy. Its website states, "Systematic reviews have not found homeopathy to be a definitively proven treatment of any medical condition."

Now, The Lancet concludes, it's up to the doctors, who "need to be bold and honest with their patients about homeopathy's lack of benefit." For scientifically-literate physicians, that shouldn't be so difficult to do.

Read more: http://www.time.com/time/health/article/0,8599,1114166,00.html#ixzz2T59x...

राज, तुम्ही १४ वर्षे जुने मेंबर आहात हे ठाऊक आहे. इथे होणारी झालेली भांडणे पाहून चुकला असाल हेही ठाऊक आहे. पहिले उत्तर लिहिण्याआधी किमान प्रोफाईल चेकावे इतके समजते मला>

>>
आकांडतांडव करणार्‍या सगळ्या डॉक्टर (अ‍ॅलोपॅथ) मंडळींनी माझ्या वरील प्रश्नाचं उत्तर देण्याचे कष्ट घ्यावेत. मॅलप्रॅक्टीस करणारे होमीओपथी डॉक्टर या विषयाकडे न घसरता (मॅलप्रॅक्टीस कोण करत नाहि?), प्रॅक्टीस करणारे अ‍ॅलोपॅथ, होमीओपथी कडे का वळतात याचा खुलासा आपापल्या माहितीनुसार करावा.
<<

"अकांड तांडव करणारे अ‍ॅलोपॅथ" "मालप्रॅक्टिस कोण करीत नाही" Happy

या तुमच्या वाक्याच्या उत्तराला जर फाटे फोडणे इतकेच म्हणायचे असेल, अन मी दिलेल्या आधीच्या ही प्रतिसादांना तुम्ही स्वतःच दिलेली दाद विसरायची असेल तर नाईलाज आहे. आय कॅन बी बॅड स्पोर्ट टू.

अ‍ॅलोपथी सोडून इतरत्र वळण्याची इन्डिविज्युअल उदाहरणेच द्यायचीत तर एक अनिरुद्ध जोशी की काय ते चांगली एमडी मेडीसीन डिग्री असताना बुवा झाले आहेत. सध्याचेच गर्भपाती मुंढे देखिल आहेत. प्रॅक्टीस सोडून अ‍ॅमवे करणारे लोकही आहेत. तसेच तुमचे प्रथितयश सुप्रसिद्ध सर्जनसाहेब होमिओपथीमागे लागले असावेत.

हे प्रसिद्ध, श्रीमंत, प्रथितयश लोक अमुक (कु/सु) पंथाला का लागले याचा खुलासा त्यांनाच न विचारता इथे विचारत रहाणे, व ते सांगताना देखिल, ते चुकीच्या मार्गाला लागले कारण मुळातच अ‍ॅलोपथीत काही प्रॉब्लेम असावा असे गर्भितपणे सुचवणे असे दिसले, म्हणून मी तो प्रतिसाद लिहिलेला आहे. त्याला फाटे फोडणे कसे म्हणता येईल?

शिवाय ब्लँकेट शिक्के! 'मालप्रॅक्टिस कोण करत नाही?' एल ओ एल. तुम्हाला सरळ वागणारा माणूस सापडला नाही म्हणुन प्रत्येकच तसा असतो का? तुम्ही लाच खाता की नाही ते ठाऊक नाही. पण तुमच्या व्यवसायात चोर्‍या कोण करीत नाही? असे विचारले तर तुम्हाला काय गुदगुल्या होतात की काय??

हे असे प्रश्न मांडलेत तर तुम्हाला वर दिला तसा प्रतिसाद द्यावा लागतो.

चुकार अ‍ॅलोपॅथ्स चुका करण्याची उदाहरणे दिसतात, तशीच शेकडो नव्हे तर बहुतांश होम्योपॅथ्स अ‍ॅलोपथी का वापरतात याचे उत्तर देता का जरा तुम्ही?

इथे आणि (इतर अनेक ठिकाणी) जे लोक सुमार्गाकडून कुमार्गाकडे वळतात त्यांचा गवगवा केला जातो. पण जे वळत नाहीत ते ही सुज्ञ असतात हे सांगितले जात नाही. पहिला गट अगदीच नगण्य असतो, आणि पुर्वाश्रमी कितीही नावाजलेला असला तरी वाट चुकलेलाच. यात कधी भलत्या-सलत्या गोष्टी मानणारे शास्त्रज्ञ असतात, तरी कधी होमीओपॅथी कडे वळणारे अ‍ॅलोपॅथ्स.

त्याचप्रमाणे केवळ एखादी गोष्ट अनेकांना पटते, लागू पडते असे वाटते म्हणून सत्य होते असे नाही.

जर होमीओपॅथीने खरेच लोकांना बरे वाटत असेल तर का याचा शोध घ्यायला हवा. ते त्यांच्या सिमिले-सिमिला तत्वाप्रमाणे नक्कीच नाही कारण त्या गोळ्यांमधे औशधाचा अंशही नसतो हे सत्य आहे. तो शोध घेण्यासाठी ते तत्व वापरून आणि स्वतःला सायकॉलॉजी समजते (आणि शरीरज्ञान आहे) असे समजणार्‍यांनी प्रॅक्टीस थांबवून त्या शोध कार्यात मदत करावी. तो शोध लागल्यास कदाचीत एक महत्वाची शक्ती मानवतेला प्राप्त होईल व जास्त लोकांचे भले होईल.

पूजा यांचे मी विशेष आभार मानतो की त्यांनी अत्यंत संयमाने खूप चांगले मुद्दे मांडले आहेत जे कदाचित मलाही जमले नसते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे खरच त्रागा होण्यावरही आमच्याकडे औषधे आहेत. गरजूंनी लाभ घ्यावा.
<<

करकरे महोदय,

कसला बोडक्यासा संयम? पुन्हा एकदा वाचा जरा. Happy तुमच्याच लेखातली शेलकी स्टेटमेंट्स दिली आहेत मी वर एका प्रतिसादात.

दुसरे, त्या पूजा मॅडमच्या आक्रस्ताळ्या वाक्यांमुळेच मी या चर्चेत सहभागी झालो.

हे घ्या : पूजा उवाचः

१. सर्वात आधी सर्जरी हा एकमेव उपाय आहे असं धमकावून सांगितलेल्या.. << धमकावून?
२. इतकच कशाला कित्येक बालरोगतज्ञ क्रोसिन पुढे हतबल होऊन आता होमिओपॅथीचा आधार घेत आहेत. << पुरावा?
३. steroid वापरून रोगाची लक्षणं तात्पुरती नाहीशी करण्यात कुठला आलाय पुरुषार्थ?? एक पे अनेक side effects FREE देऊन आपल्या शरीराची प्रयोगशाळा करणं कधीही मुर्खपणाच नाही का?? < वा! स्त्र्यार्थ??
४. दहा ठिकाणी फिरून, अ‍ॅलोपॅथीची खुराक वापरूनही "जैसे थे" किंवा बहुतांशी spoiled cases << "अ‍ॅलोपथी मुळे पेशंटची तब्येत बिघडते" वावावा.
५. साध्या पोट्दुखीसाठी डॉक्टर कडे गेल्यावर एक painkiller गोळी दुखीसाठी , एक antacid painkiller संबंधीत side effect टाळण्यासाठी आणि जमलंच तर मलटीविटामिन ताकदिसाठी आणि न जाणो काय काय दिलं जातं. distilled water चं इंजेक्शन दिलं तरी बरं वाटत. आणि त्यात जर डॉक्टरने भली मोठी lab investigation ची लिस्ट दिली तर सोने पे सुहागा!!! खूप काळजीवाहू आहे आपला डॉक्टर हे आत्मिक समाधान लाभतं. <<
काय संयत भाषेत चड्डी काढलिये हो अ‍ॅलोपथी वाल्यांची! वा!!
६. मग प्रत्येकाच्या वेदनेला diclofenac आणि acidity ला rantac 150 हे उत्तर असेल का??? तात्पुरत असेलही पण याचे long term side effects फार जीवघेणे असू शकतात.<<
ताई, तुम्हाला तुम्हीच दिलेल्या वेदनांचे / आजारांचे उपचार काय असतात हे ठाऊक आहे का ते विचारले. उत्तर कुठेय?
७. आपली सद्सद विवेक बुद्धी वापरून जे मनाला पटेल ते करावं. बाकी कंपाउंडर ही १५ दिवसात अलोपथी शिकू शकतो. निदान जी. पी. तरी करता येण कठीण नाही..!! <<

तोंड उघडले की असे बरळतात या बाई.
वरतून मला विचारतात, इतका तीळपापड का झाला? अजून गम्मत तर पुढेच आहे Happy

८. बाकी "अलोपथीची धाव steroid पर्यंत..." हे धाधांत सत्य आहे..
तरीही अनुभवातून आलेलं शहाणपण महत्वाचं.!!

९.उठ सुट वाट्टेल तशी अलोपथी औषधांची खुराक घेऊन आजार दाबून टाकण्यात स्वारस्य असलेल्यांना आरोग्याची हेळ्सांड होतेय हे लक्षातच येत नाही. उलट पटकन बरे होऊन कामाला लागलो म्हणजे मस्त औषध हा जो गैरसमज आहे तोच एक दिवस नकळत आपला बळी घेतो.
<<

च्याय्ला! काय अक्कल आहे! लवकर बरा झाला, तर ती उपचारपद्धती बेक्कार. त्यामुळे मरणार तुम्ही..

१०. मेडिकल सायन्स इतकं प्रगत होऊन सुद्धा वयोमर्यादा दिवसेंदिवस का घटत जात आहे???
<<
या वाक्यावर अनेक लोक हसले. तरी परिणाम नाही. तो होणार नाहीच, पण उत्तरही नाही. उचल्ली जीभ लावली टाळ्याला अश्या वाक्याचे काय उत्तर देणार?

११. बिचारे आजोबा... गेले ते गेले..!!!
आपल्या इब्लिस च्या मनात प्रचंड होमिओपथिबद्दल द्वेष निर्माण करून गेले.
<<
करेक्ट.
का द्वेष निर्माण झाला? कारण त्या मूर्ख होमिओपॅथने त्या बिचार्‍या म्हातार्‍याला तुमचा डायबेटीस कंट्रोल नव्हे, "बरा" करणार अशी ग्वाही दिली होती. त्या मूर्खाला जे करायचे ते समोरासमोर केलेच आहे मी तेव्हाच. त्याला डिफेण्ड करायचा प्रयत्न कृपया करू नका.

रच्याकने. आयुर्वेदाने मधुमेहाला 'असाध्य' म्हटले आहे. कधीच बरे करण्याचा दावा केलेला नाही. तो आजार काय आहे, अन त्यात लघवीतून साखर जाते, हे २-५ हजार वर्षांपूर्वी शोधून काढण्याची हुषारी असलेल्या त्या वैद्याला हॅट्स ऑफ. पण तो अन आजचे आयुर्वेद मार्केटिंग श्रीश्रीबाता या वेगळ्या बाता आहेत.

१२. Homeopathy कशी काम करते यावर कितीही सविस्तर लिहा ... आणि पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी पचनी पडून घ्यायची नाही असा सूर असेल तर.... <<
केव्हा लिहिलं हो?? एकही शब्द नाही. पुन्हा विचारतो. लिहाच.

कंटाळा आला तेच तेच लिहून. त्या नवीन एक काकू आल्यात. नक्ष व्होमिका उर्फ स्ट्रिचनिन बद्दल कॉपिपेस्ट वाल्या. महाऽन!

अस्चिग,
>>ते त्यांच्या सिमिले-सिमिला तत्वाप्रमाणे नक्कीच नाही कारण त्या गोळ्यांमधे औशधाचा अंशही नसतो हे सत्य आहे.<<
या वाक्यात एक लोचा आहे.

अंश असू शकतो.

डायल्यूशन थिअरी आहे, तशीच, नुसती बाटली धरून जोरात हलवली तरी 'पोटन्सी' वाढते अशी एक खत्रा कन्सेप्ट आहे. सॉर्ट ऑफ बाटली हलवली तर डायल्यूशन केल्यासारखं होतं, असं लिवलंय यांच्या पुस्तकांत.

तशी थोडं स्ट्रिच्नीन आय मीन नक्स व्होमिका घेऊन तासभर हलवून एक ४-४ गोळ्या कुणाला खाऊ घातल्या तर काय होईल ते एकदा पहायचंय मला.

> डायल्यूशन थिअरी आहे, तशीच, नुसती बाटली धरून जोरात हलवली तरी 'पोटन्सी' वाढते अशी एक खत्रा कन्सेप्ट आहे. सॉर्ट ऑफ बाटली हलवली तर डायल्यूशन केल्यासारखं होतं, असं लिवलंय यांच्या पुस्तकांत.

द्रवरूपात त्यांची जी औशधं मिळतात ती मुळात ३०/२००/१००० पोटेन्सीजची (लॅबमधे करुन) मिळतात. ते जर योग्य प्रकारे केले असेल तर डायल्युशन निट (शास्त्रीय) होईल. पण लोक इतर (हव्या त्या) पद्धती वापरत असतील तर ...

'शास्त्रीय' सत्य.

नमस्कार,

हि लिन्क 'गुगलुन' शोधली आहे.

http://hpathy.com/scientific-research/how-does-homeopathy-work/2/

यावरील सन्शोधन भारतात फार झाले नसावे.

Have studied and seen many cases treated & cured with Homoeopathy.
( complete cures of - viral fever, acute & chronic respiratory disorders, psychiatric illness, skin diseases,musculoskeletal disorders, gynaecological diseases
& palliative treatments in carcinomas, HIV-AIDS, diabetes mellitus
& symptomatic treatments for post-surgical pains/bleeding).
----

एच आय व्हि? अवघड आहे!
इब्लिस, मानलं तुमच्या पेशन्स ला. एक एक मुद्दा घेऊन सविस्तर लिहिता त्याबद्दल. त्या निमित्तानी चांगली माहिती मिळत आहे. धन्यवाद! Happy

एच आय व्हि? अवघड आहे!

एमबीबीएस किंवा एमडी डॉक्टर एच आय व्ही, कॅंसर , वगैरे रोगाचे पेशंट पहाताच हे माझ्या हातून होणार नाहीए, स्पेशालिस्ट गाठा असे प्रांजळपणे सांगतात. होमिओपॅथीवाले "वचने किं दरिद्रता" या उक्तीनुसार आम्ही हेही बरे करतो असा दावा करतात.

इब्लिसः

एक साधा मुद्धा, सरळ सोप्या भाषेत सांगुनहि एखाध्याला समजत नसेल तर त्याची दोन कारणं असु शकतात. १> आकलन क्षमता नाहि, किंवा २> उत्तर ध्यायचं नाहि (फॉर व्हरायटी ऑफ रिझन्स)

असो.

नेहमी प्रमाणे, मुख्य प्रश्नाला बगल देऊन भलतीच उदाहरणं ठोकलीत - बुवा झालेले, अ‍ॅमवे, भ्रुणहत्या इ. करणारे डॉक्टर... यालाच आम्हि तरी फाटे फोडणे समजतो बुवा.

तसंच, "मालप्रॅक्टीस कोण करत नाहि?" हा प्रश्न कुठल्या काँटेक्स्ट मध्ये होता ते जरा वाचा. पण तुमच्या सोयी (किंवा सवयी) नुसार "सगळेजण मालप्रॅक्टीस करतात", असा काढलात... धन्य आहात.

एखाध्या टॉप मेडिकल स्कुलचे प्रोफेसर, हॉस्पीटल मध्ये कार्यरत असणारे प्रॅक्टीसिंग सर्जन, अ‍ॅलोपथीने बरा न होणार्‍या रुग्णाला होमिओपथीचं औषध देतात आणि बरा करतात. का? कारण त्यांना अ‍ॅलोपथीच्या मर्यादा माहित आहेत. त्यांनी कुठलाहि इगो न कुरुवाळता, वेगळी उपचार पद्धती अवलंबली - रुग्णाच्या भल्याकरता. आणि ती सुद्धा कायदेशीर पणे.

आता यात हि काहि काळंबेरं दिसत असेल तर तो मनाचा कद्रुपणा आहे.

<<शेकडो नव्हे तर बहुतांश होम्योपॅथ्स अ‍ॅलोपथी का वापरतात याचे उत्तर देता का जरा तुम्ही? >>
हो. कारण - होमिओपथी धर्मा सारखे नाही (ज्याची दारे बंद असतात)... Happy

आणि वापरत असतील तर चांगलं आहे, जर कायदेशीर रित्या आणि रुग्णांच्या भल्याकरता करत असतील तर....

आणि आता हे बाकिच्या झिलकर्‍यांसाठी (इब्लिसचा आवडता शब्द)...

होमिओपथी मे नॉट बी मेन स्ट्रीम इन इंडिया, बट इट्स देअर टु स्टे. सो पुट अप ऑर शट अप...

> एखाध्या टॉप मेडिकल स्कुलचे प्रोफेसर, हॉस्पीटल मध्ये कार्यरत असणारे प्रॅक्टीसिंग सर्जन, अ‍ॅलोपथीने बरा न होणार्‍या रुग्णाला होमिओपथीचं औषध देतात आणि बरा करतात. का? कारण त्यांना अ‍ॅलोपथीच्या मर्यादा माहित आहेत. त्यांनी कुठलाहि इगो न कुरुवाळता, वेगळी उपचार पद्धती अवलंबली - रुग्णाच्या भल्याकरता. आणि ती सुद्धा कायदेशीर पणे.

ज्याप्रमाणे डेमॉक्रसी इज नॉट परफेक्ट बट ईट ईज द बेस्ट थींग वुई हॅव, त्याचप्रमाणे अ‍ॅलोपॅथीच्या बाबत. त्याला लिमिटेशन्स अर्थातच आहेत. बट दॅट इज द बेस्ट वुई हॅव. काही लोक कायदा आपल्या हाती घेऊन हवे ते करायचा प्रयत्न करतात कारण त्यांना नजीकचे भले दिदते (त्यांच्या मते). तसेच थोडेसे हे आहे.

होमीओपॅथीचा बेस काय हे जोपर्यंत ठाम पणे मांडता येत नाही तोपर्यंत ती 'प्रुफ बाय असर्शन'च राहणार.

होमीओपॅथीचा बेस काय हे जोपर्यंत ठाम पणे मांडता येत नाही तोपर्यंत ती 'प्रुफ बाय असर्शन'च राहणार.>>> किंवा 'ट्रू बाय प्रॅग्मॅटीक ट्रूथ टेस्ट'!

बुवा, गीता_९ ह्यांनी एड्स बरा होतो असे लिहिले नसून होमिओपॅथी पॅलिएटिव्ह उपचार उपलब्ध करते असे लिहिले आहे (palliative treatments in carcinomas, HIV-AIDS, diabetes mellitus). तर मला वाटते तुम्ही तुमच्या प्रतिसादाचा पुनर्विचार करावा.

इब्लिस, साती: आधुनिक वैद्यकात एखादा आजार का होतो (मूलभूत कारण) हे माहिती नसते तरी त्यावर अमूक एक औषधप्रणाली काम करते हे माहिती असते असे मी वाचलेले/ऐकलेले आहे. उदा: एखाद्या प्रकारचा कर्करोग एखाद्याला का होतो ह्याचे ठाम उत्तर सध्या माहिती नाही पण त्यावर किमोथेरपी हा उपचार काम करतो व कश्याप्रकारे करतो हे माहिती आहे व वापरले जाते. (हे माझे विधानच जर चूक असेल तर तसे सांगावे).
पण एखाद्या आजारावर अमूक एक औषध/पद्धती काम करते पण का करते ते माहिती नाही पण काम करते म्हणुन वापरली जाते असे आधुनिक वैद्यकात घडते का? की कुठलाही उपचार हा आधी संपूर्णपणे सिद्ध झाल्याशिवाय वापरला जात नाही? भले मग तो काम करत का असेना? समजा होमिओपॅथीमध्ये एखादा आजार अमुक एका औषधाने बरा होतो असे अनुभवाअंती आढळून आले आहे पण त्याची सिद्धता झालेली नाही, तर त्यात चूक काय आहे (किंवा अश्या दृष्टिकोणाचे दुष्परिणाम काय आहेत?)

टण्या, आलं लक्षात, एड्सचा क्युअर असं म्हणत नाहीयेत ते. धन्यवाद. Happy कम्प्लिट क्युर्स ऑफ सायकियॅट्रिक इलनेसेस ही दिलय जे परत तितकच गंभीर आहे आणि नेमके ह्याच कारणाकरता इब्लिस आणि इतर वैतागून लिहीत आहेत.
वर लेखकांनी स्वतः कुठलेही दावे केलेले नाहीत खरं तर आणि पुढे मंडळीनी होमियोपथी विरोधात केलेली विधानं अस्थानी ही वाटू शकतील पण पुढे जर तू पुजाएस ह्यांची काही विधानं आणि भारतात होमिओपथीशी निगडीत माऊथ टू माऊथ पबलिसिटी (होमियोपाथ्सनी केलेल्या दाव्यांमुळे) आणि जाहिरातबाजी (धन्यवाद उदयन) बघशील तर कळेल की ह्याबद्दल दुसरी बाजू मांडायची गरज का बरं आहे ते. तू पुढे मांडलेला अनप्रूवन सायन्सचा मुद्दाही लक्षात आला पण परत हे सायन्स अन्प्र्रुवन असल्याची जाणीव न ठेवता भारतात बिनदिक्कत पणे होमियोपाथ्स त्यांच्या Will cure all, come one, come all अशा स्वरुपात सर्विसेस प्लग करत आहेत.

Pages