कोलंबी पुलाव

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 16 April, 2013 - 14:30
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ वाटे कोलंबी सोलून.
२-३ कांदे उभे चिरुन
३ टोमॅटोंची मिस्करमधून काढलेली प्युरी
१ बटाट्याच्या किंवा गरजेनुसार बटाट्याच्या फोडी
बासमती किंवा कोणताही जुना तांदूळ ४ वाट्या.
२ चमचे आल लसुण पेस्ट
१ चमचा मिरची कोथिंबीर पेस्ट
३-४ दालचीनीचे तुकडे
४-५ लवंगा
७-८ मिरी
२-३ वेलच्या
३-४ तमालपत्र
पाव चमचा हिंग
१ चमचा हळद
२ चमचे मसाला
चवीनुसार मिठ
२ पळ्या तेल

(फोटोतील प्रमाण थोड्याफार फरकाने वेगळे आहे कृपया कोणी मिरीदाणे, लवंगा वगैरे मोजू नका :हाहा:)

क्रमवार पाककृती: 

१) तांदुळ धुवुन निथळून ठेवा. (जमल्यास १ तास आधी)

२) कोलंबीला आल्,लसुण, मिरची,कोथिंबीर पेस्ट लावून घ्या.

३) भांड्यात तेल चांगले गरम करुन त्यात प्रथम दालचीनी, वेलची, तमालपत्र, मिरी, लवंग टाकून त्यावर कांदा टाका व कांदा गुलाबी रंग येई पर्यंत शिजू द्या. कांदा कुरकुरीत झाल्यास अजून चविष्ट लागतो पण त्यासाठी थोडे जास्त तेल वापरावे लागते.

४) शिजलेल्या कांद्यावर हिंग, हळद, मसाला, कोलंबी व बटाटे घाला व चांगली एक वाफ येऊ द्या. (जर कुकर मध्ये करणार असाल तर बाकीचे सगळे एकत्र टाकले तरी चालते वाफ न आणता)

५) आता टोमॅटो प्युरी, घाला व जरा परतवा.

६) ह्या मिश्रणावर तांदूळ, मिठ घाला भात शिजवण्यासाठी लागते तेवढे पाणी घाला व ढवळून मध्यम आचेवर पुलाव शिजत ठेवा.

७) ७-८ मिनीटांनी ढवळा व पुन्हा शिजू द्या पाणी आटले की गॅस मंद करुन झाकण ठेवून पुलाव वाफेवर ठेवा. ( हे सगळी भात शिजवण्याचीच प्रोसेस करायची आहे.)

हा झाला आहे कोलंबी पुलाव तय्यार.

वाढणी/प्रमाण: 
४ माणसांसाठी
अधिक टिपा: 

कुकरमध्ये अजुन सोपा पडतो फक्त पाण्याचे प्रमाण थोडे कमी करायचे.

बटाटे नसतील आवडत तर नाही घातले तरी चालतात.

काजू घातले तरी अजुन छान लागतो. व्हेज वाल्यांनी कोलंबी ऐवजी काजू पुलाव करुन खाल्ला तरी चालेल काजू कोलंबीसारखेच दिसतात Lol

मी साधा तांदूळ वापरला आहे. तुम्हाला आवडेल तो तांदूळ वापरा. फक्त नवीन नको.

माहितीचा स्रोत: 
आईने शिकवलेला पण थोडाफार फरक मी केलेला.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा दोन दोन निमंत्रणं चक्क!!
पण उद्या मीच हा पुलाव बनवणार आहे, या सगळे खायला.
वर्षूने केलेला पुलाव का दिसत नाहीये मला? Uhoh

टोकु वर्षूने तुझ्यासाठी नव्हता केला म्हणून नाही दिसत. Lol
आज केलास का?

प्राची पुढच्यावेळी फोटो टाक.

जागू, काल तुझ्या या कृतीनं केलेला कोलंबी पुलाव चवीला अप्रतिम झाला असा रिपोर्ट आहे. खूप धन्यवाद!

kolambee-khichaDee-jagustyle-maayboli.jpg

मी ह्या रेसिपीने काल परत एकदा पुलाव केला. सगळ्यांना खूप आवडला. हमखास हिट्ट रेसिपी आहे ही.
पुन्हा एकदा धन्यवाद!

Pages