कोलंबी पुलाव

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 16 April, 2013 - 14:30
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ वाटे कोलंबी सोलून.
२-३ कांदे उभे चिरुन
३ टोमॅटोंची मिस्करमधून काढलेली प्युरी
१ बटाट्याच्या किंवा गरजेनुसार बटाट्याच्या फोडी
बासमती किंवा कोणताही जुना तांदूळ ४ वाट्या.
२ चमचे आल लसुण पेस्ट
१ चमचा मिरची कोथिंबीर पेस्ट
३-४ दालचीनीचे तुकडे
४-५ लवंगा
७-८ मिरी
२-३ वेलच्या
३-४ तमालपत्र
पाव चमचा हिंग
१ चमचा हळद
२ चमचे मसाला
चवीनुसार मिठ
२ पळ्या तेल

(फोटोतील प्रमाण थोड्याफार फरकाने वेगळे आहे कृपया कोणी मिरीदाणे, लवंगा वगैरे मोजू नका :हाहा:)

क्रमवार पाककृती: 

१) तांदुळ धुवुन निथळून ठेवा. (जमल्यास १ तास आधी)

२) कोलंबीला आल्,लसुण, मिरची,कोथिंबीर पेस्ट लावून घ्या.

३) भांड्यात तेल चांगले गरम करुन त्यात प्रथम दालचीनी, वेलची, तमालपत्र, मिरी, लवंग टाकून त्यावर कांदा टाका व कांदा गुलाबी रंग येई पर्यंत शिजू द्या. कांदा कुरकुरीत झाल्यास अजून चविष्ट लागतो पण त्यासाठी थोडे जास्त तेल वापरावे लागते.

४) शिजलेल्या कांद्यावर हिंग, हळद, मसाला, कोलंबी व बटाटे घाला व चांगली एक वाफ येऊ द्या. (जर कुकर मध्ये करणार असाल तर बाकीचे सगळे एकत्र टाकले तरी चालते वाफ न आणता)

५) आता टोमॅटो प्युरी, घाला व जरा परतवा.

६) ह्या मिश्रणावर तांदूळ, मिठ घाला भात शिजवण्यासाठी लागते तेवढे पाणी घाला व ढवळून मध्यम आचेवर पुलाव शिजत ठेवा.

७) ७-८ मिनीटांनी ढवळा व पुन्हा शिजू द्या पाणी आटले की गॅस मंद करुन झाकण ठेवून पुलाव वाफेवर ठेवा. ( हे सगळी भात शिजवण्याचीच प्रोसेस करायची आहे.)

हा झाला आहे कोलंबी पुलाव तय्यार.

वाढणी/प्रमाण: 
४ माणसांसाठी
अधिक टिपा: 

कुकरमध्ये अजुन सोपा पडतो फक्त पाण्याचे प्रमाण थोडे कमी करायचे.

बटाटे नसतील आवडत तर नाही घातले तरी चालतात.

काजू घातले तरी अजुन छान लागतो. व्हेज वाल्यांनी कोलंबी ऐवजी काजू पुलाव करुन खाल्ला तरी चालेल काजू कोलंबीसारखेच दिसतात Lol

मी साधा तांदूळ वापरला आहे. तुम्हाला आवडेल तो तांदूळ वापरा. फक्त नवीन नको.

माहितीचा स्रोत: 
आईने शिकवलेला पण थोडाफार फरक मी केलेला.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय हे जागु?:फिदी:

आता नुसतेच ताटात कोरडे काजू ठेवलेस तर कशी मजा येणार? त्यांना जरा तिखटमिठात घोळवले असतेस (रवा लावुन नाही हं!) तर बराबरी झाली असती आम्हा शाकाहार्‍यांसाठी.:डोमा:

असा भेद बरा नाही हों, आपली ती कोळंबी आणी दुसर्‍याचे ते काजू? इश्श!:फिदी::दिवा:

असा भेद बरा नाही हों, आपली ती कोळंबी आणी दुसर्‍याचे ते काजू? इश्श!>>>हा हा हा.....
जागु नेहमि प्रमाने मस्तच,...

काजूला कितीही चटपटीत बनवलेस तरी कोलंबी ती कोलंबीच.>>>> +११११.

इकडे अद्याप मला एकदाही कोलंबी दिसली नाही फिशमार्केटमधे. Sad

काल केला या रेसिपीनेच, मस्त होतो ,बटाटे घातल्याने खड्या मसाल्याचा extraa spice कमी होतो अस वाटल, त्यामुळे अजिबात तिखट,जळजळित झाला नाही.मुलीने सुद्धा आवडिने खाल्ला!

काजूला कितीही चटपटीत बनवलेस तरी कोलंबी ती कोलंबीच.>>>> +१०००००००००
लाजो एकदा टेस्ट तर कर...अपनी उंगलिया चाटते रह जाओगे!

लाजो ... कसला मस्त दिसतोय... तुम्हि केलेला पुलाव.जागुताई चा पण

आता मी पण घरी जावुन नक्कि बनवणार

व्हेज वाल्यांनी कोलंबी ऐवजी काजू पुलाव करुन खाल्ला तरी चालेल काजू कोलंबीसारखेच दिसतात >>>>>>>
होहो.........आम्ही वापरू बरं काजूच!(आणि याच रेसिपीने पुलाव करूनच बघू.) पण हसायचं काय कारण?

प्राजक्ता Happy अग फोटो का नाही काढलास?

लाजो मस्त दिसतोय. एकदम तोपासु. एकदा खाऊन पण बघ.

टोकू Happy

मानुषी अग तू खातेस ना?

अबोल, विजय धन्यवाद.

जागु! राहिला फोटो काढायचा यावेळेस, पण सेम लाजोच्या पुलावासारखाच दिसत होता. नेक्ष्ट-टाइम फोटो काढेल.

मला अशी शंका आहे की प्राजक्ताने पुलाव केलाच नव्हता... मग फोटो कुठून येणार?? Proud Wink
रच्याकने मी मूहुर्त शोधतेय हा पुलाव करायला अजून...परवा पण संकष्टी आहे. आज रात्री करायचा तर ताजी कोलंबी मिळायला हवी.

प्राजक्ता, टोकू Happy

अमेय धन्स. एकदा मसाला करुन पहाच. आणि तुमचे नॉनव्हेजचे वेगवेग्ळे प्रकार लवकर येउद्यात.

प्राजक्ता मग कधी येऊ? खायला आणि फोटू काढायला? :क्यामेरा हातात घेऊन धावायच्या तयारीत सर्सावून बसणारी बाहुली:

टोकु कधीही ये.

मानुषी अग पण तुच म्हणाली होतीस ना की कधिच्याकाळी आमच्याइथे मासे आणले की आज माशांच फिश केल होत अस म्हणतात Happy तू एकटी खात नसशील.

Pages