२ वाटे कोलंबी सोलून.
२-३ कांदे उभे चिरुन
३ टोमॅटोंची मिस्करमधून काढलेली प्युरी
१ बटाट्याच्या किंवा गरजेनुसार बटाट्याच्या फोडी
बासमती किंवा कोणताही जुना तांदूळ ४ वाट्या.
२ चमचे आल लसुण पेस्ट
१ चमचा मिरची कोथिंबीर पेस्ट
३-४ दालचीनीचे तुकडे
४-५ लवंगा
७-८ मिरी
२-३ वेलच्या
३-४ तमालपत्र
पाव चमचा हिंग
१ चमचा हळद
२ चमचे मसाला
चवीनुसार मिठ
२ पळ्या तेल
(फोटोतील प्रमाण थोड्याफार फरकाने वेगळे आहे कृपया कोणी मिरीदाणे, लवंगा वगैरे मोजू नका :हाहा:)
१) तांदुळ धुवुन निथळून ठेवा. (जमल्यास १ तास आधी)
२) कोलंबीला आल्,लसुण, मिरची,कोथिंबीर पेस्ट लावून घ्या.
३) भांड्यात तेल चांगले गरम करुन त्यात प्रथम दालचीनी, वेलची, तमालपत्र, मिरी, लवंग टाकून त्यावर कांदा टाका व कांदा गुलाबी रंग येई पर्यंत शिजू द्या. कांदा कुरकुरीत झाल्यास अजून चविष्ट लागतो पण त्यासाठी थोडे जास्त तेल वापरावे लागते.
४) शिजलेल्या कांद्यावर हिंग, हळद, मसाला, कोलंबी व बटाटे घाला व चांगली एक वाफ येऊ द्या. (जर कुकर मध्ये करणार असाल तर बाकीचे सगळे एकत्र टाकले तरी चालते वाफ न आणता)
५) आता टोमॅटो प्युरी, घाला व जरा परतवा.
६) ह्या मिश्रणावर तांदूळ, मिठ घाला भात शिजवण्यासाठी लागते तेवढे पाणी घाला व ढवळून मध्यम आचेवर पुलाव शिजत ठेवा.
७) ७-८ मिनीटांनी ढवळा व पुन्हा शिजू द्या पाणी आटले की गॅस मंद करुन झाकण ठेवून पुलाव वाफेवर ठेवा. ( हे सगळी भात शिजवण्याचीच प्रोसेस करायची आहे.)
कुकरमध्ये अजुन सोपा पडतो फक्त पाण्याचे प्रमाण थोडे कमी करायचे.
बटाटे नसतील आवडत तर नाही घातले तरी चालतात.
काजू घातले तरी अजुन छान लागतो. व्हेज वाल्यांनी कोलंबी ऐवजी काजू पुलाव करुन खाल्ला तरी चालेल काजू कोलंबीसारखेच दिसतात
मी साधा तांदूळ वापरला आहे. तुम्हाला आवडेल तो तांदूळ वापरा. फक्त नवीन नको.
मी येऊ का वर्षूतै
मी येऊ का वर्षूतै
जाई. मोस्ट मोस्ट वेल्कम गा..
जाई. मोस्ट मोस्ट वेल्कम गा.. ये !! ये!!
मी आले वर्षूताई. अग गडबडीत
मी आले वर्षूताई. अग गडबडीत आहे जरा.
छान झाला आहे तुझा कोलंबी पुलाव..
अरे वा दोन दोन निमंत्रणं
अरे वा दोन दोन निमंत्रणं चक्क!!
पण उद्या मीच हा पुलाव बनवणार आहे, या सगळे खायला.
वर्षूने केलेला पुलाव का दिसत नाहीये मला?
आज केला. एकदम परफेक्ट रेसिपी.
आज केला. एकदम परफेक्ट रेसिपी. धन्स जागूताई. फोटो काढेपर्यँत धीर नाही धरवला. पोट भरलं पण मन नाही भरलं.
टोकु वर्षूने तुझ्यासाठी
टोकु वर्षूने तुझ्यासाठी नव्हता केला म्हणून नाही दिसत.
आज केलास का?
प्राची पुढच्यावेळी फोटो टाक.
जागु, परफेक्ट होतो तुझ्या
जागु, परफेक्ट होतो तुझ्या कृतीने पुलाव. धन्यवाद.
जागू, काल तुझ्या या कृतीनं
जागू, काल तुझ्या या कृतीनं केलेला कोलंबी पुलाव चवीला अप्रतिम झाला असा रिपोर्ट आहे. खूप धन्यवाद!
मी ह्या रेसिपीने काल परत एकदा
मी ह्या रेसिपीने काल परत एकदा पुलाव केला. सगळ्यांना खूप आवडला. हमखास हिट्ट रेसिपी आहे ही.
पुन्हा एकदा धन्यवाद!
खुप छान
खुप छान
शुम्पी असाच व्हेज पुलाव पण कर
शुम्पी असाच व्हेज पुलाव पण कर मस्त होतो.
सहि दिस्तेय, नशीब जेवून
सहि दिस्तेय, नशीब जेवून आल्यावर नजर पडली
मसाला कुठला वापराया ? मेन चव
मसाला कुठला वापराया ? मेन चव त्याचीच असेल
Pages