लोकशाहीत नक्की उत्तरे आहेत का?

Submitted by बेफ़िकीर on 8 April, 2013 - 23:45

अजित पवारांनी केलेले वक्तव्य महाराष्ट्रमनाला झोंबले व जिव्हारी लागले. माफीनामा सादर करणे हे त्यांना महाराष्ट्रमनाची पुरेशी मलमपट्टी केल्यासारखे वाटत असावे. शरद पवारांचीही मान शरमेने खाली गेली असे हे वक्तव्य व त्याची बोच नुसत्या माफीनाम्याने का विसरावी असे कोणालाही वाटेल. खुद्द दैनिक सकाळने अग्रलेख, चारोळी, खिडकी विनोद या सदरान्वये अजित पवारांवर तोंडसुख घेणे, त्यांची खिल्ली उडवणे हे सर्व केलेले आहे. या प्रसंगी सर्व विरोधक एक झाल्याचेही दिसून येत आहे. वर्षानुवर्षे अथक परिश्रम, पक्षफोड आणि नोटावाटपाच्या जोरावर मिळालेले राजकीय स्थान अश्या एखाद्या वाक्याने उद्ध्वस्त होऊ शकते हे स्वतः शरद पवारांनाही त्यांच्या कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर अनुभवायला मिळत आहे. राष्ट्रपती संपूर्ण देशाला महाराष्ट्राची तहान भागवण्यासाठी कंबर कसून उभे राहा असे आवाहन करत असताना अजितदादांनी आपल्या हक्काच्या, घरच्या मतदारांच्या मनाचाही विचार केलेला दिसत नाही.

दुसरीकडे अत्यंत बेताल आणि स्वस्त, सवंग विधाने करून राजसाहेबांनी खेचलेली लाखोंची गर्दी मतदारांमध्ये रुपांतरीत होत नाही हे त्यांना स्वतःलाही समजलेले असावे. विशेष काहीही कामगिरी न करता बेताल व चमकदार विधाने करणे, खिल्ली उडवणे व नकला करणे यातून फार तर एका ठिकाणी किती माणसे जमू शकतात याचे रेकॉर्ड करता येईल. मनसेबाबत तर काही बोलणेच धाडसाचे आहे कारण तसे बोलणार्‍याला स्वतःच्याच जिवाची भीती वाटावी.

त्याचवेळी लक्ष्मण माने पोलिसांसमोर प्रकट झाले आहेत आणि हासत हासत तस्वीरी देत आहेत. संतोष मानेसाठी जाहीर झालेली फाशीची शिक्षा कोणालाही पुरेशी वाटत नसून त्यायोगे काही व्यापक सुधारणांची पायाभरणी होईल याचीही मुळीच शाश्वती वाटत नाही आहे. राजीव गांधींचे नांव पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय व्यवहारातील भ्रष्टाचारात आलेले आहे. या शेवटच्या तीन घडामोडी पहिल्याच पानावर झळकत असल्याने केवळ येथे यादीत दिल्या इतकेच.

चर्चाप्रस्ताव -

दिनांक १६ डिसेंबर २०१२ पासून एकुणच आत्यंतिक चीड आणणार्‍या घटना एकापाठोपाठ एक घडत आहेत. तरीही जनतेच्या हातात मतदान करणे, न करणे, रस्त्यावर उतरून आंदोलन करणे याशिवाय काही विशेष नाहीच आहे व ते घटनेबरहुकूम असल्याने तेच योग्यही आहे असेच सर्वांना वाटत आहे.

'बदल घडवून आणण्याची संधी'च मुळी पाच वर्षांनी मिळते, अश्या लोकशाहीत या अश्या वरील प्रकारच्या घटना, दुर्घटना आणि अन्याय्य बाबींना काही ठाम उत्तरे असतील अशी अपेक्षा कशी ठेवायची? की लोकशाहीच्या नावाखाली आपणच आपल्याला फसवून मोठे न्याय्य शासनप्रणाली अवलंबिणारे समजत आहोत?

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गामा.......जरा अति होत आहे असे नाही का वाटत...?

इतके धडधडीत खोट तर " बांकेलाल" सुध्दा कधी बोलला नाही... Wink

भ्रष्टाचाराचा आणि लोकशाहीचा काय संबंध?चीनमध्ये कमी भ्रष्टाचार आहे का? खरे तर भ्रष्टाचार हाही भारतीयांचा स्थायीभाव झाला आहे. त्या बिचार्‍या अडाणी, अशिक्षित, गरीब लोकांना विकले जायची संधी पाच वर्षांतून तीन-चार वेळाच(लोकसभा, विधानसभा,स्थास्वसं) मिळते. बाकीच्यांचे तसे नसते.

चीनच्या उल्लेखाने गोंधळ उडाला. चीनमधे भ्रष्टाचार आहे म्हणून लोकशाहीचा काय संबंध हा प्रश्न गोंधळात टाकतोय. चीनमधे हुकूमशाहीच आहे. हुकूमशाहीमधे भ्रष्टाचार कमी होणार नाही असं तुम्हाला सुचवायचंय असं वाटतंय.

आता लोकशाहीवर भ्रष्टाचाराचा काय परिणाम होतो असं पाहू. काय संबंध या प्रश्नामुळे गोंधळ उडतो हे संपादीत पोस्टवरून कळालंच असेल. निवडणुकांपासून ते निवडून येईपर्यंत मूठभर घराण्यांचाच पैसा लागतो. वर झालेल्या चर्चेत हेच मुद्दे सगळ्यांनी मांडले आहेत. मग अशा लोकशाहीला काय अर्थ राहील ? अगदी निवडणुकात पैसे ओतले नाहीत आणि निवडून गेल्यानंतर लोप्र खरेदी करण्यात आले तरी त्या पाच वर्षांतून मिळालेल्या संधीला / अधिकाराला आणि मतदारांच्या अपेक्षांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जातात. म्हणजे लोक वजा करून फक्त शाही राबवली जाते जी चीनसारखीच असते.

सौ. रा रा. लेले

बेफिकिर तुमच्या भावना पोहोचल्या. पण त्यावर मला एकच उत्तर वाटतेय - त्यातल्या त्यात थोडिफार तरी डेव्हलपमेंट करणारा नेता शोधणे - आणी उत्तर आहे - नरेंद्र मोदी!

भारतीय | 14 April, 2013 - 08:35
बेफिकिर तुमच्या भावना पोहोचल्या. पण त्यावर मला एकच उत्तर वाटतेय - त्यातल्या त्यात थोडिफार तरी डेव्हलपमेंट करणारा नेता शोधणे - आणी उत्तर आहे - नरेंद्र मोदी!
<<
आहे हीच घटना, आहे हीच नोकरशाही आणि आहेत त्याच लोकांकडून खूप कांही चांगल्या गोष्टी करणे शक्य आहे हे ठासून सांगणारा आणि त्याच्या कार्यक्षेत्रात ते करून दाखविणारा हा नेता आहे.
इतके सारे प्रयोग आजपर्यंत झाले. यांनाही संधी द्यायला काय हरकत आहे? उलट कायदे बदलण्याची संधी हाती आली तर नरेंद्र मोदी खूप कांही चांगल्या गोष्टी घडवून आणू शकतील अशा आशेला जागा आहे. हेही मॉडेल प्रजासत्ताकाच्या इव्होल्युशनचाच भाग होईल.
त्यांच्याविरुद्धचा अपप्रचाराचा नेहमीचा बकवास आता कालबाह्य झालेला आहे.

मोदींबद्दलचा अपप्रचाराचा नेहमीचा बकवास आता कालबाह्य झालेला आहे.

अनुमोदन. नेमकं काय वेगळं केलंय ? कसला विकास केलाय सगळ्यांपेक्षा वेगळा गुजरातेत ते एकदाचं समजू द्या बरं...

http://www.maayboli.com/node/20135

उत्तरेचे, दक्षिणेचे,रंक आणि राव येथे
शोधुनीही सापडेना भारताचे नाव येथे

मी मराठी,तो बिहारी,भारताचा ना कुणी ही
अस्मितेचा हर प्रदेशी,रंगलेला डाव येथे

घालुनी खड्ड्यात्,देशाला,कसे निर्लज्ज नेते,
''मीच तारणहार आता'' आणती बघ आव येथे

''धर्म'' हे चलनी इथे नाणेच वाजे खणखणा की,
''झामुमो''च्या ही सदस्यालाच कोटी भाव येथे

ज्या रथाचा सारथी , फुंकून ठेवी अस्मितेला,
आजही ''कैलास'' धावे तोच रथ भरधाव येथे.

डॉ.कैलास गायकवाड

Kiran...,

>> कसला विकास केलाय सगळ्यांपेक्षा वेगळा गुजरातेत ते एकदाचं समजू द्या बरं...

नक्की काय विकास केला ते मलाही माहीत नाही. कदाचित कुणाला तरी यथायोग्य माहिती असेल. मला माहित असलेली एकच गोष्ट सांगतो. 'खाणार नाही आणि खाऊही देणार नाही' अशी प्रतिज्ञा मोदींनी केली होती. दिलेल्या शब्दाला तो माणूस जागतोय.

लोक त्यांच्या चालणार्‍या सरकारमुळे त्यांना मते देतात. मला या घडीला एव्हढंच माहीत आहे.

आ.न.,
-गा.पै.

. 'खाणार नाही आणि खाऊही देणार नाही' अशी प्रतिज्ञा मोदींनी केली होती. >>>>> Biggrin

टेंडर होते गुजरात मधे टोल टॅक्स चे .. सगळे गुजराती मधुन ...पत्रक दिलेले.. एकही कॉपी इंग्लिश मधुन नाही.. समजायचे असल्यास समजा अन्यथा भरु नका अशीच भाषा सगळे बोलत होते...इतकेच नाही तर तुम्ही गुजराती नाही मग तुम्हाला कसे टेंडर देणार. ? असे देखील सांगण्यात आले...वर भरीस भर.. सगळे हफ्ते ठरलेले ... वा रे वा.... याला काय म्हणायचे ?
जसे महाराष्ट्रात आहे तसेच तिथे सुध्दा आहे फक्त तिथे .. काही चांगले होत असेल तर विरोधी पक्ष व इतर छोटे पक्ष आपापले मुद्दे घेउन ते काम अडवत नाही ..पायात पाय अडकवुन खाली पाडले जात नाही
. जसे महाराष्ट्रात होते...एखादा चांगला प्रोजेक्ट आला की सगळे आपला स्वार्थ बघायला निघतात...आपली पोळी भाजण्यासाठी त्या प्रोजेक्ट ला जाळ जाळ जाळतात आणि त्यावर शेकत बसतात.. काहीही अभ्यास न करता जनतेला स्वतःच्या स्वार्थापोटी आणि दुसर्याला श्रेय मिळवु द्यायचे नाही याच कारणाने महाराष्ट्रात राजकारण चालु आहे

.
लालु रेल्वे मंत्री असताना सुध्दा असेच वलय त्यांच्या भोवती निर्माण झालेल्या.. पण ममता यांनी सत्तेवर आल्यावर त्याच्यातला फोल पणा एक श्वेतपत्रिका काढुन दाखवुन दिलेला . Wink
.
.
असो.......

.
लालु रेल्वे मंत्री असताना सुध्दा असेच वलय त्यांच्या भोवती निर्माण झालेल्या.. पण ममता यांनी सत्तेवर आल्यावर त्याच्यातला फोल पणा एक श्वेतपत्रिका काढुन दाखवुन दिलेला >>>>> केंद्रात कांग्रेसची सत्ता आहे, राज्यपाल कांग्रेसचा आहे, CBI दिमतील आहे .............. २०१४ मध्ये सत्ता हरण्याची वाट बघत आहे का कांगेस ? आत्तापर्यत CBI नसती दिली लावुन ? ....... काहिपण justification.

>> टेंडर होते गुजरात मधे टोल टॅक्स चे .. सगळे गुजराती मधुन ...पत्रक दिलेले.. एकही कॉपी इंग्लिश मधुन नाही.. <<

ज्यांना बिझिनेस करण्यासाठी टेंडरे भरायची असतात ते असल्या किरकोळ बाबींमुळे अडून बसत नाहीत. खरे तर महाराष्त्रात देखील मराठीतच टेंडरे काढायला कोणी अडवले आहे काय?

@ लिम्बुभाउ
>>>> "पेशव्यांनी तो निकाल निकालात काढून आपल्या जवळच्या हुज-यांना, खुषमस्क-यांना वतनं दिलीच ना ? "
>>> वस्तुस्थितीला काडीचेही धरुन नसलेल्या वरील सूप्त ब्राह्मणद्वेष्ट्या वाक्याचा तत्काळ निषेध नोन्दवितो आहे.

अहो लिम्बुभौ... हे ब्राह्मणद्वेष्टे नाही आहे... वतन कोणाला दिली ? गायक्वाड, शिन्दे, होळकर... यात ब्राह्म्हणद्वेश कुठे आला? Happy कदाचित हे पोस्टणार्याला म्हणायच असेल... की पेशव्यान्नी चुकीच्या लोकान्ना वतन दिली, त्यान्च्या भावना आपण नाही समजून घेणार तर कोण घेणार? Happy

Pages