''भारतीय''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 30 September, 2010 - 09:16

उत्तरेचे, दक्षिणेचे,रंक आणि राव येथे
शोधुनीही सापडेना भारताचे नाव येथे

मी मराठी,तो बिहारी,भारताचा ना कुणी ही
अस्मितेचा हर प्रदेशी,रंगलेला डाव येथे

घालुनी खड्ड्यात्,देशाला,कसे निर्लज्ज नेते,
''मीच तारणहार आता'' आणती बघ आव येथे

''धर्म'' हे चलनी इथे नाणेच वाजे खणखणा की,
''झामुमो''च्या ही सदस्यालाच कोटी भाव येथे

ज्या रथाचा सारथी , फुंकून ठेवी अस्मितेला,
आजही ''कैलास'' धावे तोच रथ भरधाव येथे.

डॉ.कैलास गायकवाड

डॉ........ मस्त जमलिये............ मगाशी तुम्ही असुन नसल्यासारखे होतात तेंव्हाच वाटले होते नक्की काहितरी लिखाण चालु आहे.......... लई भारी........ आवडले!!!!! Happy

उत्तरेचे, दक्षिणेचे,रंक आणि राव येथे
शोधुनीही सापडेना भारताचे नाव येथे

अप्रतिम शेर. (मतला)

बाकी गझल उत्तमच.

धन्यवाद रश्मी,भुंगा,सानी,आशू.....

धन्यवाद मुटेजी..... मतला सुचला आणि त्यावर आधारीत बाकीचे शेर ''पाडले''.... आपल्या सुहृदय प्रोत्साहना बद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

भूषणराव....... मला व्यक्तीशः,मतला गझलेचाच वाटतोय.... परंतू इतर शेर विडंबनात्मक किंवा हजलीश वाटताहेत. आपल्या स्पष्ट प्रतिसादाबद्दल कधीच गैरसमज नसतोच..... यास्तव ही रचना ''काही च्या काही कविता'' मध्ये हलवत आहे.

आपल्या प्रतिसादाबद्दल खूप आभार. Happy

<<उत्तरेचे, दक्षिणेचे,रंक आणि राव येथे
शोधुनीही सापडेना भारताचे नाव येथे<<<

दुर्दैवाने ही सत्य परिस्थिती आहे...! Sad
डॉक. उत्तम शब्दात मान्डलत!!!