अजित पवारांनी केलेले वक्तव्य महाराष्ट्रमनाला झोंबले व जिव्हारी लागले. माफीनामा सादर करणे हे त्यांना महाराष्ट्रमनाची पुरेशी मलमपट्टी केल्यासारखे वाटत असावे. शरद पवारांचीही मान शरमेने खाली गेली असे हे वक्तव्य व त्याची बोच नुसत्या माफीनाम्याने का विसरावी असे कोणालाही वाटेल. खुद्द दैनिक सकाळने अग्रलेख, चारोळी, खिडकी विनोद या सदरान्वये अजित पवारांवर तोंडसुख घेणे, त्यांची खिल्ली उडवणे हे सर्व केलेले आहे. या प्रसंगी सर्व विरोधक एक झाल्याचेही दिसून येत आहे. वर्षानुवर्षे अथक परिश्रम, पक्षफोड आणि नोटावाटपाच्या जोरावर मिळालेले राजकीय स्थान अश्या एखाद्या वाक्याने उद्ध्वस्त होऊ शकते हे स्वतः शरद पवारांनाही त्यांच्या कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर अनुभवायला मिळत आहे. राष्ट्रपती संपूर्ण देशाला महाराष्ट्राची तहान भागवण्यासाठी कंबर कसून उभे राहा असे आवाहन करत असताना अजितदादांनी आपल्या हक्काच्या, घरच्या मतदारांच्या मनाचाही विचार केलेला दिसत नाही.
दुसरीकडे अत्यंत बेताल आणि स्वस्त, सवंग विधाने करून राजसाहेबांनी खेचलेली लाखोंची गर्दी मतदारांमध्ये रुपांतरीत होत नाही हे त्यांना स्वतःलाही समजलेले असावे. विशेष काहीही कामगिरी न करता बेताल व चमकदार विधाने करणे, खिल्ली उडवणे व नकला करणे यातून फार तर एका ठिकाणी किती माणसे जमू शकतात याचे रेकॉर्ड करता येईल. मनसेबाबत तर काही बोलणेच धाडसाचे आहे कारण तसे बोलणार्याला स्वतःच्याच जिवाची भीती वाटावी.
त्याचवेळी लक्ष्मण माने पोलिसांसमोर प्रकट झाले आहेत आणि हासत हासत तस्वीरी देत आहेत. संतोष मानेसाठी जाहीर झालेली फाशीची शिक्षा कोणालाही पुरेशी वाटत नसून त्यायोगे काही व्यापक सुधारणांची पायाभरणी होईल याचीही मुळीच शाश्वती वाटत नाही आहे. राजीव गांधींचे नांव पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय व्यवहारातील भ्रष्टाचारात आलेले आहे. या शेवटच्या तीन घडामोडी पहिल्याच पानावर झळकत असल्याने केवळ येथे यादीत दिल्या इतकेच.
चर्चाप्रस्ताव -
दिनांक १६ डिसेंबर २०१२ पासून एकुणच आत्यंतिक चीड आणणार्या घटना एकापाठोपाठ एक घडत आहेत. तरीही जनतेच्या हातात मतदान करणे, न करणे, रस्त्यावर उतरून आंदोलन करणे याशिवाय काही विशेष नाहीच आहे व ते घटनेबरहुकूम असल्याने तेच योग्यही आहे असेच सर्वांना वाटत आहे.
'बदल घडवून आणण्याची संधी'च मुळी पाच वर्षांनी मिळते, अश्या लोकशाहीत या अश्या वरील प्रकारच्या घटना, दुर्घटना आणि अन्याय्य बाबींना काही ठाम उत्तरे असतील अशी अपेक्षा कशी ठेवायची? की लोकशाहीच्या नावाखाली आपणच आपल्याला फसवून मोठे न्याय्य शासनप्रणाली अवलंबिणारे समजत आहोत?
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
लिंबुला अनुमोदन !
लिंबुला अनुमोदन ! माझ्याकडुनही त्या पोष्टीचा निषेध !!
लिंबुदा निषेध वगैरे करा
लिंबुदा
निषेध वगैरे करा बिनधास्त. लोकशाहीत हक्कच आहे तो. पण ब्राह्मणद्वेष , असत्यकथन, वीषपेरनी (विषप्रेरणी हवंय का?) हे कसं काय हे सांगाल का ? म्हणजे पेशव्यांच्या काळात वतनं, इनामं, देशमुख्या दिल्या गेल्या नाहीत का ? तसं असेल तर मी माझं विधान मागे घ्यायला तयार आहे. इतकंच नाहि तर बिनशर्त माफीही मागायला तयार आहे.
माझ्या माहितीप्रमाणे महाराजांनतर संभाजी महाराज तर पकडले गेले, राजाराम महाराजांच्या मागे औरंगजेब मोठं सैन्य घेऊन लागल्याने त्यांना कारभार पाहण्यास वेळ मिळाला नसावा, राण्यांच्या कारकिर्दीबद्दल तसंही इतिहासात नोंद घेण्यासारखं काही नाही. त्यानंतर सत्ता पेशव्यांकडंच आली ना ? यात ब्राह्मणद्वेष कसा काय दिसला ? अशाने काहीच लिहीणं अशक्य होईल. उपमुख्यमंत्र्यांच्या विधानाचा निषेध करायचा तर मराठा द्वेष, बाळासाहेबांच्या विधानाबद्दल काही बोलावं तर सीकेपीद्वेष, छगन भुजबळांच्या विधानाचा निषेध करावा तर माळीद्वेष असे शब्द सर्रास रूढ होतील. मी फक्त पेशव्यांनी दिलेल्या इनामांबद्दल बोललोय.
Kiran..., आपला इथला संदेश
Kiran...,
आपला इथला संदेश वाचला.
१.
>> मानलं या पोस्टसाठी. नाहीतर या धाग्यावर लिहायची इच्छा नव्हती.
हा माझा गौरव आहे. त्याबद्दल धन्यवाद!
२.
>> पण आपण डेमोक्रेटीक या शब्दाचा अनुवाद लोकशाही असा केला ..
अनुवाद केलेला शब्द डेमोक्रेटीक नसून डेमोक्रसी हा आहे.
डेमोक्रसी म्हणजे काय ते कृपया इथे पहा : http://www.khandbahale.com/englishmarathi-q-democracy.htm
रिपब्लिक म्हणजे काय ते कृपया इथे पहा : http://www.khandbahale.com/englishmarathi-q-republic.htm
वरील दोन्ही अर्थ राज्यशास्त्राच्या प्राथमिक पुस्तकात सापडतील. त्याकरिता मला जबाबदार धरू नये.
३.
>> ..आणि त्या शब्दाच्या रुपांना भुलून नाही नाही ती विमानं उडवत बसतो असं नाही का वाटत ?
नाही वाटंत. कारणे देतो :
का.१. : अमेरिकी राज्यघटनेत डेमोक्रसी आणि रिपब्लिक या दोन संज्ञांचा अर्थ विभिन्न आहे.
का.२. : भारतीय लोकशाहीचं प्रारूप (मॉडेल) ब्रिटनमधील संसदीय लोकशाहीचं आहे. तुम्ही UK मध्ये राहता, तर एक नजर लंडनकडे टाका. तुम्हाला दिसेल की ब्रिटीश राज्यपद्धती "घटनात्मक राजेशाही" ( = constitutional monarchy) आहे. मात्र भारताची संघराज्यपद्धती थोडीफार (Federal Government structure) अमेरिकी संघ्रज्याच्या वळणावर जाते.
का.३. : मर्यादांची निश्चिती झालेली बरी असते.
३.
>> मग भाबडे असल्यासारखे भोळसट असल्यासारखे प्रश्न विचारायचेच कशाला ? तळं राखील तो पाणी
>> चाखील हे लहान मुलांनाही माहीत असतंच कि.
यात भाबडा प्रश्न कुठे दिसतो तुम्हाला? त्यातूनही दिसलाच तर 'बळी तो कान पिळी' म्हणून स्वस्थ बसावं. नाहीतरी तळे राखील तो पाणी चाखील हे लहान मुलांनाही माहीत असतंच की!
४.
>> आणि लोकशाही नसेल तर दुसरी कुठली शाही न्याय मिळवून देणार आहे ?
न्याय मिळवून देण्यासाठी अगोदर अन्याय घडावा लागतो. हा अन्यायच जर होऊन दिला नाही तर बरेच प्रश्न आपोआप सुटतील. याकरिता सत्ताधार्याने स्वत:ला प्रजेचा मालक न समजता विश्वस्त मानलं पाहिजे.
५.
>> पेशव्यांनी तो निकाल निकालात काढून आपल्या जवळच्या हुज-यांना, खुषमस्क-यांना वतनं दिलीच ना ?
याचा अर्थ पेशव्यांचं राज्य प्रजासत्ताक नव्हतं. वाटल्यास चर्चेसाठी वेगळा धागा काढावा असं सुचवेन.
६.
>> सत्ताकेंद्राच्या जवळचे लोक आपल्यासारख्यांना सत्तेच्या नावाने खडे फोडणारे म्हणून हिणवतात,
>> काँग्रेसचं सरकार असताना धरणं कधी भरायची याचे पर्यायी मार्ग सुचवले जातात तर भाजपचे
>> सरकार असताना त्यांच्याविरुद्ध गळे काढणा-यांना थेट देशद्रोही म्हणूनच संबोधलं जातं. काही वेळा
>> उत्साहाच्या भरात इतकी वर्षे त्यांनी खाल्लं मग आता आम्ही खाल्लं तर काय बिघडलं अशीही विधानं
>> होतात, झक मारली नि पुरस्कार दिला अशीही होतात.
हे राजकीय मतप्रदर्शन आहे. तस्मात याचा मूळ विषयाशी संबंध नाही. 'काँग्रेस आणि भाजप यांनी मारलेली झक' असा वेगळा धागा काढल्यास बरं पडेल.
७.
>> चालायचंच. आपला तो बाब्या !
कृपया बाब्या कोण आणि कार्टं कोण हे स्पष्ट करावे.
आ.न.,
-गा.पै.
हाय्ला पैलवानाचं गुडघ्यात
हाय्ला पैलवानाचं गुडघ्यात अस्तंय म्हंतात त्येच बरूबर.
ओ पैलवान त्ये तुमास्नी न्हाई बोलून र्हायले वो.. नगा कीबोर्डं बदडू.
इब्लिस, >> हाय्ला पैलवानाचं
इब्लिस,
>> हाय्ला पैलवानाचं गुडघ्यात अस्तंय म्हंतात त्येच बरूबर.
>> ओ पैलवान त्ये तुमास्नी न्हाई बोलून र्हायले वो.. नगा कीबोर्डं बदडू.
मला वाटतं की मलाच उद्देशून लिहिलेलं आहे.
चूभूदेघे.
आ.न.,
-गा.पै.
गा पै, अहो लेकी बोले सुने
गा पै,

अहो लेकी बोले सुने लागे अशी युक्ती / उक्ती कुणा व्यक्तीने वापरलेली तुम्ही पाहीलीच नाहिये का? तुम्हाला काँटेक्श्टा ठाऊक नसल्याने असे बोलताहात, की उगा ठाऊक नसल्याचा आव आणता आहात
आ.उ.
इब्लिस.
गा पै मी इब्लीस याच्याशी सहमत
गा पै
मी इब्लीस याच्याशी सहमत आहे. पहिलं वाक्य आणि लोकशाहीची व्याख्या इतकाच तुमच्यासाठी संदेश होता. तुम्ही पोस्ट नीट वाचलीत तर तुमच्या पोस्टशी इतर मजकूराचा संबंध नसल्याचे दिसून येते. मला स्वतःचं मतप्रदर्शन करायला स्कोप राहूं द्या कि. तुम्हाला उत्तर द्यायला कधी नै म्हटलंय ?
च्यायला, झाले का वैयक्तिक
च्यायला, झाले का वैयक्तिक टीका, ब्राह्मण, अब्राह्मण सुरु!
माझे मतः हे प्रजासत्ताक, लोकशाही हे परकियांनी दिलेल्या पद्धतींचा अभ्यास करा, पण त्यातल्याच काही पद्धति वापरल्या पाहिजेत असे का? अहो, जेंव्हा जग जंगलात रहात होते तेंव्हा भारतानेच जगाला ज्ञान दिले, तत्वज्ञान, अर्थकारण, राजकारण, गणित इ. शिकवले, गूगल न वापरता, परदेशी विद्या अस्तित्वात सुद्धा नसताना! मग आताच हा झरा का आटला?
काही स्वतंत्र विचार करा -
१. भ्रष्टाचार कसा कमी करता येईल?
२. जिथे गरीब व अशिक्षित लोक फार मोठ्या प्रमाणात आहेत नि तसेच अति-श्रीमंत लोकहि आहेत, ज्ञानोपासना करणारे तसेच व्यापार करणारे आहेत, लढवय्ये आहेत, कलाकार आहेत तिथे असे लोकशाही, कम्युनिझम, सोशॅलिझम, कॅपिटॅलिझम यातली एकच पद्धत चालणार नाही.
पण काही नवीन पद्धत करायला हरकत नाही. आता पैसा आहे, शस्त्रात्रे आहेत नि हुषार लोक तर इतके की परदेशी पाठवून सुद्धा उरतातच! मग अडचण कुठली?
अशी पद्धत काढा की ज्यात अशिक्षित लोक सुशिक्षित होतील, गरीब लोकांना श्रीमंत व्हायची संधि उपलब्ध होईल, भ्रष्टाचार कमी होईल, स्वार्था ऐवजी देशप्रेम, देशाभिमान वाढीस लागेल असे काहीतरी करा. आता एव्हढी जनता आहे की त्यांच्या वजनाने भारत देश हळू हळू पाण्याखाली जायची वेळ आली आहे. म्हणजे असे अनेक जनसमुदाय करता येतील जे एकेक प्रश्नाचे उत्तर शोधून त्यावर काम करतील!
आता तुम्ही नुसतेच म्हणाल, उंटावरून शेळ्या हाकतो, तुम लढो, मैं कपडे सांभाळता हूं , तुम्ही अमेरिकेतले तुम्हाला काय कळते. हे सगळे बरोबर असल्याने मान्य करावेच लागेल.
मला निकालात काढणे अगदी सोपे आहे, पण तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी काय करत आहात?
ब्राह्मण, अब्राह्मण, भाजप, काँग्रेस, गांधी सावरकर असले वाद घालत बसणार? मग धादांत खोटी विधाने, वैयक्तिक निंदा, कुचाळकी?
अरे हो या प्रकारातल्या लोकांचाहि विचार करा नवीन पद्धतीत.
Democracy is the worst form
Democracy is the worst form of governance.
Until you try others.
लोकशाहीचे यश हे त्या
लोकशाहीचे यश हे त्या भूभागातील लोकांच्या कुवतीवर अवलंबून आहे. भारतासारख्या देशात अडाणी, अशिक्षित, मूर्ख, अविचारी लोकांची संख्या जास्त आहे आणि ह्या लोकसंख्येचा दर जास्त वेगात वाढतो आहे. त्यामुळे अशा मस्तवाल, स्वार्थी, भ्रष्ट नेत्यांची संख्याही वाढते आहे. सुशिक्षित घरातील कुटुंबाचा आकार आणि गरीब घरातील ह्याची तुलना करुन बघा.
बुद्धीवंत, विचारी लोकांना मते मिळवणे दिवसेंदिवस अवघड होत जाणार आहे. निवडणुकांकरता केला जाणारा खर्च हाही सामान्यांच्या आवाक्याबाहेरचा असल्यामुळे जे आधीच सत्तेत आहेत त्यांनाच सत्ता मिळवणे सोपे जाते. ह्या दुष्टचक्रावरही काही उपाय निघेल असे वाटत नाही.
एकीकडे शंभरची नोट, झोपडीची डागडुजी (व कायदेशीर दर्जा), एखादी बाटली, घोंगडी ह्या ऐवजावर गठ्ठ्याने मते विकत मिळत असतील आणि दुसरीकडे मूठभर बुद्धीवंत आपली वैचारिक भूमिका जाणून पूर्ण सारासारविचार करुन मगच मत देणार असतील तर नेता कुठली मते मिळवायचा प्रयत्न करेल?
इब्लिस, >> अहो लेकी बोले सुने
इब्लिस,
>> अहो लेकी बोले सुने लागे अशी युक्ती / उक्ती कुणा व्यक्तीने वापरलेली तुम्ही पाहीलीच नाहिये का?
>> तुम्हाला काँटेक्श्टा ठाऊक नसल्याने असे बोलताहात, की उगा ठाऊक नसल्याचा आव आणता आहात
काय हा सासुरवास इथे! म्हणे लेबोसुला!!
आ.न.,
-गा.पै.
Kiran... , >> पहिलं वाक्य आणि
Kiran... ,
>> पहिलं वाक्य आणि लोकशाहीची व्याख्या इतकाच तुमच्यासाठी संदेश होता. तुम्ही पोस्ट नीट वाचलीत

>> तर तुमच्या पोस्टशी इतर मजकूराचा संबंध नसल्याचे दिसून येते.
तुम्ही पण कमाल करता बुवा! एका वाक्यात तारीफ तर लगेच दुसर्या वाक्यात हजामत सुरू! मग हाताऐवजी लाथेनं शाबासकी दिल्यासारखं वाटणार नाहीका!
आ.न.,
-गा.पै.
मला निकालात काढणे अगदी सोपे
मला निकालात काढणे अगदी सोपे आहे, पण तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी काय करत आहात? >>>>>
ते तर अगदीच सोपं आहे. आम्हीही अमेरिकेचा रस्ता धरणार
आता तुम्ही म्हणाल पण तुमच्याकडे कुठाय बुद्धीमत्ता ?
तर आमचं उत्तर पंजाबातले सरदार नाही का जात टॅक्सी चालवायला ? त्यांचा दलेर मेहंदी तर आमचे अजय अतुल नाहीत का ? आंम्ही पण कबुतरबाजी करू पण अमेरिकेत जाऊच जाऊ.
मग तिथल्या फूटपाथवर शिव किंवा बराकवडापाव, जीफके पाणीपुरी इ, स्टॉल लावू. बायदवे , तिकडे पाणी आहे ना पुरीत घालायला ? नाहीतर उपमुख्यमंत्र्यांचा अमेरिका दौरा झाल्यावर येऊ
एका दिशेचा शोध ( संदीप
एका दिशेचा शोध ( संदीप वासलकर) वाचा..
बदल घडून येण्यासाठी तुम्ही आम्ही काय करु शकतो ते चांगलं मांडलं आहे...
पण तुमच्याकडे कुठाय
पण तुमच्याकडे कुठाय बुद्धीमत्ता ?
अरेच्च्या, मी असे कसे म्हणीन? मी तर नेहेमी सांगतो, मा़झ्यापेक्षा अनेक बुद्धिमान लोक भारतात होते, त्यांच्यासमोर मा़झा काय पाड लागणार? म्हणून मी आपला इकडे आलो. इथे कसे मस्त मज्जेत चालले आहे. ते सुद्धा मी ज्या काळात आलो त्या वेळी अमेरिकन ईंडियन वेगळे नि आपण वेगळे हे बर्याच लोकांना ठाउकच नव्हते. आता भारतीय म्हणजे हुषार हे ठरलेलेच. तेंव्हा काहीच अडचण नाही.
मला एक ५००० रु. जवळ नसल्याने कर्ज घ्यावे लागले. तुम्हाला काय, हजार कोटी रु. सहज असतील तुमच्याकडे. आजकाल कमीत कमी तेव्हढे पैसे भारतात सगळ्यांच्या कडे असतात म्हणे. चांगले पाच सहा लाखाचे फर्स्ट क्लास तिकीट काढा आरामात इथे या. न्यू यॉर्क ला उंची हॉटेलात काही दिवस राहून चैन करा. नोकरी काय मिळेलच! मग चैनच चैन!
एका दिशेचा शोध ( संदीप
एका दिशेचा शोध ( संदीप वासलकर) वाचा..>>>
नक्कीच वाचू. पण त्यांनी तरी ते पुस्तक भारतातच लिहीलंय ना ?
दुसरं म्हणजे मी अमेरिकेला झक्कीकाकांकडे चाललो आहे तेव्हां सगळे प्रश्न सुटलेच.
मग आम्ही दोघे मिळून भारतातल्या लोकांना इकडे अमेरिकेत कसं काय आहे आणि तुमच्याकडे काय आहे हे दाखवून देणार आणि तुम्ही तुमच्या देशासाठी काय करता हे विचारून गंमत बघत बसणार 
काका, हा मी निघालो.
नववर्षाच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा !
>>>> मी फक्त पेशव्यांनी
>>>> मी फक्त पेशव्यांनी दिलेल्या इनामांबद्दल बोललोय. <<<<
किरणभौ, वेड पान्घरुन पेडगावला जायचे ठरवल्यावर मी काय बोलणार?
पण तुम्ही "फक्त पेशव्यान्नी" दिलेल्या इनामांबद्दल बोलत असलात, तरी हे जाणूनबुजून वा सोईस्कररित्या विसरू पहाताय की पेशवे "सर्वसत्ताधीश" कधीच नव्हते, ते सातारच्या "छत्रपतींच्या" गादीचे सेवक होते, व प्रत्येक कृतीबाबत सातारच्या गादीस उत्तर देण्यास जबाबदार होते, सातारच्या "छत्रपतींच्या" गादीच्या संमतीविना एक पानही "हलवू" शकत नव्हते! हा इतिहास आहे.
अन आजही आमचे इमान वाहिले आहे ते सातारच्या छत्रपतींच्या गादीशीच! आमचा मुजरा तिथेच झडतो.
फक्त तुम्ही विसरू पहाता की पेशव्यान्ना नावे ठेवताना, पेशव्यान्चे जे "पोशिन्दे" त्या श्रीशिवछत्रपतीन्च्या वारस गादीचा देखिल तुम्हीच अपमान करता आहात.
दुसरे तथ्य असे की, जरी थोरल्या महाराजांनी वतने बन्द केली तरी तत्कालिक राजकीय परिस्थितीनुसार छत्रपती शाहूमहाराजान्ना पुन्हा परत आल्यावर काही प्रमाणात ती पुन्हा चालू करावि लागली, हा इतिहास आहे. इतिहासाचा अभ्यास थोडा वाढवा, बरे पडेल तुम्हाला.
तेव्हाची वतने गेली, पण हल्लीच्या असंख्य सरकारी "महामंडळान्च्या" संचालक सदस्यत्वाच्या/अध्याक्षाच्या रूपाने ती पुन्हा कोणी कोणाकरता रुजत घातली या वर्तमानी वतनान्चाही अभ्यास करालच! हो ना किरणभौ?
लिंबू दा माझा इतिहासाचाच काय
लिंबू दा
माझा इतिहासाचाच काय सगळाच अभ्यास कच्चा आहे हो. पेशव्यांनी कोल्हापूरच्या गादीस, तेव्हांचे शाहू महाराज यांना जास्त गडबड कराल तर अटकेत टाकू असा सज्जड दम भरल्याचे दस्तावेज असल्याचं ऐकिवात आणि वाचनातही आलंय. नागपूरच्या गादीस तर अर्धे शहाणे असलेल्या नाना फडणविसांनीही मागे जायला सांगितलं होतं याचे किस्से प्रसिद्ध आहेतच. पेशव्यांनीही नागपूरच्या गादीस अमूक एक गाव ओलांडू नये असा संदेश दिल्याचं कुठंतरी वाचलंय. या गाद्यांनी राज्यकारभार केला असं तर तुम्हाला सुचवायचं नाही ना ? तसं असेल तर आमचं अज्ञान दूर करावं ही नम्र विनंती.
आपण लोकशाहीमधे आहोत हे आपले
आपण लोकशाहीमधे आहोत हे आपले चांगले नशिब आहे.
कारण लोकशाहीमधे निदान उत्तरांकरता प्रश्न विचारण्याची मुभा तरी आहे.
शेंडेनक्षत्रास अनुमोदन.
शेंडेनक्षत्रास अनुमोदन. भारतात युनिव्हर्सल फ्रँचाइज सध्यातरी नकोच. मतदार होण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता, आयकरपात्र उत्पन्न अशा अटी हव्यातच. अनेक स्रिया आपल्या पतीच्या सांगण्याप्रमाणे मतदान करतात असे ऐकले आहे. तेव्हा स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळण्यासाठी पात्रता परीक्षा असावी. हे सगळे झाले तरच लोकशाहीला काही अर्थ आहे असे म्हणता येईल.
मतदान १८ व्या वर्षी सुरु होते
मतदान १८ व्या वर्षी सुरु होते ना? तुम्ही १८ वर्षाचे असताना इंकम ट्याक्स भरत होते का हो?
बायका ट्याक्स भरत नाहीत म्हणून त्यांची परिक्षा घ्यायची .... रिटायर लोक, अपंग लोक यांचे काय करायचे?
ट्याक्सेबल इंकम असले की लोकशाहीतील त्याला सगळे कळते, हे मात्र अफाट लॉकिज आहे.
झक्की | 9 April, 2013 -
झक्की | 9 April, 2013 - 18:49
... आता लोकशाही बद्दल जुन्या कल्पना किंवा लोकशाहीच असायला पाहिजे असा आग्रह धरण्यापेक्षा, भारताने जगाला एका वेगळ्याच आदर्श राज्यपद्धतीचे उदाहरण सिद्ध करून द्यावे.
इतकी वर्षे परकीय पद्धति वापरून काही कुणाचे समाधान नाही. तक्रारी आहेतच. मग आता स्वतःचीच अक्कल चालवावी.
<<
यात आदर्श हा शब्द टाकला तर मी पूर्ण सहमत.
मतदार होण्यासाठी किमान
मतदार होण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता, आयकरपात्र उत्पन्न अशा अटी हव्यातच. अनेक स्रिया आपल्या पतीच्या सांगण्याप्रमाणे मतदान करतात असे ऐकले आहे. तेव्हा स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळण्यासाठी पात्रता परीक्षा असावी.>>> आं??? म्हणजे जे अशिक्षित आहेत, जे बीपीएल आहेत त्यांना मतदानाचा हक्क नाही???? हे अत्यंत धोकादायक आणि चुकीचे ठरेल कारण मतदान हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा मूलभूत हक्क आहे आणि यामधे जात, लिंग, वंश, शिक्षण/उत्पन्न पात्रता यांवरून कसलाही भेदभाव बाळगला जाऊ नये. असे करणे म्हणजे भारताच्या राज्यघटनेच्या विरोधात जाणे होत नाही का?
स्त्रियांची पात्रतापरीक्षा म्हणजे काय घेणार आहात? आणि त्याचे रीझल्ट्स कशाच्या जोरावर ठरवणार? आणि त्यानंतर ती स्त्री मतदानाला पात्र ठरल्यावरदेखील पतीच्या सांगन्यावरून मतदान करणार नाही याची तुम्ही खात्री देणार आहात का?
उगाच काहीही लिहत सुटायचे.
मयेकर साहेब, आपण इटालिक करून
मयेकर साहेब,
आपण इटालिक करून लिहिले आहे ते आपले मत आहे, की कुणाचे कॉपीपेस्ट केले आहे?
टॅक्सेबल इन्कम असेल तरच मतदान
टॅक्सेबल इन्कम असेल तरच मतदान हे मी विशिष्ट विचारसरणीच्या लोकांकडून ऐकलेले आहे. या ना त्या मार्गाने अडथळा वाटणारे मतदार दूर करणे हे स्वप्नरंजन त्यामागे आहे. टॅक्सेबल असलं तरी इन्कम आहे म्हणून टॅक्स भरावा लागतोय. सर्वांना टॅक्सेबल इन्कम असेल तेव्हां ही अट ठेवायला हरकत नसावी. आज या मार्गाचा स्विकार केला कि अमूक एक टॅक्स मर्यादेच्या पुढे इन्कम असणा-यांनाच मतदानाचा हक्क अशी मागणी आली तर आश्चर्य नको वाटायला.
देशाच्या उत्पन्नाच्या ८० टक्के उत्पन्न हे फक्त पंधरा घराण्यांकडे आहे असं पंधरा एक वर्षांपूर्वीचं चित्र होतं. आजचं माहीत नाही. पण पंधराची पंधराशे घराणी झाली तरी असं मूठभरांच्या हाती उत्पन्न एकवटलेलं असणं, त्यांचीच नावं सर्व प्रकारच्या स्कॅम मधे येणं, त्यांनाच सगळे कॉण्त्रॅक्ट्स मिळणं यावर चर्चा व्हायला हवी. याच लोकांकडे मतदानाचा हक्क गेला तर काय सावळागोंधळ होईल याची कल्पना आहे का ?
किमान ज्यांना गाढव, अशिक्षित, मूर्ख म्हटलं गेलंय त्यांना असलेल्या मतदानाच्या हक्काने या मंडळींना थोडा का होईना चाप लागलेला आहे. पाच वर्षांनी का होईना त्यांच्याकडे भीक मागायला जावं लागतंय हे ही नसे थोडके. गरज असेल तर मतदारांच्या जागृतीची. त्यावर पुन्हा कधी तरी बोलू.
आपल्या पतीच्या
आपल्या पतीच्या सांगण्याप्रमाणे मतदान करतात असे ऐकले आहे. तेव्हा स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळण्यासाठी पात्रता परीक्षा असावी.
असे लिहिण्याला तुमच्या पत्नीची परवानगी आहे का तुम्हाला?
नसेल नि हिम्मत असेल तर हे आपल्या पत्नीला दाखवा.
नि कानफटात खायची तयारी असेल, तर बहिण, आई यांना दाखवा!
यात आदर्श हा शब्द टाकला तर मी पूर्ण सहमत.
बरोबर. पहिल्या फटक्यात सगळे आदर्श, लोकप्रिय होईल हे शक्यच नाही. त्यासाठी नेटाने प्रयत्न करावे लागतात.
भारतात पूर्वी राजेशाही होती. कम्युनिझम नको म्हणून सोशॅलिझम पत्करला. १९९० पर्यंत समजले हे काही बरोबर नाही. मग सध्याची परिस्थिती आली. अजून लोक समाधानी नाहीत. मग काही तरी वेगळेच पाहिजे. बरे लोकशाही दोन प्रकारची - अमेरिकन, ब्रिटिश. आपण ब्रिटिश स्वीकारली. आता घटना बदलून अमेरिकन करून बघा. त्यात सुधारणेला भरपूर जागा आहे. हुषार भारतीय तसे करतीलच.
आपल्या पतीच्या
आपल्या पतीच्या सांगण्याप्रमाणे मतदान करतात
<<
अनेक सूज्ञ मतदार त्यांच्या नेत्याच्या सांगण्या प्रमाणे मतदान करतात, असेही ऐकून आहे. डोळ्याला पट्टी बांधून रँडम (शिक्के मारणे) बटणे दाबणे असे मतदान प्रक्रियेत अपेक्षित नसावे.
कुणीतरी सांगतो आहे, त्यावर विश्वास ठेऊनच ९९% मतदान केले जाते.
पतीच्या सांगण्याप्रमाणे मतदान
पतीच्या सांगण्याप्रमाणे मतदान करतात असे ऐकले आहे. तेव्हा स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळण्यासाठी पात्रता परीक्षा असावी.
----- बंधन नाही म्हणुन काय वाट्टेल ते लिहायचे ?
अशी परिक्षा कोण घेणार? आणि पात्रता निकष काय असतील ?
हे प्रतिसाद शेंडेनक्षत्राच्या
हे प्रतिसाद शेंडेनक्षत्राच्या प्रतिसादानंतर का नाही आले?
तिरक्या अक्षरांत लिहिले तरी कळू नये? आँ?
इब्लिस, तुम्ही एकटेच हो "दुसरीकडे मूठभर बुद्धीवंत आपली वैचारिक भूमिका जाणून पूर्ण सारासारविचार करुन मगच मत देणार": या कॅटेगरीतले.
>>>> लोकशाहीचे यश .... तर
>>>> लोकशाहीचे यश .... तर नेता कुठली मते मिळवायचा प्रयत्न करेल? <<<<
शेन्डेनक्षत्र, या सम्पुर्ण पोस्ट मधे व्यक्त केलेली परिस्थिती वास्तवात आहे यास अनुमोदन. मते विकत घेतली जातात, विकत घेण्याकरता पाच वर्षात बेगमी केली जाते, ऐन निवडणू़कीत "धाकदपटशा/लालूच/पेड अपप्रचार" इत्यादी सर्व मार्ग अनुसरले जातात हे उघड गुपित आहे.
पण परिस्थिती बदलत रहाते. न पेक्षा इतक्या विषारी विरोधी प्रचारानन्तरही मोदी गुजराथेत सत्तेवर रहाते ना! अन अशी उदाहरणे बघितली कीच आशेला जागा आहे असे वाटत रहाते.
Pages