लोकशाहीत नक्की उत्तरे आहेत का?

Submitted by बेफ़िकीर on 8 April, 2013 - 23:45

अजित पवारांनी केलेले वक्तव्य महाराष्ट्रमनाला झोंबले व जिव्हारी लागले. माफीनामा सादर करणे हे त्यांना महाराष्ट्रमनाची पुरेशी मलमपट्टी केल्यासारखे वाटत असावे. शरद पवारांचीही मान शरमेने खाली गेली असे हे वक्तव्य व त्याची बोच नुसत्या माफीनाम्याने का विसरावी असे कोणालाही वाटेल. खुद्द दैनिक सकाळने अग्रलेख, चारोळी, खिडकी विनोद या सदरान्वये अजित पवारांवर तोंडसुख घेणे, त्यांची खिल्ली उडवणे हे सर्व केलेले आहे. या प्रसंगी सर्व विरोधक एक झाल्याचेही दिसून येत आहे. वर्षानुवर्षे अथक परिश्रम, पक्षफोड आणि नोटावाटपाच्या जोरावर मिळालेले राजकीय स्थान अश्या एखाद्या वाक्याने उद्ध्वस्त होऊ शकते हे स्वतः शरद पवारांनाही त्यांच्या कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर अनुभवायला मिळत आहे. राष्ट्रपती संपूर्ण देशाला महाराष्ट्राची तहान भागवण्यासाठी कंबर कसून उभे राहा असे आवाहन करत असताना अजितदादांनी आपल्या हक्काच्या, घरच्या मतदारांच्या मनाचाही विचार केलेला दिसत नाही.

दुसरीकडे अत्यंत बेताल आणि स्वस्त, सवंग विधाने करून राजसाहेबांनी खेचलेली लाखोंची गर्दी मतदारांमध्ये रुपांतरीत होत नाही हे त्यांना स्वतःलाही समजलेले असावे. विशेष काहीही कामगिरी न करता बेताल व चमकदार विधाने करणे, खिल्ली उडवणे व नकला करणे यातून फार तर एका ठिकाणी किती माणसे जमू शकतात याचे रेकॉर्ड करता येईल. मनसेबाबत तर काही बोलणेच धाडसाचे आहे कारण तसे बोलणार्‍याला स्वतःच्याच जिवाची भीती वाटावी.

त्याचवेळी लक्ष्मण माने पोलिसांसमोर प्रकट झाले आहेत आणि हासत हासत तस्वीरी देत आहेत. संतोष मानेसाठी जाहीर झालेली फाशीची शिक्षा कोणालाही पुरेशी वाटत नसून त्यायोगे काही व्यापक सुधारणांची पायाभरणी होईल याचीही मुळीच शाश्वती वाटत नाही आहे. राजीव गांधींचे नांव पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय व्यवहारातील भ्रष्टाचारात आलेले आहे. या शेवटच्या तीन घडामोडी पहिल्याच पानावर झळकत असल्याने केवळ येथे यादीत दिल्या इतकेच.

चर्चाप्रस्ताव -

दिनांक १६ डिसेंबर २०१२ पासून एकुणच आत्यंतिक चीड आणणार्‍या घटना एकापाठोपाठ एक घडत आहेत. तरीही जनतेच्या हातात मतदान करणे, न करणे, रस्त्यावर उतरून आंदोलन करणे याशिवाय काही विशेष नाहीच आहे व ते घटनेबरहुकूम असल्याने तेच योग्यही आहे असेच सर्वांना वाटत आहे.

'बदल घडवून आणण्याची संधी'च मुळी पाच वर्षांनी मिळते, अश्या लोकशाहीत या अश्या वरील प्रकारच्या घटना, दुर्घटना आणि अन्याय्य बाबींना काही ठाम उत्तरे असतील अशी अपेक्षा कशी ठेवायची? की लोकशाहीच्या नावाखाली आपणच आपल्याला फसवून मोठे न्याय्य शासनप्रणाली अवलंबिणारे समजत आहोत?

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हं. इटॅलिक म्हण्जे कॉपी पेस्ट नसून तो तिरकसपणे लिहिलेला प्रतिसाद आहे तर.

अन आम्ही त्या उरलेल्या एक टक्क्यात हो. " बाद होणारी मते" Proud

हो Wink
अन नसेल स्पष्ट लिहिता येत, तर पैलवानांसाठी खाली टीपा देखिल लिहाव्यात..
उदा. हा प्रतिसाद लेबोसुला आहे. किंवा हा प्रतिसाद तिरकस आहे, इ. 24.gif

पैलवान, दिवे घ्या.

लोकशाही ही प्रक्रिया जनसामान्यासाठी बिनखर्चाची असली तरी वेळखाऊ आहे. एखादा नेता बेताल वागतो म्हणजे लोकाशाहीच बरोबर नाही असा अर्थ काढणे बरोबर नाही असे माझे मत आहे.

लाल कृष्ण आडवानी यांच्या मी स्वतः ऐकलेल्या भाषणाचा भाग.

" मला लोक विचारतात की भारतात अनेक लोक अशिक्षीत आहेत ते स्वतः ची मते कशी बनवतात ? मी त्यांना सांगतो की भारतीय जनता ही शंकरासारखी आहे. जेव्हा लोकशाही धोक्यात येते तेव्हा लोक हुकुमशहाला फेकुन देतात उदा. १९७७ साली झालेला मा. इंदीरा गांधी यांचापराव्भव.

थांबा वेळ येऊ द्या सगळे जातील पण वानवा आहे ते त्यांची जागा घेणारअया चांगल्या लोकांची

महोदय,
>>
" मला लोक विचारतात की भारतात अनेक लोक अशिक्षीत आहेत ते स्वतःची मते कशी बनवतात ? मी त्यांना सांगतो की भारतीय जनता ही शंकरासारखी आहे. जेव्हा लोकशाही धोक्यात येते तेव्हा लोक हुकुमशहाला फेकुन देतात उदा. १९७७ साली झालेला मा. इंदीरा गांधी यांचापराव्भव.
<<
हे आपण क्वोट केलंत म्हणून आपण ही उपमा स्पष्ट कराल अशी आशा करतो (असेही मा. आडवाणी यांना मी कसा विचारायला जाणार?)

शंकरा सारखी = लोकशाही(सुष्ट शक्ति?) धोक्यात आल्यावर हुकुमशहाला(दुष्ट शक्ती?=दैत्य?) फेकून देणे हा संबंध लक्षात आला नाही. ते पुराणांत (कि कुठेतरी. चूभूद्याघ्या) लिहिल्याप्रमाणे पृथ्वीवर दैत्य माजले की अवतार घेणे हे शंकररावांचे नसून विष्णूपंतांचे काम होते असे ऐकून होतो.

पण मा. आडवाणी यांनी शंकराची उपमा दिली या पाठी काय लॉजिक असावे हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. नुसताच 'भोळा शंकर' तसे 'भोळी जनता' इ. प्रतिक आहे की काय?

(टीपः हा खराखुरा भाप्र प्रतिसाद आहे.)
(उपटीपः भाप्र=भाबडा प्रश्न)
(तळटीपः प्रतिसाद नितिनचंद्रांना उद्देशून आहे, पण टीपा मात्र पैलवानांसाठी आहेत)

ता.क.
मतदारांनी स्वतःची मते कशी बनवावीत या प्रक्रियेत शंकर असण्याच्या उपमेचा संबंध लक्षात न आल्याने मी विचारले, की प्रतिक कशा अर्थाने निर्णयप्रक्रियेचे वर्णन करते?
(ता.क. टीप : मा. आडवाणी यांना न विचारता आल्याने नितिनचंद्रांना उद्देशून प्रतिसाद आहे)

>>> प्रतिसाद नितिनचंद्रांना उद्देशून आहे <<< म्हणूनच मी काही बोलत लिहित नाही! ( जरी मी रुद्रस्वरुपी श्रीशन्कराचा महाभक्त असलो तरीही Proud मी जर खरोखरी रुद्रोपासक असेन तर मला वेळ येताच कोणतीही पाटी पुसून टाकायला वा फोडून नष्टच करुन टाकायला काहीही वाटणार नाही! Proud जसे की १९७७ मधे पाटी साफ झालेली! पण पुन्हा अडवाणिन्ची उपमा शन्कराची आहे, रुद्राची नाही, शन्कर भोळा, सबब लग्गेच पुढल्या दोन वर्षातच शन्कराने जसे अनेक असूर पोसले/वाढवले, तस्सेच या जन्तेने कॉन्ग्रेस पोसली/वाढवली आहे! Lol )

मा इब्लिस,

हे सर्व मुळ लेखाला धरुन होते. आडवानींना विचारयला आपण जाऊच शकत नाही. राजकिय नेते हे फक्त हवा घालवायला बोलत नाहीत ते विचारवंत आणि द्र्ष्टे असतात असा माझा समज आहे.

थोर नेते दिग्वीजय सिंग या लाईनीत बसतात की नाही याबाबत मला माहित नाही.

पण अश्या दृष्ट्या नेत्यांमध्ये कॉग्रेसचे पण नेते आहेत हे माझे मत खात्रीचे आहे.

लोकशाहीच्या उपयुक्ततेबाबत नोकरी करुन पोट भरणार्‍या माझ्यासारख्या पामरने काही लिहणे उचीत नाही यास्तव अडवानीजींच्या भाषनाचा संदर्भ दिला होता.

लोकांनी जनता पक्शाला का नाकारले हा संदर्भ वेगळा असुन इंदिरा गांधी पदल्या हे सत्य पुसले जाऊ शकत नाही.

भारतात लोकशाही आहे म्हणुन त्याची किंमत नाही.
कम्युनिस्ट किंवा डीक्टेक्टरशीप असलेल्या देशात रहायला गेलात तर लोकशाहीचे महत्व कळेल.
भारतात पार्लमेंट/ असेंब्ली, ज्युडीशिअल सिस्टिम ,संविधानीक आस्थापणे या व्यवस्था वेगवेगळ्या आणि एकमेकांपासुन अलिप्त आहेत हे आपले नशिब आहे. पुन्हा पत्रकारिता बर्यापैंकी अनबायस्ड आहे.
बेफिकीरसारख्यांनी हुकुमशाही असलेल्या देशात जावे व सुखी रहावे

हेलबॉय,

१.
>> भारतात पार्लमेंट/ असेंब्ली, ज्युडीशिअल सिस्टिम ,संविधानीक आस्थापणे या व्यवस्था वेगवेगळ्या
>> आणि एकमेकांपासुन अलिप्त आहेत हे आपले नशिब आहे

याचा लोकशाहीशी संबंध नाही. ही सगळी प्रजासत्ताकाची देणगी आहे.

२.
>> पुन्हा पत्रकारिता बर्यापैंकी अनबायस्ड आहे.

बर्‍यापैकी हे कीशेषण चिकटवलंय म्हणून अनुमोदन. मात्र ढोंगी व एकांगी पत्रकारिता मिरवत आहे तर सत्यनिष्ठ पत्रकारितेचा आवाज फारच बारीक आहे.

३.
>> बेफिकीरसारख्यांनी हुकुमशाही असलेल्या देशात जावे व सुखी रहावे

कोणी स्वत:हून सुखासुखी हुकूमशाही देशात जाऊन रहात नाही. सर्वात बदनाम हुकूमशहा हिटलर हा लोकशाही मार्गाने सत्तेवर आला होता, हे आपण कधीही विसरता कामा नये.

४.
>> भारतात लोकशाही आहे म्हणुन त्याची किंमत नाही.
>> कम्युनिस्ट किंवा डीक्टेक्टरशीप असलेल्या देशात रहायला गेलात तर लोकशाहीचे महत्व कळेल.

लोकशाहीच्या जागी प्रजासत्ताक हा शब्द घातल्यास माझं अनुमोदन.

आ.न.,
-गा.पै.

>> तिरक्या अक्षरांत लिहिले तरी कळू नये? आँ?

अहो मायबोलीवर लिहिणार्‍यांना इतके कळण्याची अक्कल नसते, हे तुमच्या अजून लक्षात आले नाही? किती वर्षे आहात मायबोलीवर? किती चर्चा केल्यात?

उगाच कुणाची अक्कल काय आहे याचा विचार करण्यापेक्षा, आपले सत्य मत लिहावे. अर्थात ते सत्यावर आधारित नसले तरी चालते इथे. बर्‍याच लोकांची नसतातच.
Proud Light 1

पण अश्या दृष्ट्या नेत्यांमध्ये कॉग्रेसचे पण नेते आहेत हे माझे मत खात्रीचे आहे.>>>

नितीनचंद्र यांच्या या वाक्याने लक्ष वेधून घेतलं. खूप छान लिहीलंत. बरेचसे राजकिय नेते हे तथाकथित तज्ञांपेक्षा शहाणे असतात हे संसदेत वेळोवेळी झालेल्या चर्चेत दिसून आलेले आहे. शरद यादव, लालूप्रसाद यादव या नेत्यांची मेडीया काहीही इमेज करो, समोरासमोरच्या चर्चेत असे नथीतून वार करणारे टिकत नाहीत असा अनुभव आहे. कुणाच्याही भ्रष्टाचाराचे समर्थन करायचे नाही, पण काही लोकांचा भ्रष्टाचार हा जन्मसिद्ध हक्क असल्यासारखे त्यांच्याविरुद्ध वातावरण तापवले जात नाही जितके चाराघोटाळ्याबाबत झाले. त्या आधी पंडीत सुखदेव शर्मा यांच्या घराच्या बाथरूमच्या छतातून आणि भिंतीतूनही नोटांची बरसात होऊनही ते भाजपचे पाठीराखे झाल्याबरोबर पवित्र झाले. जयललिता यांचे चिलखत लोखंडी आहे कि सोन्याचे अशी शंका यावी इतकी माया त्यांनी गोळा करूनही त्यांच्याबाबत गोड गाणी गाण्यात भाजप मग्न आहे. काँग्रेसच्या तर कुठल्याही मेंब्राला आजवर शिक्षा झालेली नाही. याचा अर्थ काँग्रेस धुतल्या तांदळासारखी आहे असा काढायचा कि काय ? आणि हेच लोक सीबीआयचा वापर छोट्या पक्षांविरुद्ध करतात तेव्हां त्यांचे मेडीयातले पेड एजंट गहजब सुरू करतात हे अडाणीच कशाला सुशिक्षित जनतेलाही कळत नाही. इथेच असं नाही तर झक्कीकाकांच्या अमेरिकेतही असंच असतं. सद्दाम अमेरिकेला हवा असेल तेव्हा सद्दामच्या बाजूचं वातावरण, नको असेल तेव्हां तोच क्रूरकर्मा. सद्दामला फाशी दिल्याबद्दल मोठमोठे लेख तिकडेही छापून येतात आणि तो निर्दोष आहे असं जेव्हां कागदोपत्री सिद्ध होतं तेव्हां मेडीया आपण त्या गावचेच नाही असं दाखवत भैरवी आळवत बसतात.

खरी मेख आहे ती मूठभर घराणी आणि राजकारण्यांच्या कनेक्शनची. अंबानींचं हेलिकॉप्टर न वापरलेले नेते म्हणून सर्व प्रकारचे कम्युनिस्ट, चंद्रशेखर, सुब्रह्मण्यम स्वामी, शरद यादव, लालूप्रसाद यादव आणि मायावती यांचं नाव घ्यावं लागेल. हेलिकॉप्टरचा वापर हे हिमनगाचं टोक असू शकतं. अशी कृपादृष्टी झाल्यावर राज्यकारभार कोण हाकणार हे उघडच आहे. या कॉर्पेरेट हाऊसच्या मर्जीने चालणारे २४ X ७ चॅनेल्स, प्रिंट मेडीया आणि सरकार, विरोधी पक्ष ही लोकशाहीला लागलेली कीड आहे. या कीडीचा बंदोबस्त न करता मतदानाचा अधिकार काढून घेणे वगैरे उपाय कोण आणि कुणासाठी करणार आहे हे उघड आहे.

या औद्योगिक घराण्यांमुळे देशात सुबत्ता आली असंही म्हटलं जातं. मी एक फॅण्टास्टिक स्टॅटिस्टिक मध्यंतरी वाचलं होतं. इथं केवळ गप्पांच्या ओघात देतोय. लिंक वगैरे देणं शक्य नाही. तर या रिपोर्ट मधे देशातील बँका आणि इतर आर्थिक संस्थांचे पैसे बुडीत खात्यात जमा होतात त्याचं विश्लेषण दिलं होतं. याच मूठभर लोकांच्या प्रोजेक्टमधे हे एनपीए आहेत. यांच्या कुठल्याही प्रोजेक्टमधे त्यांचे स्वतःचे पैसे किती आणि सरकारी वित्तीय संस्थांचे किती हे देखील पुन्हा एकदा अभ्यास करून इथं द्यायला हवंय. कष्टकरी, शेतकरी यांना पंचवीस हजारांचं कर्ज द्यायलाही या बँका किती खळखळ करतात हे देखील समोर यायला हवंय. या वित्तीय संस्था नेमक्या आहेत तरी कुणासाठी ?

कशाला टॅक्स भरतो म्हणून प्रौढी मारायची ? अमूक एका ठिकाणी अमूक एक प्रोजेक्ट आणायचा हा निर्णय गुप्त ठेवून स्वस्त भावात सरकारने जमिनी संपादन करणे, आजूबाजूच्या जमिनी याच गुप्तवार्तेच्या हवाल्याने बैठकीतल्या लोकांनी खरेदी करत सुटणे शिवाय तो प्रोजेक्टही स्वतःच्या पदरात पाडून घेणे ज्यातून निवडणुकीचा खर्च वजा जाता सेवाभाव म्हणून नेत्यांनी मानधन स्विकारणे यात कसला आलाय विकासातला सहभाग ?

केवळ प्रकल्प आला म्हणून पाठ थोपटायची कि खुल्या स्पर्धेत हा प्रकल्प पारदर्शक तत्वावर आला असता तर जनतेचे किती पैसे वाचले असते याची काळजी करायची ? ही लोकशाहीची थट्टा आहे. आजही प्रत्येकाच्या मनात तीच ती राजेशाही आहे आणि जनतेच्या मनात तिची गुलामगिरी.

इथंच घोडं पेंड खातंय सगळं.

अरारा, अहो असे सगळेच देशांत असते. कमी अधिक प्रमाणात, आज ना उद्या एव्हढाच फरक.

सत्ताधारी, कुठल्याहि पद्धतीत असले तरी सत्ता टिकवणे, कोणत्याहि मार्गाने, हा त्यांचा एकमेव उद्देश.

तुम्ही आणि इतर कुणि, ज्यांनी प्रश्न काय, वाईट काय हे लिहीले ते सर्व बरोबरच आहे. नसले तरी बरेचसे बरोबर आहे.आणि इतरहि काही काही वाईट असेल. तर त्यावर काही वादच नाही.

यातून डोक्यात आपोआप असा विचार येतो की हे जर वाईट आहे तर चांगले काय, नि ते कसे अंमलात आणावे. तो मार्ग काढण्यासाठी अक्कलवंत नि शिवाय देशप्रेमी, नि:स्वार्थी लोक पाहिजेत, शिवाय इतरांना आपले म्हणणे पटवून देण्याचे कौशल्य पाहिजे

जर वाईट लोकांना इतर लोकांना स्वतःच्या स्वार्था साठी इतरांना बनवणे जमते, तर अक्कलवंत, चांगल्या लोकांना का जमू नये हे खरे प्रश्न.

माणूस बुडतो आहे तो का, कसा यावर चर्चा करण्या ऐवजी त्याला वाचवावे कसे हे जास्त महत्वाचे नाही का? हे काम कुणाचे? सर्व विचारवंतांचेच ना?कुणा एकट्याजवळ सगळी उत्तरे नसतात म्हणून चर्चा. तर चर्चा करू.

अरुंधती कुलकर्णींनी म्हटल्याप्रमाणे भारतात खरी लोकशाही नाहीच आहे. खेड्यापाड्यात छोटीछोटी सत्ताकेंद्रे स्थानिक दहशत निर्माण करून असतात अन मोठ्या सत्ताकेंद्रांशी हातमिळवणी करून ती सत्ता अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करतात. यंत्रणेला नमवून तिचा वापर करणे अशा लोकांना कठीण जात नाही.
अन तरीही लोकशाहीला पर्याय नाही कारण कधीतरी उद्रेकित होणारा जनक्षोभाचा फटका सत्ताधार्‍यांना याच लोकशाही मार्गाने भारतात आजवर मिळाला आहे. इतर कोणत्याही रक्तरंजित मार्गापेक्षा भारतीय समूहमनाला हा मार्ग भावणारा आहे. न्यायाचा, सामाजिक समतेचा प्रकाश दूरदूरपर्यंत पोचवण्याची शक्यता लोकशाहीतच जिवंत रहाते. तिला सक्षम करणे हे प्रत्येकाचे काम आहे. किमान मतदानही गांभिर्याने घेतले जात नसेल तर लोकशाहीचे काय होणार?

वेळ येताच मागे हटतात ते विचारवंत अशी एक ओळख प्रस्थापित होऊ पाहतेय. नाही तर पूर्वीसारखा त्यांचा धाक राहिला असता यात शंका नाही. त्यांची तरी काय चूक म्हणा, पंचवीस लाखाच्या अनुदानासाठी लाचार होणा-या बुद्धीवंतांचा मेळा नवा का आहे आपल्याला ? आता सगळे नियम धाब्यावर बसवून आणलेले धरणगावातले प्रकल्प कसे देशाला हवे आहेत याची वकिली करणारे नवे विचारवंत उदयास आलेत. निळूभाऊ फुले, लिमये गेले नि "दाम-ले" आलेत

नितिनचंद्रजी,
शंकराची उपमा कशी काय लागू होते याबद्दल विचारत होतो. म्हणजे सर्व काही नष्ट करणार्‍या शंकरापेक्षा फक्त दुष्टांचे सिलेक्टिव्ह तण उपटून मूळ लोकशाही तारणार्‍या विष्णू स्टाईल का नाहीत लोक?
ते नाही का वर कुठेतरी पैलवानांनी शोध सांगितलेला आहे. रामाच्या बायकोबद्दल जनतेने (पक्षी एका धोब्याने) संशय घेताच सीतेला सत्तास्थानापासून दूर करण्यात आले Wink तर जनता = १ धोबी, जनता = शंकर असे सगळे हत्तीचे अवयव मी या धाग्यातून गोळा करतोय.

लिंबाजीराव,
पेशवे म्हटले, की बामण. शंकर म्हटलं की रुद्र. कशाला अंगावर ओढून घेता हो?
खाई त्याला खवखवे किंवा चोराच्या मनात चांदणे ही म्हण तुम्हाला फिट्ट बसते बघा.

झक्की काका,
>>मग धादांत खोटी विधाने, वैयक्तिक निंदा, कुचाळकी?<<
वैयक्तीक बोलणे म्हणजे नक्की काय हो?
प्रत्येक वेळी सामुहिक दोषारोप कसे होणार? Wink
की जसे "पेशव्यांनी" इतके जरी बोल्ले की काही लोक तमाम ब्राह्मण जातीला शिव्या दिल्यागत कागाळ्या सुरू करतात, तसेच झक्कींनी डायलॉग मारला की सगळ्या अमेरिकन ब्राह्मणांना शिव्या द्यायच्या की काय?

च्यायला,
उदयनने धोनीसारखा शेवटी येऊन सिक्सर हाणला तर त्याचं इतकं कौतुक, आणि त्याआधी आम्ही सिंगल डबल पळून सचिनसारखं शतक झळकावलं तरी कुणाला काहीच नाही त्याचं. आणि झक्कीकाकांनी केलेल्या यष्टीरक्षणाचंही काहीच नाही ? किती क्रीझ आउट केलेत बघा कि

Kiran...,

१.
>> कष्टकरी, शेतकरी यांना पंचवीस हजारांचं कर्ज द्यायलाही या बँका किती खळखळ करतात हे देखील
>> समोर यायला हवंय. या वित्तीय संस्था नेमक्या आहेत तरी कुणासाठी ?

या वित्तीय संस्था ठराविक लोकांच्या तुंबड्या भरण्यासाठीच आहेत. शंका नको.

२.
>> अमूक एका ठिकाणी अमूक एक प्रोजेक्ट आणायचा हा निर्णय गुप्त ठेवून स्वस्त भावात सरकारने
>> जमिनी संपादन करणे, आजूबाजूच्या जमिनी याच गुप्तवार्तेच्या हवाल्याने बैठकीतल्या लोकांनी खरेदी
>> करत सुटणे शिवाय तो प्रोजेक्टही स्वतःच्या पदरात पाडून घेणे ज्यातून निवडणुकीचा खर्च वजा जाता
>> सेवाभाव म्हणून नेत्यांनी मानधन स्विकारणे यात कसला आलाय विकासातला सहभाग ?

१०० % सहमत.

आ.न.,
-गा.पै.

<वैयक्तीक बोलणे म्हणजे नक्की काय हो?>

मागे नाही का तुमचे नाव लिहून मी तुमच्यावर टीका केली होती? त्याला वैयक्तिक म्हणतात. नुसते लिहीले असते की असले काही करू नये म्हणजे मग नसते झाले.

जर कुणि लिहीले की "अमुक यांनी लिहीले ते विचार, मत मला मुळीच पटत नाही, त्यापेक्षा मा़झे मत असे असे आहे." तर ती वैयक्तिक टीका नव्हे, कारण इथे मत विचार यांचा विरोध आहे. नि मत मूर्ख माणसाचे आहे असे लिहीले तर त्या माणसावर आडून टीका होते, ते वैयक्तिक. शिवाय तसे लिहून काही उपयोग नाही, कारण बर्‍याच जणांना आधीच माहित असते की तो मूर्खच आहे, त्यात तुमचा शहाणपणा काय?

माझ्या एकट्याच्या मतावरून तुम्ही समस्त अमेरिकन ब्राह्मणांबद्दल मत बनवणे हे मला बरोबर वाटत नाही. पण, "माझे मत बरोबर नाही, कारण मला भारतातली काही माहिती नाही " असे लिहीलेत तर ते जरी वैयक्तिक टीका असली तरी जर खरे असेल तर मला काही राग यायचा नाही, खोटे असेल तर, तेव्हढेच काही एक खोटे वाक्य नाही मायबोलीवर हे मला समजते, मी लक्ष देत नाही. माझ्या ओळखीतल्या बहुतेक अमेरिकन ब्राह्मणांना इतर अनेक उद्योग आहेत, ते इकडे फिरकत नाहीत, किंवा इथल्या बोलण्याला मनावर घेत नाहीत, नुसते हसतात, कमी अक्कल असलेल्या लोकांचे विनोद म्हणून
कुणि कळकळीने काही लिहावे नि बाकीच्यांनी विषयाला फाटे फोडून काही तरीच लिहावे म्हणजे गंमत करणेच की.

ती बघायला, त्यात भाग घ्यायला मी येतो.

जर कुणि लिहीले की "अमुक यांनी लिहीले ते विचार, मत मला मुळीच पटत नाही, त्यापेक्षा मा़झे मत असे असे आहे." तर ती वैयक्तिक टीका नव्हे, कारण इथे मत विचार यांचा विरोध आहे. नि मत मूर्ख माणसाचे आहे असे लिहीले तर त्या माणसावर आडून टीका होते, ते वैयक्तिक. शिवाय तसे लिहून काही उपयोग नाही, कारण बर्‍याच जणांना आधीच माहित असते की तो मूर्खच आहे, त्यात तुमचा शहाणपणा काय?<<<

काही म्हणा झक्की, तुमची ही सुपर बॅटिंग तुफान आवडते. Rofl

आपल्या प्रतिसादांचा चाहता!

माझ्या विषयाशी संबंधित अश्या प्रतिसादांचे सार -
लोकशाही की प्रजासत्ताक, भारतात काय वाईट आहे, वगैरे विषय गेली पन्नास वर्षे चर्चिल्या जात आहेत. वाईट काय याची नवी उदाहरणे फक्त वाढताहेत. कम्युनिस्ट नको, सोशॅलिस्ट नको म्हणून जागतिकीकरण, प्रायव्हेटाय्झेशन, लि लिबरलाय्झेशन करून झाले, अजून काही फरक नाही.
अश्या वेळी जगाला ज्ञान देणार्‍या भारतीयांनी राज्यशास्त्रात एक नवीनच पद्धत शोधून काढली पाहिजे. भारताला त्याची जास्त गरज आहे, कारण भारतीय समा़जात सर्व प्रकारचे लोक इतके आहेत की कुणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

माबोसत्ताक ? Uhoh

ही देखील चांगली आहे... सरकार ने मायबोलीवर यावे ..जो काही निर्णय घ्यायचा आहे त्या विषया संबधी धागा काढावा.. मायबोलीकरांची प्रतिक्रिया घ्यावी मग निर्णय घ्यावा...प्रत्येक निर्णयासाठी स्वतंत्र धागा उघडावा ...
Happy

वरती मी अडाणी, अशिक्षित आणि मूर्ख मतदारांचा उल्लेख केला आहे. बर्‍याचदा अडाणी असणारे मूर्ख असतात. पण तरी अडाणी म्हणजे मूर्ख आहेच असे नाही. मात्र शिक्षण नसेल तर लोकशाही प्रक्रिया, मतदान वगैरे मूलभूत गोष्टी आपल्या आपण शिकाव्या लागतात. पोटाचा प्रश्न जास्त तीव्र असेल तर असा अभ्यास होत नाही आणि मग निदान ह्या लोकशाही प्रक्रियेत तरी मूर्ख म्हणावा लागेल असा एक मतदार बनतो.

काही वेळा अशा मतदारांनी योग्य ते काम केले म्हणून भारतातील लोकशाही यशस्वी आहे असे म्हणणे म्हणजे बंद पडलेले घड्याळ दिवसातून दोन वेळा अचूक वेळ दाखवते म्हणून त्याची तारीफ करण्यासारखे आहे!
४० वर्षे पूर्वीच्या इतिहासाचा दाखला किती वेळा देणार (१९७७ साली कॉंग्रेसचा धुव्वा वगैरे)?
आजचे किती नेते हे भ्रष्ट, गुन्हेगारी पार्श्वभूमीचे वा गुन्हेगारांत उठबस असणारे आहेत हे दिसतेच आहे.
वरचेवर उघडकीस येणारे हजारो कोटींचे घोटाळे जे थेट पंतप्रधानांशी संबंधित आहेत यावरुन आपली लोकशाही किती यशस्वी आहे ते सूर्यप्रकाशासारखे स्वच्छ दिसते आहे.

लोकशाहीत लोक जसे असतात तसेच फळ आपल्याला मिळते. या लोकांना असे ठेवण्याचे परिणाम आपण भोगायचे आहेत. हे लोक असे का आहेत याची उत्तरे शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तर लोकशाही का हवी याचेही उत्तर मिळेल. आणि ही फळं नको असतील तर हे चित्रं बदलायचे कुणी आणि कसे हा विचार होईल. हे चित्र बदलावे असे स्वातंत्र्य स्विकारताना जे कुणी स्विकारण्याच्या स्थितीत होते त्यांना वाटलेय का या प्रश्नाचा वेध कुणी घेईल तेव्हां उर्वरीत सर्व प्रश्नांचीही उत्तरे स्वतःशीच मिळून जातील. आपली रजा घेतो.

उदयनला मॅच संपल्यानंतरही सिक्सर मारण्यासाठी फुलटॉस टाकणा-या झक्कीकाकांचा निषेध.

किरन... सरकार आले तर ... एक संसद गटग पण होईल..... लोनावल्याला ववि करण्यापेक्शा ... दिल्लीत करू... काय.. Lol
बघ किती फायदे... माबोसत्ताकचे....
.
ऐक लेख यावर यायलाच हवा

माबोसदस्यांनो,

माबोसंसदेत मी सभागृहाध्यक्ष (स्पीकर) बनायला तयार आहे. नि:पक्ष, सदाचारी आणि निर्व्यसनी असल्याने या जागेसाठी मीच सर्वथैव योग्य माबोसदस्य आहे. Lol

तसेच पैलवान असल्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणे मला तितकेसे जड जात नाही. हा अधिलाभ (बोनस) आहे. Biggrin

आ.न.,
-गा.पै.

Pages