Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16
निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.
कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.
मुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मुंबईतल्या रस्त्यांची जुनी
मुंबईतल्या रस्त्यांची जुनी नावं आठवताहेत का कुणाला? फ्रिअर रोड्,(शहीद भगतसिंह रोड) वुडहाउस रोड (नाथालाल पारेख रोड) चर्च गेट स्ट्रीट्(वीर नरिमन रोड), विन्सेंट रोड्(डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड) इत्यादि. आणखीही कितीतरी आहेत. ग्रॅण्ट रोड, लॅमिंग्टन रोड ,आर्थर रोड ब्रूस स्ट्रीट,..
हिरा, तुमच्याकडे माहितीचा
हिरा, तुमच्याकडे माहितीचा खजिना आहे
वा खुपच छान माहीती साठत चालली
वा खुपच छान माहीती साठत चालली आहे.
जाई, गोरेगावला मी वर्षातून एकदा माझ्या काकांकडे रहायला जायचे. आ.ए. कॉलनी मध्ये ते रहायचे. तिथला पुर्ण परीसर अगदी झाडाफुलांनी भरलेला असायचा त्यामुळे खुप आवडायचा. गोरेगाव स्टेशनला मार्केट होते. तिथे खरेदीसाठी जायचो आम्ही. आणि आधी लिहील्याप्रमाणे ओ.पी गार्डनमध्ये फिरायला. तो एरीया अजुनही हिरवाच दिसतो.
मालाड - सुप्रसिद्ध (
मालाड - सुप्रसिद्ध ( त्याकाळी) 'मल्लाड' जातीच्या दगडामुळे प्रसिद्ध झालेले उपनगर! आता आहे की नाही माहीत नाही. पण मालाड आणि आताचे कांदिवली मध्ये हा दगड खूप सापडत असे, हे मी कुठेतरी वाचलेले आठवते आहे.
हाच मल्लाड दगड वापरून मुंबईत बर्याच प्रसिद्ध इमारती पण बांधल्यात. उदा - Bombay House, डेविड ससून वाचनालय, चर्च्गेट स्टेशन.
बहुदा कांदिवली हे नाव पण 'खाण्-देवळी' ( मल्लाड दगडाची खाण) आलं असावं असंही ऐकलंय.
वांद्रे (प) (बंदर -> वांद्रे) येथे 'एल्को' मध्ये हातात 'त्या काळी' ( म्हणजे २५-३०वर्षांपूर्वी ) Gloves घालून पाणी-पुरी देत असत. पहिल्या ४ पुर्या वेगवेगळ्या चवीच्या असत. (तिखट, मध्यम, गोड, सुकी म्हणजे फक्त सारण आणि बुंदी) आणि त्या 'फुकट' असत. त्यानंतरच्या ६ पुर्या तुम्हाला आवडलेल्या चवीच्या!
फोर्टात कॉफी हाउस मध्ये कॉफी पिता पिता बाजुला अमोल पालेकर बसलेले बर्याच वेळा पाहिले होते.
सायनला एका ठिकाणी
सायनला एका ठिकाणी बिस्लेरीच्या बर्फ घातलेल्या पाण्यातली पाणीपुरी खिलवायला नेलं होतं भावाने. छान होती ती (पण आमच्या ताराबागेची सर नाही हो! :P).
ते मेट्रोजवळचं एल्फिन्स्टन टेक्निकल इन्स्टिट्यूटही असतं बर्याच सिनेमांत. सहसा कोर्ट वगैरे म्हणून दाखवतात. त्या पायर्या कॅमेराजेनिक असाव्यात.
एल्को ची पाणी-पुरी खाल्ली आणि
एल्को ची पाणी-पुरी खाल्ली आणि आवडली. नंतर एकदा गिरगावांत 'मुगभाटांत' पाणी-पुरी खाल्ली. तेव्हा आपण इतके दिवस खात होतो ते नक्की काय असा प्रश्न पडला होता. अ-मे-झिं-ग्ग!
मुगभाटात पाणीपुरी? नाही नाही,
मुगभाटात पाणीपुरी? नाही नाही, ताराबागच असणार ती.
स्वाती, मला 'ताराबाग' च
स्वाती, मला 'ताराबाग' च म्हणायचं होतं.. मुगभाट कुठून आठवलं माहीत नाही.
हाँ! आता कसं! मुगभाटाच्या
हाँ! आता कसं!
मुगभाटाच्या तोंडाशी ते 'लाडू' असं मोठ्ठ्या फॉन्टमधे लिहिलेलं दुकान.
तिथले कडक बुंदीचे लाडू माझे फेव्हरिट!
पुढे कांदेवाडीत केशवजी नाइकांच्या चाळीत मुंबईतला पहिला सार्वजनिक गणपती टिळकांच्या हातून बसला होता.
मजा येतेय वाचायला . आम्ही
मजा येतेय वाचायला . आम्ही आपले पार्ल्यातच जन्मलो .पार्ल्यातच शाळा-कोलेज . नोकरी करायला सुरवात केली तेह्व्हा कुठे पार्ल्याच्या बाहेर पडून एकदम चर्चगेटला जायला सुरवात केली. नाही म्हटल तर अगदी लहान असताना काका किंग्स सर्कल ला राहायचे "वीणा विहार" मध्ये . बिल्डींग च्या खाली गांधी मार्केट .टेरेस वरून खरेदीला येणाऱ्या बायका बघायचो आणि लहानपणी मामा कडे भांडूप ला जात होतो तिथून कधीच्या काळी गेलोचं तर तर पवई-विहार ला ट्रिप .त्या पलीकडे कधी मुंबई दर्शन झालच नहि. आणि हो पार्ल्याला आमच्या घराजवळ "विमान तळ" होता त्यामुळे संद्याकाळी टेरेस वर गेल कि विमान उतरताना उंच उंच उड्या मारून विमानाला हात लावायचं प्रयत्न असायचा ( हा हा हा हा )सगळे जण खूप छान लिहिताहेत .स्पेशलि हिरा
नेहेमी मुंबई चा पारशी म्हटला
नेहेमी मुंबई चा पारशी म्हटला की, पैसेवाला, दान्-धर्म करणारा असाच डोळ्यासमोर असतो पण ही documentary नक्की पहा -
मुंबई चे 'गरीब' पारशी -
http://www.youtube.com/watch?v=Q-iZbiiIEiU
ही जमात संख्येने वेगाने कमी होते आहे आणि ही चिंतेची बाब आहे.
व्वा खुपच सुंदर अन रोचक
व्वा खुपच सुंदर अन रोचक माहिती.
अनमोल आठवणींचा खजिना..
<< ही जमात संख्येने वेगाने
<< ही जमात संख्येने वेगाने कमी होते आहे आणि ही चिंतेची बाब आहे.>> खरंय. 'पारसी' हा मुंबईचा
लोभस व अविभाज्य घटकच आहे. [पारसी धनाढ्यानी व पंचायतीने फार पूर्वीपासून मुंबईत ठीकठीकाणी सुरेख, मोठ्या कॉलनी बांधून या जमातीसाठी ही मूलभूत सोय निर्माण करून ठेवली नसती तर बाहेरून येणार्या लोंढ्यांच्या रेट्यात मुंबईतून 'पारसी ' केंव्हाचाच बाहेर फेंकला गेला असता !]
भारती.... थांकु थांकु
भारती.... थांकु थांकु गं.......... हे फोटो पाहताना जी अवस्था होते तिलाच आ वासून पाहणे यालाच म्हणत असावेत
मस्तंच !!!
सर्वांकडे माहितीचे खजाने आहेत.. वावावा.. मस्त वाटतंय वाचताना..
अफ्फलातून चाललेलं आहे हे
अफ्फलातून चाललेलं आहे हे प्रकरण...
स्वाती आणि आशू जोरात आहेत!
आशू, पर्या नाही तर नाही, तू तरी मला गिरगाव पर्यटन घडव की गं.
मस्त वाटतंय वाचायला. स्वाती,
मस्त वाटतंय वाचायला.
स्वाती, केश्वे, हीरा, भाऊकाका आणि इतर... लगे रहो!!!!
ते ऑपेरा हाऊस गेल्या दोन चार वर्षात रीनोव्हेट केलंय का?
आणि मुंबईमधल्या फिल्मी लोकेशनमधे एशियाटिक लायब्ररीपण घ्यायला हवीच की....
तिवारी मिठाईवाला? <<<
तिवारी मिठाईवाला? <<< त्याच्या पुढ्यात माझं जुनं हापिस होतं.
पाटील, ऑपेरा हाऊस खूप दिवसांनी बघितलं. परवा मत्स्यालयाकडं (**) जाताना पलीकडे स्टेशनाबाहेर झालेल्या नव्या हॉस्पिटलाचं डोकं दिसत होतं. त्या बाजून नुसतंच फेरफटका मारावं असं खूप वाटत होतं. पण सोबतचे म्हणाले असते, काय यडं...
(**) त्याचं आता नुतनीकरण चालू असल्याने बंद सध्या आहे. मग तसाच पुढे जाऊन प्रिंसॉफ वेल्सात गेलो.
गजानन, फोटो मस्त आहेत.
गजानन, फोटो मस्त आहेत. मुंबईतले आहेत यावर विश्वास बसणार नाही.
आह्हा.. म्युझियम मधे क्युरेटर
आह्हा.. म्युझियम मधे क्युरेटर च्या पदावर होते आत्याचे मिस्टर तेंव्हा प्रत्येक सुट्टीम्युझियम च्या आवारातच असलेल्या त्यांच्या भल्यामोठ्या अपार्टमेंट मधे गेलीये.. , जहाँगीर आर्ट कडे आणी मॅक्स्मुलर कडे पाहताना सुद्धा भरून यायचे.. जादू भरा एरिया वाटायचा .. म्युझियम ला लागून ते बसस्स्टेशन च्या कँटीन मधले बटाटेवडे अप्रतिम चवीचे होते
अजून एक आठवण म्हंजे सी पी टँक एरियातले , हिन्दी मधली रेअर आणी क्लासिक पुस्तकं मिळण्याचं एकमेव दुकान ,' हिन्दी ग्रंथालय' .. तिथे एक जुनीपुराणी बंडी आणी कळकट धोतर नेसलेले आजोबा व्यवस्था बघत. त्यांनी तिथले एकूणएक पुस्तक वाचलेले होते. कोणतेही पुस्तक मागा, ते संदर्भासकट लगेच समोर हाजिर करत..
हे किती लोकांना रुचणार ते
हे किती लोकांना रुचणार ते माहित नाही, तरी बी लिहतो.
मुंबई बद्दल बोलत आहात पण मुंबई च्या नाईट लाईफ बद्दल कुणीच काही कसे लिहीत नाही, मला असं वाटतं कि नाईट लाईफ हे बहुधा पहिले मुंबई मध्येच एंजॉय केलं जात असणार (गोवा ही असु शकतं). त्याकाळी (१९९०-९५ ) मुंबई मध्ये अंदाजे २५-३० डिस्कोथेक्स होते.
चर्नी रोड वर कोपाकबाना, ताज मध्ये इनसॉमनिया, लिला मध्ये सायक्लॉन, जुहु ला जे४९, मरिन लाईन्स ला झार हे ठळक, बाकी चिरीमीरी जागा म्हणजे मरोळ ला ग्रँड कॅन्यन आणि होस्ट इन, जुहु ला राझबेरी र्हायनो एव्हढेच आठवतात आता. हे सगळं आता आहे कि नाही ते माहित नाही, पण खरंच पैश्यांचा आणि अन्नाचा चुराडा कसं करावं हे त्या जागी पाहिलं.
मित्रां समवेत एकदा माहिम हिंदुजा हॉस्पिटल च्या जवळपास रात्री १.००-१.१५ च्या सुमारास एक हॉटेल च्या बाहेर भिकार्यांची झुंबड पाहिली होती. आयुष्यातील एक विरोधाभास अनुभवले होते, एके ठिकाणी लोकांना काहीच खायला नाही तर एके ठिकाणी अन्न जास्त झाले म्हणुन त्याची नासाडी.
ब्रेबॉर्न स्टेडियम वर एकदा कुटुंबासहित रशियन बॅले पाहिले होते, तेव्हा शाळकरी होतो (अंदाजे १९८५ सालची गोष्ट) , रात्रौ अंदाजे ११.३०-१२.०० ला बॅले संपले तरी रस्त्यांवर गाड्यांची व लोकांची गर्दी, तेव्हाच कळले होते हे शहर कधी झोपत न्हाय ते , ह्याचे प्रत्यंतर नंतर खुपदा आले.
म्हमई रॉक्स मॅन.
१९९२ च्या दंगली नंतर आणि १९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर मुंबई ची रया जरा काळवंडळी, परप्रांतियांचे लोंढे व त्यांची दादागिरी, रस्त्यावरच अक्षरशः सगळं काही उरकणे, लोकल ट्रेन्स मध्ये हेच परप्रांतिय आपल्या डोळ्यां देखत महिला वर्गाशी केलेले असभ्य वर्तना विरुध्द आपण काहीच बोलु शकत नव्हतो, कारण ते झुंडी ने असत. साहेबांनी तर फार फार वर्षापुर्वी दाक्षिणात्या लोकांविरुद्ध जे केले होते, तेच दाक्षिणात्य लोक आता सांगतात "बालासाब सही बोलताय यार, वाट लगाके रखा है मुंबई का यह लोगो ने, अरे आओ और रहो ना चुपचाप, कमाओ और जाओ ना अपने गाव को, कोन नई बोलताय कमाने को, पर शहर को क्यु गंदा कर रेले है"
फाल्गुनी पाठक व ए बी सी एल ने नवरात्र उत्सव चे दांडिया नाईट्स करुन उत्सवाचे चे व्यवसायीकरण केले तिथुन उत्सवाचे व्यवसायीकरण चालु झाले. पुर्वी फक्त गणेशोतस्व व काही प्रमाणात नवरात्र मध्ये भोंडला व्हायचे, आता तर गोकुलाष्टमी पासुनच चालु होतं, हंडी फोडण्यात ही राजकारण / राजकारणी घुसले, गणेशोतस्वात व नवरात्र उतस्वात ही राजकारणी आलेत, उत्सव हे उत्सव न राहत इवेंट झालेत. असो बाफ म्हमई वर आहे, विषयांतर नको.
even than Mhamai rocks.
होय असामी फिल्मसिटी छोटा
होय असामी
फिल्मसिटी छोटा काश्मीरचा ऊल्लेख करणे राहून गेले
भारतीताई चित्रे यांच्या माहितीबद्दल धन्स
मला तिथे चित्रे राहायचे याबाबतीत माहिती नव्हती
बर्याचदा अशा कलंदर माणसाच्या बाबतीत असे घडताना पाहिलय
गोरेगाव पूर्व हा समाजवाद्याचा किल्ला असे म्हणतात
बाबुराव सामंत कमल देसाई आणि मृणाल गोरे
ही ऊदाहरणे
मृणालताईँचा केशव गोरे ट्रस्ट हा माझ्या शाळेजवळचाच
अल्पना धन्स
<< फिल्मी लोकेशनमधे एशियाटिक
<< फिल्मी लोकेशनमधे एशियाटिक लायब्ररीपण घ्यायला हवीच की....>> वांद्र्याची [प.] सेंट जोसेफ शाळाही बर्याच शिनेमात चमकलीय !
<< मग तसाच पुढे जाऊन प्रिंसॉफ वेल्सात गेलो. >> कितीही वेळां गेलेलं असलं तरीही केंव्हाही तिथं गेल्यावर नवीन कांहींतरी लक्षांत येतं, भावतंच ! प्र्.चि. अप्रतिम.
<<माहिम हिंदुजा हॉस्पिटल च्या जवळपास....... एक हॉटेल च्या बाहेर भिकार्यांची झुंबड पाहिली होती.>> बरेच मुस्लिम तिथल्या हॉटेलना पैसे देऊन आपल्यातर्फे गरीबाना जेवण द्यायला सांगत असतात. अशा हॉटेलांच्या बाहेर म्हणूनच लाईन लावून बसलेले निराधार हें कायमचंच दृश्य असतं तिथं.
Sanjeev.B, मला वाटतं की
Sanjeev.B,
मला वाटतं की रात्रीची मुंबई हे वेगळंच जग आहे. त्याचा दिवसाच्या मुंबईशी थेट संबंध नाही. पण तुम्ही लिहा
बिनधास्त. फारतर लोक म्हणतील की विषय बदलला!
पण गिरगावदर्शनही झकास चाललंय. मूळचा ठाण्याचा असलो तरी गिर(/ण)गावाविषयी जिव्हाळा आहे. दादरला जेव्हढं फिरणं झालं तेव्हढं गिरगावात झालं नाही याची खंत मनी आहे.
आ.न.,
-गा.पै.
टीप : फिरणं = खादाडी.
लले, नक्कीच जाउया. एक अख्खा
लले, नक्कीच जाउया. एक अख्खा दिवस मोकळा ठेवायचा आणि दक्षिण मुंबईत मुशाफिरी करायची. तेव्हाचं खास स्थापत्य असलेल्या अजून बर्याच इमारती आहेत तिथे. एल्फिन्स्टन कॉलेजचं सिलिंग बघितलंस तर तुला वाटेल यात अजून दीड दोन मजले बसले असते.
गजा, तारापोरवाला मत्स्यालय तर अगदी ठाण्याच्या तलावपाळीला जाऊन यावं तसं जाऊन बघितलं जायचं. त्याला लागून असलेल्या २-३ जिमखान्यांपैकी एकावर आमच्या शाळेचे स्पोर्ट्स व्हायचे.
लले, आपण जाऊ त्याच्या आत मत्स्यालयाचं नूतनीकरण झालं तर तेही बघता येईल आपल्याला. मे महिन्याच्या पहिल्या दुसर्या आठवड्यात जायचं का? म्हणजे उन्हाच्या निमित्ताने बर्फाचे गोळे वगैरेवरही ताव मारता येईल. प्रिन्स ऑफ वेल्सच्या बाहेरुन डबल डेकर सुटतात. त्यात बसूनही प्रवास करु.
संजीव, रात्रीची मुंबई कधी पाहिलीच नाही. रात्री १० वाजता आमचा दिवसं संपायचा. रात्री ८.३० नंतर गिरगावातले गडी भांडीच घासायला न्यायचे नाहीत. त्यामुळे जेवायला ८ वाजता बसायचो. गडी आपल्या घरात येऊन भांडी घासत नसत. मजल्यावरील सार्वजनिक नळात तरी नेत नाहीतर खाली त्यांना रहायला व पाणी साठवायला दिलेल्या जागेत नेऊन घासत. एकावेळेस दोन्ही हातात मारुतीसारखी दोन घरची भांडी तोलत २ मजले उतरुन जात आणि घासून झाली की दाराशी आणून ठेवत. भांडी घासायला शाईन-इट वगैरे चालत नसे त्यांना. राखुंडीने घासत. जिन्यातून भराभरा नेता आणताना कधी कधी पाडत. भांडी आली की बदली नाही ना झाली वगैरे बघावं लागे आणि पुन्हा विसळून ठेवावी लागत. वर्षातून १ महिना हे लोक्स शेतीसाठी कोकणात जात तेव्हा बदली बाई/गडी देत. गिरगावातील 'गडी' हा देखिल तिथल्या चाळ संस्कृतीचा एक उल्लेखनिय पैलू आहे.
सुलु, गेटवे ऑफ इंडीया
सुलु, गेटवे ऑफ इंडीया बांधण्यासाठी मालाड आणि कुर्ला इथल्या खाणीतला दगड वापरला होता.
मालाडला, अहमदाबाद रोडवरुन वसईकडे जाताना, डाव्या बाजूला त्या टाईपच्या दगडांचा एक कडा दिसतो. त्यावर सांडपाणी पडून आता खराब झाला आहे तो.
भाऊ, तूम्ही म्हणता त्या रस्त्यावर मुंबईतील बहुतेक एकमेव असे पायमोज्याचे झाड होते. अजूनही असेल. आता तिथे बरीच गुंजेची झाडे आहेत.
मरीन लाईन्सचा फ्लायओव्हर, वरळी सी फेस, गेटवे ( ते पण फक्त ताजच्याच बाजून, गोदीच्या बाजूने चित्रीकरणाला परवानगी नाही बहुतेक ) एन. सी. पी. ए. जवळचा समुद्र, हँगिंग गार्डन वरुन दिसणारी चौपाटी,
कॅपिटॉल मधून घेतलेला व्ही. टी. चा शॉट, मुकेश मिल... हि सिनेमावाल्यांची लाडकी ठिकाणे.
मुंबई नगरी ग बडी बांका, जशी रावणाची दुसरी लंका वाजतो तो डंका, हि पठ्ठे बापुरावांची रचना, स्वरराज छोटा गंधर्व यांच्या आवाजात धिंगाणा डॉट कॉम वर आहे. कुणाला मिळाली तर लिंक जरुर डकवा इथे. त्याकाळच्या
मुंबईचे चपखल वर्णन आहे त्यात.
काही मराठी गाण्यात पण मुंबईचे वर्णन येते.
ही लावणी बहुतेक, एक गाव बारा भानगडी मधली ( चु.भू.द्या.घ्या.)
कायतरी करुन, कसंतरी करुन
करा तयारी निघायची,
अंदा मुंबई बघायची, हो दाजिबा अंदा मुंबई बघायची
अशी मुंबई म्हणत्यात लोकं, तवापास्नंच फिरलया डोस्क
घाईघाईनं तिकिट काढा, नाहीतर गाडी चुकायची...
दाद कोंडके यांच्या, बिब्ब घ्या बिब्ब, मधेही मुंबईच्या मुलाबाबत एक कडवे आहे.
राजाबाई टॉवर आणि बाबूलनाथाचा
राजाबाई टॉवर आणि बाबूलनाथाचा कळस हि एकेकाळची मुंबईतली सर्वात उंच शिखरे होती. अफगाण चर्च पण त्यात असेल. मतमाऊली मात्र आधी एका टेकटीवर आहे. २८ जून १९६२ ला बाबूलनाथाच्या कळसावर वीज पडली होती. ( तारीख नेमकी लक्षात आहे कारण माझ्या जिवलग मित्राचा त्या दिवशी जन्म झाला होता. )
पुर्वी नेहरू प्लॅनेटोरियमच्या गोलाकाराच्या आतून, मुंबईतील आकाशरेखा होती, त्यात हि ठिकाणे दिसत ( नॅशनल पार्कातली गोल छत्री, ३ माकडे, गेटवे, स्टॉक एक्स्चेंज वगैरे पण होते. ) नंतर मात्र मुंबईची स्कायलाईन बदलत गेली. एलिफंटा वरून येताना, तर बर्याच अनोळखी इमारती दिसतात आता.
ताज मध्ये इनसॉमनिया >> त्याचे
ताज मध्ये इनसॉमनिया >> त्याचे पहिले नाव 1900 नंतर, 1900 and beyond आणि बंद पडताना इनसॉमनिया झाले होते, मेंबर्स ओन्ली आणि त्यांचे गेस्ट्/रुम गेस्ट असे रिस्ट्रीक्शन्स असल्याने असल्याने दर्जा राखुन होते शेवट पर्यंत, या डिस्क्मधे तेव्हाचे बरेच सेलेब्ज पाहिल्यात
ग्रँड कॅनियन माझ्या माहिती प्रमाणे उपन्गरातला पहिला डिस्क , सुरुवातीला चांगला होता मात्र नंतर अगदी पुल टेबल टाकली होती आणि पार वाट लावली.
रासबेरी , कितीतरी नवे बँड्स सुरुवातीला ईथे लाइव्ह प्ले करायचे , मागे जे गार्ड्न आहे तीथे काही इव्हेंट्स व्हायचे,
बरे आणि वाईट लिहण्यासरखे बरेच पण इथे लिहणे नको
जाई, लहानपणी आज्जीबरोबर केशव
जाई, लहानपणी आज्जीबरोबर केशव गोरे ट्रस्टला नेहेमी जाणं व्हायचं.
गोरेगाव समाजवाद्यांचा किल्ला म्हणायचे हे ही खरं. आमचं म्हणजे आज्जीचं घर पण त्यातलं एक. माझे आजोबा कार्पोरेटर होते - ते पण समाजवादीच. त्यांच्या नावाचा एक रस्ता पण आहे गोरेगावात - श्रीरंग साबडे रोड किंवा रंगा साबडे रोड.
गोरेगाव हे पहाडी या तहसिलात
गोरेगाव हे पहाडी या तहसिलात मोडत असे. १८६२ साली जेव्हा इथे बीबीसीआय रेल वे चे स्थानक झाले तेव्हा त्याचे नाव पहाडी असेच होते. महिकावतीच्या (आणि साष्टीच्याही?)बखरीत या नावाचा उल्लेख आहे. पहाडीचा उच्चार ईस्ट इंडिअन्,आगरी आणि कोळी बोलींमध्ये पआरी/पाsरी/ असा होई. बीबीसीआय चे गुजरातमध्ये पारडी नावाचे आणखी एक स्टेशन होते. त्याची या पहाडीशी गल्लत होऊ लागली म्हणून या स्टेशनचे नाव पहाडीतल्या एका मोठ्या गावावरून म्हणजे गोरेगाव वरून गोरेगाव ठेवले. या पहाडीमध्ये चार गावे होती, १)पहाडी,२)आरे,३)गोरेगाव आणि ४)एकसर.. ग्रँट रोड ते गोरेगाव या बीबीसीआय च्या मार्गात तेव्हा फक्त चार स्टेशने होती, त्यातले गोरेगाव हे एक होते.(सुरुवातीच्या काळात बीबीसीआय चे आरंभस्थान ग्रँट रोड होते. सध्याच्या ग्रँट रोड स्टेशनच्या थोडे अलीकडे, बाँबे सेंट्रलच्या दिशेने) या पहाडीमध्ये विसाव्या शतकात पश्चिमेला टोपीवाले देसाई आणि पूर्वेला सामंत अशा दोन कुटुंबांची बरीच मोठी जमीन होती. १९४०-५० सालापर्यंत या सर्व भागात, अगदी मालाड-बोरिवलीपर्यंत मोठमोठ्या आमराया होत्या. १९३० सालातल्या एका वर्तमानपत्री उल्लेखात मालाडच्या आंब्यांची स्तुती केलेली आहे. पुढे टोपीवाल्यांची जमीन सरकारने ताब्यात घेतली तर समाजवादी विचाराच्या बाबूराव सामंतांनी आपल्या जमिनीवर स्वस्त दराने ,ना नफा ना तोटा तत्वावर मध्यमवर्गासाठी घरे बांधली. काही थोडी जमीन पोस्ट ऑफिस सारख्या आवश्यक सोयीसाठी मोफतही दिली. नंतर याच लोकांनी म्हणजे बाबूराव सामंत, वसंत शिराली आणि मृणाल गोरे आणि इतर समविचारी लोकांनी लोकसहभागातून गृहनिर्माण ही अभिनव कल्पना राबवली. वसंतराव पाटिलांनी पुष्कळ प्रयत्नांती जमीन देऊ केली खरी पण या गृहनिर्माणाची बातमी तत्कालीन बिल्डर्-लॉबीमध्ये पसरल्यामुळे त्यांचे इंटरेस्ट्स यात आले. अखेर कितीतरी काळ कज्जे खटले करून एकदाची दूर कोपर्यातली दिंडोशी जवळची जागा ताब्यात मिळाली आणि 'नागरी निवारा'चे स्वप्न साकार झाले. यातली महत्त्वाची बाब अशी होती की लोकांनी पंचवीसपंचवीसच्या गटाने बँकेमध्ये वैयक्तिक नावाने खाती उघडून त्यात काही रक्कम ठेवावयाची होती.(बिल्डरला न देता). आणखीही तपशील आहेत, पण अवांतर होईल. असो. १९४७ मधल्या निर्वासितांच्या लोंढ्याला सामावून घेण्यासाठी जे प्रकल्प तातडीने आणि धडाडीने राबवले गेले त्यात गोरेगाव पश्चिमेला सिद्धार्थनगर हा एक होता. ओशिवडे खाडीच्या तोंडावर भराभर बराकी ठोकण्यात आल्या. नेमके पहिल्या वर्षीच म्हणजे ४८ मध्ये मुंबईत तुफान पाऊस आणि वादळ झाले. खाडीत बांधकामाचे साहित्य वहात गेल्याने असेल कदाचित पण या बराकींमध्ये पाणी शिरले. नवस्वातंत्र्याच्या त्या पहाटकाळात या निर्वासितांनी आणि इतरांनी आपापसात प्रचंड एकजूट दाखवून आलेल्या संकटाला तोंड दिले. सर्वस्व गमावलेल्यांवर पुन्हा एकदा ती पाळी येऊ दिली नाही.
<< गिरगावातील 'गडी' हा देखिल
<< गिरगावातील 'गडी' हा देखिल तिथल्या चाळ संस्कृतीचा एक उल्लेखनिय पैलू आहे. >>१००% सहमत. पूर्वी ही 'मंडली' बहुधा रायगड जिल्ह्यातील किंवा चिपळूण -गुहागर भागातील असे. विश्वासार्हता, कष्टाळूपणा व निरागसता हा यांचा सर्वसाधारण स्थायीभावच. हुतूतू व हातांत रुमाल हलवत करायचा 'बाल्यांचा नाच' ह्या त्यांच्या 'पॅशन्स' ! गॅलरी किंवा जिन्याखाली वास्तव्य. चाळीच्या सर्व कार्यक्रमांत यांचा उत्साहाने सहभाग. शिवाय अनायासेच बिनपगारी 'नाईट वॉचमन' म्हणूनही चाळीसाठी सेवा व्हायचीच. काम हलकं करत असले तरी चाळीत त्याना आपुलकीच मिळे. गांवीं जायला निघाले कीं त्याना कुटुंबाकरता न्यायला चाळीतून प्रेमाने भेटवस्तुही मिळत. अभ्यासात किंवा खेळात एखाद्या 'गड्या'च्या मुलाची गुणवत्ता नजरेत भरली तर त्याला सक्रीय प्रोत्साहनही दिलं जायचं. त्यांच्या मुलाना आपल्या ओळखीने बारिक सारीक नोकरीवर 'चिटकवण्या'तही चाळकरी उत्साह दाखवत.एकाच चाळीला दोन-तीन पिढ्या असं बिलगून असलेलीं कुटूंबं दुर्मिळ नसत. त्यामुळे 'गडी' हा चाळीच्या संस्कृतिचाच नाही तर कुटूंबांचाही भाग असे.
Pages