मुंबई मुंबई - माहिती, टिप्स, खास जागा, जुने फोटो, आठवणी

Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16

निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.

कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.

मुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असं काय दिसतंय ऑपेरा हाऊस? (म्हणजे खूपच छान दिसतंय). कुठल्या साईडने फोटो आहे हा? रॉक्सी साईडने आहे का? केनेडी ब्रीज साईडने बिल्डिंग आणि कंपाऊडमध्ये खूप जागा होती. आत छोटं रेस्टॉरंटही होतं. त्याच साईडने सिनेमाची अगडबंब पोस्टर्स लागलेली असायची. लहानपणी "आ गले लग जा"ची स्केटिंगवाली पोस्टर्स पाहिली होती. मी ते आग गले लग जा वाचायचे आणि काही अर्थ लागायचा नाही. स्केट्स वगैरे माहितच नसल्याने जाम अप्रूप वाटायचं त्या पोस्टरचं.

सगळ्या थिएटर्सना महिन्यानमहिने एकच सिनेमा चालू असायचा. प्रत्येक थिएटरच्या बाहेर ब्लॅकवाल्यांच्या दबक्या हालचाली आढळायच्या Proud

बरोबर - रॉक्सी साइडने समोरच्या फूटपाथवरून काढलाय.
उजव्या हाताला खाली चालत गेलं की तो नवीन मिठाईवाला (काय गं नाव..!) झालाय कॉर्नरवर. त्याच्याकडची शाही कचोरी बेस्ट असते.
मागे त्याच रस्त्याला लखनौ चिकनची दोन दुकानं आहेत.

मिठाईवाला - तिवारी मिठाईवाला? तो जुनाच आहे, त्याच्या समोर आम्ची आर्ट सोसाईटी ऑफ ईंडीआचे ऑफिस.
केनडी ब्रिज उतरल्यावर येक बंद पडलेला स्टुडीओ होता तीथे मुंबईतला पहिला गेमिंग झोन, बोलिंग अ‍ॅली होती, मी कॉलेजात असताना

स्वाती, सैफीचा लँडमार्कचा तर कायापालटच आहे. मी साबांना घेऊन कार्डिओलॉजिस्ट डॉ. युनुस लोयांकडे गेले होते ३ वेळा तिथे तेव्हा पुर्ण फिरुन पाहिलं ते हॉस्पिटल. कैच्याकै आधुनिक आहे. त्यातल्या शेवटच्या वेळी त्यांची टू डी एको टेस्ट करुन औषधं लिहून घेऊन आम्ही दोघी टॅक्सीने व्हिटीला आलो. तिथे त्यांना दम खायला उभ्या राहिलो. त्यांना घरी सोडून मी हाफ डे ऑफिसला गेले. घरी आल्यावर रात्री पहाते तर टिव्हीवर व्हिटी स्टेशन, ताज, ट्रायडंट, कामा हॉस्पिटल, कॅपिटॉल वगैरे परिसर अतिरेक्यांच्या गोळीबाराने गाजत होता. आम्ही दुपारी जिथे उभ्या होतो तिथेच तो मेला कसाब फिरत होता. कॅपिटॉलपाशी पोलिस अधिकारी मारले गेले तिथेच आम्ही टॅक्सी सोडली होती. कसाबचा पाठलाग मेट्रोला वळसा घालून झाला तिथूनच आम्ही दुपारी गेलो होतो. साबांना लगेच फोन केला आणि सांगितलं. दोघीही हबकून गेलो होतो.

तो दिवस मुंबईच्या इतिहासात अगदी काळ्या अक्षरात लिहिला गेलाय कायम.

मागे त्याच रस्त्याला लखनौ चिकनची दोन दुकानं आहेत.>>>> अय्या!!! (चल फुगडी घालूया). मी देखिल त्या दुकानांमधून खूपवेळा ड्रेसेस घेतले आहेत. एक पहिल्या मजल्यावर पण होतं दुकान. तिथल्या कपड्यांची क्वालिटी एकदम उत्तम. भरतकाम आणि कापडही ४-५ वर्षंसुद्धा टिकेल असं. खखाव्रत करणार्‍यांनी हे नोट करा Wink

तिवारी - बरोब्बर! Happy
जुना म्हणजे किती जुना? अगदी गेल्या साताठ वर्षांतला आहे ना?

तुम्ही म्हणता तो अर्देशर इराणींचा स्टुडिओ ना? त्यांचंच नाव दिलंय आता केनेडी ब्रिजला.

>> (चल फुगडी घालूया
Lol

पाटील म्हणतात त्या स्टुडिओच्या पुढे खादी ग्रामोद्योग आणि एक अतिप्राचीन होमिओपॅथीवाला अशी दोन खोपटेवजा दुकानं कित्त्त्ती वर्षं आहेत.
त्या खादी ग्रामोद्योगमधल्या सेल्समनना गिर्‍हाइकांना घालवण्याचं कमिशन मिळतं असा माझा अंदाज आहे. Proud

अश्विनी मला थोडसेच माहीतेय
गोरेगाव वेस्टातल सिध्दार्थनगर प्रबोधन बेस्ट काँलनी गजानन काँलनी
पाटकर काँलेज
इस्टातल जयप्रकाश नगर नंदादीप स्कूल दिँडोशी गोकुळधाम पांडुरुग वाडी

<< हँगिंग गार्डनच्या पायथ्याशी असलेल्या, पारशी विहिरीसंबंधी पण लिहा कोणितरी >> लहानपणीं आम्हालाही जाम कुतूहल होतं त्या विहीरीबद्दल. केम्प्स कॉर्नरवरून हँगींग गार्डनला जाणार्‍या रस्त्याला उजव्या बाजूला फाटा फुटतो तिथून त्या विहीरीकडे जातां येतं, असं माहित होतं. एकदां त्या निर्मनुष्य रस्त्यावरून दोन-चारशें मीटर गेलंही होतं आमचं टोळकं. पण पुढे कांही पारशी पुजार्‍यानी न बोलतां आमच्याकडे जी भेदक नजर रोखली त्यांतूनच पुढे काय वाढून ठेवलं असावं याची कल्पना आली व आम्ही काढता पाय घेतला.
मग हँगींग गार्डनच्या बाजूने खाली उतरून तिथं जातां येईल का, अशीही कल्पना पुढे आली. त्या गार्डनला लागूनच उतारावर [ चौपाटीच्या विरुद्ध बाजूला] होमी भाभा यांचा मोठा बंगला होता/ अजूनही असावा.त्याच्या बाजूने असलेल्या पायवाटेने आम्ही खालीं उतरलो. अगदीं कोकणातल्या पायवाटेसारखी ही पायवाट दगडा-धोंड्यातून झाडाना बगल देत खालीं उतरायची. मधेंच कुत्रीं भुंकल्याच्या आवाज सोडला तर निरव शांतता. त्या वाटेने आम्हाला खालच्या एका रस्त्यावर आणून सोडलं. वाटेत कुठे त्या विहीरीचा मात्र पत्ताच नव्हता. पण अचानक आम्ही एका वेगळ्याच दुनियेत आल्याचा भास मात्र झाला. रस्त्याच्या दुतर्फा किल्ल्याच्या तटासारख्या उंच भिंती उभारलेल्या मोठ्या इस्टेटीच दिसत होत्या. आंतल्या गर्द झाडीतून मिनि पॅलेसेस डोकावत असल्याचंही जाणवत होतं. पण माणसांची मात्र चाहूलही नव्हती. एका भिंतीलगतच आंतलं फणसाचं झाड फणस दाखवून आम्हाला वेडावत होतं. आम्हाला कळायच्या आंतच आमचा एक मित्र जवळच्या बाहेरील झाडावरून सर्रकन वर चढला व भिंतीचा आधार घेत त्याने एक छोटासा फणस पीळवटून तोडला व खालीं फेकला. कसाबसा तो फणस झेलत आम्ही त्याला खाली उतरायला सांगत होतों, इतक्यांत लांबून त्याच कंपाऊंडमधून दोन रखवालदार काठ्या घेवून ओरडत येताना दिसले. आमचा तो मित्र कसाबसा खाली उतरला आणि आम्ही धूम ठोकली. धांपा टाकत आम्ही थांबलो तेंव्हा केम्प्स कॉर्नरवरून ब्रीच कँडीला जाणार्‍या रस्त्यावर पोचल्याचं लक्षात आलं. त्याही परिस्थितीत, आमच्या त्या मित्राच्या चेहर्‍यावर मात्र विजयाचं हंसू होतं; ह्या सगळ्या धामधूमीत त्याने तो फणस कधी ताब्यात घेतला होता व ती 'ट्रॉफी' न टाकतां बरोबरच घेवून आला होता हें आम्हाला कळलंच नव्हतं.
नंतर आम्हाला कळलं कीं पूर्वीच्या बर्‍याच संस्थानिकांच्या मुंबईतील वास्तव्यासाठी घेतलेल्या त्या इस्टेट्स होत्या. सुट्टीमधे मग आम्ही तिथं नियमितपणें हुंदडायला जात असूं. पण पारश्यांची विहीर मात्र आम्हाला शेवटपर्यंत हुलकावणी देतच राहिली.
[ अर्थातच, आतां त्या भागात टोलेजंग इमारती उभ्या आहेत व तो 'एलाईटस'मधल्याही उच्चभ्रू मंडळींचा राखीव प्रांत समजला जात असावा ! ]

नाना चौकात ते एक पारशाचं आइस्क्रीम सेन्टर होतं - ग्रॅन्ट रोडकडे जाणार्‍या रस्त्यावर. नाव विसरले.
लहानपणी परीक्षा संपल्यादिवशी बाबा तिथे न्यायचे फालुदा खायला. ते बंद झालं तेव्हा मला हळहळ वाटली होती अगदी! आता फालुदा/आइस्क्रीम खायचं तर क्रॉफर्ड मार्केटला जायचं. Happy

शेट्टीचं हॉटेल आता आहे का माहीत नाही. पण ते मला कायम ओव्हरहाइप्डच वाटत आलेलं आहे एनीवेज.

विल्सन कॉलेजचं आवार आणि लायब्ररी किती हिंदी सिनेमांत वापरतात! व्हीटीच्या खालोखाल त्याचा नंबर लागेल बहुतेक.
'मशाल' सिनेमात वहीदा रहमान मरते तो सगळा प्रसंग बॅलार्ड पिअरच्या एरियात घेतलाय. आता रात्रीच्या वेळी तिथे त्यांना लिफ्ट द्यायला कोण येणार असा मला जेन्युइन प्रश्न पडला होता! Proud

विल्सन कॉलेजचं आवार आणि लायब्ररी किती हिंदी सिनेमांत वापरतात! व्हीटीच्या खालोखाल त्याचा नंबर लागेल बहुतेक. >> नाही ईबा, दुसरा नंबर फिल्म सिटीचा, कदाचित पहिलाच असेल.

आता रात्रीच्या वेळी तिथे त्यांना लिफ्ट द्यायला कोण येणार असा मला जेन्युइन प्रश्न पडला होता >> Lol

विल्सन कॉलेजचं आवार आणि लायब्ररी किती हिंदी सिनेमांत वापरतात! व्हीटीच्या खालोखाल त्याचा नंबर लागेल बहुतेक.>>> आमचं कॉलेज. तिथले आमचे फिजिकल केमिस्ट्री शिकवणारे प्रो. रत्नाकर शेट्टी बीसीसीआयचे हेड झाले कळल्यावरही असंच मस्त वाटलं होतं. शिक्षक म्हणूनही उच्च.

पाटील,ऑपेरा हाऊसचं प्रचि अप्रतिम !
उत्सवांचं,देवळांचं,थेटरांचं,प्रख्यात शाळांचं अन त्यातल्या कुख्यात हुशार वाह्यात मुलांचं,चाळींचं अन खोताच्या वाडीसारख्या चक्रव्यूहांचं ते जुनं गिरगाव..अन हो 'मौज प्रकाशन गृह' ही पंढरीही होती तिथे.
'लखनौ चिकन' मधले प्रिंटेड टॉप्सही छान असायचे. मी नेहमी घ्यायची तेव्हा अन अजूनही ती अपुरी इच्छा आहे पण का कोण जाणे तिथे जाणं होत नाही..
नंदिनी,अधिक लिहिणार होतीस ना जुन्या बांधकामांवर?
जाई, पूर्व गोरेगावात पांडुरंगवाडीत दिलीप पुरुषोत्तम चित्रेंचे वडील अन 'अभिरुची' या महान पण पुढे पडझडत गेलेल्या मासिकाचे संस्थापक संपादक पुरुषोत्तम आत्माराम चित्रे राहत. विशीतल्या माझी सत्तरीतल्या या महान संपादकाशी मैत्री होती.(:) त्यांची सहनशक्ती बरीच होती). त्यांच्या या गोरेगावातल्या घरी लेखक-कवींचा राबता असे.मराठीच नव्हे तर जागतिक साहित्याचे बाबुराव (पु.आ.चित्रे) ज्ञानकोश होते.व्यवहाराशी कधीही जमले नाही. स्वप्नसृष्टीतच वावर.इतका खरा माणूस विपन्नावस्थेतच संपला असेच म्हणावे लागेल..

जयहिंद!! >>> घरी फोन करुन विचारलंस की काय? Lol
फुगडी >>>> ऑपेरा हाऊसमध्ये अरेंज करु. रिनोवेशनचा खर्च निघेल Biggrin (आपल्याला Light 1 )

हो Lol

इतके दिवस रोमातून वाचतेय हा बाफ. माझा मुंबईशी संबंध फक्त उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाकडे गेल्यावरच. इथे लिहिलेल्या भागांमध्ये वर्ष-दोन वर्षातून एकदा पाहूण्यासारखी चक्कर मारायचो.

पण वर जाईने गोरेगावचा उल्लेख केल्यावर मात्र रहावलं नाही. सिद्धार्थनगर, तिथली ती शाळा- आदर्श विद्यालय, शाळेच्या बाजूचा जलतरण तलाव, स्टेशनजवळचं भाजी मार्केट, टोपीवाला बंगला असं सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं एकदम. Happy
दोन वर्षांपूर्वी सिद्धार्थनगर परिसरातून चक्कर मारली होती. तिथल्या सगळ्या बैठ्या चाळी पाडून रिडेव्हलपमेंटचं काम चालू होतं. आज्जीचं घर असलेला रोड नं १० ओळ्खताच आला नाही मला.

<<विल्सन कॉलेजचं आवार आणि लायब्ररी किती हिंदी सिनेमांत वापरतात! व्हीटीच्या खालोखाल त्याचा नंबर लागेल बहुतेक. >> नाही ईबा, दुसरा नंबर फिल्म सिटीचा, कदाचित पहिलाच असेल.<<>>

वांद्रे - ब्यांडस्टांड विसरू नका! अगणित चित्रपटांचं शूटींग झालं आहे तिथे!

सुलु, फिल्म सिटीची बाकी ठिकाणांशी कशी तुलना होईल? Happy
पण विल्सन जरा 'आपला बाब्या' आहे, त्यामुळे जास्त कौतुक वाटतं हे खरं. Happy

Pages