रव्याचा केक

Submitted by प्राजक्ता on 18 March, 2013 - 15:53
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

१वाटी दु ध
१वाटी दही
सव्वा वाटी साखर
पाव वाटी पातळ केलेले साजुक तुप
दिड वाटी जाडसर रवा
१ टी-स्पुन बेकि.न्ग पावडर
१ टि-स्पुन बे.सोडा
व्हॅनिला ई.न्सेस कि.न्वा जाय्फळ पावडर
सुकामेवा आवडत असल्यास केक मधे घालायला कि.न्वा सजावटीसाठी.

क्रमवार पाककृती: 

दुध्,तुप्,दही,साखर एका भा.न्ड्यात एकत्र करावे, एका भा.न्ड्यात रवा कोरडाच गुलाबी र.न्गावर भाजुन घ्यावा, जरा निवला की दह्या-दुधाच्या मिश्रणात कालवावा आणी तासभर झाकुन ठेवावे.
तासाभराने रवा मुरुन फुलुन येतो.
ओव्हन ३५० ला तापवत ठेवावे, एका केकपात्राला आतुन सगळिकडे थोडे तुप लावुन घ्यावे.
व्हॅनिला ई.न्सेस कि.न्वा जाय्फळ पावडर,बे.न्किग पावडर ,बे.सोडा दोन्ही घालुन हलवुन घ्यावे.मिश्रण सरसरित हवे, घट्ट वाटले तर दुध घालायला हरकत नाही.
३० मिनिट ओव्हन मधे मधल्या रॅकवर बेक करावे.
rava kek.jpg

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे
अधिक टिपा: 

१.हा केक तव्यावर वाळु रचुन कि.न्वा नॉनस्टिक पॅन मधेही करता येइल
२.सुकामेवा घातला तर रव्याबरोबरच मिश्रणात टाकता येइल (मी वरुन लावलाय)
३.स्वादासाठी वेलची-पुड घालु नये.
४.मॅन्गो पल्प घालुन व्हेरिएशन करता येइल.(मी केलेले नाही)

माहितीचा स्रोत: 
जुन्या हितगुज वरिल चर्चा,दिनेशदा
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जुन्या हितगुज वरची ही दिनेशदा या.न्ची क्रुती आहे,
त्यावेळेस हा केक खुप वेळा केला गेला,रव्याचे आप्पे रेसिपिवरुन आठवण झाली म्हणून आज परत केला.
फोटो टाकते थोड्यावेळात.
\

धन्यवाद अगो!
शुम्पी मलाही आवडतो पण मुलिला माझ्यापेक्षाही जास्त आवडतो.
दिनेशदा! माझे सासरे कुठलाही केक खात नाहित अगदी एगलेस आहे अस सागितल तरी ते खायचे नाहित, हा केक
मात्र त्या.न्ना फार आवडला होता.

मस्त दिसतोय केक Happy

माझ्या लेकीला पण रव्याचा केक आवडतो Happy त्याला ती 'बेक्ड गोड शिरा' म्हणते Lol

खूप जुनी कृती आहे ही. ओव्हन नव्हते तेव्हा तव्यावर वाळू पसरून करत असत त्या काळची Happy बिन अंड्याची असल्यामुळे आजी-आजोबा लोकांची आवडती.

मस्त होतो रव्याचा केक. ह्याचे आमरस घालून 'आंबाच्या केक' म्हणून व्हर्जन आहे मायबोलीवरच मानुषींनी लिहिलेले. लिंक ही: http://www.maayboli.com/node/2663

अ प्र ति म
मी नक्की करणार.
पण माझ्याकडे एल्जीचा मायक्रोव्हेव आहे त्यात कसे करु??
प्रिहीट किती वेळ करायचे? प्रिहीट करताना मायक्रोव्हेव मधे पाण्याचा बाऊल वैगरे ठेवायचा का?

नॉस्टालजीक झाले. लहानपणी माझ्या प्रत्येक वादिला आई हाच केक करायची Happy

इथे वाचून पुन्हा त्या चवीची आठवण झाली आणि घरी जाऊन लग्गेच केला. मस्त झाला होता. मी प्रमाण हेच घेतलं (एरव्ही आई/साबा सुद्धा तुप अंमळ जास्त घ्यायच्या) त्यात मी डेअरी व्हाईटनर घातलं (१० रुपयाचं एक पाकिट) (ट्रेक करता आणलेल्या पैकी २-३ पाकिटं घरात होतीच म्हणून घालून बघितलं) त्यामुळे खवा घातल्यासारखी थोडीशी चव आली. हे अ‍ॅडिशन करायला हरकत नाही हे कळलं पुढचं पाकिट पण असच संपणार आता Proud

केकच्या तुकड्याचा तेव्हढा फोटु आहे Sad केक एकाच नाश्त्याला पुर्ण संपला)

पण माझी कैतरी मिष्टेक झाली असावी. केक उपडा केला तेव्हा मधल्या भागातला केक थोडा भांड्यालाच चिकटला. भांड्याला मैदा नीट भुरभुरला गेला नसेल का?

हा केक मी कन्व्हेक्शन मधे न करता मावे मोड वर ६ मिनीटात केला.

सारिका कन्व्हेक्शन वाला मावे आहे का? असेल तर कन्व्हेक्शन मोड वर प्रिहिट करुन नेहमीच्या केक टिन मधे केक करु शकशील. प्रिहिट करताना पाणी ठेवत नाहीत (निदान मी तरी असं काही वाचलं नाही आहे)

माझ्या प्रमाणे तू मावे मोड मधेही करु शकशील काचेच्या बोल मधे ६ मि. मधे

त्यासाठी सेटिंग ठेवताना हाय पॉवर वर ३ मि. आणि ८०% पॉवर वर ३ मि. सेटिंग करुन मग स्टार्ट कर. मी आधी ५ मि. (२ मि हाय पॉ.+३ मिन. ८०% पॉ.) ठेवलेल सेटिंग पण थोडा व्हायला हवा असं वाटलं म्हणून अजून १ मिन वाढवलं

कविन तु लिहिलंस खरं पण डोक्यावरुन गेलं सगळं Sad
मला आता मधला की काय तो रॅक शोधावा लागेल, कन्वेक्शन आहे माझ्या मावेमधे.
मी कुठेतरी वाचलं होतं की प्रिहीट करताना पाण्याचा बाउल ठेवायचा.

हल्लीच आमच्या डॉक्टरांनी 'तुपाची बेरी' महती गायल्यापासून त्यांनीच सांगितल्याप्रमाणे तूप कढवून झाल्यावर हा असा केक करते.
तूप कढवून झाल्यावर काढून घेतलं की तूप कढवलेल्या भांड्यात अर्धी वाटी पाणी घालून खळाखळा उकळून घ्यायचं. ते गरम पाणी भांड्याच्या आतून सगळीकडून लागेलसं बघायचं. मग त्यात एक वाटी साखर आणि एक वाटी भाजलेला रवा घालून ठेवायचा. ते भांडं आणि आतलं रवा साखरेचं मिश्रण पूर्ण गार झालं की त्यात पाऊण वाटी दूध घालायचं. आणि एकदम घट्ट दही एक वाटी घालून सगळं मिश्रण भरपूर फेटून घ्यायचं. स्वादासाठीचे जिन्नस घालायचे. साधारण अर्धा तास ते झाकून ठेऊन द्यायचं. मग त्यात इनोचा अख्खा सहा रुपयेवाला पॅक घालून व्यवस्थित ढवळून केक भाजून घ्यायचा. मस्त खमंग केक होतो. मी कन्वेक्शन मोडवर १८० डिग्रीला १० मिनीटं प्रीहीट करून नंतर केक वीस मिनीटं भाजते.

सध्या रवा केकची चलती आहे घरी. अंड घालून, न घालता , अजून काही घटक कमी जास्त करत व्हेरिएशन्स चालू आहेत. आणि केल्या केल्या संपतोय म्हणजे चांगला होतोय प्रयोग Proud

सगळे प्रयोग मावे मोड वर करतेय. ६ मिन. यम्मी केक होतोय Happy

Mee haa cake 2-3 da kela ani awesome zala..
Aaj mazya pillacha first birthday mhanun kela.. Pan khulyasarakhi baking powder/soda visarale. Sad

Mag ata ravyache ladu. Ani andyacha cake kela punha Lol