चिकन बिर्याणी

Submitted by सामी on 4 March, 2013 - 05:44
लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

एक किलो चिकन, 7/8 कांदे , ४/५टॉमेटो, आले, लसूण 15-20 पाकळ्या, 5-६ लवंग, 7-8 मिरी, ३ बडी वेलची, 4 लहान वेलची, दालचिनी १ इंच, 2 लहान चमचा धणे, खसखस 1/2 चमचा, तमालपत्र, लाल मिरची पूड , कोथींबीर, पुदीना, तेल, तूप, ४ वाटी बासमती तांदूळ.

क्रमवार पाककृती: 

ही रेसिपी मी वेगवेगळ्या स्टेप्स मध्ये ब्रेक करून टाकत आहे. माझ्या बहुतेक मैत्रीणीना मी कृती अशीच सांगितली आणि त्यांना अश्या प्रकारे सोप्पी वाटली.

माझ्या बरयाच मैत्रीणी/मित्र चिकन बिर्याणी ही हॉटेल मध्येच जाऊन खायची किंवा घरी मागवायची या मतावर ठाम होते. इव्हन नवर्याला ही घरी हॉटेल सारखीच किंवा अजून चांगली बिर्याणी बनू शकते यावर विश्वास न्हवता. पण घरी केलेली चिकन बिर्याणी खाल्ल्यापासून महिन्यातून एकदा तरी बिर्याणी होतेच.

१. चिकन ला दोन चमचे चमचे मिरची पूड , हळद , मीठ , अर्धी लहान वाटी दही लावून ठेवावे
01_1.jpg

२. नॉर्मल साईझ चे 7/8 कांदे उभे कापून घेउन तेलात गोल्डन ब्राउन रंगावर फ्राय करून वेगळे ठेवणे. कढईत तेल न टाकता कापलेले कांदे मंद आचेवर ठेवावेत .थोड्यावेळाने तेल घालावे. हे सारखे बघावे लागत नाही. थोड्यावेळाने मध्ये मध्ये परतावे.
कांदा व्यवस्थित फ्राय व्हायला १ तास लागतो. पण मंद आचेवरच फ्राय करून घ्यावा. ज्या दिवशी बिर्याणी बनवायची त्यादिवशी उठल्या उठल्या कांदा फ्राय करायला गॅस वर ठेवून द्यावा .
फूड प्रोसेसर मध्ये कापलेला कांदा.
onion.jpgफ्राय केल्यावर
onion1.jpg

३. ४/५ टोमॅटो कुकर मध्ये शिजवून घ्यावेत . २ शिट्या काढाव्यात. थंड झाल्यावर सालं आणि बिया काढून मिक्सर मधून प्युरी करून घ्यावी. ती वेगळी ठेवावी.
टोमॅटो प्युरी/वाटलेला मसाला
tometo.jpg

४. खाली दिलेला गरम मसाला तेलात थोडा परतून त्याची मिक्सर वर बारीक पूड करावी.
2 1/2 इंच आले , लसूण 15-20 पाकळ्या , 5-६ लवंग , 7-8 मिरी , 2 बडी वेलची, 4 लहान वेलची, दालचिनी १ इंच , 2 लहान चमचा धणे , खसखस 1/2 चमचा

वरील प्रमाणात मी नॉर्मल साईझ च्या चार वाट्या बासमती तांदूळ घेते. अर्धा तास आधी बासमती तांदूळ धुऊन पाण्यात बुडवून ठेवावे. टोमेटो प्युरी , गरम मसाला , कांदे फ्राय करून झाले कि भात कारायला घ्यावा.

५. एका मोठ्या पातेल्यात थोडे तेल तापवून त्यात तमाल पत्र टाकावे . तांदूळ पाण्यातून गाळून घेऊन तेलावर परतावेत . तांदळाच्या चौपट पाणी दुसर्या टोपात उकळायला ठेवावे . पाणी उकळल्यावर तांदळात टाकावे . आच मोठी ठेवावी. मीठ टाकावे. थोड्या वेळाने तांदूळ अर्धा कच्चा शिजला असे वाटले कि गॅस बंद करून मोठ्या चाळणीतून भात गाळून घ्यावा. भात ताटात मोकळा करून ठेवावा .भात लगेच गाळून घ्यावा नाहीतर चिकट होतो
rice.jpg
आता फायनल स्टेप.

६. ज्या टोपात बिर्याणी करायची त्या टोपात प्रथम तूप आणि तेल टाकावे. शक्यतो जाड बुडाचा टोप घ्यावा. नुसत्या तुपातली बिर्याणी अप्रतीम होते .

तेलात 2 मोठी वेलची कुटून , तमाल पत्र, दालचिनी , वाटलेला मसाला, लाल मिरची पूड २ चमचे , मीठ टाकून परतावे . मग त्यात चिकन टाकून परतावे. मग टॉमेटो प्युरी टाकून नीट परतून घ्यावी. चिकन ला सगळा मसाला लागेल अश्या पद्धतीने परतावे. मग फ्राय केलेला कांदा . पुन्हा परतून त्यात एक वाटी कापलेली कोथिम्बीर , एक वाटी पुदिना , आवडी प्रमाणे काजू टाकावेत . आणि नीट मिक्स करून टोप खाली उतरावा. हे सगळे मोठ्या आचेवर करावे.

टोप खाली उतरल्यावर चिकन एकसारखे करून त्यावर अर्धाकच्चा शिजवलेल्या भाताचा थर लावावा . भातावर हवे असल्यास केशराचे पाणी शिंपडावे. थर लावल्यावर अर्धा वाटी पाणी भातावर शिंपडून , कडेने तूप सोडावे .
layers.jpg

टोपावर अ‍ॅल्युमिनिअम फॉईल लावावी . किंवा गव्हाच्या पिठाची पेस्ट लावावी. दोन चमचे पिठात थोडे पाणी घालून पातळ पेस्ट करावी . टोपावर निट बसणारे झाकण लावून टोपाची कडा आणि झाकणाच्या मध्ये जी गॅप असेल तिथे ही पेस्ट भरावी.
गव्हाची पेस्ट
paste0.jpgटोपाला पेस्ट लवल्यावर
paste.jpg

45 मिनिटे मंद गॅस वर अ‍ॅल्युमिनिअम फॉईल लावून टोप ठेवून द्यावा .

बिर्याणी अजून मुरण्यासाठी तवा तापवून त्यावर २० मिनिटे मंद गॅस वर भांडे ठेवावे .

अ‍ॅल्युमिनिअम फॉईल काढून मस्त बिर्याणीचा आस्वाद घ्यावा. Happy

बिर्याणी करणे मला मनापासून आवडते कारण सगळे खूप आवडीने खातात . कुणी जर पहिल्यांदाच बिर्याणी करणार असेल आणि काही अडल्यास मला फोन वरून मार्गदर्शन करायला आवडेल.

याचे कारण . माझी ताई अप्रतीम बिर्याणी करते. तिने मला पहिल्यांदा जेव्हा मला घरी (सासरी ) बिर्याणी करण्यास सांगितले तेव्हा मी हसण्यावर नेले कारण तोपर्यंत मी फक्त खाण्यातच एक्स्पर्ट होते . पण आता मी बर्यापैकी बिर्याणी करण्यामध्ये एक्स्पर्ट झाले आहे, आणि जर मी एक्स्पर्ट झाली आहे तर इतर कुणीही होऊ शकेल .
biryaanee.jpg

वाढणी/प्रमाण: 
६ /७ जणांना व्यवस्थित पुरते.
अधिक टिपा: 

१. कांदा कढईत तळून घेतल्यास बिर्याणी अजून चविष्ट होते पण खूप तूपकट होते. आवडत असल्यास कांदा तळून घेऊ शकता.
२. बिर्याणी आणि भाताचा थर लावताना सगळ्यत खाली बटटायाच्या कापांचा थर लावल्यास खाली करपत नाही आणि यातले बटाटे छान लागतात. पण खूपसा मसाला बटाटयामधे अ‍ॅब्सोर्ब होतो.
३. जाड बुडाचे भांडे नसल्यास १५ मिनिटांनी टोप तव्यावर ठेऊन बिर्याणी शिजवावी.
४. बिर्याणी वाढताना वरतून तळलेला कांदा , तळलेले काजू टाकावे.
५. अश्याच पद्ध्तीने मटण बिर्याणी करावी पण मटण आधी शिजवून घ्यावे.
६. कांदे फ्राय करून फ्रिज मधे ठेवू नका. चव बदलते. फूड प्रोसेसर मधे उभे कापून फ्रिज मधे ठेवल्यास चालेल.

माहितीचा स्रोत: 
माझी ताई (कल्पना)
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सामी,
सकाळी कांदा फ्राय करून (फ्रीजमध्ये ठेवणार नाही ), चिकन मेरीनेट करून फ्रीजमध्ये ठेवले, टोमॅटो प्युरी बनवून आणि गरम मसाला पूड तयार करून ठेवली आणि संध्याकाळी बिर्याणी बनवली तर चालेल का? म्हणजे मला विचारायचे आहे कि चवीत काही फरक पडेल का? आणि तळाशी बटाट्याऐवजी काय वापरू शकतो?

थंड अरे व्वा. मस्तच.

सकाळी कांदा फ्राय करून (फ्रीजमध्ये ठेवणार नाही ), चिकन मेरीनेट करून फ्रीजमध्ये ठेवले, टोमॅटो प्युरी बनवून आणि गरम मसाला पूड तयार करून ठेवली आणि संध्याकाळी बिर्याणी बनवली तर चालेल का? म्हणजे मला विचारायचे आहे कि चवीत काही फरक पडेल का? >
आशिता, सकाळी फ्राय केलेला कांदा संध्याकाळ पर्यंत खराब होऊ शकेल ग, त्यापेक्षा सकाळी फ्रीजमध्ये कपून ठेव आणि बिर्याणी करायच्या आधी एक तास फ्राय करायला घे. गरम मसाला एकत्र करून ठेव आयत्या वेळी वाटून घे. टोमॅटो प्युरी बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकतेस. चिकन रूम टेम्परेचर ला आल्यावरच बिर्याणी करायला घे.
तळाशी बटाटे नाही वापरलेस तरी चालेल, फक्त टोप जाड बूडाचा घे.
उशीरा प्रतीसाद दिल्याबद्दल , सॉरी.

आणि तळाशी बटाट्याऐवजी काय वापरू शकतो?

कांदा उभा, थोडा जाडसर कापुन मी तो तळाशी पसरते. कांदा मस्त भाजला जातो, काळपट अन कुरकुरीत आणि बिर्याणीची चव अजुनच खुलते.

आयुष्यात पहिल्यांदा मी स्वतः चिकन केलं, आणि थेट बिर्याणीच!

सामी, तुझ्या आणि फक्त तुझ्या कृपेने गं!!!

फार्फार भारी झाली होती!!!

धन्यवाद!!!

मी पहिल्यांदाच बिर्याणी बनवली..सर्व स्टेप्स फॉलो केल्या .अप्रतिम जमली होती बिर्याणी...खुप सारे धन्यवाद...

सामी....

ओ गॉड !! तू यात एक्स्पर्ट आहेस याचा मला बिलकुल पत्ता नव्हता.....आता मुंबई गटग ठरवितोच आणि हाच बेत करायला लावतो.....ग्रेट.

आम्ही कोल्हापूरकर तर बिर्याणीचे परमभक्त आहोतच....पण मटण बिर्याणी एक नंबरवर....अर्थात तू सांगितलेल्या रितीनुसार चिकन बिर्याणीदेखील केली जातेच....तरीही तू बटाट्यांचा जो उल्लेख केला आहे त्याबद्दल मी इथल्या एका पाकप्रसिद्ध मित्राला विचारले तर तोही काहीसा गोंधळला....त्यानेही कधी बिर्याणीत बटाटे वापरले नाहीत....त्यामुळे बिर्याणीच्या चवीला गोडपणा येतो असे वाटते [हे त्याचे मत]. तुला काय अनुभव?

थँक्स नम्रता.

मामा नक्किच, मी मागे एकदा लिहिले आहे की माझ्या सासूबाई कोल्हापूर च्या आहेत. त्यामुळे कोल्हापूर च्या सगळ्या मामा आणि मावश्यांना इथे आल्यावर मी केलेली बिर्याणी खूप आवडते. कोल्हापूर ला आल्यावर मी मटण बिर्याणी करावी ही सगळ्यांची मागणी अजून पेंडींग आहे. जेव्हा कोल्हापूर ला आल्यावर मटण बिर्याणी करेन तेव्हा तुम्हाला आवर्जून आमंत्रण देईनच.
आणि जेव्हा मुंबईत गटग होईल तेव्हा बिर्याणी नक्की.
आता बटाटयाबद्दल. मी शक्यतो बटाटा घालत नाही कारण त्यात मसाला मुरतो आणि चिकनची चव थोडी बिघडते. पण काही जण खाली बिर्याणी करपू नये म्हणून बटाट्याचे किंवा कच्या कांद्य्याचे कापं वापरतात.
मी सर्व्ह करताना वरतून तळलेला कांदा आणि आवडत असल्यास बटाटयाचे कापं घालते. ते खायला छान लागतात.

वल्लरी बिर्याणी करण्यासाठी गटग करुया का? Happy मोठ्या प्रमाणात करू. पाच सहा किलो वैगरे.

अहो,
रावणाला तोंडं दहा असली तरी पोट एकच आहे, दाही तोंडांनी एकेक घास खाईल बिचारा अन स्तुती मात्र १० तोंडांनीच करेल. Proud

सामी, धन्यवाद. खूप आवडली सगळ्यांनाच घरी ही बिर्याणी.
खरतर मीही घरीच करते बिर्याणी. हा पदार्थ बाहेर खाण्याचा नाहीच, असं ठाम मत आहे घरी, त्यामुळे महिन्यातून एकदा ठरलेलीच. पण मी थर लावून जास्त वेळा केली आहे, तेव्हा ही कृती वाचल्यावर करायचीच असं ठरलं. टेम्प्टिंग तर आहेच. पहिल्यांदा, केली तेव्हा नवरा आणि मी दोघच अस्ल्याने कमी प्रमाणातच केली होती, आणि आम्हाला प्रचंड आवडली. त्यामुळे सासरी गेले असतांना बिर्याणी करायचे ठरताच नवर्‍याने "माझ्या बायकोच्या हातची बिरयाणी खाउन बघा" असा गूगली टाकला. त्यात पाहुणे वाढल्यामुळे बिर्याणीचेही प्रमाण वाढत जाऊन शेवटी ३ किलोची बिर्ञाणी करावी लागली. प्रमाण तुम्ही दिलेलेच वापरले, साधारण तिप्पट करून. आणि मी प्रसिद्ध झाले. तुमच्या रेसिपिला मिळालेलं क्रेडिट तुम्हाला दिलंच पाहिजे, म्हणून मुद्दाम लिहितेय.
एकच अ‍ॅडिशन केली, आणि सगळ्याना आवडली म्हणून इथे देण्याचा आगाऊपणा करतेय.
मॅरिनेट करतांनाच, मसाला लावून झाल्यावर, त्या भांड्यात एक वाटी ठेवावी. गॅस्वर कोळसे भाजून, निखारे करुन त्यात ठेवावे व वरून साजुक तुप सोडावे. लगेच झाकण ठेवून त्यावर वजन ठेवावे, जेणेकरून धूर बाहेर जाणार नाही. चिकनला अस्सा दम बसतो की बस!!! एकदा करून बघा.

गोगो, धन्यवाद. तुमचा प्रतिसाद वाचून खूप छान वाटले.
तुमचे अ‍ॅडीशन आवडले, नक्की करून बघेन.

वेल, नविन वर्षात नक्की करू. Happy

सामी....गुरुवारी याच पद्धतीने सोया चंक्स घालुन मस्त झालेली बिर्यानी.....गुरुवार मार्गशिर्षातला लास्ट होता ना....तेव्हा बनवलेली....नवर्याला वासाने वाटलं की चिकन बिर्यानी केलिय...मग तो सांगायला लागला की अर्रे आज कस काय नॉन वेज? आज गुरुवार तु विसरलीस का?? मग त्याला सोयाचंक्स दाखवल्यावर खुश झाला ....आता संडे हो या मंडे रोज खाओ ( अंडे ) नाही बिर्यानी.....सामी स्टाईल...... Happy

अनिश्का , मस्तच ग. आता मी पण करेन, सोयाचंक्स घालून. Happy

सर्व बिर्याणी प्रेमिंना नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.....

Pages