
एक किलो चिकन, 7/8 कांदे , ४/५टॉमेटो, आले, लसूण 15-20 पाकळ्या, 5-६ लवंग, 7-8 मिरी, ३ बडी वेलची, 4 लहान वेलची, दालचिनी १ इंच, 2 लहान चमचा धणे, खसखस 1/2 चमचा, तमालपत्र, लाल मिरची पूड , कोथींबीर, पुदीना, तेल, तूप, ४ वाटी बासमती तांदूळ.
ही रेसिपी मी वेगवेगळ्या स्टेप्स मध्ये ब्रेक करून टाकत आहे. माझ्या बहुतेक मैत्रीणीना मी कृती अशीच सांगितली आणि त्यांना अश्या प्रकारे सोप्पी वाटली.
माझ्या बरयाच मैत्रीणी/मित्र चिकन बिर्याणी ही हॉटेल मध्येच जाऊन खायची किंवा घरी मागवायची या मतावर ठाम होते. इव्हन नवर्याला ही घरी हॉटेल सारखीच किंवा अजून चांगली बिर्याणी बनू शकते यावर विश्वास न्हवता. पण घरी केलेली चिकन बिर्याणी खाल्ल्यापासून महिन्यातून एकदा तरी बिर्याणी होतेच.
१. चिकन ला दोन चमचे चमचे मिरची पूड , हळद , मीठ , अर्धी लहान वाटी दही लावून ठेवावे
२. नॉर्मल साईझ चे 7/8 कांदे उभे कापून घेउन तेलात गोल्डन ब्राउन रंगावर फ्राय करून वेगळे ठेवणे. कढईत तेल न टाकता कापलेले कांदे मंद आचेवर ठेवावेत .थोड्यावेळाने तेल घालावे. हे सारखे बघावे लागत नाही. थोड्यावेळाने मध्ये मध्ये परतावे.
कांदा व्यवस्थित फ्राय व्हायला १ तास लागतो. पण मंद आचेवरच फ्राय करून घ्यावा. ज्या दिवशी बिर्याणी बनवायची त्यादिवशी उठल्या उठल्या कांदा फ्राय करायला गॅस वर ठेवून द्यावा .
फूड प्रोसेसर मध्ये कापलेला कांदा.फ्राय केल्यावर
३. ४/५ टोमॅटो कुकर मध्ये शिजवून घ्यावेत . २ शिट्या काढाव्यात. थंड झाल्यावर सालं आणि बिया काढून मिक्सर मधून प्युरी करून घ्यावी. ती वेगळी ठेवावी.
टोमॅटो प्युरी/वाटलेला मसाला
४. खाली दिलेला गरम मसाला तेलात थोडा परतून त्याची मिक्सर वर बारीक पूड करावी.
2 1/2 इंच आले , लसूण 15-20 पाकळ्या , 5-६ लवंग , 7-8 मिरी , 2 बडी वेलची, 4 लहान वेलची, दालचिनी १ इंच , 2 लहान चमचा धणे , खसखस 1/2 चमचा
वरील प्रमाणात मी नॉर्मल साईझ च्या चार वाट्या बासमती तांदूळ घेते. अर्धा तास आधी बासमती तांदूळ धुऊन पाण्यात बुडवून ठेवावे. टोमेटो प्युरी , गरम मसाला , कांदे फ्राय करून झाले कि भात कारायला घ्यावा.
५. एका मोठ्या पातेल्यात थोडे तेल तापवून त्यात तमाल पत्र टाकावे . तांदूळ पाण्यातून गाळून घेऊन तेलावर परतावेत . तांदळाच्या चौपट पाणी दुसर्या टोपात उकळायला ठेवावे . पाणी उकळल्यावर तांदळात टाकावे . आच मोठी ठेवावी. मीठ टाकावे. थोड्या वेळाने तांदूळ अर्धा कच्चा शिजला असे वाटले कि गॅस बंद करून मोठ्या चाळणीतून भात गाळून घ्यावा. भात ताटात मोकळा करून ठेवावा .भात लगेच गाळून घ्यावा नाहीतर चिकट होतो
आता फायनल स्टेप.
६. ज्या टोपात बिर्याणी करायची त्या टोपात प्रथम तूप आणि तेल टाकावे. शक्यतो जाड बुडाचा टोप घ्यावा. नुसत्या तुपातली बिर्याणी अप्रतीम होते .
तेलात 2 मोठी वेलची कुटून , तमाल पत्र, दालचिनी , वाटलेला मसाला, लाल मिरची पूड २ चमचे , मीठ टाकून परतावे . मग त्यात चिकन टाकून परतावे. मग टॉमेटो प्युरी टाकून नीट परतून घ्यावी. चिकन ला सगळा मसाला लागेल अश्या पद्धतीने परतावे. मग फ्राय केलेला कांदा . पुन्हा परतून त्यात एक वाटी कापलेली कोथिम्बीर , एक वाटी पुदिना , आवडी प्रमाणे काजू टाकावेत . आणि नीट मिक्स करून टोप खाली उतरावा. हे सगळे मोठ्या आचेवर करावे.
टोप खाली उतरल्यावर चिकन एकसारखे करून त्यावर अर्धाकच्चा शिजवलेल्या भाताचा थर लावावा . भातावर हवे असल्यास केशराचे पाणी शिंपडावे. थर लावल्यावर अर्धा वाटी पाणी भातावर शिंपडून , कडेने तूप सोडावे .
टोपावर अॅल्युमिनिअम फॉईल लावावी . किंवा गव्हाच्या पिठाची पेस्ट लावावी. दोन चमचे पिठात थोडे पाणी घालून पातळ पेस्ट करावी . टोपावर निट बसणारे झाकण लावून टोपाची कडा आणि झाकणाच्या मध्ये जी गॅप असेल तिथे ही पेस्ट भरावी.
गव्हाची पेस्टटोपाला पेस्ट लवल्यावर
45 मिनिटे मंद गॅस वर अॅल्युमिनिअम फॉईल लावून टोप ठेवून द्यावा .
बिर्याणी अजून मुरण्यासाठी तवा तापवून त्यावर २० मिनिटे मंद गॅस वर भांडे ठेवावे .
अॅल्युमिनिअम फॉईल काढून मस्त बिर्याणीचा आस्वाद घ्यावा.
बिर्याणी करणे मला मनापासून आवडते कारण सगळे खूप आवडीने खातात . कुणी जर पहिल्यांदाच बिर्याणी करणार असेल आणि काही अडल्यास मला फोन वरून मार्गदर्शन करायला आवडेल.
याचे कारण . माझी ताई अप्रतीम बिर्याणी करते. तिने मला पहिल्यांदा जेव्हा मला घरी (सासरी ) बिर्याणी करण्यास सांगितले तेव्हा मी हसण्यावर नेले कारण तोपर्यंत मी फक्त खाण्यातच एक्स्पर्ट होते . पण आता मी बर्यापैकी बिर्याणी करण्यामध्ये एक्स्पर्ट झाले आहे, आणि जर मी एक्स्पर्ट झाली आहे तर इतर कुणीही होऊ शकेल .
१. कांदा कढईत तळून घेतल्यास बिर्याणी अजून चविष्ट होते पण खूप तूपकट होते. आवडत असल्यास कांदा तळून घेऊ शकता.
२. बिर्याणी आणि भाताचा थर लावताना सगळ्यत खाली बटटायाच्या कापांचा थर लावल्यास खाली करपत नाही आणि यातले बटाटे छान लागतात. पण खूपसा मसाला बटाटयामधे अॅब्सोर्ब होतो.
३. जाड बुडाचे भांडे नसल्यास १५ मिनिटांनी टोप तव्यावर ठेऊन बिर्याणी शिजवावी.
४. बिर्याणी वाढताना वरतून तळलेला कांदा , तळलेले काजू टाकावे.
५. अश्याच पद्ध्तीने मटण बिर्याणी करावी पण मटण आधी शिजवून घ्यावे.
६. कांदे फ्राय करून फ्रिज मधे ठेवू नका. चव बदलते. फूड प्रोसेसर मधे उभे कापून फ्रिज मधे ठेवल्यास चालेल.
जयवी -जयश्री अंबासकर , भाऊ
जयवी -जयश्री अंबासकर , भाऊ धन्यवाद .
भाऊ , मटण आधी शिजवून घेतले की वर लिहिलेल्या पद्ध्तीने छान होते बिर्याणी. एकदा बेसिक बिर्याणी जमली कि मग वेरीएश्न्स करता येतात. जसे भात करताना त्यांत एखादी वेलची व लंवगा टा़कणे, चिकन मध्ये केवडा इसेन्स ही टाकता येइल.
व्हेज खाणार्यांसाठी हाच मसाला वापरून व्हेज बिर्याणी चान्गली होते. फक्त भात आणि भाज्या जरा जास्त शिजवून घ्याव्यात. भाज्या कूकर ला न लावता वाफेवर चाळणीत ठेवून शिजवाव्यात.
खूप मस्त. अगदी करून बघायचा
खूप मस्त.
अगदी करून बघायचा मोह होतो आहे. पण मला याच्या एक चतुर्थांश केली पाहिजे. 
मापाच्या वाटीचे फोटो टाकणार का? किंवा तेवढ्या तांदळाचे वजन किती होते?
करण्यातला आनंद अगदी जाणवतोय.
करण्यातला आनंद अगदी जाणवतोय. छान लिहिलीय.
मापाच्या वाटीचे फोटो टाकणार
मापाच्या वाटीचे फोटो टाकणार का? >> वाटीचे फोटो टाकण्यापेक्षा मेजरींग कपात मोजुन कपाचे माप सांगितले तर छानच
मी अशीच करते. फक्त चिकन परतुनही न घेता.
दिनेशदा मी लिहिलेल्या रेसिपी
दिनेशदा मी लिहिलेल्या रेसिपी वर तुमचा प्रतिसाद. माझा पहिलाच रेसिपी चा धागा धन्य झाला. मनापासून धन्यवाद.
वर्षा वाटीचे फोटो टाकण्यापेक्षा मेजरींग कपाचे माप सांगेन. धन्यवाद.
छान पाकृ! आता एकदा अशी करुन
छान पाकृ! आता एकदा अशी करुन बघेन.
सामी... एकादी कठीण रेसिपी
सामी...
एकादी कठीण रेसिपी एवढ्या चांगल्या पद्धतीने - Step-by-Step, तु लिहु शकतेयस...
...
सहज कुतुहल म्हणुन वाचुन बघितली तुझी रेसिपी, बिर्याणी हा प्रकार आवडीचा नसला तरी, तुझी रेसिपी लिहिण्याची पद्धत आवडली... आता कुडाळात येऊन लेक्चर द्यायची तयारी सुरु कर...
छान रेसिपी ! अगदी निट
छान रेसिपी ! अगदी निट लिहिलंयस
सामी,दालचा खाल्ला आहे काय? तो
सामी,दालचा खाल्ला आहे काय? तो पण शिका मस्त लागतो.
धन्यवाद विवेक, डॅफोडिल्स ,
धन्यवाद विवेक, डॅफोडिल्स , हेलबॉय
बिर्याणी हा प्रकार आवडीचा नसला > आता इथेच आहात ना तर जेवायलाच या. बिर्याणी हा प्रकार आवडीचा होइल.
आता कुडाळात येऊन लेक्चर द्यायची तयारी सुरु कर > खरच आवडेल.
हेलबॉय, दालचा नाही खाल्ला. आधी खाईन मग आवडला तर शिकेन. गूगलून बघितले. कुठे चांगला मिळतो सांगा.
मस्त रेसिपी, मी केलेली. सही
मस्त रेसिपी, मी केलेली. सही झाली होती. प्रमाण अगदी व्यवस्थित दिलेलं आहे मसाल्यांचं.
धन्यवाद सानुली.
धन्यवाद सानुली.
तोपासु.
तोपासु.
मी केली..धुलीवंदन ला ..
मी केली..धुलीवंदन ला .. चिकन , वडे ,चिकन बिर्याणी........
.

मस्त सृष्टी! एकदम तोंपासु
मस्त सृष्टी! एकदम तोंपासु
सृष्टी मस्तच.
सृष्टी मस्तच.
मी पण केली, गेल्या रविवारी
मी पण केली, गेल्या रविवारी

छान झाली होती असं सौ. आणि मुलं म्हणाली
आयुष्यात पहिल्यांदाच कुठलीतरी डिश केली आणि ती ही थेट चिकन बिर्याणी

धन्यवाद सामी
धन्यवाद राज्या.
धन्यवाद राज्या.
मस्त्..........रविवारी करुन
मस्त्..........रविवारी करुन पाहु
सामी....मी आज ही रेसीपी करुन
सामी....मी आज ही रेसीपी करुन बघितली. खुपच छान झाली होती. धन्यावाद ह्या रेसीपी करीता
वॉव.. मस्त रेसिपी आहे..
वॉव.. मस्त रेसिपी आहे..
हेमाली, वर्षू ताई थँक्स.
हेमाली, वर्षू ताई थँक्स.
दोन दिवसापूर्वी रविवारी करून
दोन दिवसापूर्वी रविवारी करून पाहिली. छान झाली, सौ. ला पण आवडली.

सोबत फोटो जोडत आहे. ह्या मस्त पाकृबद्दल धन्यवाद.
डीडी मस्त आलाय फोटो. खास
डीडी मस्त आलाय फोटो. खास झालेली दिसते बिर्याणी.
ते लिंबाची खाप लावलेलं
ते लिंबाची खाप लावलेलं ग्लासातलं लै मस्त आलंया फोटूत
बिर्याणी लैच ऑथेंटिक बघा तुमची. कांदा+दही वालं 'सालन' सोबत आहे!
मला बोकदाचे पाय असतात ना ते
मला बोकदाचे पाय असतात ना ते बनवायचे आहेत.कोनाला येत असल्यास त्यानि क्रुती लिहुन द्यावि...
धन्यवाद Chaitrali, इब्लिस
धन्यवाद Chaitrali, इब्लिस
धन्यवाद डीडी .
धन्यवाद डीडी .
सामी आवडली रेसिपी घरी बनवली
सामी आवडली रेसिपी घरी बनवली होती मस्त झाली बिर्यानी
मस्त रेसिपी आहे. मी हल्लीच्या
मस्त रेसिपी आहे. मी हल्लीच्या हल्ली दोनदा बनवली होती. खुप आवडली.
Pages