फोटोग्राफी स्पर्धा.. मार्च.."भावमुद्रा" निकाल.

Submitted by उदयन.. on 1 March, 2013 - 01:08

नमस्कार,

दरमहिन्या प्रमाणे "मार्च" महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.

या महिन्याचा विषय आहे "भावमुद्रा"

दोन महिने झाले स्पर्धेला या दोन महिन्यात मायबोलीकरांकडुन अप्रतिम आणि आशयप्रधान प्रकाशचित्रे सादर झाली आहेत..म्हणुनच स्पर्धा एक पाउल पुढे केली..सोप्पे विषयांपेक्षा थोडे विचारमग्न विषयांकडे वळायला हळु हळु सुरुवात केली आहे... आता फोटो हे नुसते फोटो नसुन एक संपुर्ण विषयच असायला हवे याकडे अधिक लक्ष द्यायला हवे...

भावमुद्रा यात . १) क्रोध मुद्रा...२) हास्यमुद्रा..३) शोकमुद्रा.. ४) कुतुहुल / आश्चर्य मुद्रा..५) विचारमग्न मुद्रा ..६) गंभीरमुद्रा ...७) उत्साहमुद्रा .. ८) भय मुद्रा.. ९) शांत मुद्रा...
या मुद्रांचा समावेश होतो..(अजुन काही असतील त्यांचा सुध्दा समावेश करावा Wink )

कोणतेही एक मुद्रा घेउन त्यानुसार फोटो असावा...सुरुवातीला हेडिंग मधे मुद्रेचे नाव स्पष्टपणे लिहावे.. तसेच शक्य असल्यास थोडी प्रस्तावना सुध्दा लिहावी..त्यात फोटो घेताना आपल्या मनात काय होते..का हा फोटो काढला.. फोटो काढता काय वातावरण होते ज्यामुळे ही भावमुद्रा उमटली..

प्रथम क्रमांकः रंगासेठ आणि अमित मोरे
rangaseth..jpgAmit more_.jpgद्वितीय क्रमांक: मनिष कदम आणि सौरभ सावंत

manish_kadam.jpgsaurabh.jpgतृतीय क्रमांक: आशुचॅम्प आणि शुभांगी
Ashu_554605_482436578438848_743579659_n.jpgShubhangi_DSC07202.JPGउत्तेजनार्थ: झकासराव आणि एक शून्य

ek_shunya.jpgJhakas_shankar[1].jpgजिप्सी आणि शापित गंधर्व ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...
नियमः-

१) एकच प्रतिसादात फोटो टाकावे
२) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
३) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध सांकेतिक स्थळांवर वापरले जातात
४) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
५) जास्तित जास्त २ फोटो......

"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..

मागील महिन्यांमधले स्पर्धा धागे :
१) फोटोग्राफी स्पर्धा.. जानेवारी.."थंडी
२) फोटोग्राफी स्पर्धा.. फेब्रुवारी.."रंग प्रेमाचे"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विजेत्यांचे अभिनंदन. Happy

आता उत्तेजना मिळाल्याने कॅमेर्‍यावरची धुळ झटकतो. Happy

जजेसचे आभार. Happy

दुसर्‍या फोटोत त्रिशूल कट झाला आहे. ते पूर्ण यायला हवे होते>> ह्याला म्हणतात नजर.
हे मला फोटु इकडे दिला तरी कळालं नव्हतं.
ही थॉट प्रोसेस (व्यवधान) फोटो काढताना विकसीत होणं ही मुख्य गरज आहे (निदान माझ्याबाबतीत तरी.)
एक धागा मिळाला प्रगतीपथावर जायचा. खुप खुप आभार. Happy

सर्व विजेत्यांचे अभिनंदन. Happy

आनि उत्तेजनार्थास हि..... :D..

>>>>>आता उत्तेजना मिळाल्याने कॅमेर्‍यावरची धुळ झटकतो......+१

ज्यूरींना धन्यवाद....
या वेळी आलेले फोटो पाहून मला मुळीसुद्धा आशा नव्हती की आपला नंबर लागेल म्हणून...सर्वांचेच एकसे एक फोटो होते. आणि रंगासेठचा फोटो पाहिल्या पाहिल्याच सांगितले होते की हाच विनर म्हणून...आपला अंदाज खरा ठरला....

सर्वांना धन्यवाद

आशु अगदी अगदी रे.
रंगासेठचे फोटो इतके सुरेख होते आणि इतर बरेच एकापेक्षा एक होते त्यामुळे त्यात नंबर लागला म्हणजे खरच खूप आनंद झाला. Happy
धन्यवाद ज्युरी आणि सर्वाचेंच.

पहिला फोटो... उत्तम निवड...
खुप काही सांगुन गेला..
एक चटका ही लावुन गेला.

विजेत्यांचे मनापासुन अभिनंदन... खरेतर स्पर्धकांनी फोटोबद्दल लिहिलेल्या भावना पण पुन्हा फोटोबरोबर देत जा, मनाला अजुनच भावतो तो फोटो.
झालेल्या निकालांत अजुनही हे टाकता येईल का पहा ना प्लिज Happy .

Pages