नमस्कार,
दरमहिन्या प्रमाणे "मार्च" महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.
या महिन्याचा विषय आहे "भावमुद्रा"
दोन महिने झाले स्पर्धेला या दोन महिन्यात मायबोलीकरांकडुन अप्रतिम आणि आशयप्रधान प्रकाशचित्रे सादर झाली आहेत..म्हणुनच स्पर्धा एक पाउल पुढे केली..सोप्पे विषयांपेक्षा थोडे विचारमग्न विषयांकडे वळायला हळु हळु सुरुवात केली आहे... आता फोटो हे नुसते फोटो नसुन एक संपुर्ण विषयच असायला हवे याकडे अधिक लक्ष द्यायला हवे...
भावमुद्रा यात . १) क्रोध मुद्रा...२) हास्यमुद्रा..३) शोकमुद्रा.. ४) कुतुहुल / आश्चर्य मुद्रा..५) विचारमग्न मुद्रा ..६) गंभीरमुद्रा ...७) उत्साहमुद्रा .. ८) भय मुद्रा.. ९) शांत मुद्रा...
या मुद्रांचा समावेश होतो..(अजुन काही असतील त्यांचा सुध्दा समावेश करावा )
कोणतेही एक मुद्रा घेउन त्यानुसार फोटो असावा...सुरुवातीला हेडिंग मधे मुद्रेचे नाव स्पष्टपणे लिहावे.. तसेच शक्य असल्यास थोडी प्रस्तावना सुध्दा लिहावी..त्यात फोटो घेताना आपल्या मनात काय होते..का हा फोटो काढला.. फोटो काढता काय वातावरण होते ज्यामुळे ही भावमुद्रा उमटली..
प्रथम क्रमांकः रंगासेठ आणि अमित मोरेद्वितीय क्रमांक: मनिष कदम आणि सौरभ सावंत
तृतीय क्रमांक: आशुचॅम्प आणि शुभांगी
उत्तेजनार्थ: झकासराव आणि एक शून्य
जिप्सी आणि शापित गंधर्व ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...
नियमः-
१) एकच प्रतिसादात फोटो टाकावे
२) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
३) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध सांकेतिक स्थळांवर वापरले जातात
४) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
५) जास्तित जास्त २ फोटो......
"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..
मागील महिन्यांमधले स्पर्धा धागे :
१) फोटोग्राफी स्पर्धा.. जानेवारी.."थंडी
२) फोटोग्राफी स्पर्धा.. फेब्रुवारी.."रंग प्रेमाचे"
शोभा तुला छोटा रावण नाव कसे
शोभा तुला छोटा रावण नाव कसे पडले हे सांगितले की....>>>>>>>>>ते मलाच सांगितलस ते कळलं रे.
सर्वांचे फोटो सुंदर!
सर्वांचे फोटो सुंदर!
तृप्त-समाधानी मुद्रा वयाच्या
तृप्त-समाधानी मुद्रा
वयाच्या ह्या वळणावर मुला-नातवंडांनी-पतवंडांनी भरलेले घर बघून आयुष्य सार्थकी लागले ह्याचे समाधान डोळ्यांत,तर हसू ओठांवर स्पष्ट दिसतय.
आणि ही आहे भय-विस्मयचकीत मुद्रा.
लेकीला गणपती पुळ्याच्या समुद्रकिनार्यावर अचानकच बाजूच्या कट्यावर मेलेल्या माश्याचा सांगाडा बघून भीती बरोबरच हे नक्की काय असेल बर ह्या गोष्टीबद्दल वाटलेले कुतूहल-विस्मय असे फोटोत पकडले आहे.
आशु, दोन्ही प्रचि खासच !
आशु, दोन्ही प्रचि खासच !
उजु मस्तच ग !!! आणि ते
उजु मस्तच ग !!! आणि ते आज्जी-आजोबा कोण आहेत ?
उजु, छान, दोन्हीही. पण मला
उजु, छान, दोन्हीही. पण मला भावदर्शनाच्या दृष्टीने दुसरे जास्त आवडले.
कुतुहल... हि कुठली मुद्रा
कुतुहल...
हि कुठली मुद्रा बरं...
एप्रिल महिन्याची थीम जरा कठिण
एप्रिल महिन्याची थीम जरा कठिण करुया............
.
.अजुन विचारपुर्वक फोटो येतील
>>> एप्रिल महिन्याची थीम जरा
>>> एप्रिल महिन्याची थीम जरा कठिण करुया..............अजुन विचारपुर्वक फोटो येतील <<<
यान्ची सान्गड होते तोवर फिकीर काहे की?
करा हो! बिनधास्त करा.
जोवर तुमची थीम अन आमचा फोटोन्चा स्टॉक
कठीण थीम असे मी तेव्हाच म्हणेन, जेव्हा येताजाता सामान्यपणे कधीही काढलेल्या फोटोन्च्या साठ्या व्यतिरिक्त जाऊन विषयानुरुप "मुद्दामहून फोटो काढणे" भाग पडेल! अन तेव्हाच खरा च्यालेन्ज असेल, मला वाटते की गणपती उत्सव वा दिवाळी करता असे काही थीमचे विचार करुन ठेवावेच.
धन्यवाद
धन्यवाद ...................... इतके भरभरुन प्रतिसाद दिल्याबद्दल............
.
.
या महिन्याचे फोटो टाकणे बंद केले................
.
.
आता एप्रिल महिन्याचे टाका
रिझल्ट कुठाय? एप्रिल
रिझल्ट कुठाय?
एप्रिल महिन्याचा धागा कुठाय?
लिंबुभाउ.....................
लिंबुभाउ......................जरा धिर धरा.......
.
.
रिझल्ट ५ तारखेला नेहमी प्रमाणे
.
.
धागा थोड्यावेळॅत
ओक्के उदयन! मला नविन थीमची
ओक्के उदयन! मला नविन थीमची उत्सुकता आहे.
एकूणातच ही कल्पना सुचणे, अन अंमलात आणणार्यान्चे कौतुक आहे.
कुतुहुल / आश्चर्य मुद्रा गहन
कुतुहुल / आश्चर्य मुद्रा
हास्यमुद्रा

गहन प्रश्न?
बन्धु प्रेम
march result???
march result???
एक जज इथे भारतात आल्यामुळे
एक जज इथे भारतात आल्यामुळे निकाला ला उशिर होईल
kahi harakat nahi....
kahi harakat nahi....
एक जज इथे भारतात आल्यामुळे
एक जज इथे भारतात आल्यामुळे निकाला ला उशिर होईल >>>>>>>>>>>>>त्या जजच्या हस्त इथेच निकाल लावूया. हा.का.ना.का.
रानवाटाच्या निमित्ताने आज
रानवाटाच्या निमित्ताने आज दोन्ही जजेसना जज करण्याची संधी मिळाली.
>>>> दोन्ही जजेसना जज
>>>> दोन्ही जजेसना जज करण्याची संधी मिळाली. <<<<

हो का? बर बर, पण मग त्यान्ना एखादे दोन पाच रुपयाचे कॉईन (नाणे) दिलेस की नै? छापकाटा करुन निवड करायला उपयोगी पडले अस्ते!
>>>> दोन्ही जजेसना जज
>>>> दोन्ही जजेसना जज करण्याची संधी मिळाली. <<<<
हो का? बर बर, पण मग त्यान्ना एखादे दोन पाच रुपयाचे कॉईन (नाणे) दिलेस की नै? छापकाटा करुन निवड करायला उपयोगी पडले अस्ते! >>>>छापाकाटा करूनच जर "निकाल" लावायचा असता तर तुम्हालाच नाही का "जज (ज्युरी)" केले असते.
रच्याकने, एक-दोन दिवसात निकाल जाहिर करण्यात येईल.
आंतरजालावरुन सभार
आंतरजालावरुन सभार :-
भावमुद्रांमधे आम्हाला काय अपेक्षीत होते त्याचे छोटेसे उदाहरण..:)
हा फोटो आंतरजालावरुन घेण्यात आलेला आहे
.
.
.निकाल आज संध्याकाळी जाहीर करण्यात येईल
>>> भावमुद्रांमधे आम्हाला काय
>>> भावमुद्रांमधे आम्हाला काय अपेक्षीत होते त्याचे छोटेसे उदाहरण.. <<<<
)
ओह, अस्स होत होय, मग आधीच सान्गायच ना तस की छटाकभर पावशेर अर्धाच चेहरा दाखवा म्हणून! (अशा प्रकारे गन्डलेले अर्धेमुर्धे कैक फोटो माझ्या ट्रन्केतल्या इस्टॉकमधे आहेत
जोक्स अपार्ट, वरील फोटो उत्तमच आहे जर तो नैसर्गिकरित्या (म्हणजे मुद्दामहुन उभे करुन नव्हे) खेचला गेला असेल तर! मात्र माबोवरील बहुतांशी कौटुम्बीक पार्श्वभूमी असलेले लोक "असे फोटो" कठून काढणार? का काढणार? (येऊन जाउन एखाद्या सु.ठें. चा लग्नकार्यात वगैरे लपुन छपुन काढलेला, खाम्बा आडचा वा एकिबाजुने आलेला फोटो असू शकतो म्हणा - सुदैवाने म्हणा वा दुर्दैवाने, माझ्याकडे तसाही एक अतिशय सुन्दर फोटो आहे, पण फोटोतील सु. ठें. माझ्या लांबच्या नात्यातील एका बहिणीच्या सासरकडची असल्याने मी तो कधीच जाहीर करणे शक्य नाही! एक ललित होईल अशी त्या फोटोची कहाणी आहे.) असो. हे माझे वैयक्तिक मत बरका, दिलपे मत लो.
प्राध्यापकान्च्या सम्पाचा
प्राध्यापकान्च्या सम्पाचा परिणाम इथवर पोहोचला की क्काय?
निकाल जाहीर करण्यात आला
निकाल जाहीर करण्यात आला आहे
विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन
या विषयावर इतके सुंदर सुंदर फोटो आल्याने आम्ही तीनही क्रमांक विभागुन देण्याचे ठरवले. फोटो निवडताना मुख्यतः विषयाला अनुरूप, टेक्निकली परफेक्ट, रंगसंगती, लाईटसचा वापर, कॉम्पोझिशन आणि मुख्य म्हणजे "भावमुद्रा" यावर भर दिली आहे. थोडासा हटके असा सौरभचा फोटोही आवडला. अजुनही काहि फोटो आवडले पण स्पर्धेच्या नियमानुसार नसल्याने (फक्त दोनच फोटो देणे) सिलेक्ट करता आले नाही. एक शून्य आणि झकासचे फोटोही सुरेख होते पण अनुक्रमे पहिल्या फोटोत मुकुट आणि दुसर्या फोटोत त्रिशूल कट झाला आहे. ते पूर्ण यायला हवे होते.
सर्व विजेत्यान्चे हार्दीक
सर्व विजेत्यान्चे हार्दीक अभिनंदन

(मला वाटले तसेच अमित मोरेंचा फोटो पहिल्या क्रमांकाला आला!
फारच क्युट/मस्त्/छान/अप्रतिम वगैरे विशेषणान्ना पात्र असा फोटो आहे तो.
बाकी सर्व फोटो देखिल एकाखाली एक बघताना मस्त वाटतय... मजा आली. )
अभिनंदन!
अभिनंदन!
विजेत्यांचे अभिनंदन उदयन
विजेत्यांचे अभिनंदन
उदयन विजेत्यांचे फोटो जाहीर करताना त्यांनी दिलेल्या प्रस्तावना पण देणे अपेक्शित होते.
त्यामुळे नविन बघणार्यांना ते फोटो अजुन बोलके वाटतील.
विजेत्यांचे अभिनंदन.
विजेत्यांचे अभिनंदन.
अभिनंदन..
अभिनंदन..
Pages