फोटोग्राफी स्पर्धा.. मार्च.."भावमुद्रा" निकाल.

Submitted by उदयन.. on 1 March, 2013 - 01:08

नमस्कार,

दरमहिन्या प्रमाणे "मार्च" महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.

या महिन्याचा विषय आहे "भावमुद्रा"

दोन महिने झाले स्पर्धेला या दोन महिन्यात मायबोलीकरांकडुन अप्रतिम आणि आशयप्रधान प्रकाशचित्रे सादर झाली आहेत..म्हणुनच स्पर्धा एक पाउल पुढे केली..सोप्पे विषयांपेक्षा थोडे विचारमग्न विषयांकडे वळायला हळु हळु सुरुवात केली आहे... आता फोटो हे नुसते फोटो नसुन एक संपुर्ण विषयच असायला हवे याकडे अधिक लक्ष द्यायला हवे...

भावमुद्रा यात . १) क्रोध मुद्रा...२) हास्यमुद्रा..३) शोकमुद्रा.. ४) कुतुहुल / आश्चर्य मुद्रा..५) विचारमग्न मुद्रा ..६) गंभीरमुद्रा ...७) उत्साहमुद्रा .. ८) भय मुद्रा.. ९) शांत मुद्रा...
या मुद्रांचा समावेश होतो..(अजुन काही असतील त्यांचा सुध्दा समावेश करावा Wink )

कोणतेही एक मुद्रा घेउन त्यानुसार फोटो असावा...सुरुवातीला हेडिंग मधे मुद्रेचे नाव स्पष्टपणे लिहावे.. तसेच शक्य असल्यास थोडी प्रस्तावना सुध्दा लिहावी..त्यात फोटो घेताना आपल्या मनात काय होते..का हा फोटो काढला.. फोटो काढता काय वातावरण होते ज्यामुळे ही भावमुद्रा उमटली..

प्रथम क्रमांकः रंगासेठ आणि अमित मोरे
rangaseth..jpgAmit more_.jpgद्वितीय क्रमांक: मनिष कदम आणि सौरभ सावंत

manish_kadam.jpgsaurabh.jpgतृतीय क्रमांक: आशुचॅम्प आणि शुभांगी
Ashu_554605_482436578438848_743579659_n.jpgShubhangi_DSC07202.JPGउत्तेजनार्थ: झकासराव आणि एक शून्य

ek_shunya.jpgJhakas_shankar[1].jpgजिप्सी आणि शापित गंधर्व ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...
नियमः-

१) एकच प्रतिसादात फोटो टाकावे
२) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
३) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध सांकेतिक स्थळांवर वापरले जातात
४) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
५) जास्तित जास्त २ फोटो......

"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..

मागील महिन्यांमधले स्पर्धा धागे :
१) फोटोग्राफी स्पर्धा.. जानेवारी.."थंडी
२) फोटोग्राफी स्पर्धा.. फेब्रुवारी.."रंग प्रेमाचे"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सचिन ने असला ड्रेस करुन बँटींग करावी........... धोतर आणि कुर्ता............असा ठराव मनसे पास करणार बहुतेक......हा फोटो पाहिल्यावर...........मी मराठी Wink

मला वाटते हे नवीन नाहीये उदय. क्रिकेट महर्षी प्रा. दि. ब. देवधर हे कित्येकवेळा धोतराचा काचा मारून मैदानावर उतरायचे असे ऐकले होते.

या विषयावर असंख्य फोटो आहेत, पण इथे हापिसात बसून हा येवढा टाकता आलाय.

१) नुकतेच लिम्बीचे एक जादूगार स्नेही आले होते, त्यान्नी विशिष्ट जातीचे (डोव्ह?) पांढरे कबुतर आणले होते, ते थोरलीने हाती धरले, मला अनेक कोनातुन त्याचे फोटो घ्यायचे होते पण त्याची हालचाल व मला कॅमेर्याचे सेटिंग जमत नसल्याने जसे आले तसे गडबडीत फोटो काढले. मात्र येथिल विषयानुरुप, थोरलीचे औत्सुक्यमिश्रीत आनंदी हरखलेले भावही टिपले गेले (असे मला वाटते). सबब हा फोटो येथे देत आहे. (फोटोच्या तान्त्रिक दर्जाबद्दल मात्र मी जराही समाधानी नाही)

"अय्याऽऽ....!"
Vijaya with Dio-s.jpg

२) जर हाती रोलचा कॅमेरा अस्ता तर त्यातिल मौल्यवान फ्रेम अशा "खाली मान घातलेल्या व चेहरा नीट दिसत नसलेल्या" फोटोकरता "वाया" घालवण्यास लोकं कचरली अस्ती, पण मी रोल वापरुन वा हल्ली डिजीटलमध्येही असे फोटो घ्यायला कधी कचरलो नाही. फोटो काढताना भावना एकच होती की हा फोटो अजुन १०/२० वर्षान्नी जेव्हा तिची मुलेबाळे बघतील, तेव्हा आपल्या आईला "असा अभ्यास" करताना बघुन त्यान्ना किती आनंद होईल? कितीक गम्मत वाटेल, नै?
समोरून चेहरा पूर्णपणे दिसत नसतानाही "भावमुद्रे"करता ही एक एन्ट्री!

"एकाग्र"
Study 1495.jpg

लिम्बु "डोव्ह" (स्पेलिन्ग असं आहे. उच्चार "डव्ह" असा असु शकेल) ह्या जातीच कबुतर म्हणतोयस का?

छान फोटु येत आहेत.

झकास, बरोबर, डोव्ह नावाचा तो साबण अस्तो ना, त्याचाच संदर्भ त्या जादुगारअंकलनी दिला होता. Happy मी सध्या डिओ स्कुटरेट वापरतो, ड ड च्या नामसाद्धर्म्यामुळे घोळ केला. अन तेच ते कबुतर, जे जादुगार लोक टोपीतुन/रुमालातुन वगैरे काढतात. किम्मत हजार रुपयापासून पुढे! काऽऽश, मेरे पास भी ऐसा होता..!
अंकु, धन्यवाद

"कृतकृत्य"
माझी आजी -- सर्व मुलं, सुना, लेक, जावई, नातवंडं, नातसुन, पणतु य सर्वांनी भरलेलं घर बघताना आजीच्या मनात किती आनंद असेल नाही?

WP_20121207_010.jpg

पुन्हा एकदा आजी.....पणतवाकडे बघताना खुष मुद्रा Happy

184025_1788500828268_294817_n.jpg

उत्साहमुद्रा ............ क्रिकेट खेळायचे आहे हे समजल्यावर झालेला.. आनंद.... ( गोरेगाव छोटा काश्मिर )

vedant.jpg

सहजच सापड्ले म्हणुन
दिवस भराच्या थकव्याने चाल्त्या बसमध्येही
सहज येणारी ही निद्रा ( हे आमचे तिरुपतीचे संयोजक )Bhavmudra.jpg

त्याच ट्रीप मध्ये भेटेलेला हा सह प्रवासी,ं हिंदी बोलणारा भेटला आणि त्याच्या मिशांचे कौतुक करतुया हे पाहुन अभिमान वाटणारी हे मुद्रा..
Bhavmudra2_1.jpg

पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी गोड काहि आवडत नाही म्हणून केक खाताना नापसंती दर्शवणारी ही " नकारदर्शक मुद्रा "......

DSC_0088.JPG

मकर संक्रातीला हलव्याचे दागिने घालून फोटो काढताना सरवांना " शांत बसा " खट्याळपणे सांगणारी ही " खट्याळ मुद्रा "..... Happy

DSC_0303.JPG

भावमुद्रा:- कुतुहुल / आश्चर्य मुद्रा , विचारमग्न मुद्रा , गंभीरमुद्रा, .. फोटोग्राफर : "रंगासेठ"

प्रस्तावना :- आषाढी वारी हडपसरमधून जात असताना, मगरपट्टा चौकात हे कुटुंब साहसी कसरतीचे खेळ करून पैसे कमावण्याचा प्रयत्न करत होते. या आजीबाईंना याही वयात अशा प्रकारे कष्ट करावे लागत होते, लहान चिमुरडी मुले , त्यांची आई 'कशासाठी... पोटासाठी' असे खेळ करत होते.
यात आजीबाईंच्या चेहर्‍यावरील भाव, त्या मुलांच्या आईचा चेहरा आणि दोन घडीचा डाव पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीतील आश्चर्य/ गंभीर/ खेद मुद्रा...

--

IMG_0476.CR2

Pages