फोटोग्राफी स्पर्धा.. मार्च.."भावमुद्रा" निकाल.

Submitted by उदयन.. on 1 March, 2013 - 01:08

नमस्कार,

दरमहिन्या प्रमाणे "मार्च" महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.

या महिन्याचा विषय आहे "भावमुद्रा"

दोन महिने झाले स्पर्धेला या दोन महिन्यात मायबोलीकरांकडुन अप्रतिम आणि आशयप्रधान प्रकाशचित्रे सादर झाली आहेत..म्हणुनच स्पर्धा एक पाउल पुढे केली..सोप्पे विषयांपेक्षा थोडे विचारमग्न विषयांकडे वळायला हळु हळु सुरुवात केली आहे... आता फोटो हे नुसते फोटो नसुन एक संपुर्ण विषयच असायला हवे याकडे अधिक लक्ष द्यायला हवे...

भावमुद्रा यात . १) क्रोध मुद्रा...२) हास्यमुद्रा..३) शोकमुद्रा.. ४) कुतुहुल / आश्चर्य मुद्रा..५) विचारमग्न मुद्रा ..६) गंभीरमुद्रा ...७) उत्साहमुद्रा .. ८) भय मुद्रा.. ९) शांत मुद्रा...
या मुद्रांचा समावेश होतो..(अजुन काही असतील त्यांचा सुध्दा समावेश करावा Wink )

कोणतेही एक मुद्रा घेउन त्यानुसार फोटो असावा...सुरुवातीला हेडिंग मधे मुद्रेचे नाव स्पष्टपणे लिहावे.. तसेच शक्य असल्यास थोडी प्रस्तावना सुध्दा लिहावी..त्यात फोटो घेताना आपल्या मनात काय होते..का हा फोटो काढला.. फोटो काढता काय वातावरण होते ज्यामुळे ही भावमुद्रा उमटली..

प्रथम क्रमांकः रंगासेठ आणि अमित मोरे
rangaseth..jpgAmit more_.jpgद्वितीय क्रमांक: मनिष कदम आणि सौरभ सावंत

manish_kadam.jpgsaurabh.jpgतृतीय क्रमांक: आशुचॅम्प आणि शुभांगी
Ashu_554605_482436578438848_743579659_n.jpgShubhangi_DSC07202.JPGउत्तेजनार्थ: झकासराव आणि एक शून्य

ek_shunya.jpgJhakas_shankar[1].jpgजिप्सी आणि शापित गंधर्व ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...
नियमः-

१) एकच प्रतिसादात फोटो टाकावे
२) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
३) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध सांकेतिक स्थळांवर वापरले जातात
४) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
५) जास्तित जास्त २ फोटो......

"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..

मागील महिन्यांमधले स्पर्धा धागे :
१) फोटोग्राफी स्पर्धा.. जानेवारी.."थंडी
२) फोटोग्राफी स्पर्धा.. फेब्रुवारी.."रंग प्रेमाचे"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सर्वांना.पुढे मजा येणार आहे.
<<<<अर्थात बाहेरून नन्तर काही इफेक्ट्स केले नसल्यास अधीकच उत्तम>>>> कोणत्याही प्रकारचे इफेक्ट्स वापरलेले नाहीत.

खजुराहो इथल्या देवळात काढलेला हा एक फोटो.
शिल्पातला पुरुष त्या स्त्रीची समजूत काढतोय आणि स्त्रीच्या चेहर्‍यावर स्वतःच्या विजयाचे आणि समजूत काढणार्‍याबद्दलच्या प्रेमाचे असे संमिश्र भाव आहेत.
मुद्रा- 'स्त्रीची विजयमुद्रा' असं नाव द्यायला हरकत नसावी बहुतेक Happy

-----

From Khajuraho

खूप मज्जा येतेय खरतर....चिमुकल्यांच्या चेहेर्यावरचे भाव इतके गोड कि उचलून घ्यावं वाटतं आणि लाड लाड करावा असे...
काही फोटो विनोदी अंगाकडे झुकणारे...रन्गासेठ तर भन्नाटच....एक शुन्य पण भारी .....हरपेन ची आत्ममग्न मुद्रा पण आवडली....रीमा , GS , अतुलनीय ......खरतर सगळेच अप्रतिम आहेत............

गुहागरला गेलो असताना ज्युनिअर चँपची टिपलेली मुद्रा...पहिल्यांदा समुद्र पाहिल्यावर...
एवढे पाणी एकत्र पाहिल्यानंतर त्याला काय करावे सुचेना..इतका एक्साईट झाला की बास...या फोटोनंतरच त्याचे नामकरण छोटा रावण झाले...

Million Dollar Smile...:)
गोंदवलेला भेटलेल्या आज्जीबाई...भूतकाळातील कुठली गोष्ट त्यांना आठवली असेल ज्याने त्यांना असे मिष्किल हसू फुटले....त्यांच्या त्या सुखद आठवणींमध्ये खंड पाडायची इच्छा नव्हती त्यामुळे विचारायला गेलो नाही पण हे मौल्यवान हसू कॅमेरात कैद मात्र करता आले

मी सॉफ्टवेर प्रोग्रामर होणार आणि मायबोली व फसेबूक वर दिवस भर बसणार .....ही ही ही ही.
खट्याळ मुद्रा
P1000146.JPG

मला त्याच्यात बसायचे , आणि बसवल्यावर मला रडू आले ..... उऊ उऊ उऊ उऊ
रडकी मुद्रा
P1000484.JPG

ओऽ, एप्रिलचा विषयही सान्गून टाका ना प्लिज, Proud म्हणजे तयारीला लागायला बरं.

बाहेर कुठेतरी अपलोड केलेल्या फोटोच्या "बाहेरील" लिन्का देणार्‍यान्चा तीऽव्र निषेध! Angry

आपल्या वैभव जोशीच्या पुण्यातील कार्यक्रमानंतर झालेल्या पार्टीत श्री. श्रिकांत मोघे यांनी ' वार्‍यावरची वरात' ची एक छोटीशी झलक पेश केली होती.... त्यावेळची एक भावमुद्रा टिपली आहे बागुलबुवा याने

Shabda-034.jpg

DSCN9427.JPGDSCN9432.JPGवेद ....माझा भाचा ..रक्षाबंधन च्या दिवशी बहिणीसोबत घरी आला , आणि आम्हा सर्वांची गडबड, धावपळ बघून विचारात पडला...विचारमग्न मुद्रा ..

शेवटी मग त्यालाच पाटावर बसवले तेव्हा मग ही कंटाळवाणी मुद्रा....

बाहेर कुठेतरी अपलोड केलेल्या फोटोच्या "बाहेरील" लिन्का देणार्‍यान्चा तीऽव्र निषेध!
मला येथे फोटो कसे अपलोड करायचे ते समजले नहि म्हणून अधी PC वर सेव्ह केलेले फोतो टाकले

पुण्यातल्या गणपती विसर्जन मिरवणूकीत तल्लीन होऊन ढोल वाजवणारी ही मुलगी.
तल्लीन मुद्रा.
DSCN4215

कोकणात, मुग्यांच्या प्रतिक्षेत असलेली ही बेडकी.
प्रतिक्षा मुद्रा.
DSCN2575

आशुचॅम्प... दोन्ही प्रचि मस्तच! छोटा रावण! परफेक्ट नाव!!

शुभा सानिका ची विस्मयमुद्रा खुप्पच लाघवी आहे... एकदम जपानी गुडीया वाटतेय इकेबाना धारण केलेली

Pages