फोटोग्राफी स्पर्धा.. मार्च.."भावमुद्रा" निकाल.

Submitted by उदयन.. on 1 March, 2013 - 01:08

नमस्कार,

दरमहिन्या प्रमाणे "मार्च" महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.

या महिन्याचा विषय आहे "भावमुद्रा"

दोन महिने झाले स्पर्धेला या दोन महिन्यात मायबोलीकरांकडुन अप्रतिम आणि आशयप्रधान प्रकाशचित्रे सादर झाली आहेत..म्हणुनच स्पर्धा एक पाउल पुढे केली..सोप्पे विषयांपेक्षा थोडे विचारमग्न विषयांकडे वळायला हळु हळु सुरुवात केली आहे... आता फोटो हे नुसते फोटो नसुन एक संपुर्ण विषयच असायला हवे याकडे अधिक लक्ष द्यायला हवे...

भावमुद्रा यात . १) क्रोध मुद्रा...२) हास्यमुद्रा..३) शोकमुद्रा.. ४) कुतुहुल / आश्चर्य मुद्रा..५) विचारमग्न मुद्रा ..६) गंभीरमुद्रा ...७) उत्साहमुद्रा .. ८) भय मुद्रा.. ९) शांत मुद्रा...
या मुद्रांचा समावेश होतो..(अजुन काही असतील त्यांचा सुध्दा समावेश करावा Wink )

कोणतेही एक मुद्रा घेउन त्यानुसार फोटो असावा...सुरुवातीला हेडिंग मधे मुद्रेचे नाव स्पष्टपणे लिहावे.. तसेच शक्य असल्यास थोडी प्रस्तावना सुध्दा लिहावी..त्यात फोटो घेताना आपल्या मनात काय होते..का हा फोटो काढला.. फोटो काढता काय वातावरण होते ज्यामुळे ही भावमुद्रा उमटली..

प्रथम क्रमांकः रंगासेठ आणि अमित मोरे
rangaseth..jpgAmit more_.jpgद्वितीय क्रमांक: मनिष कदम आणि सौरभ सावंत

manish_kadam.jpgsaurabh.jpgतृतीय क्रमांक: आशुचॅम्प आणि शुभांगी
Ashu_554605_482436578438848_743579659_n.jpgShubhangi_DSC07202.JPGउत्तेजनार्थ: झकासराव आणि एक शून्य

ek_shunya.jpgJhakas_shankar[1].jpgजिप्सी आणि शापित गंधर्व ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...
नियमः-

१) एकच प्रतिसादात फोटो टाकावे
२) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
३) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध सांकेतिक स्थळांवर वापरले जातात
४) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
५) जास्तित जास्त २ फोटो......

"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..

मागील महिन्यांमधले स्पर्धा धागे :
१) फोटोग्राफी स्पर्धा.. जानेवारी.."थंडी
२) फोटोग्राफी स्पर्धा.. फेब्रुवारी.."रंग प्रेमाचे"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शांत मुद्रा
P1011312.JPG
काळाघोडा फेस्टीव्हलच्या वेळी कटपुतळ्यांचा खेळ दाखवणार्‍या काठेवाडी बाईंची ही भावमुद्रा.
आजूबाजूच्या प्रचंड कोलाहल/ गर्दीमुळे आम्ही पार वैतागलेले असताना आणि " आता फोटो बिटो बिटो नको, ईथून लवकर काढता पाय घेऊया" अश्या विचारात असताना, ही कुठल्या तरी निर्जन स्थळी झाडाखाली बसल्यासारखी, गालावर हात ठेवून शून्य नजरेने ती गर्दी पाहत शांत बसली होती. अर्थात त्यामुळे मला फोटो काढायची सुरुसुरी आली. Happy

एका वेळी एक आयडी किती प्रचि टाकू शकतो???
...मला या विषयावर भरपूर काय काय टाकावेसे वाटत आहे आणि नक्की कुठला प्रचि टाकावा याबद्दल गोंधळात पडलो आहे....

हीरो हीरालाल,,,,,

हीरो हीरालाल,,,,,...कलकत्ता मंदारमनी बीच वरचा...या बीच वर अशी बिंदास सवारी फिरवतात....'एक फोटो घेते हा दादा' अस सांगितल्यावर या दादांनी अशी स्टायलिश मस्त पोज दिली आणि पार्टी एकदम खुश होती बर का.....

hero.jpg

कहेता जोकर सारा जमाना,,,,आधी हकीकत आधा फ़साना

क्रिसमस मधल्या एका समारंभात वेश घेऊन आलेल्या एका जोकर चा....न दुख दाखवता येत आणि ना खोट हसू लपवता येत असे काहीसे भाव मात्र कॅमेरयाने नेमके टिपले....

joker.jpg

मयी..........पहिला फोटो कशाबद्द्ल चा आहे ????????? मुद्रा काय... फोटो काढण्यामागचे कारण काय...कोणत्या हेतुने आपण फोटो घेतला अहे ........कृपया स्पष्ट करावे
.
.धन्यवाद

हीरो हीरालाल,,,,,पहिला फोटो.....कलकत्ता मंदारमनी बीच वरचा...या बीच वर अशी बिंदास सवारी फिरवतात....'एक फोटो घेते हा दादा' अस सांगितल्यावर या दादांनी अशी स्टायलिश मस्त पोज दिली आणि पार्टी एकदम खुश होती बर का.....

दुसरा फोटो क्रिसमस मधल्या एका समारंभात वेश घेऊन आलेल्या एका जोकर चा....न दुख दाखवता येत आणि ना खोट हसू लपवता येत असे काहीसे भाव कॅमेरयाने नेमके टिपले....

फेरफटका यांनी दिलेला 'फुग्यासाठी हट्टमुद्रा'फोटो फार आवडला. पण बिचारं बाळ फुग्यासाठी रडताना त्याला तो घेऊन देणं किंवा समजूत घालणं सोडून त्याचा फोटो काढणं हा दूष्टपणा आहे. Proud

हेच फोटो वर लिहा.......प्रस्तावना म्हणुन ....:)

फोटो मधे आपण काय पाहिले ...हे इतरांना नेमके कळु द्या Happy

मृण्मयी दीदी

स्पर्धेसाठी फक्त दोनच फोटो जोडले. हट्ट केला की तो पुरविलाच पाहिजे का? असो. नंतर फुगा घेऊन दिलाच. फोटोचा अन्गल पहा. दुष्टपणा काही नाही.

मृण्मयी
दीदी मी मायबोलीवर नवीन आहे. दातविचक्यांचा सिंबॉल पाहिला नव्हता. आपले आहारशास्त्रवरील लेखन पाहिले. चांगलेच आहे. सर्व पाहतो. आपली भेट झाली. धन्यवाद. माङयाकडून विषयावर पडदा.

हा आमचा "मुद्राभिनय" (हास्य, निद्रा,कुतुहुल, आश्चर्य) Happy
(फोटो स्पर्धेसाठी नाही आहे, पण इथे टाकण्याचा मोह आवरत नाहिये :-))

माझा एक वर्षाचा भाचा "श्लोक"

ब्रह्मास्त्र मुद्रा
शस्त्रसाठ्याच्या आधुनिकीकरणामुळे धनुष्य थोडे 'स्टेट ऑफ द आर्ट' आहे.

028.jpg

आगगाडीतून केलेला लांबचा प्रवास हा बरेचदा एकाच वेळी स्वतःसाठी भरपूर वेळ देणारा व अनुभवांची व्याप्ती वाढवणारा असतो. प्रवासात कितीही काहीही केलं (गप्पा मारल्या, पत्ते खेळले, खादाडी केली, झोपलो) तरी एक वेळ अशी येते की आपण स्वतःमधे गढून जातो, आत्मपरिक्षण करायला लागतो, हा असाच एक क्षण चालत्या गाडीतच पकडलाय एका गुजराती आजोबांचा.

आत्ममग्न मुद्रा

DSC04700.jpg

काय सांगतोस काय! 'चकीत-मुद्रा' एका मित्राची!

DSC03014.JPG

महाबळेश्वरच्या धुक्यात कुडकुडलेली तिकडी ::)
"कुडकुडमुद्रा"
IMG_6600.JPG

"कुण्या एकाची आश्चर्यमुद्रा"
IMG_6128.jpg

Pages