राधा हि बावरी

Submitted by मी मधुरा on 3 February, 2013 - 09:26

किती दिवसांनी एक मराठी मालिका पहावीशी वाटतीये. झी मराठी वरची 'राधा हि बावरी'.....कशी वाटली ती मालिका? चला इथे चर्चा करूयात!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दक्षे, प्रचंड अनुमोदन तुला.... एकेकाला समोर उभ करुन कचकचीत ठेउन द्यावी अस वाटतय मला... सगळ्यात पहिल संकल्पना लिहीणारा, नंतर दिग्दर्शक आणि मग पात्र ज्याने निवडली तो... शरद पोंक्षे सारख्या गुणी माणसाची वाट लावलीय, थ्रो अवे प्राईझला विकत घेतल्यासारख काहीही करायला लावतायेत त्याला... Angry

शरद पोंक्षे सारख्या गुणी माणसाची वाट लावलीय, थ्रो अवे प्राईझला विकत घेतल्यासारख काहीही करायला लावतायेत त्याला

>> +१

ज्याने कोणी 'मी नथुराम..' पाहिलेलं आहे त्याला अचानक राहिबा दाखवलं तर इथे माकडचाळे करणारे 'शरद पोंक्षे' हेच आहेत हे पाहुन जीव देईल तो.

अग पियु नथुराम कशाला.. अगदी उंच माझा झोका, अग्निहोत्र, कुंकु, वादळवाट सुद्धा पाहिलेल्या माणसाने राहिबामधला शरद पोंक्षे बघितला तर झीट येउन पडेल... कुंकुमधला व्हीलन (परशुराम) त्याच्याइतका तगडा दुसर्‍या कोणी केला असता अस नाही वाटत.

आता काय फक्त मम करत रहाणार का?

वादळवाट मधल्या एका सीनमध्ये तर त्याच्या अभिनयाने माझ्या अंगावर काटा आला होता. नीट आठवत नाही तो सीन आता, पण खुनाची धमकी इतक्या थंडपणे देणारा व्हीलन मी तरी नाही बघितला. अगदी नजरसुद्धा समोरच्याला गोठवणारी...

शेवटच्या भागातील शेवटच्या प्रसंगातील रा-सौ चे संवाद अगदीच पांचट होते... एपिसोड नंतर पुर्वी मराठी सिनेमानंतर जशी "समाप्त" अशी पाटी यायची, तशी पाटी आलेली.

संपली मेली एकदाची
तो सुकलेल्या थोबड्यचा कोण होता त्याला का घेतला होता कोण जाने

हुश्श संपली एकदाची..... पुन्हा कधीही एवढी भयानक दळभद्री सीरियल काढायची दुर्बुद्धी झी मराठीच्या सो कॉल्ड क्रिएटिव्ह टीम ला न होवो हीच त्या ईश्वराचरणी प्रार्थना....रा.ही.बा आणि तू.ति.मी या आतापर्यंतच्या सगळ्या सीरियलमध्ये हाइयेस्ट सुमार दर्जाच्या, 'डबडा' ऑल टाईम लो सीरियल असाव्यात....
संपविल्याबद्दल झी चे आभार, आता फटाफट 'तू तिथे मी' पण संपवा पाहू....कथानक पूर्ण नाही केलं तरी कुणालाही फरक पडेलसं वाटत नाही....

राधाला मुलगा झाला की मुलगी? << तिच्यावर / त्याच्यावर सिरीयल येणार का आता? Lol

'राधानंदन हा वेडपट'....

येत आहे येत आहे.. लवकरच .

काय 'शेवट झाला'? ----- हो झाला एकदाचा....
काय? शेवट झाला - सगळ्यांचे बरे भले झाले. दुरावलेले परत आले... आनंदीआनंद झाला...

ok

शेवट काय झाला....ह्यम....राधाबायला बाळ झाला....तीस इला भाट्यांनी शॉ़क ट्रीटमेन्ट देऊन तिचे हरपल्याले भान बरोब्बर दिशेने म्हंजे सौर्याभौकडे वळीवले....तिकडं केदार धर्माधिकारी (टकल्या) संन्यास घ्यायला निघालेला पण वाटेतच ज्योतीबाय भेटल्याने तिच्याशी (चक्क) लग्न करून्शान सुखी झाला. सर्व धर्माधिकार्यांनी कडकलक्षुमी सीमाबायचे सूत कुणा पोलिसवाल्या इन्स्पेक्टराशी जुळवण्याचा प्रयत्न केला ( इथे समस्त प्रेक्षकांचे स्वगतः बिच्चारा इन्स्पेक्टर.... याच्या राशीला कायमची साडेसाती सुरू झाली असावी आणि कुंडलीतले यच्चयावत ग्रह वक्री जाऊन वर कालसर्पयोगसुद्धा जुळून आलेले दिसताहेत, कल्याण करी रामराया....), तो अंशतः (पार्शली) यशस्वी झाला....आणि सगळीकडं कसा आणंदीआणंद झाल्येलाय (पु.लं.च्या 'वार्यावरच्या वराती' तल्या रामा धायगुड्याच्या साक्षीसारखा :))....समाप्त (एकदाचं)

सखी Lol Rofl

राधा बन्द झाली??? म्हणजे ती नवीन जामाला सुरु होतीय राहिबाच्या जागी? झाले ती नवीन सिरीयल अजून सुरु पण नाही झाली की घरी कॉमेन्ट्स सुरु झाल्यात त्या मुलीच्या आईविषयी. धन्य आहे रे बाबा या सिरीयलवाल्यान्ची कशाला प्रत्येक मुलीच्या साबा साबुच्या हाती कोलीत देतात अशा सिरीयल काढुन देव जाणे?:राग:

सखी जाम हसवलस आज.:हाहा: सीमा मार्गी लागली एकदाची. राधापेक्षा मला सीमाचीच काळजी होती.:डोमा::फिदी:

अग ती गार्गी पळाली तिच्या होणार्‍या मुलाच्या बापाबरोबर म्हणजे त्या ऋशी/साधु/सन्ता( बन्ता) बरोबर. केदारला तर मग काय रान मोकळे.:खोखो:

दक्षिणा आता मी मधूराला त्या नवीन जामाला की जाविघे वर बाफ काढायला सान्गते. मग बघ कशा धमाल कॉमेन्ट्स येतील, सिरीयल सुरु झाल्याबरोबर.:खोखो: ( अरे आज झाली वाट्ट सुरु, पण मी पाहिली नाही.:अओ:)

Pages