राधा हि बावरी

Submitted by मी मधुरा on 3 February, 2013 - 09:26

किती दिवसांनी एक मराठी मालिका पहावीशी वाटतीये. झी मराठी वरची 'राधा हि बावरी'.....कशी वाटली ती मालिका? चला इथे चर्चा करूयात!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पियु Rofl
मी पहायची तेव्हा मी थोड्या तरी पोष्टी टाकत होते इथे, पण आता मला ही सिरियल पहायला मिळत नाही (थँक गॉड :फिदी:)

धर्माधिकार्‍यांच्या घरावर कर्जच नाहीये.
सीमाचा राधावर रागच नाहीये.
हे सगळ्ळ सगळ्ळ सौरभने सुधारावं म्हणुन..
अख्खी सिरियलच त्याने सुधारावं म्हणुन चालू आहे.>>>बापरे एक माणुस काम-धंदा, नोकरी करत नाही म्हणून किती तो आटापिटा!!!

मला आपलं उगीचच वाटायचं की सर्वात चांगला /समजुतदार /शक्तीशाली / किमान सगळ्यांपेक्षा देखणा असतो त्याला नायक म्हणतात. राहिबा बघुन वाटतंय की मालिकेतल्या सगळ्यात बावळट माकडाला "मालिकेचा नायक" असं म्हणतात.>>>>>> Lol

तरी तो घनचक्कर सुधारतं नाहिये!!!>>>:हाहा: मस्त टिप्पण्या.

आज बस मधे दोन मुली/तरुणी बसलेल्या....त्यांचं बोलणं ऐकुन मला झीट यायची बाकी राहिलेली पण माझा स्टॉप आलेला म्हणुन उतरावं लागलं......त्या दोघी म्हणत होत्या...." राधाचा ड्रेस्सिंग सेन्स काय मस्त आहे ना......आणि सौरभ तर कित्ती चार्मिंग आहे.....व्वॉव....... शी पण त्याचं लग्न झालय यार... "..............

एक छोट्टस माकडाचे पिल्ल्लु सारखा दिसतो तो>>>>>>>>हो...आणि पावडर की फौंडेशन की काय लावतो त्यामुळे तर अजुन टिनपाट दिसतो......

काल रेवतीची ती असिस्टंट म्हणाली लंडनहून आजोबांचा फोन आला होता. आ़ज म्हणाली ऑस्ट्रेलियाहून आजोबांचा फोन आला की असंच करतात त्या. Uhoh

दुर दुर.. गाणं ऐकलं का?
त्या बद्दल कोणी काही का बोलत नाहीये?
ते गाणं माबोकर केतन पटवर्धन (माबो आयडी-नानुभाऊ) यांच्या रे सख्या या अल्बम मधलं होतं Happy
माबोकर मयुरेश सानेने लिहिलेलं आणि केतनने संगीतबद्ध केलेलं Happy

.

नक्की काय चाललय याच्यात? राधा-सौरभ भांडले, एकत्र झाले. सीमा वैनी रागावुन पुण्याला गेली, गार्गीची कजाग आई तिच्या सासरी येउन राहिलीय, काल सौरभ कामासाठी कुठेतरी गेलाय आणि तिथुन वडिलांच्या तब्येतीची चौकशी करतोय, राधाबाय सईमॅमना सांगतात की त्या (राधाबाय) पुण्याला जाणार सीमावैनीची समजुत घालायला Uhoh

खूप काही मिसलय बहुतेक.......

बर झाल मिसलय.... मी ईतका स्॑यम ठेवते आणी राहीबा पाहते पण आता माझा रोज तोल जात आहे.
उपाय म्हणुन फक्त blank face ठेवुन राहीबा पाहते काल पासुन.

पलक Lol

झी मराठीचे कलाकार डोंबिवली जिमखान्यात 'उत्सव' चालू आहे तिथे रविवारी आले होते, त्यात राधामधली रंजू आली होती, मला जाता नाही आले. नवरा गेला होता माझा तिला भेटायला (मामा आहेना तो तिचा), पण मी तिला मागेच ह्या सिरियलबद्द्ल नाराजी कळवली होती फोनवरुन आणि तिला मायबोलीवरचा हा बाफपण वाच असे सांगितले होते, तिला काल सोमवारी लगेच शुटींग होते गोरेगाव येथे, ते नसते तर ती रविवारी रात्री माझ्याकडे रहाणार होती, मग मी तिला इथेच हा बाफ दाखवायचा हे ठरवले होते, मी ही सिरियल बघत नाही आणि मला काय पटत नाही ते मी मागेच तिला कळवले आहे.

अन्जु जामच मनावर घेतलं आहेस तु......:) जर सिरीयल सुधारली तर इथे येउन सर्वांचे मस्त मस्त कमेंट कसे वाचता येतील गं????? Wink

आता त्या रेवतीचा आजोबा म्हणुन विजु खोटे.. हरे राम..
ह्या भाऊ बहिणीला (शुभा खोटे) झी ने दत्तक घेतलेय का?
हे आजोबा पेताड आहेत एकदम.
आणी रेवतीच्या लग्नाच्या गप्पा सौरभशी करत आहेत. Uhoh

पियु ते रेवती इतकेच किंबहुना जरा जास्तच क्रॅक दाखवले आहेत.... काल त्यांनी सौर्‍याला २ लिटर पाणी प्यायला लावल Uhoh

पण त्यांच्यासारख्या चांगल्या विनोदी कलाकाराला या मालिकेत घेउन फुकट घालवल आहे... अ.आ.मा.म

अरे त्या सीमाला घरी आणले ना आता. मग फुगली का आहे राधावर परत?
या दोघींनीच काहीतरी प्लॅन केला होता ना सौरभ सुधारण्यासाठी? मग आता काय झालंय....

आजही थोडी फुगलीच होती( वय झाल्याने गाल फुगत नाहीत इतकेच). गार्गीचे डोहाळेजेवण आहे ना. राधाला प्रिय व्यक्तीबद्दल बोलायला चानस मिळाला त्यात तिने सई मॅम आणी सीमा वैनी आईसमानच आहेत असे मोठ्या मनाने सान्गीतले.

Pages