शेवटी मिसळेन पण मातीत मी (तरही)

Submitted by मिल्या on 1 February, 2013 - 01:38

तरही लेखनाचा माझाही एक प्रयत्न

डॉ. नी दिलेली ओळ बदलून घेतल्याबद्दल आधी त्यांची माफी मागतो

काल तर झालो मला माहीत मी
आज का आलो पुन्हा शुद्धीत मी?

शक्य नाही आपले जमणे कधी
आग तू आहेस अन् नवनीत मी

कुवत नसताना भरारी घेउनी
लोटले आहे मला खाईत मी

सावलीने साथ देणे सोडले
अन् उन्हाला टाकले वाळीत मी

आज रस्ता संपता संपेचना
आज आहे नेमका घाईत मी

सोडले आता स्वत:ला भ्यायचे
(तेच घडले ज्यास होतो भीत मी)

रोज क्षितिजे नवनवी ओलांडतो
शेवटी मिसळेन पण मातीत मी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सावलीने साथ देणे सोडले
अन् उन्हाला टाकले वाळीत मी

आज रस्ता संपता संपेचना
आज आहे नेमका घाईत मी

रोज क्षितिजे नवनवी ओलांडतो
शेवटी मिसळेन पण मातीत मी<<<

व्वा व्वा

मस्त गझल

रोज क्षितिजे नवनवी ओलांडतो
शेवटी मिसळेन पण मातीत मी >>>> क्या बात है....
सर्वच शेर सुंदर .... मस्त गजल....

गझल आवडली.

सावलीने साथ देणे सोडले
अन् उन्हाला टाकले वाळीत मी

आज रस्ता संपता संपेचना
आज आहे नेमका घाईत मी

हे दोन शेर खूप आवडले.

शक्य नाही आपले जमणे कधी
आग तू आहेस अन् नवनीत मी

>>>>>>>>.

हा विचार

अनेकदा मांडलेला आहे , पण तरी हा शेर खुप सहज वाटला !!

>>>>>>>

गझल आवडली !!

व्वा मिल्या !

>>सावलीने साथ देणे सोडले
अन् उन्हाला टाकले वाळीत मी

आज रस्ता संपता संपेचना
आज आहे नेमका घाईत मी

सोडले आता स्वत:ला भ्यायचे
(तेच घडले ज्यास होतो भीत मी)

रोज क्षितिजे नवनवी ओलांडतो
शेवटी मिसळेन पण मातीत मी
<<

हे शेर त्यातल्या विरोधाभासामुळे फार आवडले.

वा वा वा....सगळेच शेर एका वरचढ एक !

केवढे सहज आले आहेत एक एक मिसरे...

खयालही थेट!

जियो !

धन्यवाद!

सावलीने साथ देणे सोडले
अन् उन्हाला टाकले वाळीत मी

आज रस्ता संपता संपेचना
आज आहे नेमका घाईत मी
जबरी...

सुरेख गझल..

शुभेच्छा

धन्यवाद परत एकदा..

सतिशजी : मतला कुणाला भावणार नाही ह्याची कल्पना होतीच बर्‍यापैकी पण तरी पण मला तो पटला म्हणून तसाच ठेवला ... मी तो उलगडत बसणार नाही पण.. त्यापेक्षा फसला आहे असेच म्हणेन

मतल्यासहीत सर्वच शेर आवडलेत.

बढिया गझल. Happy

--------------------------------------------
<<< मी तो उलगडत बसणार नाही पण.. त्यापेक्षा फसला आहे असेच म्हणेन >>>

प्रचंड सहमत. Happy