निसर्गाच्या गप्पा (भाग - १२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 31 January, 2013 - 02:12

निसर्गाच्या गप्पांच्या १२ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे !!

जिप्स्या, यातले बरेचसे वृक्ष, नॅशनल पार्कात असायला पाहिजेत. टोकफळ नसणार.
खिरणीचा फोटो मला वाटतं, डॉ कैलास यांनी इथेच टाकला होता. अजानवृक्ष बघायचा तो आळंदीचाच ! नगरला पण आहेत. कुंभा, बहुतेक राणीच्या बागेत आहे पण मालवण / गोव्यात जास्त दिसतील.
नाणा, अंबोलीलाच.

प्रा. घाणेकर / इंगळहाळीकर बहुदा पुण्याचेच पत्ते देतात. डॉ. डहाणुकरांनंतर मुंबईतल्या झाडांबद्दल कुणी
फारसे लिहिलेले दिसत नाही.

खरं तर, बरीचशी झाडे फुलावर नसताना ओळखताही येणार नाहीत. ( पण या दिवसात दिसतील तेवढे फुलोरे टिपून ठेव, नावे मग शोधू. )
तूम्हा दूर्गप्रेमींना सांगावेसे वाटतेय. तूम्ही फार क्वचितच झाडांचे फोटो काढता किंवा कुठली झाडे दिसली
त्याबद्दल लिहिता. भले ती तूम्हाला सोबत करत नसतील, पण जिथे टेकता तिथे प्रेमाची सावली तर देतातच ना ?
अगदी पुरंदर / सिंहगड / कळसुबाई यांचे पायथे / परिसर अनोख्या झाडांनी नटलेला आहे. एखादी ट्रिप केवळ
त्यासाठी कराच. मग गडाचा माथा नाही गाठलात तरी चालेल.

धन्यवाद दिनेशदा Happy

पण या दिवसात दिसतील तेवढे फुलोरे टिपून ठेव, नावे मग शोधू. >>>>>नक्कीच Happy

एखादी ट्रिप केवळ त्यासाठी कराच. मग गडाचा माथा नाही गाठलात तरी चालेल.>>> माझी तयारी आहे. Happy

सुदुपार,
तूम्ही फार क्वचितच झाडांचे फोटो काढता किंवा कुठली झाडे दिसली
त्याबद्दल लिहिता. भले ती तूम्हाला सोबत करत नसतील, पण जिथे टेकता तिथे प्रेमाची सावली तर देतातच ना ?
अगदी पुरंदर / सिंहगड / कळसुबाई यांचे पायथे / परिसर अनोख्या झाडांनी नटलेला आहे. एखादी ट्रिप केवळ
त्यासाठी कराच. मग गडाचा माथा नाही गाठलात तरी चालेल.

दिनेशदा,
अगदी आमच्या मनातलं बोललात,मी मनावर घ्यायच ठरवलं आहे,फिरायला जाण्याचा प्लान आहे,यापुढे एक निसर्ग प्रेमी म्हणून नक्की ही चुक सुधारु आणि या नविन वर्षात जास्ती जास्त निसर्गात फिरु आणि फोटो काढु असं आश्वासन देतो

जिप्सी, आपल्याला जे वाटाडे लाभतात ना ते खरे याबाबतीत ज्ञानी असतात. कुठले झाड कधी फुलावर येते ? त्याचे काय औषधी उपयोग आहेत ? शेळ्यांना त्याची पाने आवडतात का ? त्या झाडावर कुठले पक्षी येतात ?
त्या झाडांची नावे.... अशी अनमोल माहिती त्यांच्याकडे असते. त्यांच्याकडून कौशल्याने काढून घ्यावी लागते.

आपल्या आपल्यात फिरवली, तर तिला रिक्षा म्हणू नये... एक संतवचन !,''>>>>>>> दिनेशदा अगदी अगदी!
प्रेम चतुर्दशी: जिप्सी............मस्त!

सध्या मोह, पाचुंदा हे फुलले आहेत
पाचुंदा मध्ये २ प्रकार दिसले पांढरा आणि निळसर फुले सध्या खुप फुललेली दिसली
आमच्या, शेजारी दारासमोर अंगणात हे वाढले,फुलले आहेत, अंगणात हे झाड असाव कि नसावं ?

गोईण ह्या पुस्तकात पण खुप वेगवेगळ्या झाडांची नावे आहेत. पण फोटो असते तर फार बरे झाले असते.

याला लहानपणी आम्ही "बेशरमाचे झाड" म्हणायचो. कुठेही, कसेही अगदी बेशरमासारखे उगवायचे म्हणुन. Happy याच्या फांदीचा (एकच सरळ वाढलेली) उपयोग लहानपणी आम्ही "काठी उडवा उडवी" खेळताना करायचो. Happy
बालपणीच्या कित्येक आठवणी या आणि अशा झाडांशी जोडलेल्या आहेत. पूर्वी आमच्या बिल्डिंगला चारही बाजुंनी मेहंदीच्या झाडांचे कुंपण होते. त्याच्या सोबत असणार्‍या जाड पानांच्या कडु मेहंदीच्या सफेद फुलांचा रस आम्ही चोखत असु. समोर २ पांगार्‍याचे झाड होते त्याच्या बियांचा वापर आम्ही एकमेकांना चटका द्यायला करायचो. Happy अजुन दोन परस पिंपळाची (भेंडीची) झाडे होती, त्याच्या कळ्यांचा वरचा भाग काढुन त्यात काठी टाकुन आम्ही त्याचा भोवरा करत. या आणि अशा भरपूर आठवणी आहेत.

जेंव्हा जाण नव्हती तेंव्हा हि संपत्ती चहुबाजुंनी भरभरून होती आणि जेंव्हा जाण आली तेंव्हा सगळं गायब. Sad

मेहंदीच्या कुंपनाची जागी आता तारेची कुंपण आली, मेहंदी आणि कडु मेंदी आता औषधालाही सापडत नाही.
दोन्ही पांगार्‍याची झाडे जाऊन त्याच्या जागी डांबराचा रस्ता आला, भेंडीच्या दोन झाडांपैकी एक झाड कसेतरी तग धरून केविलवाणे उभे आहे. बेशरमाची ती झाडे जाऊन त्याच्या जागी शहाबादी फरशा आल्यात.

कालाय तस्मै नम: Sad

जिप्सी.. खरंय रे हे सगळं..
आता तू ,लहानपणी विपुल प्रमाणात दिसणारी पण आता दुर्मिळ झालेली फुलं,वेली शोधून त्यांचे फोटो टाक इथे.. तेव्हढंच नैनसुख !!!

तू म्हणतोस त्या भेंडीची फळे वापरुन आम्ही पिवळा रंग करायचो, पण त्या आधी त्या फळांच्या लवचिक देठाचा वापर करुन, एकमेकांच्या डोक्यात मारायचो. ( मस्त टण्ण आवाज यायचा.)
आणि कडू मेंदी म्हणतोस त्याला आम्ही कडूपानाचे झाड म्हणायचो. ( योगायोग म्हणजे आमच्याही बिल्डींगला याच दोन झाडांचे कुंपण असायचे. कितीही तोडले तरी परत वाढायचेच. ) या कडूपानाला क्वचित फळेही लागायची.

त्या बेशरमाच्या झाडाचा, अँटेना म्हणून चांगला उपयोग होतो, असे मधे वाचले होते. ( सिग्नल चांगले पकडते, ते झाड.)

वर जिप्स्याने अजानवृक्ष पाहायचाय लिहिलेय. काल चितमपल्लींचेह पक्षी जाय दिगंतरा वाचत होते, त्यात अजानवृक्ष = पिंपळाचे झाड असे लिहिलेले सापडले.

नाही, आळंदीचा अजानवृक्ष वेगळा आहे. पाने लहान असतात. लोक फार पाने तोडतात म्हणून त्याला संरक्षण दिलेले आहे.
नगरला एका मोठ्या देवळाच्या आवारात, अजानवृक्षाची बाग पण बघितली आहे.

आळंदीचा अजानवृक्ष वेगळा आहे

त्यांच्या लेखात आळंदीच्या वृक्षाचाच उल्लेख होता. पण अजानवृक्षाचे स्पष्टीकरण मात्र पुस्तकाच्या शेवटी दिलेले.

जिप्सी,
छान आठवणी आणि फोटो, या बाभळीला सध्या फुले बहरली आहेत

आह्हा.. जिप्स्याचे प्रचि आणी दिनेश दा ची माहिती म्हंजे सोनेपे सुहागा!!! >>> १००+ अनुमोदन !

त्या बेशरमाच्या झाडाचा, अँटेना म्हणून चांगला उपयोग होतो, असे मधे वाचले होते.
याला झाडाला कोल्हापुर-सांगली भागात 'गारवेल' अस नाव ऐकलयं, बहुतेक खुप पाणी असलेल्या जागी हे चांगल वाढलेल दिसतं..

शोभाला, त्या फुलांचा चांगला फोटो मिळाला कि नाही ? >>>>>>>>>>नाही ना. दिनेशदा, ती एक छोटीशी फांदी होती, जिला पानाप्रमाणे ही लाल फुले लागली होती. माझ्या बस मधल्या एका मैत्रिणीने ती, तिच्या सायबिणीच्या बुके मधुन काढून घेतली होती. मला बस मधे दाखवली. मी उभी असल्याने, आणि बसमध्ये जरासा अंधार असल्याने फोटो नीट नाही आला. आणि ती मैत्रिण माझ्या घरापासून खूप लांब रहाते. म्हणून परत फोटो पण नाही काढता आला. Sad Sad पण मी तिला ती फांदी जमिनीत थोडीशी पुरून ठेवायला सांगितल. आणि तिनेही ती लावलेय. बघू जगते का? जगली आणि फुलली तर नक्कीच परत फोटो दिसेल तोपर्यंत वाट पहात बसणे. Uhoh

जिप्स्या टुक टुक. माझ्या कुंपणाला कडू मेहेंदी आहे. शिवाय तू ज्याला बेशरमाच झाड म्हणतोस ते आमच्या पाठच्या ओसाड आवारात खुप आहेत. मेहेंदीचे मात्र औषधापुरतीच माझ्या माहेरी एक झुडूप उरलय. ह्या पावसाळ्यात फांदी आणून लावणार आहे. पारिंगा पण औषधापुरता दिसतो. हल्ली तर होळीलाही मिळायला कठीण झालाय. लांबून आणावा लागतो. पुर्वी आम्हाला काही लागले, जखम झाली की आजी पारिंग्याच्या पानाचा रस टाकायची जखमेवर. दुसर्‍यादिवशी जखम एकदम बरी झालेली असायची. रक्तप्रवाह लगेच थांबायचा.

आमच्याकडे बेशरम दुसर्‍या झाडाला म्हणतात. त्याचे फुल सकाळी पांढरे, दुपारी फिक्कट गुलाबी तर संध्याकाळी गडद गुलाबी होतो. ह्या रंगबदलत्या स्वभावामुळे त्याला बेशरम म्हणतात.

( सिग्नल चांगले पकडते, ते झाड.)>>>>>>> काय सांगता दिनेशदा? इन्टरेस्टिन्ग!
जिप्सी बाभळीची फुल काय मस्त !

जागु Proud

तू ना लक्कीशेस अगदी.. निसर्गाच्या कुशीत राहायला मिळतंय तुला.. Happy
ती सकाळ ,दुपार्,संध्याकाळ रंग बदलणारी फुलं लहानपणी खूप पाहिलीयेत, घरी शेजारी सर्वत्र लागायची. चांगलं उंच पण हडकुळी झाडं होती या फुलांची..

रावी हे स्पॅथोडिया आहे. अफ्रिकन ट्युलिप. लालभडक रंगाच असत हे फुल.
हा सुकलेल्या फुलांचा फोटो आहे ना?

कालच आणलं एक पॅकेट, ही वाळकी ,लालचुटुक ,भलीमोठी बोरं, खास थंडीच्या दिवसांत मिळणारा खाऊ आहे.पोटाचे आणी स्प्लीन चे विकार बरे करण्याची क्षमता यांच्यात आहे.
अजूनही काही उपयोग इथले जाणकार सांगतीलच..

Pages