भक्तीगीतांचा संग्रह

Submitted by महेश on 25 January, 2013 - 05:25

नमस्कार,

नुकतेच एक जुने हिंदी भक्तीगीत ऐकायला मिळाले.
मुझीमे रहके मुझीसे दूर,
ये कैसा दस्तूर रे मालिक ये कैसा दस्तूर

अतिशय सुंदर रचना, तेवढेच सुंदर संगीत आणि आशाताई, रफीसाहेबांचा मधुर आवाज.
हे गीत ऐकताना असे वाटले की अश्विनी यांनी स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना साठी एक धागा चालू केला आहे,
तसा भक्तीगीतांसाठी एक वेगळा धागा सुरू करूयात.
यामधे आपल्याला आवडणारी भक्तीगीते लिहावीत.
गीताच्या सुरूवातीच्या एकदोन ओळी, गीतकार, संगीतकार, गायक, चित्रपट / अल्बम, इ. जेवढी जमेल तेवढी माहिती तसेच त्या गीतासंदर्भात अजुन काही अवांतर माहिती देता आली तर अजुनच छान !

तसे तर सर्व भाषांमधली गीते चालतील, पण सुरूवात प्रामुख्याने हिंदी चित्रपटातील भक्तीगीतांबद्दल करावी असे वाटते. सुरूवात करत आहे मला आवडणार्‍या काही गीतांनी

मन तरपत हरी दर्शन को आज
चि : बैजू बावरा, गी : मोहम्मद शकील, सं : नौशाद, गा : रफी, राग : मालकंस
(नौशाद यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की हे गीत एका अर्थाने वेगळे अशासाठी आहे की यामधे तिन्ही लोक हिंदू धर्माचे नाहीत. जे लोक कलेचे उपासक असतात त्यांना धर्म हा अडसर होऊ शकत नाही. गीताच्या रेकॉर्डीन्गला गीतकार मोहम्मद शकील देखील उपस्थित होते. शेवटी एक छोटेसे कृष्णभजन आहे त्यावेळी तर ते पण तल्लीन होऊन डोलत होते. Happy )

आना है तो आ राह मे कुछ फेर नही है, भगवान के घर देर है अंधेर नही है
चि : नया दौर, गी : साहीर, सं : ओपी , गा : रफी, राग : ?
(या गीताचे चित्रिकरण जेजुरी येथे झाले आहे असे म्हणतात)

1 देवा श्री गणेशा - (अजय / अजय अतुल / अग्नीपथ)
2 साँचा तेरा नाम - (अनुराधा / लक्ष्मीप्यारे / बिवी हो तो ऐसी)
3 पिया हाजी अली - (ए आर रहमान / ए आर रहमान / फिझा)
4 ख्वाजा मेरे ख्वाजा - (ए आर रहमान / ए आर रहमान / जोधा अकबर)
5 अल मदद मौला - (ए आर रहमान / ए आर रहमान / मंगल पांडे)
6 कुन फाया कुन - (ए आर रहमान / ए आर रहमान / रॉक स्टार)
7 जिक्र - (ए आर रहमान / ए आर रहमान / बोस फरगॉटन हिरो)
8 कौन ठगवा लूटल हो - (आशा / जयदेव / अनकही)
9 मुझी मे छुपकर मुझी से दूर, ये कैसा दस्तूर - (आशा, रफी / मदन मोहन / जेलर)
10 राधा के प्यारे कृष्ण कन्हाई - (आशा / नौशाद / अमर)
11 तू शाम मेरा साँचा नाम तेरा - (आशा, उषा / राजेश रोशन / ज्युली)
12 तोरा मन दर्पण कहलाये - (आशा / रवी / काजल)
13 रोम रोम मे बसनेवाले राम - (आशा / रवी / निलकमल)
14 इतनी शक्ती हमे दे न दाता - (अशोक खोसला, शेखर सावकार, घनश्याम वास्वानी, मुरलीधर / कुलदीप सिंग / अंकुश)
15 पल पल है भारी - (आशुतोष गोवारीकर, विजय प्रकाश, मधुश्री / ए आर रहमान / स्वदेस)
16 मन मोहना - (बेला शेन्डे / ए आर रहमान / जोधा अकबर)
17 घूँघट के पट खोल - (गीता दत्त / बुलो सी रानी / जोगन)
18 मत जा मत जा जोगी - (गीता दत्त / बुलो सी रानी / जोगन)
19 उठत चले अवधूत - (गीता दत्त / बुलो सी रानी / जोगन)
20 ना मैं धन चाहूँ ना रतन चाहूँ - (गीता दत्त, सुधा मल्होत्रा / स.दे.बर्मन / काला बाझार)
21 एक ओम्कार - (हर्षदीप कौर / ए आर रहमान / रंग दे बसंती)
22 शिवजी बिहाने चले - (हेमंत कुमार / स.दे.बर्मन / मुनिमजी)
23 राम सियाराम जय जय राम - (जसपाल सिंग / रविंद्र जैन / गीत गाता चल)
24 श्याम तेरी बँसी पुकार राधा नाम - (जसपाल सिंग, आरती मुखर्जी / रविंद्र जैन / गीत गाता चल)
25 नूर उल अल्लाह - (कादीर, मुर्तझा / ए आर रहमान / मिनाक्षी)
26 मौला मेरे मौला - (कैलाश खेर, जावेद अली / ए आर रहमान / दिल्ली ६)
27 ऐ खुदा हर फैसला तेरा मुझे - (किशोरकुमार / रा.दे.बर्मन / अब्दुल्लाह)
28 ओ बंदा रे - (कृष्णा बी. / गौरव दासगुप्ता / राझ २)
29 ओ पालनहारे - (लता, साधना सरगम, उदीत नारायण / ए आर रहमान / लगान)
30 एक तूही भरोसा एक तूही सहारा - (लता / ए आर रहमान / पुकार)
31 जय जय हे जगदंबे माता - (लता / चित्रगुप्त / गंगा की लहरें)
32 तुम्ही हो माता पिता तुम्ही हो - (लता / चित्रगुप्त / मैं चूप रहूँगी)
33 तुम आशा विश्वास हमारे - (लता / हृदयनाथ / सुबह)
34 माता सरस्वती शारदा - (लता, दिलराज कौर / जयदेव / आलाप)
35 अल्लाह तेरो नाम - (लता / जयदेव / हम दोनो)
36 प्रभू तेरो नाम - (लता / जयदेव / हम दोनो)
37 चुप चुप मीरा रोये - (लता / कल्याणजी आनंदजी / जॉनी मेरा नाम)
38 बहुत दिन बीते - (लता / लक्ष्मी प्यारे / संत ज्ञानेश्वर)
39 सत्यम शिवम सुंदरम - (लता / लक्ष्मी प्यारे / सत्यम शिवम सुंदरम)
40 यशोमती मैय्यासे बोले नंदलाला - (लता / लक्ष्मी प्यारे / सत्यम शिवम सुंदरम)
41 कान्हा कान्हा आन पडी तेरे द्वार - (लता / लक्ष्मी प्यारे / शागीर्द)
42 खुदा निगेहबान - (लता / नौशाद / मुघल ए आजम)
43 एक राधा एक मीरा दोनो ने - (लता / रविंद्र जैन / राम तेरी गंगा मैली)
44 ए री मैं तो प्रेमदिवानी - (लता / रोशन / नौबहार)
45 जागो मोहन प्यारे - (लता / सलील चौधरी / जागते रहो)
46 राधा ने माला जपी श्याम की - (लता / स.दे.बर्मन / तेरे मेरे सपने)
47 बनवारी रे जीने का सहारा तेरा नाम रे - (लता / शंकर जयकिशन / एक फूल चार काँटे)
48 मोहे छेडो ना नंद के लाला - (लता / शिव हरी / लम्हे)
49 ज्योती कलश छलके - (लता / सुधीर फडके / भाभी की चुडियाँ)
50 म्हाने चाकर राखो - (लता / वसंत देसाई / दिया और तुफान)
51 मुरलिया बाजेगी - (लता / वसंत देसाई / दिया और तुफान)
52 पिया ते कहाँ गयो - (लता / वसंत देसाई / दिया और तुफान)
53 ऐ मालिक तेरे बंदे हम - (लता / वसंत देसाई / दो आँखे बारह हाथ)
54 जो तुम तोडो पिया - (लता / वसंत देसाई / झनक झनक पायल बाजे)
55 ओ शंकर मेरे कब होंगे दर्शन तेरे - (महेन्द्र कपूर / कल्याणजी आनंदजी / बैराग)
56 हे नटराज गंगाधर शंभो - (महेन्द्र कपूर, कमल बारोट / एस.एन.त्रिपाठी / संगीत सम्राट तानसेन)
57 तुम मेरी राखो लाज हरी - (मन्ना डे, सुधा मल्होत्रा / मदन मोहन / देख कबीरा रोया)
58 आन मिलो आन मिलो श्याम साँवरे - (मन्ना डे, गीता दत्त / स.दे.बर्मन / देवदास)
59 भय भंजना सुन वंदना हमारी - (मन्ना डे / शंकर जयकिशन / बसंत बहार)
60 तू प्यार का सागर हैं - (मन्ना डे / शंकर जयकिशन / सीमा)
61 ज्योत से ज्योत जगाते चलो - (मुकेश / लक्ष्मी प्यारे / संत ज्ञानेश्वर)
62 सजन रे झूठ मत बोलो - (मुकेश / शंकर जयकिशन / तिसरी कसम)
63 देव पुजी पुजी - (परवीन सुलताना / उस्ताद दिलशाद खान / आश्रम)
64 वृंदावन का कॄष्ण कन्हैय्या - (रफी, लता / हेमंत कुमार / मिस मेरी)
65 सुख के सब साथी - (रफी / कल्याणजी आनंदजी / गोपी)
66 शिर्डीवाले साईबाबा - (रफी / लक्ष्मी प्यारे / अमर अकबर अँथनी)
67 मन तरपत हरी दर्शन को आज - (रफी / नौशाद / बैजू बावरा)
68 ओ दुनिया के रखवाले - (रफी / नौशाद / बैजू बावरा)
69 तू है मेरा प्रेम देवता - (रफी, मन्ना डे / ओ.पी.नय्यर / कल्पना)
70 आना है तो आ राह मे कुछ फेर नही है - (रफी / ओ.पी.नय्यर / नया दौर)
71 अजब तेरी कारीगरी रे करतार - (रफी, कृष्णा कल्ले / रवी / दस लाख)
72 बिरज में होरी खेलत नंदलाल - (रफी / रवी शंकर / गोदान)
73 बडी देर भयी नंदलाला - (रफी / शंकर जयकिशन / बसंत बहार)
74 दुनिया ना भाये मोहे - (रफी / शंकर जयकिशन / बसंत बहार)
75 परवर दिगारे आलम - (रफी / एस.एन.त्रिपाठी / हातिमताई)
76 आयो प्रभात - (राजन साजन मिश्रा / लक्ष्मी प्यारे / सूर संगम)
77 धन्य भाग सेवा का अवसर पाया - (राजन साजन मिश्रा / लक्ष्मी प्यारे / सूर संगम)
78 जाँऊ तोरे चरणकमल पर वारी - (राजन साजन मिश्रा / लक्ष्मी प्यारे / सूर संगम)
79 हाँ रहम फरमा ऐ खुदा - (राशिद अली / अमित त्रिवेदी / आमीर)
80 आरती तुम्हारी - (रेखा भारद्वाज / ए आर रहमान / दिल्ली ६)
81 अल्लाह मेघ दे पानी दे - (स.दे.बर्मन / स.दे.बर्मन / गाईड)
82 मोरया मोरया - (शंकर महादेवन / शंकर एहसान लॉय / डॉन)
83 जैसे सुरज की गर्मी से - (शर्मा बंधु / जयदेव / परिणय)
84 तू प्रभ दाता दान मत पुरा - (सुखविंदर / सुखविंदर, वनराज भाटीया / हल्ला बोल)
85 अल्लाह करम करना तू मौलाह रहम करना - (सुमन कल्याणपुर / उषा खन्ना / दादा)
86 होरी खेले रघुबिरा अवध मे - (उदीत नारायण, अलका याज्ञिक, अमिताभ / आदेश श्रीवास्तव / बागबान)
87 तेरी पनाह मे हमे रखना - (उदीत नारायण, साधना सरगम, सारिका कपूर / नदीम श्रवण / पनाह)
88 मैं तो आरती उतारूँ रे - (उषा / सी अर्जुन / जय संतोषी माँ)
89 हम को मन की शक्ती देना - (वाणी जयराम / वसंत देसाई / गुड्डी)
90 शाम रंग रंगा रे हर पल मेरा रे - (येसूदास / भप्पी लाहिरी / अपने पराये)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"ए मेरे वतन के लोगो...जरा आंखमें भरलो पानी, जो शहिद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी"

जिप्सी,
आज २६ जानेवारी, या गीताचा ५०वा वाढदिवस आहे.

सर्वांनी एवढा भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल मनःपुर्वक आभार.
लवकरच या सर्व गीतांची यादी करून हेडरमधे टाकता येईल का ते पहातो.

दिल से मधले.. "कर थैया थैया" हे पण (सुफी) भक्तिगीतात येते का?
http://www.youtube.com/watch?v=kJx6uwrCBbw
यात युट्युब वरील कॉमेंट्स प्रमाणे बुलेशाह म्हणुन कोणी लिहिले आहे.

एम एस सुब्बुलक्ष्मींनी गायलेली मीरा-कबीर-सूरदास-कृत भजने
विशेषतः वैष्णव जन तो तेणे कहिए आणि भज गोविंदम्
त्यांच्या आवाजातला अभंग

मराठी चित्रपटांमधील गाणी चालतील का?

१. ये जवळी, घे जवळी प्रिय सखया भगवंता
गायिका:लता मंगेशकर/ संगीतकारः मीना खाडिलकर/ चित्रपटः माणसाला पंख असतात

ना मैं धन चाहू, ना रतन चाहू
तेरे चरनेंकी धोल मिल जाए
तो मैं तर जाऊ, हां मैं तर जाऊ : काला बझार (आशा, गीता)

.........................

१. मत जा मत जा जोगी
२. उठत चले अवधुत
३. घुंगट के पट खोल

चित्रपटः जोगन
...............................
traditionally भजन नसले तरी भाभी चुडिया मधले "मेरी लाज राखो गिरीधारी" फार आवडते.

"वैश्नव जन तो" :लता: http://www.youtube.com/watch?v=rKAhRsqvZqo

राधा के प्यारे कॄष्न कन्हाई, तेरी दुहाई
हम भी तेरे कुछ तो दया कर
लाखों की तुमने बिगडी बनाई : अमर ( नौशाद, आशा) सुंदर भजन आहे.

नवीन: लताचे लगान मधील ओ पालनहारे( काय आवाज आहे), सुखविंदरचे हल्ला बोल मधले "तू प्रभ दाता दान मत पुरा, हम थारे भिखारी जिओ"

माझी आवडती भक्तीगीते (काही वरती आली आहेत)

कान्हा कान्हा (शागीर्द)
तोरा मन दर्पन कहलाये (काजल)
तुम्ही हो माता पिता तुम्ही हो (मै चूप रहूंगी)
दिल एक मंदिर है (दिल एक मंदिर)
भगवान का घर है (अमर)
जैसे सूरज की गर्मी से (परिणय)
इतनी शक्ती हमे दे ना दाता (अंकुश)

याशिवाय प्रहार मधेही एक चांगले भक्तीगीत आहेत पण शब्द आत्ता आठवत नाहीत.

50 years of popular Bhajans या नावाचा एक संग्रह ५ भागांमधे एच एम व्ही ने काढला होता. अशक्य आणि अखंड स्वर-मेजवानीच आहे हा संग्रह म्हणजे. एक प्रकारे ५० वर्षांच्या भक्तीसंगीताचा आढावाच होता हा संग्रह म्हणजे. (माझ्याकडे ह्याच्या ५ कॅसेटस् आहेत, अर्थात आता वापरून वापरून खराब झाल्यात त्या आणि अजून काही ही गाणी एम्पी३ मधे मिळाली नाहीयेत त्यामुळे मला हा धागा बघून फार म्हणजे फारच नॉस्टॅल्जिक झाले. )

विशेष उल्लेखनीय म्हणजे मी (त्यावेळी) प्रथमच ऐकलेली गाणी म्हणजे डी. व्ही. पलूस्करांच्या आवजातली पायोजी मैने, ठुमक चलत ही भजने, एम एस सुब्बालक्ष्मीने गायलेली मीरेची भजने, पंकज मलीक, पुरुषोत्तम दास जलोटा, सी एच आत्मा, ओंकारनाथ ठाकूर यांची भक्तीगीते.

बाकी नेहेमीच्या सर्व ओळखीच्या म्हणजे लता, आशा, उषा, माणिक वर्मा, किशोरी आमोणकर, सुमन कल्याणपूर, वाणी जयराम, सुधा मल्होत्रा, पासून ते कविता कृष्णमूर्ती पर्यंत गायिकांची गाणे आहेत या संग्रहात आणि गायकांमधे कुमार गंधर्व, भीमसेन जोशी,जगजीत सिंग, हरीओम शरण, रफी, मुकेश, मन्ना डे, पासून सुरेश वाडकर, उदित नारायण पर्यंतचे गायक

गाणी इतक्यात ऐकली नसल्या कारणाने (आणि संख्येने खूपच असल्याने) नमूद करत नाहीये त्याबद्दल क्षमस्व...पण म्हणे ही सध्या ऑनलाईन उपलब्ध आहेत; तेव्हा ती शोधुन, जमेल तेव्हा त्याचा दुवा इथे द्यायचा प्रयत्न करतो.

खुदा निगेहबान है तूम्हारा, असे एक गाणे ऐकल्याचे आठवतेय. बहुतेक लताचेच आहे. पुढच्या ओळी आठवत नाहीत ! ( पण इथे सापडतील. )

हर्पेन....

"पुरुषोत्तम दास जलोटा....." यांच्या नावाच्या उल्लेखाबद्दल तुमचे खास आभार. मी असे का म्हटले आहे हे ज्यानी पुरुषोत्तम दास जी यांची भजने ऐकली आहेत त्याना नक्कीच उमजेल.

अशोक पाटील

रुना लैला ने झुलेलाल आणि शहबाझ कलंदर यांच्यासाठी गायलेली कव्वाली
दमा दम मस्त कलंदर, अली दम दम दे अन्दर

१. "मधुबन...." हे गाणे एकप्रकारे विरहिणीची स्थिती असून त्रयस्थ राधेच्या हालचालीचे वर्णन करीत आहे असा भाव त्या गीतात आहे. त्यामुळे रुढार्थाने ते भक्तीगीत होऊ शकणार नाही.

२. "ओ दुनिया के रखवाले...." देवाला उद्देश्यून एक भाकणूक [अपील] असून त्यात मात्र भक्तीरसाचा पुरेपूर वापर असल्याने हे गीत त्या गटात नक्कीच येते.

अशोक पाटील

धन्यवाद अशोकजी,

दुनिया न भाये मुझे अब तो बुलाले शरणोमे शरणोमे (बसंत बहार)
वृंदावन का कृष्ण कन्हय्या सबकी आन्खों का प्यारा (मिस मेरी)

धन्यवाद नविन प्रतिसादांबद्दल !
आधीच्या प्रतिसादांमधुन निवडून गीतांची एक यादी तयार केली आहे,
लवकरच हेडर मधे अपडेट करण्यात येईल.

मंदिरात अंतरात तोच नांदताहे
नाना देही नाना रूपी तुझा देव आहे.

गीत:- सुधीर मोघे संगीत:- सुधीर फडके चित्रपट:- धाकटी सून (१९८६)
माझे सगळ्यात आवडते भक्तीगीत.

आत्तापर्यंतच्या प्रतिसादांमधुन हिंदी चित्रपटांमधली भक्तीगीते निवडून एक यादी धाग्याच्या मुळ लेखात समाविष्ट केली आहे. या अशा स्वरूपात ठीक आहे की काही वेगळ्या प्रकारे (फाईल, इ.) स्वरूपात यादी करावी ? कृपया सुचविणे.
गायक, संगीतकार, चित्रपट आणि गीत या क्रमाने सॉर्ट केले आहे. त्याबद्दलही काय प्रकारे सॉर्ट केलेले चांगले ते सुचविणे.
मोहम्मद रफी , मुकेश यांची अजुन बरीच भक्ती गीते (चित्रपटातील) असण्याची शक्यता आहे.
आठवतील तशी येथे सुचविणे. धन्यवाद !

किस विधी करे बखान (?) प्रभु, तेरे कोटी कोटी उपकार
कल तक थी खाली झोली, और आज भरे भंडार

अजब तेरी कारीगरी रे करतार
समझ आए माया तेरी, बदले रंग हजार

रफी: दस लाख

ह्यात बॅकग्राऊंडला कधीतरीच हिंदी सिनेमा असणारा मणिपुरी नाच आहे.

धन्यवाद Happy मी जाम विसरून गेलो होतो Sad
वडिलांच्या आवडत्या गीतांपैकी एक "अजब तेरी कारीगरी रे करतार"
लहानपणी त्यांच्या तोंडी अनेकवेळा (आणि कधी तरी रेडिओवर) ऐकले आहे.

अरे व्वा, हा धागा छानच आहे Happy ही सर्व गीते नेटवरुन कुठे मिळतील (अर्थात फ्री Wink ) त्या लिन्का मिळाल्या तर अधिक बहार येईल.

सगळीच भक्तीगीते छान आहेत.
महेश धन्यवाद
पण माय बोलीतही छान भक्तीगीते आहेत.. त्यांची दे़खील एक यादी करता येईल.

केशवा माधवा, तुझ्या नामांत रे गोडवा

देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा
उघड दार देवा आता उघड दार देवा

मंदिरात अंतरात तोच नांदताहे
नाना देही नाना रूपी तुझा देव आहे. (धीरज ने लिहिलेलेच आहे)

त्या फुलांच्या गंधकोशी, सांग तू आहेस का?
त्या प्रकाशि तारकांच्या,ओतिसि तु तेज का? ( हे पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटणारे)

तिन्ही लोक आनंदाने भरुन गाउ दे रे
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावु दे रे - मंगेश पाडगावकर

फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार
विठ्ठला, तू वेडा कुंभार ! गीत - ग. दि, माडगूळकर

तुझे रुप चित्ती राहो, मुखी तुझे नाम
देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम

ऐरणिच्या देवा तुला, ठिणगि ठिणगि वाहु दे
आभाळागत माया तुजी, आम्हांवरी ऱ्हाउ दे

नको देवराया अंत आता पाहू । प्राण हा सर्वथा, जाऊ पाहे

खालील गीते यादीत सामिल करण्यात आली आहेत.

मुझी मे छुपकर मुझी से दूर, ये कैसा दस्तूर - (आशा, रफी / मदन मोहन / जेलर)
ओ शंकर मेरे कब होंगे दर्शन तेरे - (महेन्द्र कपूर / कल्याणजी आनंदजी / बैराग)
अजब तेरी कारीगरी रे करतार - (रफी, कृष्णा कल्ले / रवी / दस लाख)
शाम रंग रंगा रे हर पल मेरा रे - (येसूदास / भप्पी लाहिरी / अपने पराये)

परवा एका झी च्या कार्यक्रमा ( सा रे गा मा बहुधा) एका नवीन गायकाने "दत्तदर्शनला जायाचं.... आनंद पोटात माझ्या माइना" सुंदर म्हंटलं. हे बहुधा तो एक 'झुंज' चित्रपट होता जुना त्यातले असावे. मला आधी वाटले एकदम नवीन गाणे आहे. पण जुने दिसते.

हे ओरिजिनल दिसते. मस्त भजन आहे.
https://www.youtube.com/watch?v=XT8exj2BEw4

Pages