ओरिगामी

Submitted by अवल on 23 January, 2013 - 01:32

आपल्याला माहिती, येत असलेल्या ओरिगामीच्या वस्तू इथे टाकूयात.
जमलं तर त्यांची कृती ही.
लिहून/ चित्रातून/ व्हिडिओची लिंक देऊन.
सुरुवातीला चुकून हा वाहता धागा झाला होता. त्यामुळे काहींच्या कलाकृती वाहून गेल्या, क्षमस्व __/\__ कृपया आपल्या कलाकृती टाकाल?
काहींनी मस्त लिंक्सही दिल्या होत्या, त्याही पुन्हा द्याल?
तसदीबद्दल दिलगीर !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवल बर झाल हा धागा काढला Happy
नाहितरि माझ्याकडे तुझि लिंक ओपन होत नव्हती.आता यातिल पण काही लिंक ओपन होत नाही. Sad

माझा पहिलाच ओरिगामीचा प्रयत्न! पिंगु ह्यांनी दिलेल्या लिंकवरून केलेला हंस! आधी हंस वाटण्याऐवजी आग ओकणारा चायनिज ड्रॅगन वाटत होता! पण मग मान जरा नीट केली. Happy
20130127_165936.jpg

ऑफिसमधे प्रिंटरचे वेस्ट कागद पडले होते त्यापासून केला. पण तो कागद जरा जाड असल्याने तुकडे एकमेकांत अडकवायला आधी त्रास झाला पण मग एकदा बेस जमल्यावर सगळं पटकन झालं.
कागदाचे तुकडे करून घड्या घालायला जाम कंटाळा आला पण मग वाटलं it was worth! Happy

मस्त झालाय हंस !
आम्ही पाच कागदाचे पाच वेगळे भाग करुन विमान करत असू. आता घड्या आठवताहेत का ते बघावे लागेल.

एक विनंती :- 'हंसा'ची लिंक पुनः ईथे देता येईल का?...

बाकी ईतर दाखवलेल्या कलाकृती अप्रतीम...
Happy

एका पाच वर्षाच्या मित्राला ओरिगामी शिकवण्यासाठी पुस्तक शोधतेय. कुणी एखादं साधंसं, लहानग्यांना सहज जमेलसं पुस्तक सुचवू शकतं का?

धारा, मध्यंतरी स्ट्रँडच्या पुस्तक प्रदर्शनात खूप बेसीक ओरीगामीची पुस्तके बघितली. त्यांच्या वेबसाईट्वर (www.strandbookstall.com/) असायला हवीत त्यातली बरीचशी.

Pages