तडतड मिरची! (प्रायोगिक चिली पॉपर्स!)

Submitted by नीधप on 22 January, 2013 - 12:40
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

७-८ लांबुळक्या पांढरट हिरव्या मिरच्या (चवीला माइल्ड ते मध्यम तिखट)
ऑलिव्ह ऑइल (ऑ ऑ)

१/३ वाटी हरभर्‍याचे दाणे
१ छोटा टोमॅटो
१५-२० पुदिन्याची पाने
पेराएवढे आले किसून
१ मोठी लसूण पाकळी
tadtadmirachi-tayari-1.jpg

अर्धी वाटी पातळ पोहे
१ चमचा फ्लेक्ससीडस
१ चमचा भोपळ्याच्या बिया
२ लाल सुक्या मिरच्या
tadtadmirachi-tayari-2_0.jpg
चवीप्रमाणे मीठ

२ चीझ स्लाइस

क्रमवार पाककृती: 

१. अर्धी वाटी पातळ पोहे, १ चमचा फ्लेक्ससीडस, १ चमचा भोपळ्याच्या बिया, २ लाल सुक्या मिरच्या हे सगळे तव्यावर कोरडे भाजून घ्या.
२. जरा गार झाले की मिक्सरमधून भरड वाटून घ्या.
३. १/३ वाटी हरभर्‍याचे दाणे, १ छोटा टोमॅटो, १५-२० पुदिन्याची पाने, पेराएवढे आले किसून, १ मोठी लसूण पाकळी हे सगळे मिक्सरमधून भरड वाटून घ्या.
४. दोन्ही वाटणे चार थेंब ऑ ऑ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. याच वेळेला चवीनुसार मीठ घाला. पातळ पोहे असल्याने हे पटकन आळत जातं त्यामुळे मिरच्यांचे सिडींग आधी केल्यास बरे. नाहीतर थोडे पाणी घालून सारखे करायला हरकत नाही. सारणाची कन्सिस्टन्सी हवी. खूप पातळ नको.
tadtadmirachi-tayari-3.jpg

५. मिरच्या मध्यभागी चिरून बिया आणि शिरा काढून घ्या.
tadtadmirachi-tayari-4.jpg

६. चीझ स्लाइसच्या अर्ध्या सेमी जाडीच्या पट्ट्या कापून घ्या.
७. या पट्ट्या प्रत्येक अर्धमिरचीत एकेक अश्या भरा
tadtadmirachi-tayari-5.jpg

८. चीझच्या पट्टीनंतर सारण ओतप्रोत भरा.
tadtadmirachi-tayari-6.jpg

९. बेकिंग पॅन/ डिश ला ऑ ऑ चा हात पुसून घ्या.
१०. ओव्हन १७० डि से. ला २०-२५ मिनिटे चालवा.
tadtad-mirachi_0.jpg

११. खाण्याइतपत गार झाल्यावर हादडा Happy

वाढणी/प्रमाण: 
दोन तीन माणसांसाठी उत्तम स्टार्टर होऊ शकते.
अधिक टिपा: 

अनेक गोष्टींना अनेक सब्स्टिट्यूट करता येतील. करून बघा आणि कळवा Happy
दह्याचा बेस असलेल्या कुठल्याही चटणीबरोबर अफलातून लागेल.

माहितीचा स्रोत: 
हालापिनो पॉपर्सच्या नेटवरच्या रेस्पीज आणि माझे प्रयोग.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही.....तोंडाला पाणी सुटलं....या शनीवारी सुट्टी आहे तेव्हा करुन बघेन.....वाचता वाचता आणि पिक्स बघता बघता लाळ गळुन टेबल वर पडण्याच्या बेतात आली होती........दिसतय पण ऑसम.....:)

वॉव्..मस्त Happy
तव्यावर शॅलो फ्राय करता येईल का? तव्यावरच्या मि. जास्त खमंग लागतील असं वाटतय!

इथे वाचुन मी प्रयोग केला.
पण सारण बदलुन केला,मी मिरच्यांमधे सारणासाठी दोन कप पिझ्झा चीज,एक कप वाफवलेले स्वीट कॉर्न दाणे आणि तीन सॅशे डोमिनोचे पिझ्झा सोबत आलेले हर्ब मिक्स केले.
नी च्या रेसिपीनुसार स्लाईस चीज घालुन नंतर वरिल मिश्रण भरले.
थोड्या मिरच्या मैद्याच्या घोलात डिप केल्या,त्यातल्या थोड्या ब्रेड्क्रंप मधे घोळल्या न निम्म्या ग्रिल केल्या न उरलेल्या शॅलो फ्राय केल्या.
(थोडक्यात खालील combinations बनवले
१.मैदाघोल्+ब्रेडक्रंप कवर+शॅलो फ्राय
२.मैदाघोल+ब्रेडक्रंप कवर+ग्रिल
३.मैदाघोल+शॅलो फ्राय
४.मैदाघोल+ग्रिल
५. नो कवर+शॅलो फ्राय
६.नो कवर+ग्रिल
घरात सर्वांना खुप आवडले.

हाय हाय मिर्ची....उफ उफ मिर्ची !!!
नी ची आठवण काढून मी आज मेक्सिकन यालापिनो मिर्च्यांवर प्रयोग केला आला आहे. Happy

नीर्ज्या बाई धन्यवाद तुमास्नी Happy

सारणात पोह्यांबरोबर उकडलेला बटाटा मिक्स केलाय.
चण्यां ऐवजी मी हिरवे तूर दाणे वापरले, पुदिन्या ऐवजी कोथिंबिर, थोडा बारीक कापलेला कांदा आणि
लाल मिर्च्यां ऐवजी झणझणित रेशिम् पत्ती लाल तिखट वापरले म्हणून चिमुटभर साखर आणि आमचूर घातले.

chilli popers2 (640x480).jpg

यालापिनो थोड्या जाडसर होत्या म्हणून मी ओव्हन मध्ये ३०० वर २० मिनिटे भाजल्या.
एकुण जे काय बनले ते एकदम तोंपासू होते..
चिंचेच्या चटणी सोबत चट्टामट्टा करुन टाकले Lol

chilli popers_small.jpg

डॅफो, मिरची झकास.

(उच्चारावरून मला वाटले आता इथे कॉस्टच्यूम, कॉस्च्युम सुरु होणार की काय?)

आपण म्हणू तो उच्चार बरोबर .. नाही कोणाला कळला/पटला तर 'मोगामुसिया' गावात असेच म्हणतात सांगायचे. Happy
जस्ट किडींग...

Pages