तडतड मिरची! (प्रायोगिक चिली पॉपर्स!)

Submitted by नीधप on 22 January, 2013 - 12:40
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

७-८ लांबुळक्या पांढरट हिरव्या मिरच्या (चवीला माइल्ड ते मध्यम तिखट)
ऑलिव्ह ऑइल (ऑ ऑ)

१/३ वाटी हरभर्‍याचे दाणे
१ छोटा टोमॅटो
१५-२० पुदिन्याची पाने
पेराएवढे आले किसून
१ मोठी लसूण पाकळी
tadtadmirachi-tayari-1.jpg

अर्धी वाटी पातळ पोहे
१ चमचा फ्लेक्ससीडस
१ चमचा भोपळ्याच्या बिया
२ लाल सुक्या मिरच्या
tadtadmirachi-tayari-2_0.jpg
चवीप्रमाणे मीठ

२ चीझ स्लाइस

क्रमवार पाककृती: 

१. अर्धी वाटी पातळ पोहे, १ चमचा फ्लेक्ससीडस, १ चमचा भोपळ्याच्या बिया, २ लाल सुक्या मिरच्या हे सगळे तव्यावर कोरडे भाजून घ्या.
२. जरा गार झाले की मिक्सरमधून भरड वाटून घ्या.
३. १/३ वाटी हरभर्‍याचे दाणे, १ छोटा टोमॅटो, १५-२० पुदिन्याची पाने, पेराएवढे आले किसून, १ मोठी लसूण पाकळी हे सगळे मिक्सरमधून भरड वाटून घ्या.
४. दोन्ही वाटणे चार थेंब ऑ ऑ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. याच वेळेला चवीनुसार मीठ घाला. पातळ पोहे असल्याने हे पटकन आळत जातं त्यामुळे मिरच्यांचे सिडींग आधी केल्यास बरे. नाहीतर थोडे पाणी घालून सारखे करायला हरकत नाही. सारणाची कन्सिस्टन्सी हवी. खूप पातळ नको.
tadtadmirachi-tayari-3.jpg

५. मिरच्या मध्यभागी चिरून बिया आणि शिरा काढून घ्या.
tadtadmirachi-tayari-4.jpg

६. चीझ स्लाइसच्या अर्ध्या सेमी जाडीच्या पट्ट्या कापून घ्या.
७. या पट्ट्या प्रत्येक अर्धमिरचीत एकेक अश्या भरा
tadtadmirachi-tayari-5.jpg

८. चीझच्या पट्टीनंतर सारण ओतप्रोत भरा.
tadtadmirachi-tayari-6.jpg

९. बेकिंग पॅन/ डिश ला ऑ ऑ चा हात पुसून घ्या.
१०. ओव्हन १७० डि से. ला २०-२५ मिनिटे चालवा.
tadtad-mirachi_0.jpg

११. खाण्याइतपत गार झाल्यावर हादडा Happy

वाढणी/प्रमाण: 
दोन तीन माणसांसाठी उत्तम स्टार्टर होऊ शकते.
अधिक टिपा: 

अनेक गोष्टींना अनेक सब्स्टिट्यूट करता येतील. करून बघा आणि कळवा Happy
दह्याचा बेस असलेल्या कुठल्याही चटणीबरोबर अफलातून लागेल.

माहितीचा स्रोत: 
हालापिनो पॉपर्सच्या नेटवरच्या रेस्पीज आणि माझे प्रयोग.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम वेगळाच प्रकार. असं सारण कधीच पाहिलं नव्हतं ह्यापूर्वी. मिरचीच्या तळाशी चीजस्लाईस घालण्याची आयडिया भारीच आवडली. नक्की करुन बघणार Happy

सही दिसतायत! फोटो पण मस्त आलेत

(मी ज्या लिहल्या होत्या त्या याच मिरच्या वापरुन करता येतिल फक्त आमच्याकडच्या मिरच्या अजुन ला.न्ब आणी जाड्या असत्यात)

अगं हरभर्‍याचे दाणे आज मिळाले चक्क. मग सुचत गेलं. बेससाठी ब्रेडक्रम्स पेक्षा पातळ पोहे बारीक घेतले तर ते जास्त बरे... असं काय काय...

येस संपे.. हाय हाय मिरची.. उफ उफ मिरची! Happy

दह्यात चिमूटभर हिंग, चिमूटभर मिरपूड, चिमूटभर सैंधव, चिमूटभर सॅण्डविझ्झाचा सॅण्डविच मसाला असे घालून मस्त घोटायचे. आणि या मिरच्यांबरोबर डिप म्हणून घ्यायचे Happy

भारी आहे ही कृती. कमी तिखट मिरच्या मिळाल्या की करून बघता येईल.
Flax seeds च्या पुढे कंसात जवस लिहीशील का, सगळ्या साहित्याची नावे मराठीत आहेत तर याचे पण मराठी नाव असु दे.

मस्त !! फारच इनोव्हेटिव्ह आहे सारण. हल्ली ताजे हरभरे नाही मिळत. त्याला मटारच्या दाण्यांचा पर्याय वापरून करून बघणेत येईल.

रेसिपी मस्त लिहिली आहेस.
अगदी पुस्तकं असतात ना बेसिक फॉर डमीज तशी. Happy
अगदीच कुणी नवख्याने अजुन चुका करु नये म्हणुन फोटोत नावं दिली आहेत ते आवडलं. Happy

हा प्रकार लयी भारी लागत असणारच.

धन्स लोकहो.. एकदम जमून गेलेला प्रयोग होता हा..

अगदी पुस्तकं असतात ना बेसिक फॉर डमीज तशी <<<
कारण मला तश्या प्रकारे रेस्पी सांगितली असेल तरच जमते. फार फॅन्सी-श्मॅन्सी प्रकारे लिहिलेलं असेल किंवा मग अट्टल सुगरणीच्या भाषेत असेल तर झेपत नाही Happy

Pages