तडतड मिरची! (प्रायोगिक चिली पॉपर्स!)

Submitted by नीधप on 22 January, 2013 - 12:40
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

७-८ लांबुळक्या पांढरट हिरव्या मिरच्या (चवीला माइल्ड ते मध्यम तिखट)
ऑलिव्ह ऑइल (ऑ ऑ)

१/३ वाटी हरभर्‍याचे दाणे
१ छोटा टोमॅटो
१५-२० पुदिन्याची पाने
पेराएवढे आले किसून
१ मोठी लसूण पाकळी
tadtadmirachi-tayari-1.jpg

अर्धी वाटी पातळ पोहे
१ चमचा फ्लेक्ससीडस
१ चमचा भोपळ्याच्या बिया
२ लाल सुक्या मिरच्या
tadtadmirachi-tayari-2_0.jpg
चवीप्रमाणे मीठ

२ चीझ स्लाइस

क्रमवार पाककृती: 

१. अर्धी वाटी पातळ पोहे, १ चमचा फ्लेक्ससीडस, १ चमचा भोपळ्याच्या बिया, २ लाल सुक्या मिरच्या हे सगळे तव्यावर कोरडे भाजून घ्या.
२. जरा गार झाले की मिक्सरमधून भरड वाटून घ्या.
३. १/३ वाटी हरभर्‍याचे दाणे, १ छोटा टोमॅटो, १५-२० पुदिन्याची पाने, पेराएवढे आले किसून, १ मोठी लसूण पाकळी हे सगळे मिक्सरमधून भरड वाटून घ्या.
४. दोन्ही वाटणे चार थेंब ऑ ऑ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. याच वेळेला चवीनुसार मीठ घाला. पातळ पोहे असल्याने हे पटकन आळत जातं त्यामुळे मिरच्यांचे सिडींग आधी केल्यास बरे. नाहीतर थोडे पाणी घालून सारखे करायला हरकत नाही. सारणाची कन्सिस्टन्सी हवी. खूप पातळ नको.
tadtadmirachi-tayari-3.jpg

५. मिरच्या मध्यभागी चिरून बिया आणि शिरा काढून घ्या.
tadtadmirachi-tayari-4.jpg

६. चीझ स्लाइसच्या अर्ध्या सेमी जाडीच्या पट्ट्या कापून घ्या.
७. या पट्ट्या प्रत्येक अर्धमिरचीत एकेक अश्या भरा
tadtadmirachi-tayari-5.jpg

८. चीझच्या पट्टीनंतर सारण ओतप्रोत भरा.
tadtadmirachi-tayari-6.jpg

९. बेकिंग पॅन/ डिश ला ऑ ऑ चा हात पुसून घ्या.
१०. ओव्हन १७० डि से. ला २०-२५ मिनिटे चालवा.
tadtad-mirachi_0.jpg

११. खाण्याइतपत गार झाल्यावर हादडा Happy

वाढणी/प्रमाण: 
दोन तीन माणसांसाठी उत्तम स्टार्टर होऊ शकते.
अधिक टिपा: 

अनेक गोष्टींना अनेक सब्स्टिट्यूट करता येतील. करून बघा आणि कळवा Happy
दह्याचा बेस असलेल्या कुठल्याही चटणीबरोबर अफलातून लागेल.

माहितीचा स्रोत: 
हालापिनो पॉपर्सच्या नेटवरच्या रेस्पीज आणि माझे प्रयोग.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नीधप,खूप्पच छान..मस्त रेसिपी आहे.चीज स्लाइस मुळे छान चव येत असणार .भरलेले मिश्रण तर मस्त कोम्बिनेशन आहे.मिरची बरोबर दुसरीकडे ही वापरता येईल--भेंडी,तोंडली,बेबी कॉर्न ,बेबी पोटेटो

मिरची बरोबर दुसरीकडे ही वापरता येईल--भेंडी,तोंडली,बेबी कॉर्न ,बेबी पोटेटो
>> टोमॅटो वापरून्ही करता येइल का? Uhoh

मी म्हणलं ना तसाही हा प्रयोग असल्याने कुठलिही गोष्ट सिमिलर वस्तूने सब्स्टिट्युट करू शकता.
मटार हे हरभर्‍यांपेक्षा सहज मिळणारे आहेत त्यामुळे तेच केलं जाईल माझंही सीझन नसताना. Happy

ही अशी व्हेरिएशन्स करून बघा आणि मला कळवा Happy

छान कल्पक प्रकार.

गोव्यामधे आणखी एका प्रकारच्या मिरच्या मिळत. पोपटी रंगाच्या, टोकेरी पण जाड नाहीत. चवीला फार छान असत त्या. बहुतेक कर्नाटकातून येत होत्या. ( मुंबईत बघितल्या नाहीत ) त्याचा असा प्रकार चांगला लागेल.

भारी रेसिपि. आणि मिरचिइतकाच तडका लिखाणाला पण. ओतप्रोत भरा, अर्धमिरची वगैरे वाचून जाम मजा आलि. मी केल्याच तर हे सगळं आठवेल त्यावेळी. Happy

कार्व्ह न करता "हा मसाला " वरुन टाकुन मंद आचेवर झाकणात पाणी ठेवुन भाजी शिजवायची.हि. चण्याची चव मस्त येईल

उफ उफ मिरची....एकदम तोंपासु फोटो टाकलेत गं आणि डिटेलवार रेसिपी. अगदी चविष्ट लागत असणार हे प्रकरण.

अतिसुंदर दिसताहेत. इथुनच उचलुन खाय्ची सोय असती तर बरे झाले असते.. काहीतरी चमचमीत खावेसे वाटतेय (ह्या कंटाळावाण्य संध्याकाळि हाफिसात बसुन कंटाळलेय)

Pages