सिंगापुरातल्या आमच्या एका बंगाली मैत्रिणीचा नवरा कोणे एके काळी आमच्या खानदेशात कामानिमित्त गेला होता.
इथे ओळख झाली अन त्यांना कळले की "मी खानदेशी" तर त्यादिवशीच धुळ्याच्या संगम लस्सीची अन जळगांवच्या आमच्या प्रभातच्या बदाम मिल्क शेकची तोंड दुखेपर्यंत तारीफ करुन झाली.
गेल्या आठवड्यात त्यांच्यासाठी आणि आमच्या इतर मित्रांसाठी संगम लस्सी बनवली होती. फोटो काढता आले नाही क्षमस्व. पुन्हा केली तर नक्की डकवेन. किंवा तुम्ही कुणी ट्राय केली तर जरुर टाका.
तर सादर आहे संगम लस्सी...
लस्सी साठी :
दही - पाव किलो - २५० ग्रॅम
साखर - अर्धी वाटी
मीठ - एक छोटा चमचा
आणि अर्थातच पाणी - लस्सी घट्टच राहिल इतपत.
बर्फ - प्रत्येक ग्लासला एक दोन क्युब्ज
आईस्क्रीम साठी:
फूल क्रीम दूध : १ लिटर
साखर : १ वाटी
कॉर्न फ्लोअर : १ मोठा चमचा
हेवी क्रीम : १- १.५ वाटी
अर्धी वाटी दूध उकळुन थंड केलेले : कॉर्न्फ्लोअर विरघळुन घेण्यासाठी
लस्सी :
१. प्रथम घट्ट दही रवीने व्यवस्थित घुसळुन घ्यायचे. पाणी मुळीच टाकायचे नाही
२. आता त्यात साखर आणि मीठ मिसळुन पुन्हा घुसळावे. दह्याला अगदी मऊसुत पोत आला की ब्लेंडर/ मिक्सर मध्ये पुन्हा थोडे फिरवुन घ्यावे.
३. आता त्यात हळुहळू पाणी मिक्स करा. मिल्कशेक सारखी कन्सिस्टन्सी हवी.
४. लस्सी तयार आहे. ती थंड होण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवा.
आईस्क्रीम :
१. एक लिटर दूध मंद आचेवर उकळत ठेवणे.
२. सतत हलवत रहा जेणेकरुन तळाला चिकटणार नाही. आता यात साखर घाला. ढवळत रहा.
३. अर्धी वाटी दूध, जे आपण आधीच वेगळे काढले आहे त्यात कॉर्नफ्लोअर मिक्स करुन घ्या. गुठळ्या रहायला नको.
४. उकळत ठेवलेले दूध साधारण पाऊण लिटर किंवा त्यापेक्षा किंचित कमी झाले की गॅस बंद करुन त्यात कॉर्नफ्लोअर विरघळलेले दूध हळुहळु ओता. एका हाताने ढवळणे सुरु ठेवा.
५. गॅस पुन्हा मंद आचेवर सुरु करुन १-२ मिनिट सुरु ठेवा.
६. गॅस बंद करुन दूध पूर्ण थंड होऊ द्या.
७. आता हे दूध फ्रीजर मध्ये ठेवा.
८. पूर्ण सेट झाल्यानतर मोठे मोठे तुकडे करा.
९. आता हे तुकडे पुन्हा ब्लेंडर मध्ये टाका , फिरवा.
१०. आता त्यात क्रीम टाका. पुन्हा फिरवा.
११. इथे तुम्ही चव चाखुन बघु शकता. साखर कमी वाटल्यास साखर/ मध टाकुन पुन्हा ब्लेंडर फिरवा.
१२. मिश्रण आता दुप्पट झाल्यासारखे वाटेल एवढा वेळ ब्लेंडर मध्ये फिरवा. मिश्रण फ्लफी होण्यासाठी इतके अधिक क्रीम घालाल तितके चांगले.
१३. आता हे मिश्रण पुन्हा फ्रीजर मध्ये ठेवायचे आहे.
१४. सेट झाले की बाहेर काढा. आईस्क्रीम तय्यार !
संगम लस्सी :
लस्सी ग्लास मध्ये ओता.
त्यात एक दोन आईस क्युब्ज टाका
वरुन एक भला मोठा आईस्क्रीमचा गोळा टाका.
अमिताभ बच्चन चमचा (लंबु चमचा) ग्लासमध्ये ठेवा.
आस्वाद घ्या.
आगामी आकर्षण : जळगावच्या प्रभातचा बदाम मिल्क शेक 
लस्सी घट्ट हवी. पंजाबी लस्सी प्रमाणे पातळ नको. त्यामुळे पाणी बेताने घाला.
मिश्रण इतके जास्त फ्लफी तितके जास्त आईस्क्रीम मऊ अन टेस्टी. कॅलरीज चा विचार करत नसाल तर क्रीमचे प्रमाण वाढवल्यास हरकत नाही. त्याच प्रमाणात साखरही वाढवा.
आईस्क्रीम मध्ये इसेन्स, फ्रुट पल्प , चॉकलेट/ कोको काहीही घालु नये. मूळ संगम लस्सी मध्ये मलई आईस्कीमच असते. कुठलाही फ्लेवर एवढेच काय अगदी ड्राय फ्रुट्स सुद्धा नसतात्. त्यामुळे अशी नटवलेली संगम लस्सी कशी लागेल महिती नाही. 
नुसतीच लस्सी (आईस्क्रीम न टाकता) संगम लस्सी नसते. 
वर लिहिलेला २० मिनिटे वेळ लस्सी अन आईस्क्रीम तयार झाल्यानंतरचा आहे.
पूर्ण वेळ सांगायचा तर एक आख्खा दिवस लागतो. पण ग्लास तोंडाला लावल्यावर खरे समाधान मिळेल.
शैलजा सुमेधा खरय बिना
शैलजा
सुमेधा खरय बिना फोटोच्या रेसिपीत बिलकुल मजा येत नाही. सर्व्ह करतांना फोटो काढणा असे ठरवले होते. पण लक्षात राहिले नाही. आता पुढच्या वेळी नक्की.
अहाहा काय याद करून दिलिस
अहाहा काय याद करून दिलिस गं.... स्स्स्स
पण आम्ही फक्त सुट्टीपुरते जळगावात जायचो, तेंव्हा ह्या तोंपासु प्रकाराला लस्सी आईसक्रीम म्हणायचो.
:बदाम मिल्कशेक ची वाट बघणारी बाहुली:
माझा लेक मुळीच बदाम खात नाही. तुझी रेसिपी आवडली (त्याला) तर तुला मी अर्धा किलो बदाम देईन गिफ्ट म्हणुन
वॉव प्रिंसेस! मी पण हे कॉम्बो
वॉव प्रिंसेस! मी पण हे कॉम्बो प्रथमच बघतेय, लस्सी आणि आईस्क्रीम!
ते आईस्क्रीम मस्त सॉफ्ट होतं का?तसं असेल तरच छान लागेल ना.
सॉफ्ट लस्सी बरोबर सॉफ्ट आईस्क्रीम!
लस्सी जैसी कोई नहीं. मस्त
लस्सी जैसी कोई नहीं.
मस्त कृती. करके देखणार.
आमच्या नगरात एका हॉटेलाबाहेर
आमच्या नगरात एका हॉटेलाबाहेर नेहेमी मेनूचे बोर्ड असत. काळ्या फळ्यावर खडूने लिहीत.
उन्हाळा आला की एक ठरलेला मेनू आणि अर्थातच बोर्डवर लिखाणः
"आला उन्हाळा आला.................आहाहा लश्शी!"
आम्ही लस्सी असं नुस्तं म्हणतच नाही. आहाहा लश्शी असंच म्हणतो!
मानुषी ताई हे विसरलो होतो मी
मानुषी ताई हे विसरलो होतो मी लश्शी
चला दुर्गासींग गटग करुयात
चला दुर्गासींग गटग करुयात
तोंपासु......................
तोंपासु...............................
स्लर्प
आशु२९, हाहाहा.. आजकालच्या
आशु२९, हाहाहा.. आजकालच्या पोरांची नो ग्यारंटी . पण घरातला मोठा मुलगा नक्की खाईल याचे १००% हमी


माधवी , हो सॉफ्ट असते आईस्क्रीम. त्यामुळेच छान लागते.
नंदिनी, कळव कशी वाटली ते.
मानुषीताई, लेकाच्या लग्नाबद्दल लश्शी पार्टी देणार ना
डॅफो
Pages