घरचे घर!

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

मुलीच्या शाळेतल्या स्नेहसंम्मेलनात शिवाजीच्या आयुष्यातील ठळक घटना दाखवणार आहेत. त्यात प्रत्येक इयत्तेतल्या मुलांनी शिवाजीच्या आयुष्यातला काही भाग रंगमंचावर सादर करायचा, अशी संकल्पना आहे. त्याकरता रंगमंचावर मांडण्यासाठी बाईंनी एक घर करून द्याल का असे विचारले. आणि शाळेतले शिक्षक विचारतायत म्हटल्यावर काय विचारतायत ते मेंदूत घुसायच्या आधीच मानेनं 'हो हो' केलं.

आणि हे घर बनवलं. (म्हणजे ते हे असं बनलंय..)

साहित्य:

पुठ्ठे :
७२ सेमी x ४८ सेमी (रंग पांढरा, नग दोन)
३६ सेमी x २४ सेमी (रंग पांढरा, नग दोन)
तळाशी ठेवायला एक खाका पुठ्ठा

बांबूच्या कांबी

चिकटपट्टी, फेव्हीकॉल, दोरा

रंगीत कागद, कात्री

रंग
कृती:

१. ७२ सेमी x ४८ सेमी दोन्ही पुठ्ठे कापून ४८ सेमी x ४८ सेमीचे दोन चौरस काढले. कापून निघालेले आयत छपरासाठी वापरले.

२. त्यांना शाडूचा/कौलांचा फील येण्यासाठी रंग दिला.

३. बांबूच्या कांबींपासून चाकूने चोया काढल्या.

४. पुढच्या बाजूच्या पुठ्ठ्यावर चौकट काढून घेतली.

५. रंगीत कागद कापून चौकटीच्या तोरणाकरता लहान लहान पाने कापली. आणि चौकटीवर तोरण चिटकवून घेतले.

६. आता घराच्या पुढच्या भिंतीच्या वरच्या कडेला पुढच्या बाजूच्या छप्पराची कडा चिटकवली.

७. नुसती चिकटपट्टी चिटकवून मजबूती यायची नाही म्हणून चिकटपट्टीखाली बांबूच्या दोन-दोन चोया ठेवल्या आणि वरून चिकटपट्टी चिटकवली.

८. अशाप्रकारे घराच्या सगळ्या बाजू योग्य त्या ठिकाणी ठेऊन बांबूच्या चोयांसह चिकटपट्टीने जोडून घेतल्या.

९. छताच्या वरच्या जोडणीवर फेव्हीकॉल भरले आणि अध्ये-मध्ये चिकटपट्टीचे जोड दिले.

१०. त्यावर लाल रंगाची कागदी पट्टी चिटकवली.

११. भिंतींवर स्केचपेनने दर्जा काढल्या. आणि झाले घर तयार!

विषय: 
प्रकार: 

त्यातल्या एका दाराला बसवलेली असते.>> ओके. पण मग दरवाज्याची कडी त्या नक्षीवरून जायला हवी ना?
सॉरी, मी फारच चिकित्सा करतेय. व्हेरी सॉरी!

गजानन, घर फार सुरेख झालय.. Happy

दरवाजा लावल्यावर नक्षीच्या उभ्या पट्टीचं प्रयोजन काय ते समजलं नाही. >>> जुन्या वाड्यांचे वगैरे खूप मोठे मोठे दरवाजे असेच असतात की मंजू आणि आपल्या घरातलं कपड्यांचं कपाट असतं त्यातही काही अशी पट्टीवाली कपाटं असतातच की ग.. माझ्याकडे आहे तस कपाट..

Pages