घरचे घर!

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

मुलीच्या शाळेतल्या स्नेहसंम्मेलनात शिवाजीच्या आयुष्यातील ठळक घटना दाखवणार आहेत. त्यात प्रत्येक इयत्तेतल्या मुलांनी शिवाजीच्या आयुष्यातला काही भाग रंगमंचावर सादर करायचा, अशी संकल्पना आहे. त्याकरता रंगमंचावर मांडण्यासाठी बाईंनी एक घर करून द्याल का असे विचारले. आणि शाळेतले शिक्षक विचारतायत म्हटल्यावर काय विचारतायत ते मेंदूत घुसायच्या आधीच मानेनं 'हो हो' केलं.

आणि हे घर बनवलं. (म्हणजे ते हे असं बनलंय..)

साहित्य:

पुठ्ठे :
७२ सेमी x ४८ सेमी (रंग पांढरा, नग दोन)
३६ सेमी x २४ सेमी (रंग पांढरा, नग दोन)
तळाशी ठेवायला एक खाका पुठ्ठा

बांबूच्या कांबी

चिकटपट्टी, फेव्हीकॉल, दोरा

रंगीत कागद, कात्री

रंग
कृती:

१. ७२ सेमी x ४८ सेमी दोन्ही पुठ्ठे कापून ४८ सेमी x ४८ सेमीचे दोन चौरस काढले. कापून निघालेले आयत छपरासाठी वापरले.

२. त्यांना शाडूचा/कौलांचा फील येण्यासाठी रंग दिला.

३. बांबूच्या कांबींपासून चाकूने चोया काढल्या.

४. पुढच्या बाजूच्या पुठ्ठ्यावर चौकट काढून घेतली.

५. रंगीत कागद कापून चौकटीच्या तोरणाकरता लहान लहान पाने कापली. आणि चौकटीवर तोरण चिटकवून घेतले.

६. आता घराच्या पुढच्या भिंतीच्या वरच्या कडेला पुढच्या बाजूच्या छप्पराची कडा चिटकवली.

७. नुसती चिकटपट्टी चिटकवून मजबूती यायची नाही म्हणून चिकटपट्टीखाली बांबूच्या दोन-दोन चोया ठेवल्या आणि वरून चिकटपट्टी चिटकवली.

८. अशाप्रकारे घराच्या सगळ्या बाजू योग्य त्या ठिकाणी ठेऊन बांबूच्या चोयांसह चिकटपट्टीने जोडून घेतल्या.

९. छताच्या वरच्या जोडणीवर फेव्हीकॉल भरले आणि अध्ये-मध्ये चिकटपट्टीचे जोड दिले.

१०. त्यावर लाल रंगाची कागदी पट्टी चिटकवली.

११. भिंतींवर स्केचपेनने दर्जा काढल्या. आणि झाले घर तयार!

विषय: 
प्रकार: 

मस्त झालंय घर. एकदम सुबक.
ज्या पालकांमध्ये कलागुण नाहीत त्यांच्या डोक्याची भट्टी

ऊत्तम! यात मुल जावुन खेळु श्कतील का? मुव्हि,न्ग चे अनेक खोके आहेत, मुलिला सहभागी करुन अस काहितरी बनवल तर मजा येईल.. विकतचे अनेक प्ले हाउस आनी टेन्ट आहेत पण घरी बनवायची मजा वेगळिच शेवटी..

सिंडरेला, सायो, शूम्पी, बिल्वा, rmd, डॅफो, रैना, प्राजक्ता, झकास, शैलजा, अल्पना, रुणूझुणू, धन्यवाद प्रतिसादाबद्दल!

प्राजक्ता, याची एकूण उंची दोन-सव्वादोन फुट झाली असेल. म्हणजे मुलांना आत जाऊन खेळणे अशक्यच. Happy

सुशांत, विपु पाहिली. उत्तर लिहिलेय. धन्यवाद.

छान झाले आहे घर Happy हे अख्खे घरच उचलून घेऊन गेलास का कार्यक्रमाच्या ठिकाणी? की तिकडे जाऊन जोडलेस?

दरवाज्याच्या कडीची कल्पना काही समजली नाही. कडी लावलेली आहे का - म्हणजे दरवाजा बंद आहे का? दरवाजा अगदी सुबक काढला आहेस. पण माझ्यामते बहुतेक कडी उलटी काढली आहे. भिंतीच्या प्रमाणात दरवाजा छोटा वाटतोय.

मंजू, घरीच जोडलेय. अजून शाळेत नेलेले नाही. उद्या परवा टॅक्सीतून नेऊ. Happy

आणि बरोबर, एकूण उंचीच्या मानाने दरवाजा थोडा लहान झालाय. (खरेतर घराची रुंदी वाढवावी असे खूप वाटत होते कारण घराची उंची यापेक्षा कमी करता येणार नव्हती. पण नेण्या-आणण्याच्या दृष्टीने अवघड वाटत होते.) दरवाजा बंद आहे आणि कडी लावलेली आहे. कडी उलटी का बरे वाटली तुला?

कडी उलटी का बरे वाटली तुला?>> माझ्या डोक्यात कडीचं चित्र म्हणजे 'ए'ची आरशातली प्रतिमा Happy
दरवाजा लावल्यावर नक्षीच्या उभ्या पट्टीचं प्रयोजन काय ते समजलं नाही.

इंद्रा, आरती, पूनम, ललिता, माधुरी, अरुंधती, मिलिंदा, प्रिति, अनेक धन्यवाद. Happy

मंजू, उलटा 'ए' <<< मग तसेच असणार! Proud
दरवाजा लावल्यावर नक्षीच्या उभ्या पट्टीचं प्रयोजन काय ते समजलं नाही. <<< अग ती उभी पट्टी वेगळी नाही. त्यातल्या एका दाराला बसवलेली असते. (या घराच्या बाबतीत ती उजव्या दाराची आहे.) असे दरवाजे पाहिले नाहीस का? थांब, मला फोटो मिळाला तर टाकतो.

Pages