गोड...काटा रुते कुणाला...!?

Submitted by अत्रुप्त आत्मा on 14 January, 2013 - 00:15

हम्मम्म.......... का...य?,शीर्षकावरून अंदाज आला असेलच ना..??? काय म्हणताय??? गाणं........? ''छो हो...! ते ऐकण्यापलिकडे माझा आणी त्याचा संमंधही नाहिये हो...'' मग गोड आणी काटा म्हणजे नवकाव्य किंवा पाककृती वगैरे........? मग मी म्हणेन-''राम राम राम...आपला आणी त्याचाही काहि संमंध नाहि हो....'' मग आहे तरी काय???'' ---

हांsssssssss

अत्ता खर्री मज्जा येणार सांगायला....! अवो,आज संक्रांत आहे ना...!, मंग ह्यो गोड...काटा म्हणजे,आपला साखर/तीळ हलव्याचा काटा हो......! हां,अता संक्रांतीला तस बरेच काटे न वरा आणी काय को???,,,आपलं सॉरी...ते..हे.. बाय को...(तरी गॅप पडली...)तर..तसे बरेच काटे, नवरा आणी बायको ...यांच्यात यायचे.
पूर्वी काळ्या साड्या(अत्यंत उठावदार काळ्या शेड्स निवडून) आणल्या/घेतल्या जायच्या... हल्ली काय काय होत असावं बरं.......??? आंम्ही काय सांगणार.आमचं ते क्षेत्र (म्हणजे विवाहित असण्याचं Wink ) निर्माणच नाही झालेलं अजून ;-).तरी सामान्यतः काहि ना काहि खरेदीच्या निमित्तानी हे काटे उभयता येत असणारच.नवविवाहितां चे प्राचीन हळदी/कुंकू समारंभ आता इतर रुपानी साजरे होत असणार.काळ भराभर बदलला,तरी मूल्य माणसाबरोबरच बदलतात...असो.

मला ना ह्या काटेरी हलव्याबद्दल लहान पणा पासून कुतुहल होतं....एकतर खाण्याचीच गोष्ट करायची झाली तर,ह्या काटेरी हलव्यात खाण्यापेक्षा तो शक्यतो दुसर्‍यांना देऊन,त्याबदल्यात तिळगुळाचे लाडू/वड्या या मिळविण्याकडे कल असायचा. आणी आंम्ही अजुन येक बेरकीपणा करायचो.संक्रांतिच्या दिवशी संध्याकळी १/२ रुपायची ही हलव्याची पुडी,आमच्या ग्यांगमधे प्रत्येकी १ घेतली जायची.आणी २ रुपायचं साधारण किलोभर खडेमीठ सगळ्यांमधे वाटून दिलं जायचं...गल्लीत अंधार पडला की समोरच्याकडून तिळगुळ/हलवा असं जे काहि मिळेल ते उकळायचं आणी देणारा किंवा री मर्जीतली नसली की अंधारात परत हलव्याच्या जागी खडेमीठ टेकवायचं...आणी सटकायचं.त्यामुळे ते खडेमीठ खरोखर ''जिरवणे'' ह्या एकाच कामासाठी तेंव्हा वापरलं जायचं. त्यामुळे माझ्यातरी या हलव्याबद्दलच्या अठवणी अगदी मोहक वगैरे नसल्या,तरी अगदीच काटेरीपण नाहियेत. तरी वर मी म्हटलेलं काट्यांबद्दलच कुतुहल होतच.आणी या वर्षी ते कुतुहल सुटायचा योग आला.

पर्वा मंडई मधे विड्याच्या पानांचा गाळयातून पानं घेतली आणी मधल्या गोलाकडे जाणार्‍या पायर्‍यांजवळचा १ तास करंट देणारा आमचा ''कट्टर च्या...'' मारला आणी बाहेर पडलो..तर सहजच लक्ष एका जुन्या गुडदाणीच्या गाडिकडे गेलं.कच्च्या अखंड शेंगदाण्याची साखरेतली चिक्की इथे अनेकदा घेतलेली. आज तिच्याबरोबर कडेलाच हि हलव्याची पाकिटं रचलेली पाहिली.आणी पावलं तिकडे सरकली.आमची पेटंट पावशेर साखर/दाण्याची चिक्की घेतली आणी त्या वयस्कर गुडदाणीवाल्यांना (श्री.ढेंबे) विचारलच मी, ''काय हो ? हा काटेरी हलवा,साधा आणी रंगीत करताना...रंग नंतर मारतात की पाक करताना त्यात टाकतात?'' गुडदाणीवाल्या अजोबांनी माझ्याकडे पाहिलं,आणी,''चौकस गिर्‍हाइक आलं...'' अश्या नजेरेनी माझ्याकडे बघुन त्यांच्या कसबा पेठेतल्या गुडदाणी/काटेरी हलवा/राजगिरालाडू+वड्या इत्यादी प्रकार करण्याच्या कारखान्याचं व्हिजिटिंग कार्ड माझ्या हतात ठेवलं. मग काय इचारता...मी लगेच पुढच्या एका दिवशी न्यूज रिपोर्टरच्या वेशात नसलो,तरी त्या आवेशात तडक तिकडे निघालोच...मग तो कसब्यातला कारखाना,आणी त्या अजोबांचा व्यवसाय पुढे हिमतिनी चालवणारा त्यांचा मुलगा (श्री.महेश ढेंबे) यांना गाठलं,नमस्कार चमत्कार जाहले...आणी त्यांच्या कडून एकंदर या व्यवसायाची जमेल तितकी माहिती,या हलवा बनविण्याच्या पूर्वीच्या आणी चालू प्रोसेस सकट त्यांच्याकडून मिळवली.त्याही माणसानी मला अगत्यानी माहितिही दिली आणी आत कारखान्यातले फोटोही...! (रिपोर्टरचं बेअरिंगच आपण तसं पकडलवतं भें.....डी!!! Wink )

चला तर अता आपण पाहू ह्या काटेरी हलव्याची छोट्टिशी प्रोसेस... पूर्वी हे काम कोळश्याची छोटि शेगडी घेऊन केलं जायचं...आधी लालबुंद कोळश्याच्या चुल/शेगडीवर एक पितळ्याची परात ठेवायची.नंतर ती चांगली तापली की त्यावर बिनसाली/पांढरे तीळ टाकायचे मग ते तडतडायला/उडायला लागले की नंतर त्यात साखरेचा हळूहळू दाट करत अणलेला पाक एका बाजूनी हळूहळू सोडायचा आणी त्याच वेळी पसरट हतानी वरच्यावर तो पाक तीळांभोवती लगडत असताना हलवायचा. हां...!!! फार पटकन होणारी गोष्ट वाटते की नै..? पण तसं नाय हां.यातलं तंत्र फार डेंजर हाय...
१)आधी त्या पाकात तयार होताना काटा चांगला पडावा आणी हलवा शुभ्ररंगाचा व्हावा म्हणून लिंबू सत्व आणी हायड्रो पावडर या २ गोष्टी मिसळणे हे पहिलं तंत्र.
२)आणी नंतर तीळ जळू न देता एका वेळी परातिभोवती चार/चार बायका हात भाजत भाजत आळीपाळीनी हा हलवा चांगला कडक काटेरी होई पर्यंत करत असत...हे दुसरं तंत्र....
ही दोन यातली महत्वाची तंत्र जमली तर तयार होतो तो हलवा,नायतर मात्र उरतो,तो काटाच....! अता ही जुनी पद्धत बाद झाली आहे.कारण तापत्या तांब्याच्या गोलाकार भट्टीत हा खेळ एकत्रच होतो... कसा ते बघू आपण. (ही भट्टी बनवण्याची कल्पना-महेश ढेंबे यांच्या वडलांचीच...)

सर्वात अधी मोठ्ठ्या गॅस चुल्हाण्यावर पाक करायला घेतात
https://lh4.googleusercontent.com/-iIRsz-97LpM/UO_pr2NRpzI/AAAAAAAAB54/jl1n2bUSHnQ/s640/DSCF0245.JPG
साखर विरघळेपर्यंत पाक करण्याची क्रीया मात्र संथ असते,दमाचं काम हाय त्ये...!
https://lh6.googleusercontent.com/--XA3zC07tJI/UO_sQhIcyWI/AAAAAAAAB6w/884-X_nu39U/s640/DSCF0252.JPG
मग पाक पहिली तार धरत आला की त्यात लिंबू सत्व आणी हायड्रोपावडर टाकतात...
मग बघा पाक कसा ट्रान्स्फरंट पा.........क होतो ते.
https://lh5.googleusercontent.com/-9_nUq1DyNr4/UO_rr2Xm6vI/AAAAAAAAB6o/klvLinx5FYU/s640/DSCF0251.JPG
अता आपण त्या महाकाय काँक्रीट मिक्सर सारख्या-कढईचं दर्शन घेऊ...
https://lh4.googleusercontent.com/-KZSAcZmsi14/UO_qxCvcY2I/AAAAAAAAB6Y/CPHlwWYIIvc/s640/DSCF0249.JPG
केव्हढी आहे ना...!? मी पण बसेन आत Wink
https://lh6.googleusercontent.com/-7BTLvJD2sSI/UO_rIvlwR2I/AAAAAAAAB6g/mBmXsoMWflI/s640/DSCF0250.JPGhttps://lh6.googleusercontent.com/-xxFN9SozsDU/UO_s6wfLrqI/AAAAAAAAB7A/ew8OKNj1idk/s640/DSCF0254.JPG
ह्या फिरत्या कढईच्या खाली मोठ्ठा गॅस बर्नर लागलेला आहे...
https://lh6.googleusercontent.com/-6JlwCms0wEI/UO_qfr0AKnI/AAAAAAAAB6Q/5QmVLisUgdU/s640/DSCF0248.JPG
नंतर तापलेल्या कढईत तीळ टाकून हा असा पाक त्यात ''लावला'' जातो.
https://lh5.googleusercontent.com/-z393lxyeNC4/UO_svmEzDwI/AAAAAAAAB64/v6FpgoVt_dg/s640/DSCF0253.JPG
आणी मग जरा वेळानी तीळावर कोटींग होत होत तयार होतो. तो हा अस्सा पांढरा शुभ्र...काटेरी हलवा
https://lh5.googleusercontent.com/-JK2VxHPOm08/UO_p7ov_gAI/AAAAAAAAB6A/fCMW1MuEasY/s640/DSCF0246.JPG
अता या हलव्या पासून तयार होणारे हार/दागिने पहा....
https://lh6.googleusercontent.com/-Zt3psYtLDlo/UO_wCPcC2JI/AAAAAAAAB8U/2oSRpI0xtl8/s640/DSCF0258.JPGhttps://lh6.googleusercontent.com/-mJfPZAeaqj8/UPL2RlKNydI/AAAAAAAAB9Y/UGttkimXZhU/s640/Photo-0058.jpghttps://lh4.googleusercontent.com/-LA6iYI_cOs4/UPL2iBAhoQI/AAAAAAAAB9g/XTGpMASqASk/s512/Photo-0059.jpg
शिवाय इथे होणारे तिळ गुळाचे लाडू
https://lh6.googleusercontent.com/-x-5XXbCFvqE/UO_pJ6oLvaI/AAAAAAAAB5o/htzN65DJnnA/s640/DSCF0243.JPG
आणी हा..........रंगीत हलवा.
https://lh5.googleusercontent.com/-imoz9odLObs/UPL3NZuB07I/AAAAAAAAB9o/0CqNEXWc6J0/s512/Photo-0061.jpg
गोडाऊन मधे लागलाय ...मार्केटला जायला...
https://lh4.googleusercontent.com/-pzVZfRv9hgM/UO_u_c3zdVI/AAAAAAAAB8E/DaCxd2flEGo/s640/DSCF0256.JPGhttps://lh6.googleusercontent.com/-ejLB10h_eu0/UO_wRvCQJtI/AAAAAAAAB8c/adc2SPzms5g/s640/DSCF0260.JPG
असा हा गोडवा वाढवणारा तिळगूळ आणी काटेरी हलवा. दिवसेंदिवस महागाईचा काटेरी मुकुट घालून आपल्याकडे येत असला,तरी तोंडात टाकल्यावर जो पर्यंत गोड लागतो आहे,तो पर्यंत त्या(महागाई)चा ''काटा'' सहन करायला हरकत नाही....नाही का??? Happy
https://lh6.googleusercontent.com/-nCN_TW3FJMo/UPL3nwksQBI/AAAAAAAAB9w/dnbTviy0AU8/s512/Photo-0062.jpg
=========================================================================

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@सस्मित -पण ते रंगीत हलवे कसे करतात???>>> तयार पांढर्‍या हलव्याला, खायचा रंग पाण्यात घालुन,त्यातुन काढलं जातं...रंग डायरेक्ट पाकात घालत नाहीत.

ओके Happy

मस्त आणि भारीच इंटरेस्टिंग माहिती. धन्यवाद. प्रचि छानच आहेत.

श्री. ढेंब्यांचही कौतुक. तुमचं कुतुहल जाणून त्यांनी इतक्या सहजपणे तुम्हाला कारखान्याची वाट दाखवली.

<< भट्टी बनवण्याची कल्पना-महेश ढेंबे यांच्या वडलांचीच >> आवडले.

मी सोलापूरला असताना भांडे गल्लीच्या जवळपास कुणाकडेतरी अशी ही पद्धत पाहिली होती. त्यांचा लाह्या, चणे-फुटाण्याचा घरगुती व्यवसाय होता. गुढी पाडव्याच्या आधी साखरेच्या गाठी आणि संक्रांती साठी रेवड्या, हलवा सुद्धा ते तयार करून विकत असत. नाव विसरले पण त्यांच्या आजी मोठ्या लोखंडी पाटीमधे थोडे थोडे तीळ टाकून, मग पाक टाकून हाताने हलवा करत बसायच्या. फार कौशल्याचं काम हे.

हे फोटो पण आवडले. मस्त माहिती. आत्मा तृप्त झाला!! Happy

चांगली माहिती.

ते परातीत हलवा करायचा एकदा बघितलं होतं. साक्षात दंडवत वगैरे घालन्यासारखी कामं आहेत ती...

हलवा तयार करणे खरोखरीच अतिशय जिकीरीचे काम.पण माझी आई अजूनही घरी करते आणि मला आयता पाठवते. याशिवाय आमच्या घरची व्हेरिएशन म्हणजे मेव्याचा हलवा. काजू, बदाम, पिस्ता आदि वस्तूंचे बारीक तुकडे करून असाच काटा आणायचा. खूप चटके देणारे काम आहे ते. माझी आई आणि साबांमधे काँपिटिशन असते आणि मधल्यामधे आळशी मला छान खायला मिळतं. Wink

Pages