हम्मम्म.......... का...य?,शीर्षकावरून अंदाज आला असेलच ना..??? काय म्हणताय??? गाणं........? ''छो हो...! ते ऐकण्यापलिकडे माझा आणी त्याचा संमंधही नाहिये हो...'' मग गोड आणी काटा म्हणजे नवकाव्य किंवा पाककृती वगैरे........? मग मी म्हणेन-''राम राम राम...आपला आणी त्याचाही काहि संमंध नाहि हो....'' मग आहे तरी काय???'' ---
हांsssssssss
अत्ता खर्री मज्जा येणार सांगायला....! अवो,आज संक्रांत आहे ना...!, मंग ह्यो गोड...काटा म्हणजे,आपला साखर/तीळ हलव्याचा काटा हो......! हां,अता संक्रांतीला तस बरेच काटे न वरा आणी काय को???,,,आपलं सॉरी...ते..हे.. बाय को...(तरी गॅप पडली...)तर..तसे बरेच काटे, नवरा आणी बायको ...यांच्यात यायचे.
पूर्वी काळ्या साड्या(अत्यंत उठावदार काळ्या शेड्स निवडून) आणल्या/घेतल्या जायच्या... हल्ली काय काय होत असावं बरं.......??? आंम्ही काय सांगणार.आमचं ते क्षेत्र (म्हणजे विवाहित असण्याचं
) निर्माणच नाही झालेलं अजून ;-).तरी सामान्यतः काहि ना काहि खरेदीच्या निमित्तानी हे काटे उभयता येत असणारच.नवविवाहितां चे प्राचीन हळदी/कुंकू समारंभ आता इतर रुपानी साजरे होत असणार.काळ भराभर बदलला,तरी मूल्य माणसाबरोबरच बदलतात...असो.
मला ना ह्या काटेरी हलव्याबद्दल लहान पणा पासून कुतुहल होतं....एकतर खाण्याचीच गोष्ट करायची झाली तर,ह्या काटेरी हलव्यात खाण्यापेक्षा तो शक्यतो दुसर्यांना देऊन,त्याबदल्यात तिळगुळाचे लाडू/वड्या या मिळविण्याकडे कल असायचा. आणी आंम्ही अजुन येक बेरकीपणा करायचो.संक्रांतिच्या दिवशी संध्याकळी १/२ रुपायची ही हलव्याची पुडी,आमच्या ग्यांगमधे प्रत्येकी १ घेतली जायची.आणी २ रुपायचं साधारण किलोभर खडेमीठ सगळ्यांमधे वाटून दिलं जायचं...गल्लीत अंधार पडला की समोरच्याकडून तिळगुळ/हलवा असं जे काहि मिळेल ते उकळायचं आणी देणारा किंवा री मर्जीतली नसली की अंधारात परत हलव्याच्या जागी खडेमीठ टेकवायचं...आणी सटकायचं.त्यामुळे ते खडेमीठ खरोखर ''जिरवणे'' ह्या एकाच कामासाठी तेंव्हा वापरलं जायचं. त्यामुळे माझ्यातरी या हलव्याबद्दलच्या अठवणी अगदी मोहक वगैरे नसल्या,तरी अगदीच काटेरीपण नाहियेत. तरी वर मी म्हटलेलं काट्यांबद्दलच कुतुहल होतच.आणी या वर्षी ते कुतुहल सुटायचा योग आला.
पर्वा मंडई मधे विड्याच्या पानांचा गाळयातून पानं घेतली आणी मधल्या गोलाकडे जाणार्या पायर्यांजवळचा १ तास करंट देणारा आमचा ''कट्टर च्या...'' मारला आणी बाहेर पडलो..तर सहजच लक्ष एका जुन्या गुडदाणीच्या गाडिकडे गेलं.कच्च्या अखंड शेंगदाण्याची साखरेतली चिक्की इथे अनेकदा घेतलेली. आज तिच्याबरोबर कडेलाच हि हलव्याची पाकिटं रचलेली पाहिली.आणी पावलं तिकडे सरकली.आमची पेटंट पावशेर साखर/दाण्याची चिक्की घेतली आणी त्या वयस्कर गुडदाणीवाल्यांना (श्री.ढेंबे) विचारलच मी, ''काय हो ? हा काटेरी हलवा,साधा आणी रंगीत करताना...रंग नंतर मारतात की पाक करताना त्यात टाकतात?'' गुडदाणीवाल्या अजोबांनी माझ्याकडे पाहिलं,आणी,''चौकस गिर्हाइक आलं...'' अश्या नजेरेनी माझ्याकडे बघुन त्यांच्या कसबा पेठेतल्या गुडदाणी/काटेरी हलवा/राजगिरालाडू+वड्या इत्यादी प्रकार करण्याच्या कारखान्याचं व्हिजिटिंग कार्ड माझ्या हतात ठेवलं. मग काय इचारता...मी लगेच पुढच्या एका दिवशी न्यूज रिपोर्टरच्या वेशात नसलो,तरी त्या आवेशात तडक तिकडे निघालोच...मग तो कसब्यातला कारखाना,आणी त्या अजोबांचा व्यवसाय पुढे हिमतिनी चालवणारा त्यांचा मुलगा (श्री.महेश ढेंबे) यांना गाठलं,नमस्कार चमत्कार जाहले...आणी त्यांच्या कडून एकंदर या व्यवसायाची जमेल तितकी माहिती,या हलवा बनविण्याच्या पूर्वीच्या आणी चालू प्रोसेस सकट त्यांच्याकडून मिळवली.त्याही माणसानी मला अगत्यानी माहितिही दिली आणी आत कारखान्यातले फोटोही...! (रिपोर्टरचं बेअरिंगच आपण तसं पकडलवतं भें.....डी!!!
)
चला तर अता आपण पाहू ह्या काटेरी हलव्याची छोट्टिशी प्रोसेस... पूर्वी हे काम कोळश्याची छोटि शेगडी घेऊन केलं जायचं...आधी लालबुंद कोळश्याच्या चुल/शेगडीवर एक पितळ्याची परात ठेवायची.नंतर ती चांगली तापली की त्यावर बिनसाली/पांढरे तीळ टाकायचे मग ते तडतडायला/उडायला लागले की नंतर त्यात साखरेचा हळूहळू दाट करत अणलेला पाक एका बाजूनी हळूहळू सोडायचा आणी त्याच वेळी पसरट हतानी वरच्यावर तो पाक तीळांभोवती लगडत असताना हलवायचा. हां...!!! फार पटकन होणारी गोष्ट वाटते की नै..? पण तसं नाय हां.यातलं तंत्र फार डेंजर हाय...
१)आधी त्या पाकात तयार होताना काटा चांगला पडावा आणी हलवा शुभ्ररंगाचा व्हावा म्हणून लिंबू सत्व आणी हायड्रो पावडर या २ गोष्टी मिसळणे हे पहिलं तंत्र.
२)आणी नंतर तीळ जळू न देता एका वेळी परातिभोवती चार/चार बायका हात भाजत भाजत आळीपाळीनी हा हलवा चांगला कडक काटेरी होई पर्यंत करत असत...हे दुसरं तंत्र....
ही दोन यातली महत्वाची तंत्र जमली तर तयार होतो तो हलवा,नायतर मात्र उरतो,तो काटाच....! अता ही जुनी पद्धत बाद झाली आहे.कारण तापत्या तांब्याच्या गोलाकार भट्टीत हा खेळ एकत्रच होतो... कसा ते बघू आपण. (ही भट्टी बनवण्याची कल्पना-महेश ढेंबे यांच्या वडलांचीच...)
सर्वात अधी मोठ्ठ्या गॅस चुल्हाण्यावर पाक करायला घेतात
साखर विरघळेपर्यंत पाक करण्याची क्रीया मात्र संथ असते,दमाचं काम हाय त्ये...!
मग पाक पहिली तार धरत आला की त्यात लिंबू सत्व आणी हायड्रोपावडर टाकतात...
मग बघा पाक कसा ट्रान्स्फरंट पा.........क होतो ते.
अता आपण त्या महाकाय काँक्रीट मिक्सर सारख्या-कढईचं दर्शन घेऊ...
केव्हढी आहे ना...!? मी पण बसेन आत 
ह्या फिरत्या कढईच्या खाली मोठ्ठा गॅस बर्नर लागलेला आहे...
नंतर तापलेल्या कढईत तीळ टाकून हा असा पाक त्यात ''लावला'' जातो.
आणी मग जरा वेळानी तीळावर कोटींग होत होत तयार होतो. तो हा अस्सा पांढरा शुभ्र...काटेरी हलवा
अता या हलव्या पासून तयार होणारे हार/दागिने पहा....

शिवाय इथे होणारे तिळ गुळाचे लाडू
आणी हा..........रंगीत हलवा.
गोडाऊन मधे लागलाय ...मार्केटला जायला...
असा हा गोडवा वाढवणारा तिळगूळ आणी काटेरी हलवा. दिवसेंदिवस महागाईचा काटेरी मुकुट घालून आपल्याकडे येत असला,तरी तोंडात टाकल्यावर जो पर्यंत गोड लागतो आहे,तो पर्यंत त्या(महागाई)चा ''काटा'' सहन करायला हरकत नाही....नाही का??? 

=========================================================================
मस्त रे अ आ. भट्टीची कल्पना
मस्त रे अ आ.
भट्टीची कल्पना भारीच आहे.
सह्हीच
सह्हीच
इतक्या वेळा वाचले पण लक्षात
इतक्या वेळा वाचले पण लक्षात नाही आले की कुठली कृती आहे. वाटले काहीतरी लेख आहे बोरींग असेल.
मस्त प्रकार आहे. केवढी ती मेहनत.. व त्या काम करणार्यांना कितीसे मिळत असतील पण?
पुर्वी पणजी घरी बनवत तापल्या तव्यावर तीळाचा दाणा टाकून्(आपन काही पैदा न्हवतो झालो तेव्हा... ) ..
@झंपी-वाटले काहीतरी लेख आहे
@झंपी-वाटले काहीतरी लेख आहे बोरींग असेल.;-) >>> छान बेअरिंग घेता तुंम्ही
मस्त! लेख आवडला. गोSSSड
मस्त! लेख आवडला. गोSSSड झालाय.
वा, सविस्तर लिहिलेय. माझी आई
वा, सविस्तर लिहिलेय. माझी आई पण घरी करायची. थोड्याच तिळाचा भरपूर होतो तो.
अरे वा.. या हलव्याबद्दल
अरे वा.. या हलव्याबद्दल नेहमीच उत्सुकता होती कसा करत असावात याबद्दल.. खूप छान रंजक पद्धतीने सविस्तर माहिती सांगितलीस ,जोडीला अतिशय स्पष्ट आणी सुपर्ब फोटोज..
मस्त लेख. कोणी घरी हलवा करतात
मस्त लेख. कोणी घरी हलवा करतात का अजून? तो चुलीवर्/स्टोव्ह वरच करता येतो की गॅसवर पण जमतो?
अरे व्वा ! मस्त माहिती. हलवा
अरे व्वा ! मस्त माहिती. हलवा बनवायची पद्धत पहिल्यांदाच कळली.
छान माहिती. सचित्र बघायला
छान माहिती. सचित्र बघायला मिळालं. जिकरीचं काम आहे हे, हाताने करणार्यांना _/\_
छान लेख. फोटो पण छान. सुमेधा,
छान लेख. फोटो पण छान.
सुमेधा, माझी आई करायची गॅसवर. फार हौसेचे काम आहे. एकदा करायला घेतला आणि झाला असे होत नाही.
तो पहाटेच थंडीच्या वेळीच करावा लागतो. परातीला पाक चिकटला कि ती धुवून कोरडी करावी लागते. आणि परत सुरवात करावी लागते. घरच्या हलव्याचा काटा नाजूक आणि सुंदर दिसतो.
मस्त लेख आणि फोटो! मी लहान
मस्त लेख आणि फोटो!
मी लहान असताना आई करायची घरी हलवा. संक्रांतीच्या जवळ जवळ १५ दिवस आधी सुरुवात करायची. रोज थोडा थोडा करायची. फार सुरेख असायचा तिचा हलवा. मी साधारण ४थीला होते तेव्हा माझा स्कॉलरशिपचा अभ्यास, बहिणीचा अभ्यास, इतर वाढलेले व्याप यामुळे मग तिचे घरी हलवा बनवणे बंद झाले. तो पर्यंत विकतचा हलवा मिळू लागला होता त्यामुळे घरी करण्याची फारशी आवश्यकताही उरली नव्हती.
छान माहिती ... खरं तर
छान माहिती ... खरं तर वडीपेक्शा याला मेहनत जास्त वाटते पण देताना वडी जास्त भाव मारून जाते. शेवट्चा फोटो खूप आवडला. मस्त रंगसंगती.
माझी आई बनवते तिळाचा हलवा
माझी आई बनवते तिळाचा हलवा घरी...अतिशय सुंदर....ती सर बाहेर मिळणाऱ्या साखर फुटाण्या ना नाही!!! मोठच काम आहे हलवा बनवण म्हणजे.. patience लागतात बरेच... निदान ४-५ दिवस जातात....सकाळी थंडीत उठून करावा लागतो..म्हणजे सुंदर काटा येतो...उन्हाच्या वेळेला काटा तितका नाही चांगला येत.... आणि हात पण भाजून घ्यावे लागतात...कारण चमच्याने हलवला कि काटा मोडतो! मी पण मदत करायचे पूर्वी तिला...पण तिळावर नाही..चुरमुरे, शेंगदाणे, बडीसोप ह्यावर :)..मला फार हौस वाटते ह्या हलव्याची....हि म्हणजे सुगरण पणाची अत्युच्च कसोटी वाटते मला...पण हल्ली try सुद्धा करायला वेळ नसतो!
सुमेधा, gas वर पण येतो
सुमेधा, gas वर पण येतो बनवता...मंद आचेवर....माझी आई आधी gas वर तवा ठेवते आणि त्यावर पितळी परात ठेऊन त्यात करते...
@ अंजली --मला तर वडी पेक्षा जास्त हा घरी केलेला हलवाच आवडतो
तिळगुळ घ्या...
तिळगुळ घ्या...
छान माहिती. सचित्र बघायला
छान माहिती. सचित्र बघायला मिळालं. जिकरीचं काम आहे हे, हाताने करणार्यांना _/\_ >>>>>+११११११
छान माहिती.
छान माहिती.
मस्त माहिती. मी ऐकलं होतं
मस्त माहिती. मी ऐकलं होतं सा.बां.कडून, पण कधी प्रत्यक्ष पाहिले नव्हते.
शेवटचा फोटो एकदम मस्त !
आत्मबंध---------/\.--------
आत्मबंध---------/\.--------
@पुरंदरे शशांक, क्रिश्नन्त,
@पुरंदरे शशांक, क्रिश्नन्त, आशिका, सायु:- तिळगूळ घेतलेल्या सर्वांना धन्यवाद.
साडी घेतलीत का नाही वहिनींना?
साडी घेतलीत का नाही वहिनींना?
@डोंगरवेडा >>> असो!
@डोंगरवेडा >>> असो!
साडी घेतलीत का नाही
साडी घेतलीत का नाही वहिनींना?>>> लग्नानंतरचा पहिला सण संक्रांत आला तर तो पुढच्या व र्षी करतात हो

आत्मबंध
Pages